झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"कोण आहे हा?
मला याचा बंदोबस्त करावाच लागेल"
नक्की कर तुलाच सहज सापडेल तो आणि बंदोबस्तही करता येईल.

बिग बजेट चित्रपट भारतासाठी बनतच नाहीत बहुधा.झिरो भारतात फ्लॉप जाऊनही ओव्हरसीज मुळे 100 कोटी च्या वर जाऊन भांडवल निघाले आहे.ठगचेही हेच.
ओव्हरसीज ला लोकांना फार चॉईस नसावेत.विशेषतः अमराठी लोकांना.त्यामुळे ओव्हरसीज ला लावला की अगदी 100 कोटी घातले तरी निघतच असतील.उरलेले कदाचित टीव्ही ब्रॉडकास्ट ला विकून निघत असतील.
एकंदर पैश्याकडे पैसा जातो हे खरं.

१६ जानेवारी २००९ साली चांदणी चौक टू चायना हा चित्रपट रिलीज झाला होता. ऍक्शन कॉमेडी असलेल्या ह्या चित्रपटाचा प्रमुख अभिनेता होता अक्षय कुमार. 200८ मध्ये अक्षय ऐन भरात होता. त्याचे सर्व चित्रपट हिट झाले होते.
मात्र चांदणी चौक टू चायना रिलीज होण्याआधीच त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी झाली.
कारण म्हणजे शाहरुख खान. त्यावेळी प्रत्येक टीव्ही चॅनलवर ह्या गोष्टीची चर्चा होती. शाहरुख कशा प्रकारे क्रिटिक्स मॅनेज करू शकतो याची.
आता २०१८ मध्ये हेच अस्त्र उलटलंय. पण तेव्हा मूठभर क्रिटिक्स मॅनेज करणं सोपं व्हायच. आता लाखो लोक निगेटिव्ह लिहितायेत चित्रपट बघितल्याशिवाय, तर शाहरुखला नक्की जुने कर्म आठवत असतील.

Mi_anu ओव्हर्सिज कलेक्शनची गणिते वेगळी असतात. तिथली ग्रोस टोटल कलेक्शनमध्ये धरली जाते, आणि डिस्ट्रिब्युतरला फक्त २५% हिस्सा मिळतो. भारतात हा हिस्सा कमीत कमी ४० टक्के ते जास्तीत जास्त ५० टक्के एवढा असतो. त्यामुळे, झिरो तिकडे जाऊन कॉस्ट काढेल, हे जरा अवघड आहे.
आणि सॅटेलाईट हक्क कितीला विकलेत याची मलाही कल्पना नाही पण झी बरोबर शाहरुखची आधीच डील असल्याने, त्यामध्येच झिरोचे हक्क विकले गेल्याची शक्यता आहे.
शेवटी पोळतो तो डिस्ट्रिब्युटर!!!

चांदणी चौक टू चायना रिलीज होण्याआधीच त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी झाली.>>
हा पण एक महाभंगार सिनेमा आहे.

कोणते फिल्मफेर बेस्ट ऍक्टर अवॉर्ड शाखा deserve करत नाही?

माझ्या मते 1995 चा - DDLJ बद्धल वाला. DDLJ कितीही चांगला चित्रपट असू दे, अवॉर्ड खरच रंगीला बद्धल अमीर ला मिळायला हवे होते.
आणि 2003 चा देवदास - खरंच मुन्नाभाई mbbs बद्धल संजय ला मिळायला हवे होते.

बाकी स्वदेस, चक दे, kkhh, बाझिगर वेल deserving.

My name is खान आणि दिलतो पागल ला पर्याय कॉम्पितिशन नव्हती, सगळे सिनेमे रद्दड त्या वर्षी.

‘झिरो’ जर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही, असं शाहरुख काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला होता. मात्र या सिनेमात अनुष्का, कतरिना, शाहरुखच्या या त्रिकुटाबरोबरच आर. माधवन, अभय देओल, श्रीदेवी, आलिया, दीपिका, सलमान खान, करिष्मा कपूर, जुई चावला इत्यादी लोकप्रिय अभिनेत्यांचा टेकू घेऊनही शा.खा.चा सिनेमा चालला नाही. यावरुन सध्या शा.खा.ची अवस्था काय आहे हे समजते.
--
--

My name is खान आणि दिलतो पागल ला पर्याय कॉम्पितिशन नव्हती, सगळे सिनेमे रद्दड त्या वर्षी.
>>>>>>

दिल तो पागल है अफाट सुण्दर आणि तरल सिनेमा होता. आणि शाहरूखने आपली भुमिका साकारलीही अप्रतिम होती. त्याच्या सर्व राज राहुल चित्रपटांमध्ये मी याला फार वरचे स्थान देतो.

