झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Simbaa मुळे इम्पॅक्ट होईल झिरो वर. अनुष्का ला आणि कतरिनाला बघायला लोक जाणार नाहीत पण सारा ला बघायला नक्की जातील थेटरात.. मी पण जाणार आहे ☺️

वीएफेक्स ईफेक्ट पायरेटेड सीडीवर चांगले न दिसलयाने लोक नावे ठेवत आहेत...
>>>>

ही शक्यता आहे.
बहुतांश लोकं हल्ली पायरेटेड कॉपी बघतात. ट्रेनमध्ये येता जाता गर्दीत लोंबकळत धक्के खात टॉयलेट सीट वर बसून लेक्चरला मागच्या बाकावर सकाळी ब्रश करता करता चहा पिता पिता एका हाताने मांडीवरच्या बाळाला दूध पाजता पाजता गार्डनमध्ये खेळणारया पोरावर लक्ष ठेवता ठेवता अगदी वाटेल तिथे वाटेल तेव्हा थोडा थोडा पिक्चर मोबाईलच्या स्क्रीनवर सडियल प्रिंट बघतात आणि मग झिरो झेपला नाही आणि वीएफएक्स खराब होते बोलतात अश्यांचे काय मनावर घ्यायचे....

जर खरेच एवढ्या लोकांनी थिएटरला पिक्चर पाहिला असता तर आताच चारशे करोड झाले असते असे माझे आकडे सांगतात.

पण एक मात्र नक्की आहे, शाहरूखचे सिनेमे सर्वाधिक लोकं बघतात.
कारण शाहरूख हा नुसता बघण्याचाच नाही तर बोलण्याचाही विषय आहे. आणि बघितल्यावर आणखी छानपणे चर्चेत भाग घेता येते.

बरोबरे. फक्त पायरेटेड सिडीत थोडी कथा टाकली असती तर लोक परत थेटरात गेले असते चांगले इफेक्ट्स बघायला. मी मात्र ट्रेलर बघूनच काय ते समजले. असो.
Submitted by साधना on 26 December, 2018 - 22:16

***********
#####

हे मी बरेच जणांच्या तोंडून ऐकले आहे.
कॅन एनीबडी ईन दी वर्ल्ड एक्स्प्लेन मी की लोकांना ट्रेलर बघून चित्रपटात कथा आहे की नाही हे कसे कळते??

बरोबरे. फक्त पायरेटेड सिडीत थोडी कथा टाकली असती तर लोक परत थेटरात गेले असते चांगले इफेक्ट्स बघायला. मी मात्र ट्रेलर बघूनच काय ते समजले. असो.+११११११११११

ट्रेलर बघून चित्रपट चांगला की वाईट ठरवणे चूक आहे.
एन्काऊंटर the किल्लिंग नावाचा एक चित्रपट मी कॉलेजात फर्स्ट डे फर्स्ट शो पहिला होता - नसिरुद्दीन शाह चा.
त्याचा ट्रेलर इतका बंडल आहे पण चित्रपट 100 नंबरी सोने आहे.

चला मंडळी, सगळी आकडेवारी मांडून झाली. आता तर झिरो खूप जुना झालाय माझ्यासाठी...
पुढील आकर्षण सिमबा...
त्याचा रिव्ह्यू मी शनिवारी देईनच... नक्की...
तर आता या धाग्यावरून मी रजा घेतोय. राहिलेल्या कथा पूर्ण करायच्या आहेत. नवीन लेखन करायचंय...
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद!!!
अधिक चर्चेसाठी विपु आहेच

सिंबा चा विषय इथे नको... पुन्हा धागा भटकायचा.. धागाकर्ते काहीच प्रयत्न करतांना दिसत नाहीयेत चर्चा झीरो / शाखा च्या रूळावर ठेवण्यासाठी Sad

बेकरीतून सुद्धा सिनेमा चांगला असल्याचा रिपोर्ट आला आहे.

बेकरीतून सुद्धा सिनेमा चांगला असल्याचा रिपोर्ट आला आहे.
>>>>>

कुठली बेकरी? पावाची?
आणि त्या रिपोर्टची लिंक कॉपीपेस्ट वगैरे काही असेल तर येऊ द्या या धाग्यावर ..

बेकरीतून सुद्धा सिनेमा चांगला असल्याचा रिपोर्ट आला आहे.
>>>>>

कुठली बेकरी? पावाची?
आणि त्या रिपोर्टची लिंक कॉपीपेस्ट वगैरे काही असेल तर येऊ द्या या धाग्यावर ..

बेकरीतून सुद्धा सिनेमा चांगला असल्याचा रिपोर्ट आला आहे.
>>>>>

कुठली बेकरी? पावाची?
आणि त्या रिपोर्टची लिंक कॉपीपेस्ट वगैरे काही असेल तर येऊ द्या या धाग्यावर ..

