ऋन्मेऽऽषचा लोकांना एवढा राग का येतो?

Submitted by हायझेनबर्ग on 1 December, 2018 - 11:30

मायबोलीवर असा एक काळ होता जेव्हा प्रत्येक धाग्यावर कथा / ललित /चर्चेचा विषय कुठलाही असला तरी चर्चा फक्त 'शाहरूख खान' ह्या एकाच व्यक्ती आणि विषयाभोवती फिरत असत. तसे हट्टाने घडवून आणण्यात ऋन्मेऽऽष सर्वाधिक उत्साही होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझ्यासह अनेकांनी ह्यावरून आपल्या नाराजी ते राग अशा विविध भावना वेळोवेळी व्यक्त केल्या. ह्या अनाकलनीय हट्टाचे पर्यवसान अनेक चांगले धागे भरकटण्यात होत असे.
मग एका मोठ्या वाद विवादानंतर (बहुतेक रसप ह्यांचा धागा) जे सांगायचे होते ते सांगून संपल्यानंतर मी हा नाराजी व्यक्त करण्याचा pursuit सोडून दिला.
माझ्या आकलनशक्ती प्रमाणे ऋन्मेऽऽष ना सुद्धा कुठे तरी 'आपण ह्या नाराजीचा विचार करावा' ह्याची जाणीव झाली असावी असे वाटते. कारण त्यानंतर माझ्या निरीक्षणानुसार 'शाहरूख' विषयावरून इतर धागे भरकटणे थांबले.
बाकी त्यांचे स्वत:चे 'इतर' धागे निखळ करमणूक करणारे असतात हे तर कोणीही मान्य करेल.
सगळ्यांना अपेक्षित असणारा हा positive बदल घडवून आणण्यासाठी माझ्या मते ऋन्मेऽऽष खरोखर कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहेत.

पण एवढ्यात ज्या धाग्यावर 'शाहरूख' संदर्भात बोलणे/लिहिणे हे विषयाला धरूनच आहे तिथे सुद्धा ऋन्मेऽऽष ह्यांच्यावर क्लेशदायक वैयक्तिक टीका टिप्पणी होतांना पाहून वाईट वाटले. खासकरुन त्यांनी घेतलेल्या समंजस भूमिके नंतर.

तेव्हा प्रश्न पडला लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात?
एखाद्यापाशी तो करत असलेल्या एखाद्या कृतीचा निषेध म्हणुन नाराजी, मतभेद, राग व्यक्त करणे वेगळे (मैत्री मध्ये हे हमखास होते म्हणुनच वाद, भांडणानंतर सुद्धा आपण मित्र राहतो) आणि
एखाद्याने काहीही कृती केली तरी तिचा कायम राग राग करणे वेगळे. (इथे त्या व्यक्तीप्रती तुमच्या नजरेत तिरस्कार कायम वास्तव्याला आहे हे कळून येते).

ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?
कारण अशी आकसाची, तिरस्काराची भावना आपल्या एक समंजस आणि सहृदय व्यक्ती बनण्याच्या प्रवासात एक मोठा अडथळा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असला धागा तुम्ही काढाल असे वाटले नव्हते.
ये हो क्या राहा है???

बाकी लेखाशी सहमत- चुकीचे आहे असे उगाचंच राग करणे.

असल्या धागा तुम्ही काढाल असे वाटले नव्हते.>>>+११११! वरचा लेख वाचला नाही मी, तरी रसप च्या कभी हा कभी ना च्या धाग्यावर तुम्ही जो धुमाकूळ घातला होता तो लक्षात घेता खरेच असा काही धागा तुम्ही काढाल असे नव्हते वाटले.

बाकी, ऋन्मेष असो वा इतर कोणीही, आंतरजालावर मुळात एखाद्याला इतके महत्त्व द्यायचेच का की त्याबद्दल राग यावा किंवा असूया वाटावी. हां जर एखाद्याशी व्यक्तिरिक्त संपर्कात असेल तर गोष्ट वेगळी.

