ऋन्मेऽऽषचा लोकांना एवढा राग का येतो?

Submitted by हायझेनबर्ग on 1 December, 2018 - 11:30

मायबोलीवर असा एक काळ होता जेव्हा प्रत्येक धाग्यावर कथा / ललित /चर्चेचा विषय कुठलाही असला तरी चर्चा फक्त 'शाहरूख खान' ह्या एकाच व्यक्ती आणि विषयाभोवती फिरत असत. तसे हट्टाने घडवून आणण्यात ऋन्मेऽऽष सर्वाधिक उत्साही होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझ्यासह अनेकांनी ह्यावरून आपल्या नाराजी ते राग अशा विविध भावना वेळोवेळी व्यक्त केल्या. ह्या अनाकलनीय हट्टाचे पर्यवसान अनेक चांगले धागे भरकटण्यात होत असे.
मग एका मोठ्या वाद विवादानंतर (बहुतेक रसप ह्यांचा धागा) जे सांगायचे होते ते सांगून संपल्यानंतर मी हा नाराजी व्यक्त करण्याचा pursuit सोडून दिला.
माझ्या आकलनशक्ती प्रमाणे ऋन्मेऽऽष ना सुद्धा कुठे तरी 'आपण ह्या नाराजीचा विचार करावा' ह्याची जाणीव झाली असावी असे वाटते. कारण त्यानंतर माझ्या निरीक्षणानुसार 'शाहरूख' विषयावरून इतर धागे भरकटणे थांबले.
बाकी त्यांचे स्वत:चे 'इतर' धागे निखळ करमणूक करणारे असतात हे तर कोणीही मान्य करेल.
सगळ्यांना अपेक्षित असणारा हा positive बदल घडवून आणण्यासाठी माझ्या मते ऋन्मेऽऽष खरोखर कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहेत.

पण एवढ्यात ज्या धाग्यावर 'शाहरूख' संदर्भात बोलणे/लिहिणे हे विषयाला धरूनच आहे तिथे सुद्धा ऋन्मेऽऽष ह्यांच्यावर क्लेशदायक वैयक्तिक टीका टिप्पणी होतांना पाहून वाईट वाटले. खासकरुन त्यांनी घेतलेल्या समंजस भूमिके नंतर.

तेव्हा प्रश्न पडला लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात?
एखाद्यापाशी तो करत असलेल्या एखाद्या कृतीचा निषेध म्हणुन नाराजी, मतभेद, राग व्यक्त करणे वेगळे (मैत्री मध्ये हे हमखास होते म्हणुनच वाद, भांडणानंतर सुद्धा आपण मित्र राहतो) आणि
एखाद्याने काहीही कृती केली तरी तिचा कायम राग राग करणे वेगळे. (इथे त्या व्यक्तीप्रती तुमच्या नजरेत तिरस्कार कायम वास्तव्याला आहे हे कळून येते).

ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?
कारण अशी आकसाची, तिरस्काराची भावना आपल्या एक समंजस आणि सहृदय व्यक्ती बनण्याच्या प्रवासात एक मोठा अडथळा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोल सुटत चालला आहे. Lol
आता काहीच क्षणात मूळ अवतारात देव प्रगट होतील. Lol
एका ठिकाणी फजिती झाली म्हणून ज्याचे नाव घेतले त्याच्याबद्दल आधी का लिहीले नाही हा प्रश्न छळ छळ छळल्याने आता उशिरा का होईना त्याच्याबद्दल धागा काढला आहे असे मुळीच म्हणायचे नाही.
खरे म्हणजे लोक आपले लेखन किती गांभीर्याने वाचतात हे पाहण्यासाठीच लेखकाने हा प्रश्न विचारलेला आहे.

कारण या प्रश्नाचे उत्तर लेखकाने आधीच देऊन ठेवलेले आहे. जर सिरीयसली वाचले असते तर लोकांनी उत्तरासाठी शोधाशोध करण्याची गरज नव्हती.

रुनमेशने धागे भरकटवणे थांबवले असं अनुमान मला इतक्यात काढावसं वाटत नाही. जोपर्यंत केलेली चूक व्यक्ती मान्य करत नाही आणि ती चूक परत होऊ नये म्हणून काय उपाय करणार यावर बोलत नाही तोवर केवळ हल्ली काही दिवस असं काही घडलं नाही म्हणजे व्यक्तीला पश्चाताप झाला आणि ती सुधारली असं मानणे फारच नाईव्ह आणि सोयीस्कर वाटतं मला. एकदा त्याला बेनिफिट ऑफ डाउट देऊन झाला आहे, आणि हात पोळले आहेत. आता ताकही फुंकरूनच पिणे कोणी करत असेल तर ते स्वाभाविक आहे.

