ऋन्मेऽऽषचा लोकांना एवढा राग का येतो?

Submitted by हायझेनबर्ग on 1 December, 2018 - 11:30

मायबोलीवर असा एक काळ होता जेव्हा प्रत्येक धाग्यावर कथा / ललित /चर्चेचा विषय कुठलाही असला तरी चर्चा फक्त 'शाहरूख खान' ह्या एकाच व्यक्ती आणि विषयाभोवती फिरत असत. तसे हट्टाने घडवून आणण्यात ऋन्मेऽऽष सर्वाधिक उत्साही होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझ्यासह अनेकांनी ह्यावरून आपल्या नाराजी ते राग अशा विविध भावना वेळोवेळी व्यक्त केल्या. ह्या अनाकलनीय हट्टाचे पर्यवसान अनेक चांगले धागे भरकटण्यात होत असे.
मग एका मोठ्या वाद विवादानंतर (बहुतेक रसप ह्यांचा धागा) जे सांगायचे होते ते सांगून संपल्यानंतर मी हा नाराजी व्यक्त करण्याचा pursuit सोडून दिला.
माझ्या आकलनशक्ती प्रमाणे ऋन्मेऽऽष ना सुद्धा कुठे तरी 'आपण ह्या नाराजीचा विचार करावा' ह्याची जाणीव झाली असावी असे वाटते. कारण त्यानंतर माझ्या निरीक्षणानुसार 'शाहरूख' विषयावरून इतर धागे भरकटणे थांबले.
बाकी त्यांचे स्वत:चे 'इतर' धागे निखळ करमणूक करणारे असतात हे तर कोणीही मान्य करेल.
सगळ्यांना अपेक्षित असणारा हा positive बदल घडवून आणण्यासाठी माझ्या मते ऋन्मेऽऽष खरोखर कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहेत.

पण एवढ्यात ज्या धाग्यावर 'शाहरूख' संदर्भात बोलणे/लिहिणे हे विषयाला धरूनच आहे तिथे सुद्धा ऋन्मेऽऽष ह्यांच्यावर क्लेशदायक वैयक्तिक टीका टिप्पणी होतांना पाहून वाईट वाटले. खासकरुन त्यांनी घेतलेल्या समंजस भूमिके नंतर.

तेव्हा प्रश्न पडला लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात?
एखाद्यापाशी तो करत असलेल्या एखाद्या कृतीचा निषेध म्हणुन नाराजी, मतभेद, राग व्यक्त करणे वेगळे (मैत्री मध्ये हे हमखास होते म्हणुनच वाद, भांडणानंतर सुद्धा आपण मित्र राहतो) आणि
एखाद्याने काहीही कृती केली तरी तिचा कायम राग राग करणे वेगळे. (इथे त्या व्यक्तीप्रती तुमच्या नजरेत तिरस्कार कायम वास्तव्याला आहे हे कळून येते).

ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?
कारण अशी आकसाची, तिरस्काराची भावना आपल्या एक समंजस आणि सहृदय व्यक्ती बनण्याच्या प्रवासात एक मोठा अडथळा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> so that is bokalat and people supporting him.

नानबा, वरील व्याख्या बोकलत यांना लागु होत नाही कारण ते अमानवीय धाग्यावर अमानवीय अनुभव लिहितात. तिकडे शाहरुख किंवा स्वजो आणत नाहीत. तुमचा बोकलत यांच्या किश्श्यांवर विश्वास बसत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमचा ज्या किश्श्यांवर विश्वास बसतो ते इतर कोणाला अविश्वसनीय वाटत असतील. उलट बोकलत यांनी लिहु नये यासाठी झुंडशाही करुन त्यांच्यावर जे दडपण आणले जाते ते अश्लाघ्य आहे.

कुठल्या किस्स्याबद्दल बोलत आहात?
मी हल्ली कुठे कधी किस्सा लिहिल्याचे मला आठवतही नाही

आणि अमानवीय किस्स्यावर विश्वास बसत नाही म्हणजे तो मानवीय वाटतो का?

धाग्यात रुन्मेश चे नाव असले तरी धागा ऋण्मेश बद्दल नाहीये.