च्रप्स,
मायबोली बाबतीत माझा एक सरळ, साधा दृष्टीकोन आहे... मी आयडीच्या लिखाणाला/कृतीला/ईंटेंटला महत्व देतो आयडीला नाही. एखादी कृती चुकली किंवा आवडली नाही म्हणून तो आयडी माझ्यासाठी कायमचा बाद आहे असा विचार मी करत नाही. जे काही सातत्याने (मुद्दाम) चुकणारे आयडी असतात त्यांना मात्र नक्की ईग्नोर करतो.
माझ्या मते जे चूक ते चूक... मग ऋन्मेष असो, स्वाती_आंबोळे असोत किंवा अजून कोणी आयडी असो... आणि कितीही वेळा 'हे चूक आहे' सांगावे लागले तरी मी यथाशक्ती सांगतो. आयडीच्या कृतीपलिकडे मी आयडीला महत्व देत नाही... ह्याचाच दुसरा अर्थ grudge सुद्धा ठेवत नाही.

उदाहरण देतो.. शाहरूखच्या एखाद्या सिनेमातल्या मला न आवडलेल्या भुमिकेचे मी एक लेख लिहून जगाच्या अंतापर्यंत यथेच्छ वाभाडे काढले - ह्याचा अर्थ मी शाहरूखचा पुढचा सिनेमा आजिबात बघणार नाही आणि त्याची भुमिका चांगली असली तरी त्याचे कौतूक करणार नाही किंवा माझ्या मते चांगल्या भुमिकेला वाईट म्हणणार्‍याशी 'भुमिकेबद्दल' वाद घालणार नाही असा होत नाही. पुन्हा एखादी वाईट भुमिका करणारा शाहरूख म्हणजे 'एक वाईट व्यक्ती' आहे असा सोयीस्कर अर्थही मी काढत नाही.

सध्या ऋन्मेषच्या बाबतीत चुकीचे होते आहे ... त्याला चूक म्हणत आहे. ऋन्मेषशी माझा वाद होता म्हणून आता त्याला चुकीच्या पद्धतीने नावं ठेवणारे बरोबर आहेत असा स्वार्थी विचार मी करत नाही.

मुद्दा समजून न घेता हे फक्त 'हायझेनबर्ग ने लिहिले आहे' म्हणून विरोधच करायचा, वैयक्तिक काहीबाही लिहायचे असे ठरवून काही usual suspects ईथेही येतील त्यांच्याबद्दल काय बोलणार.. देव त्यांचे भले करो.

<< लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात? >>
<< ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना? >>

माझी ऋन्मेऽऽष यांच्याशी मैत्री नाही आणि वैरही नाही, त्यामुळे एक तटस्थ मत म्हणून विचार करावा. लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग करतात याचे कारण त्या व्यक्तीचा narcissistic स्वभाव हा असू शकतो. प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे तसाच त्या व्यक्तीने पण स्वतःला विचारले पाहिजे की आपल्याला Narcissistic Personality Disorder नाहीये ना.

तुम्ही दारूचा धागा वाचला का हायझेनबर्ग? त्या आणि इतर अनेक धाग्यांवर रूनमेश उर्फ भभा उर्फ मधूरांबे यांनी विनाकारण खूप गोंधळ माजवून चांगल्या धाग्याची वाट लावली होती. त्या धाग्यात ना दारूचे उदात्तीकरण होते, ना पिण्याचा आग्रह.. फक्त अनुभव आणि काही रेसिपी होत्या.. पण वृथा आपले उपद्रवमूल्य अबाधित ठेवण्यासाठी म्हणून रुंमेश तिथे घाण करत होते. हे असं वागणं तिरस्कार निर्माण करतं.
असो!

ये मायबोलीवाले भी ना...
समजते नही है कभी कभी.,
मै सिर्फ फॅन नही हू उसका..
दुनिया है वो मेरी !

शाहरूखबाबत माझी केमिस्ट्री वेगळीच आहे.
मी प्रत्यक्ष आयुष्यात कदाचित शाहरूख ईतका स्मार्ट, लव्हेबल, रोमांटीक, बोलण्यात चतुर, वागण्याबोलण्यात प्रचंड आत्मविश्वास असलेला, फुल्ल ऑफ एनर्जी कदाचित नसेलही.. पण आजवरचा कुठल्याही सोशलसाईटवरचा माझा वावर शाहरूख असल्यागतच असतो. मला बरेच लोकं शाहरूख अशीच हाक मारतात आणि तसेच समजतात. त्यामुळे त्याचे कौतुक करताना, त्याच्याबद्दल लिहीताना मला माझ्याबद्दलच काहीतरी लिहीतोय असे वाटते आणि माझा अहं सुखावतो. त्यामुळे मी स्वत:नंतर न थकता, न कंटाळता कोणाबद्दल लिहू शकतो तर तो शाहरूख खान!