डीडीएलजेच्या राजपेक्षा रंगीलाचा आमीरच काय ईतर काहीही भारी असू शकते ही कल्पनाच सहन होत नाही. रंगीला माझाही आवडीचा चित्रपट. एसी चालू है सर. तो ईधर घुमाना संवाद आजही लक्षात आहेत. पण बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरीटा आणि बाबूजी ठिक कहते है सिमरन मै एक आवारा किसम का लडका हू. तो क्या हुवा अगर ये आवारा तुम्ही दिवानो की तरह प्यार करता है, प्यार सबकुछ तो नही होता ना, बाबूजी ठिक कहते है सिमरन, बाबूजी ठिक कहते है ची सर नाही त्याला....

'झिरो’ जर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही, असं शाहरुख काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला होता.>>>>
फेकत होता. झिरो च्या आधीच त्याने राकेश शर्मा यांच्यावर बायोपिक साइन केलीये.

शाहरूख खान आणि बायोपिक... जमेल त्याला? शाहरूख न वाटता काही और वाटणे.. कदाचित झिरोच्या अपयशानंतर त्याला काढून सुबोध भावेला घेतील.

स्वदेश, झिरो आणि आता राकेश शर्मा बायोपिक... एक समान लिंक तर आहे.

ऋन्मेष या धाग्यावर तुझेच किती प्रतीसाद आहेत ते तूच मोज. दर १ ल्या, दुसर्‍या प्रतीसादामागे तू उत्तरे देतोयस. तू शाहरुखचा धृतराष्ट्र फॅन आहेस, तुला झीरो आपटलाय हेच सहन होत नाहीये. आता तू यावर भलीमोठी प्रतीसादाची लिस्ट देशील हेही माहीत आहे.

मी अमिताभ फॅन आहे, पण गांधारी टाईप नाही. महान, पुकार आणी आणखीन बर्‍याच भंगार चित्रपटांना , त्यात केवळ अमिताभ आहे म्हणून चांगला दर्जा कधीच दिला नाही आणी त्याची भलामणही वारंवार केली नाही. कारण अमिताभ, मला त्याचे ते भंगार चित्रपट पाहीले म्हणून गौरवणार पण नाहीये किंवा चांगले पाहीले म्हणून पैसे पण देणार नाहीये.

अज्ञातवासी, यापुढे शपथ घ्या बरं की कुठल्याच खानाच्या सिनेमाचे परीक्षण लिहीणार नाही म्हणून. कारण उद्या तुम्ही अमीर, सलमान वगैरे कोणाच्याही सिनेमाबद्दल इथे लिहायला घेतलेत, की ऋन्मेष , शाहरुखला त्यात आणुन त्या धाग्याची पूर्ण वाट लावणार हे शंभर टक्के सत्य.

सलमान, शाहरुख, आमिर, देवगण आणि खिलाडी कुमार यांनी आता घरी बसावं. या आजोबा लोकांना नातींबरोबर रोमान्स करतांना खरंच नाही बघवत आता. (आमिर शहाणा झालाय त्यातल्या त्यात. )

फेकत होता. झिरो च्या आधीच त्याने राकेश शर्मा यांच्यावर बायोपिक साइन केलीये.
नवीन Submitted by अज्ञातवासी on 26 December, 2018 - 07:28
<<

राकेश शर्मा म्हणजे India's first cosmonaut ??
'चक दे इंडीया' वगैरे सिनेमातील त्याचे काम पाहता, हा रोल शा.खा. छान करु शकतो असे वाटते.

