Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<<हे लिहीपर्यंत पुढच्या भागात
<<हे लिहीपर्यंत पुढच्या भागात मार्केटिंग वाल्याचे काम झेंडे करतोय. कॅलेण्डर वरच्या मॉडेल्स ना न वापरण्याचा निर्णय "त्या एजन्सीला कळवा" - यावर हो सर म्हणून तो जातो कळवायला.<<

इतर वेळी जयदिपचे डोळे मिश्किल
इतर वेळी जयदिपचे डोळे मिश्किल दिसतात पण! त्याच्या रागापेक्षा त्या रागाला घाबरुन त्याचा बाऊ करणारे अधिक आहेत असे वाटले.>> या सिरियलमधल्या कोणाचीही कॅरेक्टर नीट लिहिलेलीच नाहीत. जयदीप नक्की कसा आहे हे ते कॅरेक्टर करणाऱ्या आशुतोष गोखलेलाच माहित नसावं. तो रोज वेगळाच वागतो.
आशुतोष गोखले हा ईशापेक्षा चांगली अॅक्टींग करतो असं त्याचं "डोण्ट वरी बी हॅप्पी" नाटक पाहून माझं मत झालेलं आहे. पण या सिरियलमध्ये सुभा आणि झेंडे सोडल्यास सगळे च ओव्हर करतायत.
ईशाची नोकरी जाउ शकली असती
ईशाची नोकरी जाउ शकली असती/असेल अशी तीन पोटेन्शियल कारणे आत्तापर्यंतची:
- जयदीप सरांना मीटिंग मधे जाउ दिले नाही
- जयदीप सरांच्या चहा मधे एक डिप जास्त केला
- जयदीप सरांची मायराने जाउन दिलेली चकल्यांची ऑर्डर तिच्या आईने वेळेवर पूर्ण केली नाही
डेस्कवर डुलक्या मारणे, बॉस ला गोष्टी सांगत बसणे, नक्की काय काम करते हे कोणालाच माहीत नसणे - ही बहुधा प्रमोशनची कारणे असावीत.
फारेंड..
फारेंड..
किती व्हर्सेटाईल असावं माणसानं...!! कुठली गोष्ट कुठे आठवावी !!
दोस्तांच्या फौजा...
एव्हीपी, कंपनी हेड व सिक्युरिटी हेड......!!
पण हे कॅलेंडर विक्री साठी होतं....की प्रमोशन साठी ? म्हणजे एकतर ते कालनिर्णय सारखं पाहीजे..किंवा मग वामन हरी पेठेंच्या कॅलेंडर सारखं तरी..फुकट मिळणारं....,,वर्षारंभी!
केड्या अगदीच पाट्या टाकतोय हं पण...दोनही शिरेलीं मधे! कैच्य कैच!
येथे दिवाळीचे फराळ बनवून मिळेल !
आणि इशाने बावळटने ती फाईल घरी नेऊन अशीच ठेवून दिली टेबलवर?
फाइल घरी न्यायची गरज काय होती
फाइल घरी न्यायची गरज काय होती तेच कळले नाही. व इतकी महत्वाची फाइल तिला दिलीच कस्याला? टेंड र भरतात त्या पेपरला बिड म्हणतात टें डर नव्हे. ती नोटीस अस्ते फक्त. मी एका कंपनीत इलेक्ट्रिकल पाइप फिटिंग्स ची बिड्सा इलेक्ट्रि सी टी बोर्डांना व एकात रंगाची बिड्स साउथ सेंट्रल रेल्वेला सबमिट केली आहेत. रेट्स कोलकात्या हून बी एम कडे यायचे फोन वर, त्याची सेक्रे टरी पेपर्स टाईप करून द्यायची ते सील्ड एन्वलप रेल्वेत जाउन बॉक्सात टाकायचे ते काम माझे. दोनच्या आत. दोमल गुड्याहून सिकंद्राबाद दूर चक्कर असे. मग अडीचला बिड उघडले की रेट्स लिहून बॉसला द्यायचे. एखादी ऑर्डर मिळाली की मस्त १५ १६ हजार लिटर सप्लाय. त्या महिन्यात आपण राजा. हे सर्व आठवले. इतका तरी रीसर्च करावा. बर टेंडर नक्की कुठे भरले तिथला चीफ मॅनेजर फोन वर बोलू शकला असता पण तेव्ढ्या साठी आला कस्टमर कडे म्हन जे ज कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्ट उधरसे भी है. नॉट डन. तो म्यानेजर पण सबनिस. मराठी सीरीअल मध्ये सर्व पात्रे मराठीच. पंजाबी सीरीअल मध्ये सर्व पंजाबीच. मुंबईत राहून ह्यांना एक ही परप्रांतीय भेटत्देखील नाही.
