झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिरो परीक्षण
ह्या धाग्यावर एक निरीक्षण
--->
धागा आधी चित्रपट विषयी म्हणजे ग्रुप चित्रपट ओके
मध्यांतरात प्रतिसाद राजकारण विषयी म्हणजे ग्रुप झाला राजकारण भारतात
आणि आता गप्पा इतक्या रंगल्यात की हे गप्पांचे वाहते पान वाटू लागलं आहे Proud

नवीन वर्षात ( सुरुवात ) एकदम रागवण्या आधी जरा शांतपणे विचार करुन मग लिहावे असा संकल्प आजपासुन केलाय. होप, तो कायम राहो.>> बाकी काही नाही.. पण हे एकदम बेस झाले.
अभिनंदन आणि शुभेच्छा... जमेल तुम्हाला नक्की. Happy

IMDB रेटिंग बघा
सिमबा imdb -5.8
झिरो - 6.2
ठुग्स -3.5
रेस 3 -2.1

ज्जे बात च्रप्स.
Box office चे आकडे दाखवून सिनेमा चांगला की वाईट ठरवणार्‍या प्रेक्षकांना चपराक.
Rotten Tomato वर सुद्धा झीरो चा ऑडियन्स स्कोर 87% आहे आणि simmba चा फक्त 39%. Lol

ऋन्मेऽऽष भाऊंचे ह्या मुद्द्यावर विवेचन ऐकायला आवडेल. पाच दहा वर्षानंतर सिनेमांची नावे आणि कलाकारांचे परफॉर्मन्सेस लक्षात राहतात... कलेक्शनचे मीडिया मध्ये फुगवून सांगितलेले आकडे नाही. Proud

ऋन्मेऽऽष भाऊंचे ह्या मुद्द्यावर विवेचन ऐकायला आवडेल. >>>>

हो ना, त्यांचा दांडगा व्यासंग आहे अभ्यासपूर्ण मते मांडण्यात. धाग्याच्या विषयात तर त्यांनी पीएचडी केलेली असल्याने त्यांचे मत आवर्जून वाचावे असेच आहे. वाचक कंटाळू नये, त्याचे लक्ष भरकटू नये , धागा सोडून तो पळू नये म्हणून आपले मत ते भरपूर शब्दांचा वापर करून त्या शब्दभांडारात कुठेतरी लपवून ठेवतात. उत्सुक वाचक त्या शब्दांचा कापूस पिंजून त्यांचे अलौकिक मत शोधताहेत हे दृश्य माबोवर अनेकदा दृष्टीस पडते.

हो ना, त्यांचा दांडगा व्यासंग आहे अभ्यासपूर्ण मते मांडण्यात. धाग्याच्या विषयात तर त्यांनी पीएचडी केलेली असल्याने त्यांचे मत आवर्जून वाचावे असेच आहे. >> हो मग! कोई शक?

वाचक कंटाळू नये, त्याचे लक्ष भरकटू नये , धागा सोडून तो पळू नये म्हणून आपले मत ते भरपूर शब्दांचा वापर करून त्या शब्दभांडारात कुठेतरी लपवून ठेवतात. उत्सुक वाचक त्या शब्दांचा कापूस पिंजून त्यांचे अलौकिक मत शोधताहेत हे दृश्य माबोवर अनेकदा दृष्टीस पडते.>> यालाच धागा भरकटू न देणे म्हणतात. तो भरकटला तरी तुम्ही टोमणे मारणार... भरकटू नये म्हणून प्रयत्न केले तरी बोल लावणार.. विषयाबद्दल आस्था कळकळ असणार्‍या गरीब बिचार्‍या वाचक/लेखकाने करावे तरी काय? Sad

IMDB रेटिंग बघा
सिमबा imdb -5.8
झिरो - 6.2
ठुग्स -3.5
रेस 3 -2.1

Box office चे आकडे दाखवून सिनेमा चांगला की वाईट ठरवणार्‍या प्रेक्षकांना चपराक.
Rotten Tomato वर सुद्धा झीरो चा ऑडियन्स स्कोर 87% आहे आणि simmba चा फक्त 39%. Lol

√√√√√√

मी एक सामान्य चित्रपटरसिक आहे. हे IMDB रेटिंग नाव ऐकून आहे ! पण काय असते मला कल्पनाही नाही.
Rotten Tomato हे तर मला ते जेवण ऑर्डर करायचे झोमॅटो वाटले पटकन. नावही हे पहिल्यांदाच ऐकलेय मी.