बेकरीतून सुद्धा सिनेमा चांगला असल्याचा रिपोर्ट आला आहे.
>>>>>

कुठली बेकरी? पावाची?
आणि त्या रिपोर्टची लिंक कॉपीपेस्ट वगैरे काही असेल तर येऊ द्या या धाग्यावर ..

एका अतिसामान्य नटाच्या फडतूस आणि आगापिछा नसलेल्या सिनेमावर इतकी चर्चा?
लोकांकडे बराच मोकळा वेळ आहे असे दिसत आहे.

एका अतिसामान्य नटाच्या फडतूस आणि आगापिछा नसलेल्या सिनेमावर इतकी चर्चा?
लोकांकडे बराच मोकळा वेळ आहे असे दिसत आहे.
नवीन Submitted by रिव्हर्स स्वीप on 26 December, 2018 - 23:47

#####

चूक चूक चूक ...

थोडा वेळ काढून पुर्ण चर्चा वाचली तर लक्षात येईल की फार उच्च दर्जाची चर्चा चालू आहे. सिनेमाच्या प्रत्येक अंगाला विविध दृष्टीकोणातून स्पर्श होतोय.

अर्थात न वाचताच टिका करायची असेल तर नुसते ट्रेलर बघूम चित्रपटावर टिका करण्यासारखेच होईल ते Happy

झिरो च्या आधीच त्याने राकेश शर्मा यांच्यावर बायोपिक साइन केलीये.

Submitted by अज्ञातवासी on 26 December, 2018 - 07:28>>>>>
तो सॅल्युट चित्रपट आमिरने सोडल्यामुळे शाखा ला मिळालाय
अन अमिरनेच रिकमेंड केलंय त्याला

चूक चूक चूक ...

थोडा वेळ काढून पुर्ण चर्चा वाचली तर लक्षात येईल की फार उच्च दर्जाची चर्चा चालू आहे. सिनेमाच्या प्रत्येक अंगाला विविध दृष्टीकोणातून स्पर्श होतोय>> +११११११११११११११११११११११११

वर कोणी तरी अनुराग कश्यपच्या रिव्ह्यूचा उल्लेख केला आहे. नॉर्मल केसमध्ये कश्यपच्या (त्याचं या क्षेत्रातील अँथोरिटी लक्षात घेता) शब्दावर विश्वास ठेवून, सगळा prejudice विसरून हा सिनेमा नक्कीच पाहिला असता, पण .............
कश्यपचं शाहरुखप्रेम पाहता ( त्या शिवाय Happy New Year सारख्या भिकार सिनेमात इतका चिप कॅमिओ रोल कोण करेल) या सिनेमाचा रिव्ह्यू पण आंधळ्या प्रेमातून आलेला असू शकतो. बाकी मला ट्रेलर आवडला नाही त्यामुळे नेटफ्लिक्स, प्राईम किंवा TV वर पहाणार.

झिरो हा सिनेमा प्रतिकात्मक आहे. शून्यातून शून्याकडे ही कथा मांडताना बिग बँग थिअरीपासून सुरूवात होते आणि हे संपूर्ण विश्व शेवटी कृष्णविवरामधे गडप होऊन शून्य होणार आहे. त्यामुळे जे काही चालू आहे ते सर्व मिथ्या आहे असा चित्रपटाचा संदेश आहे. मात्र हे सर्व त्यांनी मर्त्य मानवाच्या प्रतिकात्मक कथेतून मांडलेले आहे. बुटका मनुष्य हा उंच माणसापेक्षा शून्याच्या अधिक जवळ असतो असे म्हणतात. पण उंच मनुष्य ही जास्त उंच होत गेला तर शेवटी त्याचेही शून्य ठरलेलेच आहे.

या दोन्ही अंशातून शून्याचा घेतलेला वेध प्रेक्षकांच्या जाणिवा आणि नेणिवांना शून्य बनवून टाकते. ही प्रचंड ताकद दिग्दर्शकाने कमावलेली आहे. सिनेमाहॉल मधून बाहेर आल्यावरही प्रेक्षक थिजलेला असतो, शून्यवत झालेला असतो. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचत नाही. त्याची शून्य प्रतिक्रिया हेच या सिनेमाचे प्रायोगिक यश आहे.

सिनेमाहॉल मधून बाहेर आल्यावरही प्रेक्षक थिजलेला असतो, शून्यवत झालेला असतो. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचत नाही. त्याची शून्य प्रतिक्रिया हेच या सिनेमाचे प्रायोगिक यश आहे.>>>>> Rofl

अज्ञातवासी, तुम्ही म्हणताय ते खरे आहे. ओके ! अज्ञातवासी, सिंबा, व्हिबी आणी बाकी सार्‍यांचे म्हणणे पटले.

हायझेनबर्ग आणी व्हिबी, ऋन्मेषच्या बाकी बर्‍याच पोस्टस तशा सेन्सीबल असतात , काही ठिकाणी तो छान मुद्देसूद लिहीतो. पण शाहरुख हे नाव आले की तो अंगात आल्यासारखे करुन सगळा धागा हायजॅक करतो. आणी वाचणारा वैतागतो. म्हणून मी पण कंटाळले.