फक्त एक रुपयाने बिड कमी हे पण त्रिशुल सिनेमातून जसे च्या तसे उचलले आहे. अमिताभ संजीव कुमार ला शह देतो तेव्हा.
फारएण्डा, तुझ्यामुळे हे
फारएण्डा, तुझ्यामुळे हे बघायचं धाडस केलं. जयदीप स्वतःला विराट कोहली समजत असावा. दाढी तशीच. पुन्हा वर काही झालं की अॅग्रेसिव्ह होऊन आरडाओरडा. काल 'क्रॅप!' अश्या थाटात ओरडला, की कोहलीचा रिव्ह्यू हुकल्यावर त्याच्या तोंडून आपसूक जे येतं त्याची आठवण झाली. सुभा स्काईप कॉलवर "मी आता प्रमोशन करून थकलोय रे" मोडमध्ये बोलत होता. बराच दमला असावा. असाच बोलत राहिला, तर इशाच्या हृदयातली प्रेमभावना विझून पोटची मातृत्वभावना वगैरे जागी होईल असं वाटलं.
मायरालाच रक्कम माहिती असताना सरळ एक टेक्स्ट मेसेज करून ती सांगण्याऐवजी स्पाय पाठवायचं काय प्रयोजन होतं, ते काही कळलं नाही. ट्रेस ठेवायचा नसेल, तर झेंडेला व्हर्बल मेसेज डिलीव्हर करायला लावायचा. झेंडे तसंही इशाच्या शेजार्यांना धमक्या देणे, रिटेलरला गन दाखवणे वगैरे प्रकार करण्यातच पगार मिळवतो.
तो सो कॉल्ड "स्पाय" काही
फाइल घरी न्यायची गरज काय होती
फाइल घरी न्यायची गरज काय होती तेच कळले नाही. >> हो, मीही हाच विचार केला. पण यशस्वी चकली उद्योजिका आणि यशस्वी अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी ह्या दोघींच्या सहवासात फाईल राहिली तर टेंडरला योग्य ते ब्लेसिंग मिळेल, अश्या विचारातून ती कल्पना आली असेल, असं स्वतःलाच समजावलं.
फारएण्ड, भा.चा.
फारएण्ड, भा.चा.

अर्र! नावं ठेवण्यासाठी का
अर्र! नावं ठेवण्यासाठी का होईना सगळे सिरीयल बघतात वाटतं
झेंडे तसंही इशाच्या शेजार्यांना धमक्या देणे, रिटेलरला गन दाखवणे वगैरे प्रकार करण्यातच पगार मिळवतो.>>>>>> हो खरंय
फारेंड कमेंट्स लय भारी सर्वचं
फारेंड कमेंट्स लय भारी सर्वचं
फाइल घरी न्यायची गरज काय होती तेच कळले नाही. >> हो, मीही हाच विचार केला. पण यशस्वी चकली उद्योजिका आणि यशस्वी अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी ह्या दोघींच्या सहवासात फाईल राहिली तर टेंडरला योग्य ते ब्लेसिंग मिळेल, अश्या विचारातून ती कल्पना आली असेल, असं स्वतःलाच समजावलं. >>> जबरदस्त
अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी >> हे
अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी >> हे म हा न आहे.
<<<यशस्वी
<<<यशस्वी अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी<<< अगागा ..
"ईशा, तुला विचारून आत येता
"ईशा, तुला विचारून आत येता येत नाही ?" असा नॉर्मल प्रश्न विचारलेला बघून तो डायलॉग जयदीप ने लिहिला आहे का अशी शंका आली...
नाहितर इशाबाय ह्या एक वाईल्ड कार्ड आहेत आणि हे ईशाबाय्ना माहीत आहे असं वाटतं...वाट्टेल ते वाट्टेल त्या वेळी वाट्टेल तसं करणे....
वर काही चुकलं तर लहान मुलीसारखं खाली मान घालून सॉरी म्हणणं....लय बोर
अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी
अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी ह्यात मला कणिक दिस्ली आधी
" कल्पनेत सअअरांसाठी आठ पांढर्या शुभ्र पोळ्या साठी लागणारी कणिक मळणारी ईशा " असं वाटलं
ऑनलाइन टेन्डर भरतात आमच्या
ऑनलाइन टेन्डर भरतात आमच्या इथे तर.. फाइली बियलींचा जमाना कुठे राहिला...