थोडक्यात मी जाणकार नाहीये. अभ्यासू तर मुळीच नाहीये. मी तसा कधी आवही आणत नाही.
पण एक गोष्ट आहे माझ्यात. ती म्हणजे माझ्यातील प्रामाणिकपणा. मी शाहरूखचा चाहता असल्याने त्याच्यातील चांगल्या बाबींना डोक्यावर उचलून धरतो. त्याचे पोवाडे गातो. पण वाईट बाबींना लपवत नाही.

झिरो कुठे कमी पडला असेल, बॉक्स ऑफिसवर हा पिक्चर फेलही गेला असेल. त्याला जबाबदार शाहरूख असेलही....

पण ....

कोणी चित्रपट न पाहताच हे ठरवत असेल, केवळ शाहरूखचा चित्रपट आहे म्हणून त्याला झोडायला येणार असेल आणि शाहरूखला निवृत्तीचे सल्ले वगैरे देणार असेल तर त्याला या चाहत्याशी सामना करावाच लागणार.

तसेच मुद्दामहून नकारात्मक परीक्षण/पोस्ट लिहीणार असेल, जे आजकाल फार चालते, तर तिथेही विषयाला धरून मी माझा मुद्देसूद विरोध नोंदवणारच.

राहिला प्रश्न सिंबाशी तुलना करायचा, तर मला प्रत्येकाच्या अभिरुचीचा आदर आहे. माझ्या एका मित्राला शाहरूखपेक्षा जास्त शक्तीकपूर आवडतो. अगदी त्याच्याही अभिरुचीचा मी आदर करतो. तर सिंबासारख्या व्यावसायिक मसालापटाशी झिरोसारख्या एका प्रयोगशील कलाकृतीची तुलना न करता मी दोन्हीकडच्या प्रेक्षकांचा आदरच करणे पसंद करेन.

मला बॉक्स ऑफिस आकड्यांशे काही घेणेदेणे नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे शाहरूखच्या पुढच्या दहा चित्रपटांनी झिरो कमाई केली तरी काल आज आणि उद्याही तोच सुपर्रस्टार राहणार आहे.

तरी या धाग्यावर खुद्द धागाकर्त्यांनी बॉक्स ऑफिस आकडे आणून झिरो कसा फ्लॉप होतोय याचे विवेचन सुरू केले आणि लोकांनाही त्या आकड्यावर चर्चा करायचे आव्हान केले म्हणून मी त्यात उतरलो ईतकेच.

तर कोण्या सिंबाची रेघ छोटी दाखवून झिरोची रेघ मोठी बनवण्यात मला रस नाही. शाहरूख आज त्या ऊंचीला पोहोचला आहे जिथे त्याची स्पर्धा त्याच्याशीच आहे. त्याला दगड मारणारयांची दगडेही आता तिथवर न पोहोचता गुरुत्वाकर्षणाने परत येऊन मारणारयावरच आदळत आहेत. मी फक्त ती मधल्यामध्ये झेलत आहे ईतकेच Happy

तरी या धाग्यावर खुद्द धागाकर्त्यांनी बॉक्स ऑफिस आकडे आणून झिरो कसा फ्लॉप होतोय याचे विवेचन सुरू केले आणि लोकांनाही त्या आकड्यावर चर्चा करायचे आव्हान केले. >> तोही चित्रपटावरील चर्चेचाच भाग होता ना. 500 कोटी झाले तर चर्चा होते, तसचं.