बाकी गेले काही महिने त्याला वेळ झाला नाही हे एकूण मायबोलीच्या स्वास्थ्याच्या दृष्टींने फार उत्तम झाले इतकं लिहितो आणि थांबतो.

अमितव सहमत आहे.
श्रावणात एखाद्याने मद्यपान केले नाही म्हणून त्याने कायमचे मद्यपान त्यागले असा उत्कर्ष काढायची घाई करण्यात काही अर्थ नाही.
ईलेक्शन जवळ आले की पेट्रोलचे भाव कमी होतात, लगेच अच्छे दिन आले म्हणून बोंबाबोंब करायचे कारण नाही.

फारच नाईव्ह आणि सोयीस्कर वाटतं मला. एकदा त्याला बेनिफिट ऑफ डाउट देऊन झाला आहे, आणि हात पोळले आहेत.
>>>>

हे प्रकरण सविस्तर लिहील्यास आवडेल. असे एखाद्याबद्दल एखादे वाक्य टाकून वाचकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. बाकी आपली मर्जी Happy

ऋन्मेऽऽषचा लोकांना एवढा राग का येतो?
१ कारण तो एक ड्यु आञडी आहे. इतकीच जर खाज आहे सगळीकडे झळकायची अन शारुख अन सई /स्वजो चा टेम्भा मिरवत फिरायची तर खर्‍या नावाने लेखन करायची हिम्मत का नाही दाखवत हे महाभाग?
२ प्रचंड इरिटेटेन्ग . ऋन्म्या वारला आला अन भभा आला ... हिशोब काय एकच.. माबोकरान्च्या डोक्यास ताप.
मध्ये मिपावर पण तडमडायला गेलेलम हे बेण पण तिकडून बी हाकलला बहुतेक ..
जौद्या .. जेवढी सभ्य भाषा शक्य होती तेवढी वापरली आहे , घाण शिव्या हाणाव्याश्या वाटतात या भिकार मनोव्रुत्तीला ऋण्म्याच्या ...

Sad

इररितेटिंग असेलही( किंबहुना आहेच तो) पण खऱ्या नावाने लेखन करा खाज असेल तर हा काय मुद्दा झाला? माबोवर खऱ्या नावाने किती लोक आहेत? माबो म्हणजे सरकारी वेबसाईट थोडीच आहे की आधार कार्ड वगैरे लिंक करून खरी आयडेंटिटी द्यायला.
हा मुद्दा रूनमेश बाबतीत का आणतात लोक..

रमेशजी,
तुम्हाला आणि सगळ्यानाच विनंती करेन,
'राग का येतो' हे सांगताना एखाद्याला आपल्या नाराजीचे कारण सांगताना - त्याचे निवारण होईल अशी आशा आपण बाळगणे आणि अपेक्षित बदल दिसून येण्यासाठी थोडा संयम ठेवणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

शक्य असल्यास Let bygones be bygones.
Now that Runmesh seems to be back, let us all start with a clean slate, not muddy the clean water with old rotten goods and most importantly write a word of appreciation wherever it is due.

ह्याउपर जर पुन्हा भूतकाळ रिपीट झाला तर खुशाल माझी गणना मायबोलीच्या सात मूर्खात करा.
(बाकीचे सहा कोण ते माहित नाही.. पण कुठल्याही लहान मोठ्या जगात किमान सात मूर्ख असतात असे ऐकून आहे.)

हायझेनबर्ग, तुमची तब्येत ठीक नव्हती?
आता कशी आहे? काय झाले होते?
परत आलात तुम्ही नि ऋSSन्मेष परत आलात हे बरे झाले.
<<<बाकी गेले काही महिने त्याला वेळ झाला नाही हे एकूण मायबोलीच्या स्वास्थ्याच्या दृष्टींने फार उत्तम झाले >>>
असे लिहू नये हो. लोकांच्या भावना दुखावतात. बर्‍याच जणांना उपहास, विनोद इ. समजत नाही. लोक मग उलट सुलट काहीतरी लिहून तुमच्या मागे लागतात, - असे का लिहीले? तुम्ही वाईट हेतूनेच लिहीले वगैरे.

