ऋन्मेऽऽषचा लोकांना एवढा राग का येतो?

Submitted by हायझेनबर्ग on 1 December, 2018 - 11:30

मायबोलीवर असा एक काळ होता जेव्हा प्रत्येक धाग्यावर कथा / ललित /चर्चेचा विषय कुठलाही असला तरी चर्चा फक्त 'शाहरूख खान' ह्या एकाच व्यक्ती आणि विषयाभोवती फिरत असत. तसे हट्टाने घडवून आणण्यात ऋन्मेऽऽष सर्वाधिक उत्साही होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझ्यासह अनेकांनी ह्यावरून आपल्या नाराजी ते राग अशा विविध भावना वेळोवेळी व्यक्त केल्या. ह्या अनाकलनीय हट्टाचे पर्यवसान अनेक चांगले धागे भरकटण्यात होत असे.
मग एका मोठ्या वाद विवादानंतर (बहुतेक रसप ह्यांचा धागा) जे सांगायचे होते ते सांगून संपल्यानंतर मी हा नाराजी व्यक्त करण्याचा pursuit सोडून दिला.
माझ्या आकलनशक्ती प्रमाणे ऋन्मेऽऽष ना सुद्धा कुठे तरी 'आपण ह्या नाराजीचा विचार करावा' ह्याची जाणीव झाली असावी असे वाटते. कारण त्यानंतर माझ्या निरीक्षणानुसार 'शाहरूख' विषयावरून इतर धागे भरकटणे थांबले.
बाकी त्यांचे स्वत:चे 'इतर' धागे निखळ करमणूक करणारे असतात हे तर कोणीही मान्य करेल.
सगळ्यांना अपेक्षित असणारा हा positive बदल घडवून आणण्यासाठी माझ्या मते ऋन्मेऽऽष खरोखर कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहेत.

पण एवढ्यात ज्या धाग्यावर 'शाहरूख' संदर्भात बोलणे/लिहिणे हे विषयाला धरूनच आहे तिथे सुद्धा ऋन्मेऽऽष ह्यांच्यावर क्लेशदायक वैयक्तिक टीका टिप्पणी होतांना पाहून वाईट वाटले. खासकरुन त्यांनी घेतलेल्या समंजस भूमिके नंतर.

तेव्हा प्रश्न पडला लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात?
एखाद्यापाशी तो करत असलेल्या एखाद्या कृतीचा निषेध म्हणुन नाराजी, मतभेद, राग व्यक्त करणे वेगळे (मैत्री मध्ये हे हमखास होते म्हणुनच वाद, भांडणानंतर सुद्धा आपण मित्र राहतो) आणि
एखाद्याने काहीही कृती केली तरी तिचा कायम राग राग करणे वेगळे. (इथे त्या व्यक्तीप्रती तुमच्या नजरेत तिरस्कार कायम वास्तव्याला आहे हे कळून येते).

ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?
कारण अशी आकसाची, तिरस्काराची भावना आपल्या एक समंजस आणि सहृदय व्यक्ती बनण्याच्या प्रवासात एक मोठा अडथळा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हाब यांना पोक्त व विचारवंत वैग्रे व्यक्ती समजत होतो पण युगांतर धाग्यांवरील प्रतिसाद पाहून मला ही व्यक्ती अहं झालेली, स्वत:ला ओव्हरस्मार्ट समजणारी वाटली.

Pages