ऋन्मेऽऽषचा लोकांना एवढा राग का येतो?

Submitted by हायझेनबर्ग on 1 December, 2018 - 11:30

मायबोलीवर असा एक काळ होता जेव्हा प्रत्येक धाग्यावर कथा / ललित /चर्चेचा विषय कुठलाही असला तरी चर्चा फक्त 'शाहरूख खान' ह्या एकाच व्यक्ती आणि विषयाभोवती फिरत असत. तसे हट्टाने घडवून आणण्यात ऋन्मेऽऽष सर्वाधिक उत्साही होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझ्यासह अनेकांनी ह्यावरून आपल्या नाराजी ते राग अशा विविध भावना वेळोवेळी व्यक्त केल्या. ह्या अनाकलनीय हट्टाचे पर्यवसान अनेक चांगले धागे भरकटण्यात होत असे.
मग एका मोठ्या वाद विवादानंतर (बहुतेक रसप ह्यांचा धागा) जे सांगायचे होते ते सांगून संपल्यानंतर मी हा नाराजी व्यक्त करण्याचा pursuit सोडून दिला.
माझ्या आकलनशक्ती प्रमाणे ऋन्मेऽऽष ना सुद्धा कुठे तरी 'आपण ह्या नाराजीचा विचार करावा' ह्याची जाणीव झाली असावी असे वाटते. कारण त्यानंतर माझ्या निरीक्षणानुसार 'शाहरूख' विषयावरून इतर धागे भरकटणे थांबले.
बाकी त्यांचे स्वत:चे 'इतर' धागे निखळ करमणूक करणारे असतात हे तर कोणीही मान्य करेल.
सगळ्यांना अपेक्षित असणारा हा positive बदल घडवून आणण्यासाठी माझ्या मते ऋन्मेऽऽष खरोखर कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहेत.

पण एवढ्यात ज्या धाग्यावर 'शाहरूख' संदर्भात बोलणे/लिहिणे हे विषयाला धरूनच आहे तिथे सुद्धा ऋन्मेऽऽष ह्यांच्यावर क्लेशदायक वैयक्तिक टीका टिप्पणी होतांना पाहून वाईट वाटले. खासकरुन त्यांनी घेतलेल्या समंजस भूमिके नंतर.

तेव्हा प्रश्न पडला लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात?
एखाद्यापाशी तो करत असलेल्या एखाद्या कृतीचा निषेध म्हणुन नाराजी, मतभेद, राग व्यक्त करणे वेगळे (मैत्री मध्ये हे हमखास होते म्हणुनच वाद, भांडणानंतर सुद्धा आपण मित्र राहतो) आणि
एखाद्याने काहीही कृती केली तरी तिचा कायम राग राग करणे वेगळे. (इथे त्या व्यक्तीप्रती तुमच्या नजरेत तिरस्कार कायम वास्तव्याला आहे हे कळून येते).

ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?
कारण अशी आकसाची, तिरस्काराची भावना आपल्या एक समंजस आणि सहृदय व्यक्ती बनण्याच्या प्रवासात एक मोठा अडथळा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवळ माझ्याविरोधात लिहायचे म्हणून ऋच्या चुकीच्या मुद्द्यांचे समर्थन केलेत>>>>>>>>>>>>>>>>

ख्या ख्या ख्या,
म्हणजे ऋ कायम चूकच लिहितो अशी तुमची धारणा आहे का?

कि केवळ रुन्मेश णे लिहिले म्हणून त्याला चूक म्हणावे आणि तुम्ही (काय लिहिलेत ते आठवत नाही, पण बर्याचदा तुमचे लिहिणे मला वैयक्तिक रित्या इडीओटिक वाटते ) जे काही लिहिले होतेत त्याची पाठराखण करावी अशी अपेक्षा आहे का?