पण खऱ्या नावाने लेखन करा खाज असेल तर हा काय मुद्दा झाला?
>>>>>>>>

मला पर्सनली हा वॅलिड मुद्दा वाटतो. म्हणजे कोणी या कारणासाठी माझा राग करत असेल तर ईटस ओके. माझी काही हरकत नाही. एखाद्याला नाही आवडत असे ओळख न देता वाबरणारे लोकं तर यात फार काही गैर नाही.
किंबहुना जे ओळख न देता वावरतात त्यांनी अश्या विचारांच्या लोकांकडून राग राग होणार या तयारीनेच यायला हवे. आणि अश्यांचा राग मनावर न घेण्याची सवय असायला हवी Happy

त्यामुळे त्याचे कौतुक करताना, त्याच्याबद्दल लिहीताना मला माझ्याबद्दलच काहीतरी लिहीतोय असे वाटते आणि माझा अहं सुखावतो. कोणाचे ईतके फॅन असणे वा एखाद्याशी ईतके एकरूप असणे चांगले नसेलही.. पण मला नेहमीच एक वेगळीच एनर्जी देतो शाहरूख हे मात्र खरे आहे..
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 December, 2018 - 16:24 सेम माझीही हीच फिलीन्ग आहे शाहरुख बद्द्ल माहित नाही का? पण आहे...
आणि राहिला कुणाचा राग यायचा प्रश्न तर सोशल साइट वर किवा इतर कुठेही जे आवड्ल ते सान्गायच आणि कुणाच मत किवा काही पट्ल नाही तर सरळ इग्नोर करायच.

ऋन्मेष ला जे करायला जमतं ते इतराना तितक्या सहज नाही जमत हे कारण असेल काय? >>>>>> काय जमतं? जे इतरांना सहजासहजी नाही जमत?

१) नवनवीन धागे विणणे-

२) सतत प्रत्येक पोस्ट मध्ये स्वतःचे कौतुक आणी शाहरुख, सई व सोपनील यांचा उदो उदो / भजन / कव्वाली गाणे

हे जर प्रामुख्याने असेल तर हो, आम्हाला खरच असे जमत नाही.

ऋन्मेषचे लिखाण, त्याची सहनशीलता, बर्‍यापैकी असलेला कॉमिक सेन्स वगैरे गोष्टी मला आवडायच्या. आपण नाही का लहान भावा- बहिणीचे अवखळ उद्योग , त्यांची प्रयोगशीलता यांना दाद देतो, तसेच काहीसे. पण बरेच धागे वाचल्यानंतर लक्षात आले की हा शाहरुख, स्वताचे प्रतिमा प्रेम, मीच कसा किंवा माझेच कसे बरोबर या पलीकडे जात नाहीये. Funny kitten

आधी दुसर्‍याच्या आवडीचा विरोध करायचा, मग बाकीच्यांनी ते सिद्ध केल्यावर ज्याला नावे ठेवली त्याला चांगले म्हणायचे ही त्याला सवय लागली आहे. ( उदा कमल हसन ला आधी रंगरंगोटी म्हणून नावाजल्यावर नंतर तो असेल बरा म्हणून पलटी मारायची ) जर त्यातुन तो बाहेर आला तर ठीकै !!Cat chasing tail

ऋन्मेषचा मी किंवा इतर कोणीही राग करत नाही, पण तो शाहरुखवर आला की सगळे ( २-३ जण सोडले तर ) पिसाळतात, ही वस्तुस्थिती आहे. उद्या मी पण अमिताभ कित्ती ग्रेट, त्याचे वागणे कित्त्ती ग्रेट, त्याची कमाई कित्ती ग्रेट अशी भुणभुण लावली तर माझ्यावरही लोक दगडं ( शाब्दीक ) मारतील कारण हे त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडले असेल. तेव्हा उगाच ऋन्मेषचा लोक राग का करतात असे धागे काढुन त्याचा TRP वाढवु नका. Proud आम्ही मानसीक रित्या थकलो आहोत, त्याच्या सवाल- जवाब कार्यक्रमाला, तर तुम्ही ते प्लीजच ते सादर करु नकाCute Kitten Sorry

धागा अर्थातच वाचला नाही.
तसंही शीर्षक वाचून तो टाळलाच असता म्हणा.
पण तुमची 'माबो लेखनाची' मी चाहती असल्याने धागा दिसत राहतो आणि दरवेळी 'अरेरे' असं वाटतं.
अगदी अपेक्षाभंग केलात तुम्ही...
असो.

