फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अॅमी, लोकांना ही किती फिट याचा हेवा आणि हिच्या सारखं आपल्याला जमत नाही याची खंत वाटू शकते. (हे नकळत होऊ शकते.) काहींना तुम्ही हे मन मारून करत आहात असेही वाटू शकतं. म्हणुन अथवा खरंच चारचौघांसारखे खाणेच योग्य तसे न करणे घातक अशी समजूत असल्याने लोक असा सल्ला देत असावेत. त्याचा विचार करू नका.
फिट रहा, खुष रहा.

Lol Lol अनु!

===
मानव,
हेवा नसेल काळ्जीपोटीच सांगत असतील. किंवा
> काहींना तुम्ही हे मन मारून करत आहात असेही वाटू शकतं. म्हणुन अथवा खरंच चारचौघांसारखे खाणेच योग्य तसे न करणे घातक अशी समजूत असल्याने लोक असा सल्ला देत असावेत. > ही दोन कारणं असतील.

> त्याचा विचार करू नका.
फिट रहा, खुष रहा. > हो. धन्यवाद Happy

एका फेसबुक ग्रुपवर हा पोल दिसला :
Are you willing to starve your men if they outright refuse to help you in the kitchen?

संदर्भ _ बायकांची सुटकावाली कविता.

अहो अ‍ॅमी, तुमच्या या यशाचे रहस्य नव्या धाग्यावर कळवा.
तुमचे ही आडनाव द वरून असेल तर उत्तमच. तुमची अ‍ॅमी प्रणाली किंवा दंडवते / दांगट / दोड्डा जी काही असेल ती "द" प्रणाली व्हायरल करण्याची जबाबदारी आमची.

मेरीच गिनो Rofl Rofl
ना आडनाव द वरून नाही आणि हे यश आहे कि नाही याचीदेखील खात्री नाही. त्यामुळे जाऊदेत...

https://foodandnutrition.org/from-the-magazine/investigating-intermitten...

जिज्ञासुंनी / तज्ञांनी वरिल आर्टिकल मुळापासून सर्व वाचावे व आपले मत द्यावे. ह्या रिसर्च मध्ये क्लेम केले आहे की इ-फास्टींग मुळे काही दुष्परिणाम होतात (Side effects of intermittent fasting include persistent hunger, cold, irritability, low energy, distraction and lower work performance.)जे खरोखर होत नाही, त्याच्या अगदी उलट होते असे फास्टींग करणारे स्वतः सांगतात .

https://www.altnews.in/fact-check-dr-dixits-two-meals-a-day-diet-for-wei...

Conclusion
We could not find any published research to substantiate his claim with regards to limiting the meal time to 55 minutes and as a result, the subsequent avoidance of the 2nd phase insulin release.

The claims of Dr. Dixit that amount of insulin released in response to meals has no relation with the quality and quantity of meals is factually incorrect, and is in stark contrast to the physiological facts established via numerous published studies.

While according to one study, two meals earlier in the day had an impact on body weight and plasma glucose, the benefits were not extended to other time periods such as late evening meals as suggested by Dr. Dixit. The larger body of established evidence suggest it is beneficial to consume smaller meals of low calories throughout the day as opposed to two large meals, leaving the subject open for further research in a larger cohort of patients.

Dr. Dixit is associated with a social media campaign related to diabetes and obesity. The majority of case studies and experiments conducted by him are based on self-testing or self-reported measures and cannot be taken as scientific evidence.

Hence, Dr. Dixit’s viral claim is not only misinformed but is potentially harmful for the pre-diabetic and type-2 diabetes patients for following reasons.

The patients with type 2 diabetes who are on glucose lowering drugs are at a very high risk of hypo-glycaemia, which can cause light-headedness and shivering, if they do not take frequent meals as advised by the doctor.
Consuming limitless food in one go would lead to consumption of excessive calories, especially if the patients opt for high caloric food and would in turn lead to weight gain.

For more information on guidelines for Diabetes, please visit the WHO website: https://www.who.int/diabetes/publications/en/

सोनू.
असलं काही लिहू नका ईथे...ईंग्लिश मधलं काही कळत नाही आम्हाला ..साधं सरळ सोपं सुटसुटीत समजायला सोपं ... मग चुकीचं का असेना... तेवढच लिहा ईथे... ह्या सायंटिफिक लिंका फिंका क्लिक करण्याच्या फंदात कोणी पडत नाही ईथे...
ईथे फक्त स्तुतीपर लिहायचं आहे... तुम्हाला वैज्ञानिक वगैरे दाखले देऊन चुका काढायच्या असतील तर नवीन धागा काढा... ईथे नको.