जिथे चित्रपटांवर चर्चा चालते तिथे चर्चच्या ओघात शाहरूख येणे स्वाभाविकच आहे. पण बरेचदा ईतर धाग्यात शाहरूख यायचा ते काहीतरी उदाहरण देताना तो किंवा त्याच्या चित्रपटातील एखाद्या प्रसंगाचे उदाहरण दिले जाते. कारण शाहरूख ईतका माझ्या डोक्यात भिनला आहे की माझ्या डोक्यात उदाहरणेही त्याच्याशी संबंधितच येतात.
ईथे मी नेहमी क्रिकेटवर कॉलम लिहीणारे द्वारकानाथ संझगिरींचे उदाहरण देतो. त्यांच्या क्रिकेटव्यतीरीक्त ईतर विषयांच्या लेखातही "क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर..' असे म्हणत क्रिकेटसंबंधित उदाहरणे दिलेली असतात. माझेही शाहरूखबाबत तसेच होते.

कोणाचे ईतके फॅन असणे वा एखाद्याशी ईतके एकरूप असणे चांगले नसेलही.. पण मला नेहमीच एक वेगळीच एनर्जी देतो शाहरूख हे मात्र खरे आहे..

असो, तर जर काही लोकं माझा राग करत असतील तर त्याची अजूनही कारणे असतीलच. मलाही काही माहीत आहेतच. पण तुर्तास या पोस्टमध्ये शाहरूखपुरतेच लिहितो. प्रतिसादात कोणी काही शाहरूखव्यतीरीक्त मुद्दा घेतला तर त्यानुसार बोलता येईन Happy

Submitted by अजिंक्यराव पाटील on 2 December, 2018 - 02:37
>>>>>

मधुरांबे ??
आपल्या पोस्टमधून हे नाव वगळा
मग मला आपल्या पोस्टचे उत्त्तर द्यायला आवडेल Happy

दारू कशी पिता या धाग्यावर रूनमेश ने खरच त्रास दिला होता. मुळात धागा दारू च्या रेसिपी चा होता तिथे येऊन दारू कशाला पिता वगैरे..
याबाबतीत अजिंक्यराव यांचा मुद्दा बरोबर आहे. +1

लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग करतात याचे कारण त्या व्यक्तीचा narcissistic स्वभाव हा असू शकतो.
>>>>

येस्स!
मी सो कॉलड नार्सिस्ट आहे !
माझे स्वत:वर प्रचंड प्रेम आहे.
आणि ते चारचौघात व्यक्त करायलाही मी लाजत नाही.
स्वत:वरचेच कश्याला, आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींवर प्रेम केले आहे ते असेच बिनधास्त व्यक्त केले आहे. मग आई असो वा गर्लफ्रेंड, वा एखादा खास मित्र...
प्रेम व्यक्त करायला संकोच करणे हा मी त्या प्रेमाचा अपमान समजतो.

पण अश्या लोकांचा ईतर लोकांना राग का येतो हे मला आजवर न सुटलेले कोडे आहे Happy

दारू कशी प्यायची याची चवीचवीने चर्चा करणे. ईतर जणांना पिण्यास उस्युक्त करणे, हे मला फार चुकीचे वाटते तसे ते दारूचे उदात्तीकरण वाटते.
निदान तो धागा वाचून बहकलेल्या होतकरू तरुणांना माझ्या मध्येमध्ये येणारया पोस्ट धोक्याचा सिग्नल दाखवतील. त्यामुळे मला माझ्या या कृत्याचा जराही पश्चाताप नाही. हजार लोकांनी माझा राग केला तरी चालेन, एखाद्या माऊलीचे आशिर्वाद तरी मला नक्की मिळतील.. मला ते पुरेसे आहे Happy

आंतरजालावर मुळात एखाद्याला इतके महत्त्व द्यायचेच का की त्याबद्दल राग यावा किंवा असूया वाटावी. हां जर एखाद्याशी व्यक्तिरिक्त संपर्कात असेल तर गोष्ट वेगळी.

