खमण

Submitted by स्स्प on 4 December, 2018 - 06:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

• २५० ग्राम बेसनपीठ
• अर्धा चमचा (पोहे खाण्याचा) लीम्बुफुल पावडर (Citric acid)
• २ चमचा साखर
• १ आणि अर्धा चमचा इनो
• मीठ
• फोडणीसाठी तेल, हिरवी मिरची

क्रमवार पाककृती: 

कृती:
१) सर्वप्रथम बेसनपीठ ३ वेळा मैद्याच्या चाळणीतून चाळून घ्या .
२) पीठ मधेय पाणी घालून भजेचे पीठसारखे पण थोडे जास्त पातळ भिजवा.२० मिनिटे तसेच
ठेवा.त्यानंतर चांगले फेटा
३) एका कढई मधेय पाणी घालून चाळणी अथवा stand ठेवा , एका ताटलीला तेलाचा हाथ
लावून त्यामाधेय ठेवा.
४) भिजवलेल्या पीठमधेय लिंबूफुल पावडर, इनो,साखर ,मीठ घालून चांगले फेटा.(१० मी.)
त्यानंतर पीठ ताटलीमधेय ओतून द्यावे. फुल आचेवर १५ ते १८ मिनीटे वाफ काढावी. वाफ
काढताना झाकण अजिबात उचलू नये.
५) १५ ते १८ मिनीटांनी गॅस बंद करावा. व लगेच भांडे बाहेर काढावे.
ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी.
लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक
चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी.

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतोय.
मी फोडणी सोबत दोन चमचे साखरेचे गरम पाणीही टाकतो.

साखरेचे पाणी - म स्ट आहे..नाहीतर ढोकळा खाताना छातीत बसतो..
फोडनी मध्ये तीळ, कढीपत्ता पण छान लागतो.. आई रवा पण मिक्स करते बेसन मध्ये
वरतून खोबरे +कोथोइम्बीर आ णी सोबत चिन्गू चटणी + हिरवी (पूदीना) चटनी ... आ हा हा !!

जबरी जमलाय शितल. छान आहे रेसीपी. पण मला कधीही न जमलेला पदार्थ आहे हा. Sad गिट्स च बहुदा त्यामुळ नेक्स्ट टाइम.
तुमचा प्रोफाईल फोटो मस्त आहे एकदम.

मस्तच दिसतोय.

आई रवा पण मिक्स करते बेसन मध्ये >>> मीही करते पण मी इंस्टंट करत नाही, काही तास भिजवते ताकात आणि मी आलं लसूण मिरची ठेचा घालते, साखर मात्र अजिबात घालत नाही, साखरेचं पाणीही नाही. माझा इतका जाळीदार होत नाही पण चांगला होतो.

आजच करते Happy
पण माझ्याकडे एका लाडक्या मायबोलीकर मैत्रिणीने दिलेले इंस्टंट पिठ आहे, त्यामुळे त्याचाच करेन

नाही, खांडवी म्हणजे सुरळीच्या वड्यांचं गुज्जू नाव.
खमण म्हणजे ढोकळ्याचा चुरा करावा तसा पाहिलाय. वरून शेव वगैरे घालून खातात.

गुजरातीत सुरळीच्या वड्यांना खांडवी म्हणतात.
खमणचा अर्थ कुस्करा किंवा कीस असावा. इथे सुलेखा यांनी दिलेली अमीरी खमणची रेसिपी आहे.

Dhoklya chya chura la khamni mahntat....tyat hi barech prakar ahet....Dhokla chana dal chya vatlelya pitha cha asto.....khaman mahnje besanpith cha instant dhokla...ambat- gode chav....bakichya dhokla prakarat sakhar naste

Pages