तेव्हा प्रश्न पडला लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात?
एखाद्यापाशी तो करत असलेल्या एखाद्या कृतीचा निषेध म्हणुन नाराजी, मतभेद, राग व्यक्त करणे वेगळे (मैत्री मध्ये हे हमखास होते म्हणुनच वाद, भांडणानंतर सुद्धा आपण मित्र राहतो) आणि
एखाद्याने काहीही कृती केली तरी तिचा कायम राग राग करणे वेगळे. (इथे त्या व्यक्तीप्रती तुमच्या नजरेत तिरस्कार कायम वास्तव्याला आहे हे कळून येते).
ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?

हा धाग्याचा विषय आहे. >>>>>> अनुमोदन

पुढील चर्चा विषयाला धरून व्हावी हि अपेक्षा. >>>>> ही अपेक्षा सध्या जरा अवास्तव वाटत नाही का?

धाग्यात रुन्मेश चे नाव असले तरी धागा ऋण्मेश बद्दल नाहीये.
>>>>
वर एकाच वाक्यात दोन्ही रुणमेष वेगळेच आहेत आणि चुकीचे आहेत हे बघून मौज वाटली Happy

जोक्स द अपार्ट, अनुमोदन
सर्वसमावेशक चर्चा झाल्यास या धाग्यातून काही चांगले निघू शकेन..

>>कशाला हवी शुद्ध मराठी- समोरच्याला म्हणणे पोचतंय ना- मग कशाला लोड घ्यायचा. मी तर मुद्दाम इंग्रजी आणि हिंदी शब्द घुसवतो बोलताना मराठी माहीत असले तरी.

मुद्दाम? आणि त्याने काय साध्य होते म्हणे?
प्रादेशिकतेच्या किंवा बोलीभाषेच्या प्रभावाने आलेले चुकीचे किंवा अशुद्ध शब्द समजून पण घेता येतील पण 'मी कसा बाकी लोकांपेक्षा भारी/वेगळा' हे दाखवण्याच्या अट्टहासातुन आलेले 'जोक्स द अपार्ट' किंवा 'हुमायून नेचर' सारखे शब्द खटकतातच खटकतात!
माझ्या मते पोस्टचा वेगळेपणा त्यात मांडलेल्या विचारातुन आला पाहिजे.... तिथेच जर काही दम नसेल तर मग अश्या धेडगुजरी क्लुप्त्यांचा आधार घ्यावा लागतो!
असो!

स्वरुप, आपण शाळेत सारे एकाच गणवेशात जातो तसे बिल्डींगमधील सारे लोकं एकाच कापडात कपडे शिवून घालू लागले तर कसे वाटेल?
वेगळेपण दाखवायच अट्टाहास म्हणून नाही पण प्रत्येकाची एक स्वतंत्र स्टाईल असावी की नाही?

जोक्स द अपार्ट आणि हुमायून नेचरवर आक्षेप घेणारे रच्याकने वा तत्सम मायबोलीवर सर्रास वापरले जाणारया शब्दांवर का आक्षेप घेत नाहीत?

जोक्स द अपार्ट आणि हुमायून नेचर हे अमराठी शब्दप्रयोग म्हणजे शाळेत गणवेष घालून जायच्या काळात केला तर शोभून जातो असा बालीशपणा आहे.

तस्मात ऋन्म्या, बालीशपणा सोड, लवकर मोठा हो. तुझ्याकडून बर्‍याच अपेक्षा आहेत माझ्या

ओह!
ऋन्मेष तुला खुप खुप शुभेच्छा.
खुप छान उपक्रमात भाग सहभागी झाला आहेस / होणार आहेस.
हर्पेन तुम्हालाही शुभेच्छा.

अहो सस्मित अजून कुठे सहभागी झालो नाहीये.
अहो हर्पेन सध्या तरी त्या अपेक्षा पुर्ण व्हायला वेळ आहे. स्वत:च्याच जबाबदारयात व्यस्त आहे. तशी वेळ येता तुम्हालाच पहिला गाठेन हे नक्की !
ईतर मदत लागल्यास नक्की सांगा ..

@ मानवमामा, जर तुम्ही त्या गाड्यांतीलच एक गाडी व्हाल तर तुम्हाला त्या सारया डावीकडून जाताना दिसतील. कधी त्यांना सामोरे गेलात तर जाणवेल त्या तुमच्या उजवीकडून जात आहेत.

हर्पेन, खुप मौल्यवान काम करताय तुम्ही!
उपक्रमाला शुभेच्छा!!

या उपक्रमासाठी काय करता येईल याचे विचारचक्र तर चालू झाले आहे.... सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.... कसे, केंव्हा ते कळवीन!