ते नव्हते म्हणले का? की डायबेटीसच्या डागतरांच्या धंद्यावर पाय येतो म्हणून... तसलंच कायतरी दिसतं हे.. कोट्यावधी रुपयांची ऑफर दिली आहे आल्टन्युज आणि त्या डॉ. परेखला हे लिहिण्यासाठी. मराठी माणसाचा भारतभर होणारा बहुमान सहन होत नाय हो लोकाना...

एकंदर सर्व प्रयोग स्वतःच्या शरीराला झेपेल आणि स्वतःच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने/परवानगीनेच करावे असे उलट सुलट माहिती वाचून वाटते.

लोकप्रभामध्ये एका डाॅनी लिहीले आहे की हे दोनच वेळा भरपूर जेवणे घातक आहे. चहा विशेषांकात आहे तो लेख. लिंक देता येते का बघते.

"भरपूर जेवणे घातक आहे"

पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड.

दोन वेळा जेवा की दहा वेळा जेवा. कॅलरीचे आणि काय नक्की खात आहोत त्याचे गणित सांभाळले की काहीही घातक नसते.

तसेही कोणाच्या जीवनशैलीनुसार कसा आहार असावा हे तज्ञांना ठरवू देणे श्रेयस्कर. हजार जोर मारणार्‍ञा पैलवानाला जो आहार तोच काल परवा जीमला जायला लागलेल्या पाप्याच्या पितरास देऊन चालत नाही.

सोनू, +१

पुण्यातील काही डायबेटीसमधल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी दीक्षित पद्धतीमुळे लोकांचे एचबीए१ सी वाढल्याचे सांगितले आहे. माझ्या पाहण्यातील ३ लोकांचे हे रेशो ७ वरून ८.५ पर्यंत वाढले. त्यातील काही लोकांनी चक्कर वगैरे येऊ नये म्हणून मनानेच औषधे बंद केली होती.
खाण्याचा कन्टेन्ट ब्लडशुगरसाठी अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे. आणि टाईप २ वाल्या लोकांनी घरच्या घरी रोज फास्टिंग शुगर बघणेदेखील महत्वाचे आहे. त्यामुळे धोक्याची सूचना आधीच मिळते. ज्यांच्या घरी टाईप २ आणि लठ्ठपणा अनुवांशिक आहे अशा लोकांनी टाईप २ डिटेक्ट व्हायचीदेखील वाट पाहू नये. टाईप २ डिटेक्ट होण्याआधी कितीतरी वर्षं लोक प्रिडायबेटिक असतात. याचे सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे फास्टिंग शुगर १०० च्या वर असणे. या स्टेजमध्ये प्रिडायबेटिस आहाराने रिवर्स करणे खूप सोपे असते. म्हणून तिशी ओलांडली की ग्लुकोमीटर घेऊन आठवड्यातून एकदा फास्टिंग बघणे उपयोगी आहे.

वरील रात्री उशिरा खाण्याबद्दल म्हंटलेले सुद्धा महत्वाचे आहे. शरीराचे सरकेडियन क्लॉक रात्री मेंटेनन्सची कामे करण्यासाठी काही विशिष्ट वेळ राखून ठेवते. तेव्हा आपण भरपूर खाल्ले तर त्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. ७ च्या आत जेवणे, आणि शक्य झाल्यास संध्याकाळी जेवण न करणे हे अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळची साखर ७०-९० मध्ये राहते, जशी ती असायला हवी.

आरती... भागवतांनी मागच्या पानावर दिली आहे भक्तजनांसाठी.... वेट्लॉस देवतेचा अनुग्रह व्हावा आणि ती प्रसन्न व्हावी म्हणून...
धागा मन लाऊन वाचल्यावर वेट्लॉस देवतेच्या ऊपासनेचे व्रत तुम्हाला कळून येईल... अधिक माहितीसाठी मागच्या पानांवर दिलेल्या फोन नंबरवर वॉट्स अप मॅसेज आणि रक्ताच्या चाचणीचा रिपोर्ट पाठवा.