शाहरुख च्या दिल तो पागल है मध्ये अनेक चंपटपणे होते.पण त्या येड्या वयात तो आवडायचा.जसं धूम3 मध्ये ग्रेट इंडियन सर्कस मध्ये एक कसरत आणि आग वालं 5 मिनिटाचं गाणं बघायला प्रेक्षक तिकीट काढून का येतात आणि ते बघून झाल्यावर घरी जातात का असा प्रश्न होता तसे दितोपाहै मध्ये या अनेक गाणं नाच वाल्या शो चा सराव किती दिवस चालू आहे, याचं बजेट नक्की किती आहे असे अनेक प्रश्न येतात.यात सर्वात चांगला आणि पटणारा पार्ट करिश्मा चाच.बाकी शा, मा, अरुणा इराणी हे सर्व (त्यांचे अभिनय नाही, या कथेतली पात्र)अत्यंत खोटे आणि प्रिंटेनशियस.

ऋन्मेष या धाग्यावर तुझेच किती प्रतीसाद आहेत ते तूच मोज. दर १ ल्या, दुसर्‍या प्रतीसादामागे तू उत्तरे देतोयस. तू शाहरुखचा धृतराष्ट्र फॅन आहेस, तुला झीरो आपटलाय हेच सहन होत नाहीये. आता तू यावर भलीमोठी प्रतीसादाची लिस्ट देशील हेही माहीत आहे. >>>>> रश्मी बिथरलाय बिचारा/बिचारे/बिचारी, जे कुणी असेल ते. यावेळी धडधडीत आकडे समोर येतायेत, आणि धागाकर्ता सरळ दुर्लक्ष करतोय, हे बघून कुणीही ड्रॅमा क्वीन चिडेलच...

मी अमिताभ फॅन आहे, पण गांधारी टाईप नाही. महान, पुकार आणी आणखीन बर्‍याच भंगार चित्रपटांना , त्यात केवळ अमिताभ आहे म्हणून चांगला दर्जा कधीच दिला नाही आणी त्याची भलामणही वारंवार केली नाही. कारण अमिताभ, मला त्याचे ते भंगार चित्रपट पाहीले म्हणून गौरवणार पण नाहीये किंवा चांगले पाहीले म्हणून पैसे पण देणार नाहीये.>>>>> तुम्हाला खरोखर वाटतंय तो/ती/ते शाहरुखचा फॅन आहे? तो फॅन आहे आरशाचा, ज्यात त्याला स्वतःची प्रतिमा कुरवाळत बसण्यास आवडत, अशा व्यक्तीला चर्चेत राहण्यासाठी कुठलंही माध्यम पुरे आहे.

अज्ञातवासी, यापुढे शपथ घ्या बरं की कुठल्याच खानाच्या सिनेमाचे परीक्षण लिहीणार नाही म्हणून. कारण उद्या तुम्ही अमीर, सलमान वगैरे कोणाच्याही सिनेमाबद्दल इथे लिहायला घेतलेत, की ऋन्मेष , शाहरुखला त्यात आणुन त्या धाग्याची पूर्ण वाट लावणार हे शंभर टक्के सत्य.>>>>> थँक्स. तुमची मनापासून तळमळ समजतेय, पण माझा स्वभाव जरा इन्ट्रोवर्त आहे. जास्त कुणी मित्रमंडळी नसल्याने विरंगुळा म्हणून लिखाण करायला आवडते. तुम्ही लोक चांगलं लिहिलंय म्हणतात तेव्हा छान वाटतं. त्यामुळे जे मला आवडत, ते अशा व्यक्तीसाठी, जिला ना मी वजेत धरत ना बेरजेत, तिच्यासाठी नाही सोडू शकत.
तरीही खूप थँक्स रश्मी...

सलमान, शाहरुख, आमिर, देवगण आणि खिलाडी कुमार यांनी आता घरी बसावं. या आजोबा लोकांना नातींबरोबर रोमान्स करतांना खरंच नाही बघवत आता. (आमिर शहाणा झालाय त्यातल्या त्यात. )>>>>
सलमान शाहरुख देवगण अनुमोदन. खिलाडी कुमार (शहाणा झालाय तोही) आमीरच नाही सांगता येत

झिरोचे साधे ट्रेलर सुद्धा बघितले नाही तर मुव्ही बघायचा प्रश्नच येत नाही. पण हे परीक्षण आवडले. छान लिहिलेय.