Submitted by VB on 1 December, 2018 - 23:12

>>>>>>>

छान विचार आहेत.
शक्य झाल्यास वैयक्तिक संपर्कात असलेल्या व्यक्तींचाही कोणत्याही कारणासाठी राग करू नका वा कोणाबद्दल असूया बाळगू नका... वैयक्तिक आणि खरया आयुष्यात तरी कोणाला ईतके का महत्व द्यावे की ज्याच्यामुळे आपल्यालाच मनस्ताप सहन करावा लागेन Happy

बाळूशाही धागा मी अजून वाचला नाही. ते काय प्रकरण आहे मला माहीतही नाही. हल्ली माझ्याकडे वेळ नसतो. गेले चारपाच दिवस वेळ मिळालाय तो माझ्या आवडीच्या विषयांवर बागाडतोय. असाच वेळ मिळाला तर तो धागाही चेक करेन. जर त्या धाग्यावर काही गैरप्रकार चालू आहे या तुमच्या म्हणण्यात तथ्य असेल तर नक्की आवाज उठवेन.

<<<जर त्या धाग्यावर काही गैरप्रकार चालू आहे या तुमच्या म्हणण्यात तथ्य असेल तर नक्की आवाज उठवेन.>>>
य्ये बात! अगदी बरोब्बर. याच तुम्ही निरनिराळ्या धाग्यांवर, हायझेनबर्ग यांनाहि घेऊन या. सरळ करा एकेकाला.
<<<ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?>>>
छे: छे:, असे कुठे असते का? मा़झे ते बरोबर, इतर चुकले. मी रागावलो तर ते योग्य, कारण ते वाईट. पण ते रागावले तरी तेच वाईट!

बहुतेक नाहितर प्रत्येक वेळेला, ऋन्म्या त्या राजा आणि टोपीवाल्या उंदराच्या गोष्टीतल्या उंदरासारखा रिअ‍ॅक्ट होतो. म्हणजे काय, तर त्याच्या लाडक्या शाखा/स्वजो/सप यांच्या विरोधात काहि वाईट बोललं गेलं, तर ऋन्म्याचं आपलं ढुमाक ढुमाक. काहि चांगलं बोललं गेलं तरिहि ढुमाक ढुमाक. आणि त्याचं हे ढुमाक ढुमाक इरिटेटिंग होतं, जाहिरपणे व्यक्त केलं जातं तरिहि याचं आपलं ढुमाक ढुमाक चालुच असतं... Lol

रूनमेश - दारूपेक्षा वाईट साखर आहे,>>>
उगीच काहीही का दारूचे समर्थन करण्यास Proud
हे दारूचे उदात्तीकरण करणे झाले. साखरेच्या नशेत रेस्टॉरंट बाहेर शिव्या घालत एकमेकांची डोकी फोडणारे लोक पाहिलेत का?

मेरीच गिनो, हायझनबर्ग आणि ऋन्मेष एक नव्हेत.
हां, गेल्या चारपाच दिवसात हायझनबर्ग यांचे अकाउंट हॅक तर झाले नाही ना असे वाटण्याइतपत बदल दिसून येतो ती गोष्ट वेगळी.

अरे पण अतिप्रमाणात दारू वाईट हे तिथे पण लिहिले होतेच की.. शिवाय आणि पिणाऱ्यांना तुम्ही काहीही सांगणारे आहातच कोण? गरज काय? एकदा बोलून सोडून द्या.. आता गुलूमुलू माऊली वगैरे बोलून टाळताय, पण आपली दखल (किमान) आभासी जगतात प्रत्येक ठिकाणी असावी, आपले उपद्रवमूल्य (पुन्हा एकदा किमान) आभासी जगात अबाधित रहावे हिच तुमची एकमेव इच्छा असते.
असो उगाच प्रतिसाद वाढवण्यात अर्थ नाही. तुम्ही चालू द्या आरश्याची आरती.

बरं. काल पासून तुम्ही तसं म्हणत आहात असं मला उगाच वाटत होतं. ते चुकीचं होतं हे आता कळलं, क्षमस्व.