रश्मी छान पोस्ट!

आपल्या पोस्टने काही प्रश्न उपस्थित केले आहेत !

१) काही लोकं शाहरूखचा पहिल्यापासून राग करतात, म्हणून ते लोकं ऋन्मेषचा राग करू लागले आहेत का?

२) काही लोकं ऋन्मेषचा पहिल्यापासून राग करतात, म्हणून ते लोकं शाहरूखचा राग करू लागले आहेत का?

३) या प्रक्रियेत (शाहरूखचा अधीपासूनच राग करणारे + ऋन्मेषचा राग येतो म्हणून शाहरूखचा राग करणारे) अशी शाहरूखचा राग करणारयांची टोटल संख्या वाढली आहे का?

४) ऋन्मेषमुळे शाहरूखचा राग करणारयांची संख्या वाढली आहे म्हणून शाहरूखचे चाहतेही ऋन्मेषचा राग करू लागले आहेत का?

५) तुम्हाला तर माहीतच आहे,
यू कॅन लव्ह शाहरूख, यू कॅन हेट शाहरूख, बट यू कॅननॉट इग्नोर शाहरूख.
थोडक्यात शाहरूखचे चाहते आणि शाहरूखचा राग करणारे यांची टोटल मारली तर ती संख्या अतिप्रचंड भरेल. आणि हे सर्व आता ऋन्मेषचा राग करू लागले आहेत का?

६) आपल्यावर राग करणारयांची संख्या वाढल्याने तो ईफेक्ट न्यूट्रलाईज करायला ऋन्मेषच आता स्वत:वर अतिप्रचंड प्रेम करू लागला आहे का?

७) त्याच्या या स्वत:वर प्रेम करण्यामुळे उरलेसुरले लोकंही आता त्याचा राग करू लागले आहेत का?

८) ते पाहून ऋन्मेष आणखी आणखी स्वत:वर प्रेम करू लागला आहे का?

९) ईथे एक लूप तयार झाला आहे का?

१०) यावर सोल्यूशन काय? तुम्ही ऋन्मेषच्या जागी असता तर या परीस्थितीत काय केले असते?

खालील धाग्यावर आलेल्या ताज्या अनुभवाला अनुसरून चर्चेत एक नवीन मुद्द्दा घेतो -

https://www.maayboli.com/node/68233

लोकांना माझ्याकडे बघून शाहरूख आठवतो, ते शाहरूखचा उल्लेख करतात आणि पुढे विषय वाढला की बिल माझ्यावर फाटते Sad

रश्मी पोस्ट वाचली नाही, हा धागाही वाचला नाही फार पण स्मायलीज का इमोजीज बहारदार, जबरदस्त Lol . इमोजी शब्द तोंडात येत नाही पटकन, स्मायलीज येतो.

धागा अर्थातच वाचला नाही.
तसंही शीर्षक वाचून तो टाळलाच असता म्हणा.
पण तुमची 'माबो लेखनाची' मी चाहती असल्याने धागा दिसत राहतो आणि दरवेळी 'अरेरे' असं वाटतं.
अगदी अपेक्षाभंग केलात तुम्ही...
असो.
Submitted by आतिवास on 3 December, 2018 - 16:04

>>>>>>

अपेक्षाभंग??
मुळात लोकांनी माझा रागच करावा ही अपेक्षा का?
बर्रं एखाद्याने माझ्यावरचा राग सोडला, वा कमी केला, तर त्याचा फायदा त्यालाच नाही का होणार?
मला रामायण ते महाभारतापासून एखादे उदाहरण दाखवा ज्यात रागामुळे कोणाचे भले झाले आहे.

इमोजी शब्द तोंडात येत नाही पटकन, स्मायलीज येतो.
>>>>
हे दोन्ही वेगळे प्रकरण आहेत का?
स्माईली म्हणजे काय? चेहरे असतील तर का..

हे दोन्ही वेगळे प्रकरण आहेत का?
स्माईली म्हणजे काय? चेहरे असतील तर का.. >>> काय माहिती, जाणून घ्यायचा पण प्रयत्न केला नाही.

मायबोलीवर काही निवडणुका होणार आहेत का?
ऋन्मेSSष नि हायझेनबर्ग कुठल्या निवडणुकीला उभे रहात आहेत का? खूप काही (तरीच) लिहून स्वतःचे नाव सतत मायबोलीवर दिसत राहील असे करतात.

Pages