मी असे कुठे म्हणालो तो नव्हता? >>
मग इतका त्रास का करून घेताय? Zero बघितला तुम्ही?
मला बघायचाय.. कसाही असला तरीही.. खरं तर पहिल्याच दिवशी बघायचा होता.. पण कुणीच सोबत यायला तयार नाही.. Sad

Zero बघितला तुम्ही?
+++

याचे उत्तर मला स्वतंत्र धाग्यात द्यायला आवडेल

< पण कुणीच सोबत यायला तयार नाही.>
चित्रपटाबद्दल लोकांना काय वाटतंय याबद्दल हे वाक्य खूप काही सांगून जातंय.

मला वाटतं शाहरुख खान फॅन क्लबच्या अध्यक्षांनी अशा एकट्या दुकट्या पडलेल्या फॅन्ससाठी शाखाफिल्म गटग (माबोस्पेशल शब्द - एका लांबलचक चर्‍हाट प्रतिसादाची सोय) आयोजित करायला हवं.

< पण कुणीच सोबत यायला तयार नाही.>
चित्रपटाबद्दल लोकांना काय वाटतंय याबद्दल हे वाक्य खूप काही सांगून जातंय.

*****

ईथे कोणीतरी एक वाक्य लिहिले. ते खरे खोटे त्यामागचा संदर्भ काहीच जाणून न घेता तुम्ही थेट जगभरातल्या लोकांना चित्रपटाबद्दल काय वाटते हा निष्कर्श काढून मोकळा झालात हे आवडले.
याला म्हणतात ऑनलाईन शितावरून भाताची परीक्षा Happy

>चॅम्प, सदस्यनाव चमनचे हायझेनबर्ग बदलून 4-5 वर्षे तरी झाली.

^^^^^

होय का? बापरे
पण म्हणजे तेच तुम्ही ना?
पण तुम्ही जी व्यासंगी तलवार चालवत होतात ते अजून लक्षात आहे
काय आता कोणाच्या नादाने काय करू लागला भाऊ
लेटेस्ट अनुभव माहिती येऊ द्या, पुन्हा एकदा व्यासंगी लिहिते व्हा
आता हे जे काही सुरू आहे त्याला अंत नाही आणि अर्थही नाही
रिकाम्या ### ची कामं नका करू, इतके पोटेन्शशियल असताना
बाकीच्याना काय करायचं ते करू द्या, तुम्हाला म्हणून कळकळीने सांगतोय
बाकी कोणाला मी असले काही सांगायलाही जात नाही

आशु, राहू दे
त्यांना असे काही लिहिले की ते मी व्यासंगी नाहीच आहे म्हणून अजून हटून बसतात,

झिरो न पाहण्याची कारणे असा धागा आला की त्यावर हे लोक भाताचे वेगवेगळे प्रकार सादर करू शकतील.>>> काय हसलेय.... खालुन करपलेला मधून आसट व वर कच्चे तांदूळ असा हा भात आहे. पाणी उकळून वाहुन गेल्याने गॅस विझला आहे व इंडक्षन कुकर शॉर्ट झाला आहे. अजून हसतेच आहे. क्काय हा प्रतिसादे... वर्थ इट.

मला बघायचाय.. कसाही असला तरीही.. खरं तर पहिल्याच दिवशी बघायचा होता. >>>>>>> DShraddha, म्हणजे तुम्हीसुद्दा शाखाफॅन आहात का?

चँप,
व्यासंग वगैरे मोठे शब्द झाले पण तुम्हाला मायबोलीवरील लिखाण म्हणायचे असेल त्याबद्दल दोन मुद्दे लिहीन
१) आयडीच्या लिखाणावरून किंवा कधीमधी झालेल्या भेटींवरून आयडीमागील खर्‍या व्यक्तीचे कॅरॅक्टर जोखण्याची चूक करू नका. (मी एकदा करून बसलो)
२) दिखाओपे मत जाओ अपनी अकल लगाओ थोडक्यात दिखाऊ शब्दांऐवजी हेतूला (जो डोकं लावल्याशिवाय लक्षात येत नाही) महत्व द्या.