जे लोक modi विरोधात बोलतात ते मुद्द्यांना विरोध करतात, मुद्दा नसताना केवळ भाषा प्रभूत्वावर modi समर्थन करणारे लोक आज इतिहास जमा झाले आहेत, त्यामुळे विरोधकांना गारद करण्यासाठी कुऋ चा खांदा वापरला हा तर हास्यास्पद निष्कर्ष आहे

कौतुक-चिडचीड- राग - ते कीव-- हा ओव्हर all इम्प्रेशन चा प्रवास असला तरी या क्षणी मांडलेले मत बरोबर कि चूक हे समजायची आणि केवळ त्या मुद्द्याला पाठींबा देण्याची मच्युरीटी काही लोकांकडे असते , भरत त्या मधील एक आहेत असे माझे मत आहे.

{{{ तुम्ही (काय लिहिलेत ते आठवत नाही, पण बर्याचदा तुमचे लिहिणे मला वैयक्तिक रित्या इडीओटिक वाटते ) जे काही लिहिले होतेत त्याची पाठराखण करावी अशी अपेक्षा आहे का? }}}

सिम्बा,
आठवत नसतानाही तुमच्या मर्यादित आकलनक्षमतेला माझे लिहिणे इडिओटिक वाटते यातच सारे काही आले. माझ्या मतांची तुमच्यासारख्या एकांगी विचाराच्या आयडीने पाठराखण करावी अशी अपेक्षा करण्याइतकी माझी दयनीय परिस्थिती खचितच नाही. तसेच हेमंत लाटकर हे नेहमीच कट्टर मोदीविरोधी मत मांडतात पण तनुश्री दत्त / नाना पाटेकर धाग्यावर त्यांचे मत योग्य वाटल्यावर मी त्यांचे तिथे समर्थन केले आहे. असला संतुलितपणा अड्डेकर कधीच दाखवित नाहीत (यास आरारा आणि भरत मला काही प्रमाणात अपवाद वाटत होते पण आता... असो.)

{{{ जे लोक modi विरोधात बोलतात ते मुद्द्यांना विरोध करतात, मुद्दा नसताना केवळ भाषा प्रभूत्वावर modi समर्थन करणारे लोक आज इतिहास जमा झाले आहेत, त्यामुळे विरोधकांना गारद करण्यासाठी कुऋ चा खांदा वापरला हा तर हास्यास्पद निष्कर्ष आहे }}}

तुम्ही वापरला नसला तरी तो इतर अनेक मोदीविरोधकांनी वापरलेला आहे तेव्हा हा अपुर्‍या माहितीवर काहीही बिनडोक निष्कर्ष काढलाय.

{{{ या क्षणी मांडलेले मत बरोबर कि चूक हे समजायची आणि केवळ त्या मुद्द्याला पाठींबा देण्याची मच्युरीटी काही लोकांकडे असते , भरत त्या मधील एक आहेत असे माझे मत आहे.
नवीन Submitted by सिम्बा on 6 December, 2018 - 12:02 }}}

असेच माझेही मत होते. परंतु त्या धाग्यावरील माझ्या तार्किक मुद्यांचा प्रतिवाद करताना आणि ऋच्या बिनडोक प्रतिसादांचे समर्थन करुन भरत यांनी त्यांचे नेहमीचे सहकारी नानाकळा यांच्याही विरोधात मांडले आणि त्यानंतर माझ्या अनेक प्रतिसादांवर नेहमीच विरोधी मत मांडताना आपला पूर्वीचा संतुलितपणा सोडला असल्याचे माझे निरीक्षण आहे.

{{{ बाहुबलीने चीनमध्ये कमवलेला गल्ला पाहून पोटदुखी झाल्याने अमीर खानने दंगल चीनमध्ये उतरवला .
Submitted by भरत. on 6 December, 2018 - 11:51 }}}

धडधडीत खोटे विधान.

<<कौतुक-चिडचीड- राग - ते कीव इथवर >>
माझा प्रवास तर त्याहून पुढे जाऊन मला हे सगळे फारच विनोदी वाटायला लागले आहे.