हर्पेन यांना गहीवर पुरस्कार देण्यात येत आहे. असे दुर्मिळ लोक आजही समाजात आहेत.....
हा दुर्दम्य आशावाद जपला पाहीजे.

आता ऋन्मेSSष बद्दल लोकांना एव्हढा गहिवर का येतो असा धागा काढा!
स्वरूप,
<<<पोस्टचा वेगळेपणा त्यात मांडलेल्या विचारातुन आला पाहिजे.>>>
इथे असले काही होत नाही हो. इथे फक्त चालू धाग्यासारखे धागे काढून त्यावर बाष्कळ वादावादी करायची!
<<<खरतर इथल्या आभासी वावरात कुणीच कुणाचा राग राग करु नये!>>>
हेहि इथे कुणाला पटत नाही. मायबोली हे आता एक वैयक्तिक आयुष्याशी निगडित झालेले प्रकरण आहे - इथले लिहीणे म्हणजे अगदी शब्दशः घेतले जाते. त्यातून उपहास विनोद वगैरे समजण्याची अक्कल इथे कुणालाहि नाही. जन्मजन्माची वैरे इथे निर्माण होतात! नि मग इथल्या धाग्यांना नि त्यावरच्या प्रतिसादांना ऊत येतो.

असले धागे निघणे आणि त्यावर शतकोत्तरी प्रतिसाद येत राहणे हे मालक लोक हिवाळी झोपेत (कोल्ड स्लीप) गेल्याचे चिह्न आहे.

बिपीनचंद्र हा निचरा आहे. अधूनमधून होणे आणि एकाच धाग्यात होणे सर्वांसाठीच चांगले असते. असे मला वाटते.

चिडकू, पण हायझेनबर्ग यांच्या पोस्ट कोणालाच दिसत नाहीयेत .. तुम्ही स्वतासाठी ब्लॉक करू शकतात, पण सर्वांसाठी कसे केलेत?

ह्या अत्याचाराला वैतागून मी एक क्रोम एक्सटेंशन लिहिले आहे. ज्यात नको असलेले लोक ब्लॉक करता येतात.>>> जरा शेअर करता का?

सध्या मी माझ्यासाठी बनवला आहे म्हणून क्रोम वेब स्टोर वर प्रकाशित केले नाही. सर्वांसाठी बनवायचे असेल तर थोडे बदल करावे लागतील.

सध्या मी माझ्यासाठी बनवला आहे म्हणून क्रोम वेब स्टोर वर प्रकाशित केले नाही. सर्वांसाठी बनवायचे असेल तर थोडे बदल करावे लागतील. >>>> क्रुपया शेअर करा

धन्यवाद सिंबा, हर्पेन.

ऋन्मेऽऽष,
शंभर एक प्रतिसादानंतर असे म्हणेन ज्या मोजक्या आयडींनी जेन्युईन नाराजीची कारणे व्यक्त केली आहेत त्या कारणांचा जरूर विचार करावा.. शक्य असल्यास त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा.
इथे आणि नंतर दुसर्‍या धाग्यांवर मुद्दाम धुसफूस करणार्‍या बाकी बेगडी आयडींची दखल घेत बसू नये. त्यांना कारणेही सांगायची नाहीत आणि उगीच 'हे ऋन्मेऽऽषने लिहिले आहे' ह्या रागातून काहीबाही वैयक्तिक शेरेबाजी करीत लिहित रहायचे.
शुभेच्छा तुम्हाला. तुमचा जुना फेम तुम्हाला पुन्हा मिळो.

धाग्याचा अंतःस्थ हेतू xxxचा अजूनही काही लोकांना राग कसा येत नाही? हा आहे, अशी दाट शंका आहे. हेतू साध्य झाल्याचे दिसतेच आहे. त्याचवेळी शंकर पाटलांच्या धिंङ या कथेचा आधुनिक प्रयोगही पाहायला मिळतोय.
काही कट्टर फॅन्सनी भक्तिमार्गावर पावले टाकायला सुरू केल्याचेही दिसते. त्या भक्तांसाठी खास प्रश्न - जर इतकं स्पोर्टिंग आहे, तर हुमायून नेचर आणि जोक्स द अपार्टच्या चिमट्यांचे वळ अजून का हुळहुळताहेत. पदोपदी त्यांची आठवण का येते? बाकी सोडा, या दोन गोष्टींचं केलेलं समर्थन मान्य आहे का?