अहो हायझेनबर्ग, ऋन्मेष शाहरुखचा डायहार्ड फॅन असल्याने तो धृतराष्ट्रासारखे करतो असे मला म्हणायचे आहे. पण मी जरी अमिताभ ची फॅन असले तरी गांधारी सारखी पट्टी लावु शकत नाही असे मला म्हणायचे होते. Proud त्यातुन भलतेच अर्थ काढु नका बुवा !

कश्यपचं शाहरुखप्रेम पाहता ( त्या शिवाय Happy New Year सारख्या भिकार सिनेमात इतका चिप कॅमिओ रोल कोण करेल) या सिनेमाचा रिव्ह्यू पण आंधळ्या प्रेमातून आलेला असू शकतो.
>>>>>

जे शाहरूखबद्दल आणि त्याच्या चित्रपटांबद्दल चांगले बोलतात ते सारे त्याचे आंधळे चाहते असतात.
हे आवडले Happy

हॅपी न्यू ईयरमध्ये अभिषेक बच्चनही होता ना? तो सुद्धा शाहरूखचा चाहता आहे का? खुद्द बिग बी चा मुलगा....

पण मी जरी अमिताभ ची फॅन असले तरी गांधारी सारखी पट्टी लावु शकत नाही असे मला म्हणायचे होते.
>>>>

रश्मी मला आपल्या अमिताभप्रेमाला हलके लेखायचे नाही. किंबहुना भावनांची तुलना होऊच शकत नाही. पण माझे शाहरूखप्रेम आपल्या अमिताभप्रेमापेक्षा जास्त असूच शकते ना.
असो, अमिताभ हा धाग्याचा विषय नसल्याने जास्त एक्स्प्लेन करत नाही Happy

काय रु तुम्हाला बेकरी माहीत नाही? जसे टिपापा तशी बेकरी गप्पांचे पान आहे.. बे एरियात माबोकार
>>>>>>

च्रप्स ओके. असेल. कदाचित पाहिलेही असेल पण लक्षात राहिले नसेल. कारण मी सोशलसाईटवर गप्पांच्या पानात वा चॅट थ्रेडवर रमत नाही. गप्पा प्रत्यक्ष मित्रांशी समोरासमोर माराव्यात आणि ईथे चर्चा वादसंवाद करावे अशी माझी पद्धत आहे.

गप्पा प्रत्यक्ष मित्रांशी समोरासमोर माराव्यात आणि ईथे चर्चा वादसंवाद करावे अशी माझी पद्धत आहे. >> अभिषेक मग ड्युआयडी काढून इथे कशाला पचकत असतोस ? अभिषेक सावंत या नावाने सर्वांचे फोन नंबर्स घे, व्हिडीओ कॉल कर. बोल. प्रत्यक्षात असा फालतूपणा तुला जमणार नाही. लिहून ठेव.

किल्ली - नुसते जन्माला येणे म्हणजे लग्न करणे आणि मुले जन्माला घालणे हाच उद्देश बरोबर नाही ना ☺️ >>> बरोबर, मला असे म्हणायचे नव्हतेच मुळी! सलमानसाठी एव्हढंच म्हणायच होतं की आता लहान लहान हीरवीणी बरोबर रोमान्स बास कर.. बघवत नाहीत जरठ कुमारी जोड्या,.. अर्थात हे वैयक्तिक मत आहे... सगळ्यांनी असाच विचार करावा असं म्हणणं नाही... कोणा कोणाला सखा/किंवा कुठलाही स्पेसिफिक नट कसाही आवडतो.. माझं जरा वेगळं मत आहे इतकंच

मी तुमच्या लिखाणाचा पंखा आहे >>> धन्यवाद हो Happy

हॅपी न्यू ईयरमध्ये अभिषेक बच्चनही होता ना? >>>> हसू का या वाक्यावर? अनुराग कश्यप आणि अभिषेक बच्चन यांची तुलना? काही अपवाद वगळता अभिषेक पडेल हिरो आणि मिळेल त्या फालतू सिनेमात काम करणारा आहे. अनुराग कश्यप त्याच मापात मोजणं तुम्हालाच जमो.

कश्यपचं शाहरुखप्रेम पाहता ( त्या शिवाय Happy New Year सारख्या भिकार सिनेमात इतका चिप कॅमिओ रोल कोण करेल) या सिनेमाचा रिव्ह्यू पण आंधळ्या प्रेमातून आलेला असू शकतो>> Rofl
आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कार्टं. Rofl
नावडतीच मीठ अळणी Rofl

गप्पा प्रत्यक्ष मित्रांशी समोरासमोर माराव्यात आणि ईथे चर्चा वादसंवाद करावे अशी माझी पद्धत आहे.>>+११११११११११११११११११११११११

Pages