कळकळ पोचली... ती व्यक्त केल्याबद्दल खरंच मनापासून खूप आभारी आहे... तुम्हाला ती व्यक्त करावीशी वाटली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आता मायबोलीला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आणि असलं तरीच देण्याची ईच्छा आजिबात नाही... आता फक्त घ्यायची.... मज्जा!

आता हे जे काही सुरू आहे त्याला अंत नाही आणि अर्थही नाही >> पण त्यात मज्जा आहे.. निदान माझ्यासाठी तरी, कारण ही मज्जा मी पूर्वी अनुभवली नव्हती. अनेक वर्षे मायबोलीचा प्रोटोकॉल सांभाळत, आदर देत घेत लिहिले. आता त्या प्रोटोकॉल सांभाळण्याचा कंटाळा आला आणि आदर तर आता घंटा कोणाबद्दल वाटत नाही. आता प्रोटोकॉल नाही की आदर नाही फक्त मज्जा आणि मज्जा!!

न आवडून/कंटाळून/ वैतागून मायबोली सोडून अनेक जण जातात मी ईथेच राहून हवी तशी मज्जा करण्याचे आणि घेण्याचे ठरवले आहे.
कदाचित तुम्हाला पटणार नाही आणि आवडणार तर त्याहूनही नाही.. पण पटावे/आवडावे असा आग्रह नाही पुन्हा सांगेन......
दिखाओपे मत जाओ अपनी अकल लगाओ.

हायजेनबर्ग, मी या धाग्यावरून आधीच रजा घेतली होती, बऱ्याचदा एका आयडीने उचकवायचा प्रयत्न केला, पण तुमचा प्रतिसाद वाचून राहवलं नाही.
आयुष्यात कुणाला खरंच थोड्या भेटीगाठींवरून ओळखू नका, जोखू नका. कारण कोण कधी खरं रूप दाखवेल नाही सांगता येत. होतात चुका या, पण यातून आपण आपलं माणूसपण सोडलं तर समोरची व्यक्ती जिंकली, असंच ना? आपण चांगले होतो, तर समोरच्याच्या वाईटपणाविषयी का आपण वाईट व्हावं? हे मी का कळकळीने सांगतोय, कारण एक चांगला माणूस ओळखली जाणारी व्यक्ती कुणा दुसऱ्यासाठी वाईट होणं खूप वाईट असतं.
हायजेनबर्ग या धाग्यावर तुम्हाला कधीही मी समोरच काय, आडूनही बोललो नाही. त्या एका आयडीपेक्षा तुम्ही जास्त धुमाकूळ घातलाय, तरीही नाही. मी बोलणारही नाही, कारण सर्वात आधी मी तुमचा आदर करतो आणि नंतर मला तुमचा हेवा वाटतो.तुमचं अफाट डिटेलिंग, भाषेवर प्रभुत्व आणि अष्टपैलू लेखन असलेला लेखक मायबोलीवर विरळाच. आणि तुमचा उद्वेग बघून मला खूप वाईट वाटलं, केलंही असेल कुणी वाईट, पण तुमची अवस्था बघून त्याला वाईट वाटत नसेल, तर तो खदाखदा हसत असेन, बघा कसा हायजेनबर्ग संपवला!
मज्जा घ्यायची असेल तर जरूर घ्या, पण तुमचं जुनं लिखाण आठवणारे हळहळत राहतील. तुमची वाट बघत राहतील!
आणि याला अंत कुणी दुसरं कुणी करू शकत नाही. तो आपला आपल्यालाच करायचा असतो. उद्या तुमचं एखादं सुंदर लेखन येऊ दे, बघू अंत होतो, की पुन्हा सुरुवात...
असो! काळजी घ्या! लिहते व्हा!

>>पण त्यात मज्जा आहे
खरंच हाब? मला तर हा स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करायचा प्रकार वाटतो.
पूर्वीचे हाब पुन्हा लिहिते व्हावेत म्हणून विनंती करणाऱ्यात +१

पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आता मायबोलीला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आणि असलं तरीच देण्याची ईच्छा आजिबात नाही
>>> कुठे लिहिणार आहात त्याची लिंक देत चला मग. तिकडे वाचायला येऊ.