माझा प्रवास कौतुक-चिडचीड- राग - ते कीव इथवर झालेला आहे.
स्वतःच्याच दुसर्‍या आयडीने लिहिलेल्या लेखाची अन्य कोणी दिलेली लिंक उघडून तो वाचल्याचे आणि आवडल्याचे सांगितलेले पाहून तर आता करुणा दाटू लागली आहे.

माझा प्रवास कौतुक-चिडचीड- राग - ते कीव इथवर झालेला आहे.
स्वतःच्याच दुसर्‍या आयडीने लिहिलेल्या लेखाची अन्य कोणी दिलेली लिंक उघडून तो वाचल्याचे आणि आवडल्याचे सांगितलेले पाहून तर आता करुणा दाटू लागली आहे.
नवीन Submitted by भरत. on 6 December, 2018 - 09:09

वर बोल्ड केलेला प्रवास नेमका याच टप्प्याने झाला का? कारण काही धाग्यांवर आपण ऋन्मेषच्या चुकीच्या मुद्द्यांचे समर्थन करीत माझ्यासोबत अगदी हिरीरीने वाद घातला आहे. तेव्हा आपला प्रवास नेमका कौतुक या टप्प्यावरच होता का? की तो चिडचीड-राग या टप्प्यावर असतानाही केवळ माझ्याविरोधात लिहायचे म्हणून ऋच्या चुकीच्या मुद्द्यांचे समर्थन केलेत. ॠच्या गेल्या तीन वर्षांमधील अत्यंत तर्कहीन व बाष्कळ धागे आणि प्रतिसादांचे समर्थन अनेकांनी स्वतःच्या सोयीने विरोधकांना गारद करण्यासाठी केले आहे. वेळोवेळी मिळत गेलेल्या या समर्थनामुळेच अत्यंत दर्जाहीन धागे व प्रतिसादांचा विषवृक्ष मायबोलीवर या काळात फोफावला आहे. समर्थकांमध्ये सोकॉल्ड सेक्युलर्स / मोदीविरोधक फार आघाडीवर आहेत.

इतके इरीटेटींग धागे व प्रतिसाद असतानाही या आयडीचे नाव लिहून त्याचा लोकांना राग का येतो? असा धागा मायबोलीवर असू नये असे माझे मत आहे. त्या विशिष्ट धागे व प्रतिसादांवर निषेध करणे हाच एक उपाय आहे अगदीच हे जमत नसल्यास दुर्लक्ष केले तरी चालेल पण समर्थन कुठल्याही परिस्थितीत करु नये. आपोआप टीआरपी घटून उत्साह मावळेल. मागे एक कवी रोज तडका लावीत होते (निदान ते दुसर्‍या धाग्यांवर येऊन गोंधळ घालत नसत हे फारच स्तुत्य होते). आधी अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. काहींनी त्यांच्या धाग्यांचे विडंबन केले तर काही सोकॉल्ड सेक्युलरांनी त्यांच्या विशिष्ट तडक्यांची तळी उचलून समर्थनही केले. पण हळूहळू समर्थक व विरोधक दोन्ही बाजूंनी त्यांचा नाद सोडला आणि सरतेशेवटी शून्य प्रतिसादांचे अनेक तडके लावून झाल्यावर एक दिवस हा रतीब बंद झाला. ऋबाबतही लोकांनी संयम दाखवून मौन पाळले तर हे वैताग देणारे प्रकार प्रतिसादाविना ओस पडून नंतर बंदही होतील. फक्त यात एक गोम आहे. ऋभाऊ कुठलातरी करंट हॉट टॉपिक घेतात आणि त्यावर किरकोळ खरडी टाकून नंतर लोकांना प्रतिसादांना उद्युक्त करतात. याकरिता मायबोलीकरांना विनंती - कुठलाही टेम्टींग हॉट टॉपिक या उघडला तरी त्या हनी ट्रॅपमध्ये न फसता वाटल्यास त्याच विषयावर दुसरा धागा उघडावा व तिथे चर्चा करावी आणि तिथेही हे महाशय डोकावलेत तर सरळ त्यांना ओलांडून पुढे जावे. त्यांच्यावर चिडून काहीच उपयोग नाही. ते स्वतः न रागावता उलट दुसर्‍यालाच चीडीस आणण्यात तरबेज आहेत.

Pages