पण <<बाहुबलीने चीनमध्ये कमवलेला गल्ला पाहून पोटदुखी झाल्याने अमीर खानने दंगल चीनमध्ये उतरवला .>>
हे वाचून आशा वाटते की हे वाक्य जरी वरवर विषयाशी संबंधित दिसत नसले तरी त्याला काही खूप, खूप खोSSSलवर अर्थ असावा. पण इथे कुणाला तो अर्थ समजणार? इथे साध्या शब्दांचे अर्थ कित्येकांना कळत नाहीत, तर हे असले खोSSSल अर्थ कुणाला समजणे सोडाच पण त्यात काही विषयाशी संबंधित अर्थ असू शकेल अशी शंका सुद्धा कुणाला येणार नाही.
कारण चर्चेचा विषय, नि त्यावरील चर्चा हे सगळे निरर्थकच आहे.

नाहीतर धागा किती भरकटला आहे नि किती निरर्थक आहे हे दर्शवण्यासाठी लिहीले असावे.
असो.
पण विनोदाचा प्रयत्न असेल तर इथल्या लोकांना समजतील असे विनोद करा. उदा. महाराष्ट्र टाईम्स मधला आजचा हसा लेको मधला विनोद. काही लोकांना तो विनोद आहे हेहि कळणार नाही म्हणा, पण त्यातल्या त्यात!

विनोद आहे हे कळावे म्हणून स्वतःच भरभरून हास्य स्माईल्या टाकण्याची प्रथा आहे आजकाल.

माझा प्रवास कौतुक-चिडचीड- राग - ते कीव इथवर झालेला आहे.
<<
याला मम.
पण त्यानंतर हे जे खालचं आहे, ↓

>>स्वतःच्याच दुसर्‍या आयडीने लिहिलेल्या लेखाची अन्य कोणी दिलेली लिंक उघडून तो वाचल्याचे आणि आवडल्याचे सांगितलेले पाहून तर आता करुणा दाटू लागली आहे.<<

त्याने, किव येण्याच्या पुढचा किळस हा प्रकार येतो. Sad

स्वतःच्याच दुसर्‍या आयडीने लिहिलेल्या लेखाची अन्य कोणी दिलेली लिंक उघडून तो वाचल्याचे आणि आवडल्याचे सांगितलेले पाहून तर आता करुणा दाटू लागली आहे
>>> इंटरेस्टिंग. हा कोणता धागा- लिंक मिळेल का? भन्नाट भास्कर चा धागा की अर्चना सरकार चा?

पुण्यातून काँग्रेसच्या तिकीटावर संजय दत्त ?
<<
कोथ्रूडमधून ग्रामसेवकाची इलेक्सन्स होणारेत का? कारण इतक्यात इतर कोणत्या निवडणुका माहीती नाहीत? येरवड्यातून त्याने सोशल नेटवर्किंग केलं असेल तर माहित नाही, पण त्याचे बाबा काँग्रेसचे खासदार खूप वर्षे होते, अन चांगलेही होते, हे सत्य आहे.

म्हणजे ऋ कायम चूकच लिहितो अशी तुमची धारणा आहे का?
कि केवळ रुन्मेश णे लिहिले म्हणून त्याला चूक म्हणावे आणि तुम्ही जे काही लिहिले होतेत त्याची पाठराखण करावी अशी अपेक्षा आहे का? >> +११११११११११११११११११११११११११ ( वैयक्तिक संदर्भ टाळण्यासाठी कंसातला मजकूर गाळला आहे)
हा प्रश्न खरं तर ऋन्मेष-क्रोधाने ग्रस्त सगळ्याच मायबोलीकरांना विचारला पाहिजे.

कुठल्यातरी सबंधित वा असबंधित कारणाने ऊद्भवलेल्या रागातून/तिरस्कारातून/आकसातून मुठी कायम वळलेल्या ह्यांना एक पंचिंग बॅग हवी असते आणि ते सदैव अशा पंचिंग बॅगेच्या शोधात असतात. एक पंचिंग बॅग आणि आपला शो-डाऊन बघायला किमान एक मायबोलीकर, एवढे मिळाले की झाले. शो-डाऊनची जागा मायबोलीच असली पाहिजे असे काही नाही कारण ह्यांच्या मुठींच्या बोटांसारखे ह्यांचे कणेही वाकलेले असतात.
चालायचेच, जसा जन्म म्हंटला की त्याचे फेरे आले तसे एकदा मायबोलीकर झाला की ह्या सगळ्या स्थित्यंतरातून गेल्याशिवाय आयडीच्या नशिबाचे भोग संपत नाही.