झिरो धागा स्थलांतरीत होऊनही त्याच्या ३५० + पोस्ट झाल्या..

सिंबाच्या अजून ५० नाही झाल्या. त्यातही दहाबारा पोस्ट तिथेही झिरोचीच चर्चा झाल्यामुळे जमल्या. शतक तर दूरच आहे अजून. त्यातही झिरोने मदत केली तरच शक्य होईल.

झिरो मायबोलीवर हिरो ठरत आहे Happy

यू कॅन हेट हिम यू कॅन लव्ह हिम बट यू कॅनॉट इग्नोर हिम पुन्हा एकदा खरे ठरत आहे Happy

> पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आता मायबोलीला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आणि असलं तरीच देण्याची ईच्छा आजिबात नाही... > सांगितल्याबद्दल आभार.

> आता फक्त घ्यायची.... मज्जा! > सांगायचा काहीही हक्क, अधिकार नाही माहित आहे तरीही लिहीतेय. फुकटचा सल्ला, कळकळीची विनंती, काय वर्कआऊट/अराऊंड होऊ शकतं याचे अनुभवातून मिळालेले शहाणपण यापैकी काहीतरी एक किंवा तिन्हीचे मिश्रण समजा.
टेक अ ब्रेक फ्रॉम माबो. रोमात जा किंवा वाचूदेखील नका. इथे जो वेळ जातो तेवढ्याच वेळात दुसरे काहीतरी करत जा, जे करण्यातून आनंद मिळतो/ जे बरेच दिवसांपासून करून बघायचे होते पण काहीनकाही कारणाने राहून गेले.

धागा हाब वर घसरला आहेच तर आणि सगळे आपली मते मांडत आहेत तर मी पण -
मला हे नवीन हाब सही वाटतात, आवडतात प्रतिसाद त्यांचे.
बादवे -माबो वर सगळे बॉट्स आहेत असे समजून राहिलात तर इमोशनली हर्ट ( जर झाला असला तर) नाही होणार कधीच.
प्रतिसाद हा फक्त प्रतिसाद म्हणून बघितला आणि कोणी लिहिलाय हे नाही बघितले तर आनंदी राहाल इथे सगळे.
एखाद्या आयडी चा जो प्रतिसाद आवडत नाही विरोध करा, जे प्रतिसाद आवडतात सपोर्ट करा.

>>आता प्रोटोकॉल नाही की आदर नाही फक्त मज्जा आणि मज्जा!!<<
अभिनंदन, या स्टेजला इतक्यात पोचल्याबद्दल. माबोच्याच शब्दात सांगायचं झालं तर झक्किफिकेशन (i.e. झेनिफिकेशन) च्या या स्टेजपर्यंत पोहचायला तपश्चर्या लागते. Proud

आपले विचार आपण कोणापुढे मांडतोय, ते नीट पोहचतायत कि नाहि (गाढवापुढे...) याची सर्वसाधारण क्ल्पना यायला लागली, वैचारीक(?) गाढवं ओळखु यायला लागली कि मग, यु गेट युज्ड टु गिविंग ए कोल्ड शोल्डर वेनेवर्/वेरेवर नीडेड. आणि हे एकदा जमलं (लर्न्ट टु स्टॉप स्वेटिंग स्माल स्टफ) कि मग तुम्ही म्हणता तसं "मौजा हि मौजा"...

झिरो मायबोलीवर हिरो ठरत आहे
>>> चूक.. इथे लोक शिव्या घालत आहेत की.
बादवे - झिरो चांगला चित्रपट आहे पण 2018 मधल्या चित्रपटांच्या तुलनेत खूप मागे आहे. सोनू के टीतू की स्वीटी पडमन, पद्मावती हे खूप उजवे ठरतात.
स्त्री, बधाई हो, राझी ,अंधाधून यांच्याशी तर कॉम्पितिशनच नाहीय झिरोची. सॉरी रूनमेश - झिरो फेल्ड ऑन बीओ आणि हेच सत्य आहे.

Pages