रश्मी, एक सांगू ऋन्मेष एक पोष्ट लिहो की हजार, सरळ सरळ दुर्लक्ष करा. सहसा एखाद ओळ वाचली की लक्षात येते की कोणी लिहिलेय. कायेन्न कोणीतरी आपल्याला भाव देतोय (चांगला/वाईट कसलाही) हीच असल्या मनोवृत्ती च्या व्यक्ती ची भावनिक गरज असते. अन त्यातही नकारात्मक प्रतिसाद जास्त आवडतात यांना, मग समोरच्याला उचकवायला अजून effort घेतात. अन जेव्हा आपण चिडून त्याच्या विरुद्ध त्रागा करतो, आपली ऊर्जा वाया घालवतो, तेव्हा त्यांना आंनद होतो अन हेच तर अपेक्षित असते यांना. सो जस्ट इग्नोर हिम ☺️

<<<अज्ञातवासी, यापुढे शपथ घ्या बरं की कुठल्याच खानाच्या सिनेमाचे परीक्षण लिहीणार नाही म्हणून>>>> बिलकुल नाही, लिहा हो तुम्ही. तो काही एकटा वाचक नाहीये इकडे. एकदा का त्याच्या नको असणाऱ्या कमेंट्स ओलांडता आल्या न की झाले.☺️

अन हो, ऋन्मेष च्या काही सगळ्याच कमेंट्स टाकाऊ नाहीयेत, अपवाद म्हणून काही चांगले प्रतिसाद देखील लिहतो तो.

मला न मुळात हेच कळत नाही की लोक त्याला इतके महत्व देतातच का मुळी???? माबोवर च्या हजारो आयडीपैकी तो एक. इतके बास आहे की Proud

शाहरुख ला बायोपिक चांगला जमेल इंफॅक्ट. सिरीयस रोल्स चांगले जमतात त्याला.
<<
अगदी !
सध्या झिरो सिनेमात तो थेट मंगळावर जाऊन आल्याने, त्या बायोपिकमधे त्याला स्पेसमधे जाणे फार अवघड नसावे.
----
थोडे आवांतर : मुळात एकदा शा.खा.ला मंगळावर पाठवल्यावर त्या झिरो सिनेमाच्या दिग्दर्शकांने त्याला परत पृथ्वीवर आणलेच का, हे एक न उलघडणारे कोडेच आहे.

>> सलमान, शाहरुख, आमिर, देवगण आणि खिलाडी कुमार यांनी आता घरी बसावं. या आजोबा लोकांना नातींबरोबर रोमान्स करतांना खरंच नाही बघवत आता.

कुठल्याश्या एका नियतकालिकाने (सामना?) खूप वर्षांपूर्वी "चाळीशीतल्या हिरोंनो जरा सरका की" अशी एक कव्हरस्टोरी केली होती ते आठवले Lol (त्यात एक अनिल कपूर असल्याचेही आठवते). हे हिरो मात्र पन्नाशी उलटली तरी सरकायचे नाव घेईनात Proud

झीरो : ट्रेलर अजिबात नाय आवडला, पुर्ण पाहिला गेला नाही... सिनेमा पाहण्याचा प्रश्नच येत नाही

अवांतरः
लिहिण्याचा मोह आवरत नाहीये, हा सल्मान खा माझ्या बाबान्च्या वयाचा आहे, योग्य वयात लग्न झाल असत तर माझ्याएवधी मुलगी असती आणि तिचं सुद्धा लग्न झाल असत.. Proud

रश्मी, एक सांगू ऋन्मेष एक पोष्ट लिहो की हजार, सरळ सरळ दुर्लक्ष करा. >>>>>
भन्नाट भास्कर चा उपद्रव थांबवायला ही युक्ती उपयोगी पडलेली.
फक्त इतकेच करायला हवे की सगळ्यांनी दुर्लक्ष करायला हवे, एकाने जरी थोडी ढील दिली की गाडी घरंगळत जाते.

अज्ञातवासी तुम्ही मला फार छान दुर्लक्ष करत आहात.

फक्त ते सर्वांना पुन्हा पुन्हा सांगू नका Happy

ईतर प्रतिसादांना उत्तर द्यायला संध्याकाळी येतो ......

<<<ईतर प्रतिसादांना उत्तर द्यायला संध्याकाळी येतो ......>>> काहि गरज नाहि रे....कंटाळा आला आहे त्याचा.. तुझे धागे उघड आणि काय धिंगाणा घालायचा आहे तो घाल.. पण एवढे स्पष्ट लिहिले असताना तरि तुला समजायला पहिजे होते.

Pages