चार दिवसांपूर्वी हायझेनबर्ग यांनी भन्नाट भास्कर यांचा लेख वर काढला.
https://www.maayboli.com/node/66805

त्यावर मी असा प्रतिसाद दिला.

सुंदर आणि प्रामाणिक लेख !
वर काढल्याबद्दल धन्यवाद Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2018 - 00:11

या प्रतिसादावर वरती चर्चा चालू आहे का?

असो,
खरेच सुंदर आणि प्रामाणिक लेख लिहीला आहे मी. सर्वांनी जरूर वाचा.

Lovely lines from
Mirza Ghalib...

ख़ुदा की मोहब्बत को फ़ना कौन करेगा?
خُدا کی مہبت کو فنا کون کریگا؟
सभी बन्दे नेक हों तो गुनाह कौन करेगा?
سبھی بندے نئک ہوں تو گناہ کون کریگا؟
ऐ ख़ुदा मेरे दोस्तों को सलामत रखना
اے خُدا میرے دوستوں کو سلامت رکھنا
वरना मेरी सलामती की दुआ कौन करेगा
ور نہ میری سلامتی کی دُعا کون کریگا
और रखना मेरे दुश्मनों को भी महफूज़
اور رکھنا میرے دُشمنوں کو بہی مہفوذ
वरना मेरी तेरे पास आने की दुआ कौन करेगा...!!!
ورنہ میری تیرے پاس آنے کی دُعا کون
کریگا۔۔۔۔!!!

कौतुक-चिडचीड- राग - ते कीव आणि फायनली किळस ...
या सर्वांवर एकेक धागा हवा. फक्त रागावरच का?

तुम्हाला ऋन्मेषची किव का वाटते? किळस का येते? वगैरे वगैरे..

पण सिक्वेन्स फॉल्लो करूया..

तुम्हाला ऋन्मेषचे कौतुक का वाटते?
वरीलपैकी कोणीही एकाने हा धागा काढा.

हुमायून नेचर बघता राग चीडचीड लोकं उत्स्फुर्तपणे व्यक्त करतात.. पण कौतुक करायच्या आधी शंभर वेळा विचार करतात.

मला विचाराल तर हे खरे उलटे व्हायला हवे. म्हणजे एखाद्याचे कौतुक मनमोकळेपणाने करावे. पण राग करताना शंभर वेळा विचार करावा. कारण कौतुक जर मनापासून असेल तर ते करताना आपल्यातील सकारात्मकता वाढीस लागते आणि मन प्रसन्न होते. तर राग व्यक्त करताना आपलीच मन:शांती ढासळते.

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचे बाफं कसे खूप खूप
बाफांवर बोलणे कसे गूळ तूप
बोलण्याचा अर्थ कसा गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या पोष्टी कश्या लांब लांब
लॉजिकने काढला घाम घाम
शब्दांचा अर्थ कसा झोल झोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या थापांचा ताम झाम
वाचक आले घेवून बाम बाम
थापांची झाली मग पोल खोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषला नाही काही काम काम
पब्लिकला केले त्याने जाम जाम
जाममध्ये टमाटर कसे गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचा हीरो कसा हकल्या
हकल्याच्या पोष्टी जश्या टिकल्या
बाफांना टिकल्यांची ओल ओल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुssझा माबोवर भरोसा नाssय काssय

- कवी - लोककवी हायझेनबर्ग
संदर्भ :
https://www.maayboli.com/node/63169

मागच्या एका प्रतिसादात ही लिंक दिलेली होती. पण त्यावर चर्चा झालेली दिसत नाही.