दीक्षितांच्या सपोर्टवाल्यांनी क्लिनिकल ट्रायल ऑर्गनाईझ करायला हवी! ती इन्शुलिन सायकल 55 मिनिटांचीच असावी अन प्रत्येक वेळी फक्त ठराविक प्रमाणातच इन्शुलिन तयार होत असेल हे काही पटत नाही.

दुध का दुध पानी का पानी हो जायेगा...

पन भक्त म्हटले की बाप दाक्कव नाहीतर श्राद्ध कर असा प्रकार होतच नाही. उद्या दिक्षितांनी सांगितले की मी एक कोटी लोकांवर कंट्रोल्ड क्लिनिक्ल ट्रायल करुन नासामध्ये रिसर्च छापुन मंगळावर प्रसिद्ध करुन आणला आहे.. तरी हे मानतील.

दीक्षितांच्या सपोर्टवाल्यांनी क्लिनिकल ट्रायल ऑर्गनाईझ करायला हवी!>>>>

ते कशाला करतील? इतक्या वर्षांची चारी ठाव खायची सवय मोडून फक्त दोनदा खायचे कसे जमवायचे या विवंचनेत ते आहेत. त्यात असली कामे करायला वेळ कोण काढेल?

आणि इन्सुलिन काय काय खाल्ल्यावर सीक्रेट होतं हे तुमचं तुम्हीच शोधून काढा असे दीक्षित सांगतात. त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे घालुन स्वतःच्या टेस्टस करून पाहिल्यात.

एकदा सीक्रेट झाल्यावर 55 मिनिटात परत होत नाही हे खरे की खोटे जे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही पैसे घाला व टेस्ट करत राहा. इन्सुलिन टेस्ट फॅसिलिटी सर्वत्र उपलब्ध आहे. समर्थक तर विश्वास ठेवून आहेत, ते कशाला पडतील या भानगडीत?

उद्या दिक्षितांनी सांगितले की मी एक कोटी लोकांवर कंट्रोल्ड क्लिनिक्ल ट्रायल करुन नासामध्ये रिसर्च छापुन मंगळावर प्रसिद्ध करुन आणला आहे.. तरी हे मानतील.>>>>

नासामध्ये छापून आणला तर मानायला हवाच ना... की तेव्हाही मानणार नाही तुम्ही?

{इतक्या वर्षांची चारी ठाव खायची सवय मोडून फक्त दोनदा खायचे कसे जमवायचे या विवंचनेत ते आहेत. त्यात असली कामे करायला वेळ कोण काढेल?}
चार ऐवजी दोनच वेळा खायचं म्हणजे उलट वेळ वाचला की.

धाग्यात केलेला दावा :
"स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.
ऑल्ट न्यूजचा दावा - We could not find any published research to substantiate his claim with regards to limiting the meal time to 55 minutes and as a result, the subsequent avoidance of the 2nd phase insulin release.

The claims of Dr. Dixit that amount of insulin released in response to meals has no relation with the quality and quantity of meals is factually incorrect, and is in stark contrast to the physiological facts established via numerous published studies.

https://www.ijclinicaltrials.com/index.php/ijct/article/download/44/37
https://www.ijclinicaltrials.com/index.php/ijct/article/download/231/126

हे दोन पेपर्स केलेत पब्लिश दीक्षितांनी. त्या अल्टन्युज वाल्याना का दिसले नाहीत देव जाणे. कदाचित हा जास्त रेप्यूटेड म्हणजे लॅन्सेटसारखा प्रकार नसल्याने मान्य केले नसतील!

शिवाय अशाच प्रकारचा एक रिसर्च पेपर झेक रिपब्लिकमध्ये झालाय पब्लिश.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4079942/

पहिल्या पेपरमधली काही वाक्यं -
पान २ वर तळाला - लक्षात घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा - मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांसाठी ही आहारयोजना उपयुक्त नाही

The study was self controlled community trial.

Limitations - The data was obtained with the method of self reporting, not verifiable.
दिवसातून दोनदाच खाल्ल्याने काही लोकांनी आहारातून कमी उष्मांक घेतल्यानेही त्यांचे वजन कमी झाले असल्याची शक्यता आहे.

पान २ वर तळाला - लक्षात घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा - मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांसाठी ही आहारयोजना उपयुक्त नाही
>>

हो तर. नाहिच आहे. मी बघितलेल्या २ व्हिडीओमध्येतरी डायाबेटीक लोकांनी हा प्लान वापरु नका अस बोल्ले ते.

Pages