मानव,
तिकडेही लिहिले होते आणि इथे पुन्हा लिहितो
आजारी होतो आणि तश्या स्थितीत सलग काही बघण्या वाचण्यासाठी लागणारा फोकस शक्य होत नसल्याने मायबोलीवरील मिस झालेले हलके फुलके धागे वाचले आणि प्रोत्साहनपर प्रतिसाद दिला.
तुम्ही त्याचा दोन दोनदा उहापोह करण्या ऐवढे माझे काही चुकले का?
मायबोली वर असे वाचणे लिहिणे निषिद्ध आहे का?
मी काही चुकीचे/खटकणारे प्रतिसाद दिले का?
मी ते तुमची परवानगी घेऊन करायला हवे होते का?
तुम्हाला ते क्लेशदायक वाट्ले का?
एकाही प्रश्नाचे तुमचे उत्तर हो असल्यास तुमची आगाऊ माफी मागतो.. सॉरी.

हायझनबर्ग मी फक्त आश्चर्य व्यक्त केले, नाराजी नाही. हा बदलही स्वागतार्हच आहे. मी फक्त मेरीच गिनो यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

ओह तरी सॉरी म्हणतो, स्वतःचा गैरसमज करून घेतल्याबद्दल.
माझ्यासारख्या मायबोली वरील सामान्य आयडीने धागे वाचणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे ह्यात एखाद्याला आश्चर्य वाटण्या एवढे नेमके काय केले हे कोडे आता मला छळत राहणार.

मेरीच गिनो साहेब,
धागा ऋन्मेऽऽष बद्दल आहे, माझ्या बद्दल नाही. ऋन्मेऽऽषला तो नको असल्यास त्यांनी सांगितले असते आणि मी धागा रद्द केला असता.

पण तुम्हाला काही कारणाने माझा राग येत असेल आणि त्याबद्दल लिहून बरे वाटणार असेल किंवा इतरांनी लिहावे असे वाटत असेल तर जरूर तसे लिहा... Anything for you sir.

हाबसाहेब
अहो, धाग्याचं शीर्षक दुस-याच्या खांद्यावर ठेवून बंदूक मारणे असे आहे का हा प्रश्न तुमच्या चाणाक्ष आणि अति संवेदनशील मेंदूला केव्हांच समजला असेल. पण मुरलेल्या भाजपेयी लोणच्याप्रमाणे त्याला त्रागा आणि विपर्यासाचे तेल सुटलेय. Lol

बर बाबा,
ऋन्मेऽऽषच्या नावाने धागा काढून मला 'लोकांना माझा राग का येतो' ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे आहे हे तुमचे रावणाच्या बेंबीतून उगवलेले लॉजिक सपशेल मान्य. Proud ह्या न्यायाने केदार जाधव ना त्यांच्या शाहरूख च्या धाग्यावर 'मायबोलीकरांना केदार जाधव का आवडत नाही' ह्याचे उत्तर मिळाले असेल.
ह्या अशा लॉजिक सेन्स ने तुम्ही ' हाब तुमचे लॉजिक गंडलेले असते' म्हणत असाल तर मला आनंदच आहे माझे लॉजिक गंडलेले असण्याचा.

तुमचा भाजप वर पण राग आहे का? बोलून टाकत चला हो.. राग म्हणजे आपल्यालाच जिवंत जाळणारी चिता, माहित आहे ना.
तुमच्या सारख्यांना बरे वाटवे म्हणुनच हा धागा उघडला आहे. तुम्हाला 'मला हायझेनबर्गचा राग का येतो' म्हणुन वेगळा धागा हवा आहे का? Please help yourself. माझा काहीही आक्षेप नाही..
तुमच्या पासून स्फूर्ती घेऊन अनेक जण भीड चेपून लिहिते होतील.. आवडेल मला.
धागा नाही जमला तर माझ्या विपू मध्ये लिहिले तरी चालेल.

बाकी Usual suspects मध्ये तुम्ही पहिला नंबर मारलात.. अभिनंदन.

अरे पण अतिप्रमाणात दारू वाईट हे तिथे पण लिहिले होतेच की..
>>>>>
हो ना, जसे की साखर, चहा, अगदी पाणी सुद्धा अतिप्रमाणात वाईट म्हणत सर्वांना एकाच पंगतीला बसवले जात होते.
..

शिवाय आणि पिणाऱ्यांना तुम्ही काहीही सांगणारे आहातच कोण? गरज काय?
>>>>>>
आमच्याकडे मुंबईत जेव्हा कोणी धावत्या ट्रेनमध्ये चढतो तेव्हा मीच काय बरेच लोकं त्याला ओरडतात, अबे मरनेका है क्या?
या मागची भावना समजून घ्या...

Pages