मस्तच Lol

कौतुक करा काय सांगितले लोकं सारे पसार..
या रे .. रागच करा.. पण या परत

आणि ते स्वत:च्या लेखावरची कौतुकाची पोस्टचा व्यवस्थित संदर्भ द्या..

अर्धेच सत्य मांडून युधिष्टिर बनू नका Happy

मी आधीचे सगळे रीप्लायवाचले नाहीत.. तेवढा वेळ आणि उ त्साह ही नाही ह्या विषयाबद्दल ..

पण मला असे वाटते आहे "ऋन्मेSSष" ही एक व्यक्ती नसून कोणीतरी डू.आय. ने सगळ्याना " मान्जर-मासा" (तेच ते .. cat·fish) म्हणजे थोडक्यात "मामा" बनवले आहे.

तसे करन्याची अनेक कारणे:

- ऋन्मेऽऽष हे व्यक्ती चित्र आपण मराठी-जनता श़ क्य तो ज्या ज्या गोष्टी ऊजळ माथ्याने करणार नाही, आणि केल्या तरी गाव भर सान्गत सुटणार नाही (ग. फ्र., अनेक प्रेम-प्रकरणे, मुलगी पहाणे कार्यक्रम, व्हेज़ लोकाना नॉन - व्हेज़ खाऊ घालणे, अनेक शिव्या देणे आणि त्याबद्डल अभिमान बालागने ..ते "बार" काढणे) अश्या सुप्त इच्छा अश्या डू. आय. च्या निमित्ताने पूर्ण करणे
- तमाम जनतेला उल्लू बनवणे
-त्यान्चे धागे हॅयेजॅक करूँ विषय भालती कडेच वळवणे , त्यातून स्वत: फेमस होणे
- हयातून स्वत: ची "निखळ" करमणूक करूँ घेणे
- स्वत: च्या लिखाणाचा लोकन्वर होनारा परीनाम पाहून आनंद लूटने

पण त्यावर चर्चा झालेली दिसत नाही. >> असं करता का? तुम्हीच दोन चार डुप्लिकेट आयडी काढा ( तीन महिन्यांच्या बाळवयात तुम्हाला वारसा हक्कातून मिळालेला राग पाहता तुमचे आधीचे जुने अतृप्त आयडी असतीलच (अर्थात त्यांचे निर्दालन झाले नसल्यास) ), मग ते आयडी वापरून तुम्हीच आणा की चर्चा घडवून... चर्चा काय चांगली महाचर्चा घडून जाऊ दे. निदान स्वत:चा राग स्वतः व्यक्त करण्याएवढे धैर्यवान झाल्याचे भाबडे समाधान मिळेल तुम्हाला Wink
बघा जमेल तुम्हाला नक्की.....मी दोन दिवस स्कीईंग करून येतो आणि आल्यावर तुम्ही ईथे किती घसरलात ते पाहतो. Proud

अहो हाब किती तो त्रागा
तुमच्या काव्यशक्तीचे आम्ही कौतुक करावे आणि तुम्ही मात्र मोदी असल्याच्या थाटात मला बघा कसे त्रास देतात, माझा राग राग करतात म्हणून भोकाड पसरावे हे काही समजत नाही. किती राग करताय माझा ? ड्युआयडी काय, तीन महीन्यात राग काय...

तुम्हीच धागा काढलाय लोक राग का करतात (यात स्वतःला गृहीत धरले होते का ?)
आता तुमचीच कविता चर्चेला घेतली आहे. यात माझा दोष काय बुवा ? (कि मी जबरदस्तीने लिहून घेतली ? Lol )

Lol तुमची तडफड समजू शकतो कटप्पा. मला आउटविट करण्यासाठी लागणारा स्मार्टनेस अजूनतरी तुमच्याकडे नाही एवढे जरी तुम्ही स्वतःला समजाऊ शकलात तर तुम्हाला थोडा peace of mind मिळू शकेल.
You can't fathom how easy it is for me read you Proud

Pages