त्या उपर फक्त १ रुपयांसाठी टेन्डर ह्याला त्याला मिळत नाही.. बाकी पण क्रायटेरिआ असतातच ना..
रि-डिस्कशन पण होतात काही केसेस मधे.. नेगोसिएशन्स होतात..
सध्या टेन्डरच टेक्निकल प्रोसेसचच काम करत असल्याने केड्याला धरुन मारायची इच्छा होतं आहे..
आणि एम्प्लॉयी ने बॉसला चहा नेउन देणे वगैरे कुठे बघितलं केड्याने.. ????
त्यासाठी प्रॉपर माणसं असतात आणि आहेत ना.. इथे एकच वेटर कम प्युन फिरत असतो.. इफ नॉट राँग मायरा पण चहा देत होती एकदा..
कौन क्या है ?
एखाद्या छोट्या फर्म मधे असं होउ शकतंकी एकच माणुस २-३ प्रोफाइल बघतो .. पण ते पण डिफाइन्ड.. चहा बिहा देणे नाही.. इथे तर सगळच धन्य आहे..
अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी>>>>>
अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी>>>>>
ही सिरियल नक्की कोण लिहीतंय??
ही सिरियल नक्की कोण लिहीतंय?? केड्या की अजून कोण वेगळंच??
कारण झी मराठी अॅवाॅर्डस् मध्ये या सिरियलचा लेखक म्हणून कोणीतरी दुसऱ्यालाच अॅवाॅर्ड देण्यात आलं.
मी पण बघत होते, इबाळ आता
मी पण बघत होते, इबाळ आता भोकाड पसरते की काय! पण नाही. ते फक्त विक्रान्त सरान्च्या समोरच असत.
हाईट म्हण्जे टेन्डर लिक झाल्याचे कळताच जयदीप झाडुन सगळ्या स्टाफला कॉन्फरन्स रुम मधे बोलव अशी मैराला ऑर्डर देतो आणि नन्तरच्या सीनमधे मिटीन्ग रुममधे इन मिन ४ डोकी.
हे पाहुन अगदी हहपुवा झाले.
लेखक कुणीतरी वेगळा आहे.
लेखक कुणीतरी वेगळा आहे. केड्या पटकथा लिहितो..
तेव्हढाच स्टाफ ए त्यांचा!
तेव्हढाच स्टाफ ए त्यांचा!
त्या मा न बा च्या आनंदने
त्या मा न बा च्या आनंदने पटकथा लिहाव्यात सर्व सिरियल्सच्या, काय लिहितो सॉलिड. भेटी लागी जीवा अजूनपर्यंत तरी बेस्ट चाललीय.
अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी >>>
अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी >>>

ह्यात मला कणिक दिस्ली आधी>>>
एक बेसिक प्रश्न .. की ठिक आहे
एक बेसिक प्रश्न .. की ठिक आहे फाइल मधुन टेन्डर भरतात ..
आता मायरा म्हणते की आपण कधीही आजपर्यंत टेन्डरची फाइल आपल्या ऑफिस मधे ठेवली नाही.. हा नियम कुठला आणि का?
ऑफिस मधे नाही तर कुठे ठेवता?? .. की हाताला लागेल त्या एम्प्लोयी च्या घरी ठेवायला देतात.. इतके दिवस येवढी महत्वाची फाइल कुठे ठेवत होते?? .. ऑफिस मधे फाइल सुरक्शित असेल की असच कोणाहीकडे??..
यशस्वी चकली उद्योजिका आणि
यशस्वी चकली उद्योजिका आणि यशस्वी अष्टरूप्यकाणिकल्पनाजननी ह्या दोघींच्या सहवासात फाईल राहिली तर टेंडरला योग्य ते ब्लेसिंग मिळेल >>> भा
ईशा च्या डेस्कवर तिचे नाव आणि हे "पद" ठेवलेले दिसत आहे मला.
नाहितर इशाबाय ह्या एक वाईल्ड कार्ड आहेत आणि हे ईशाबाय्ना माहीत आहे असं वाटतं...वाट्टेल ते वाट्टेल त्या वेळी वाट्टेल तसं करणे.... >> हे परफेक्ट आहे.
दोस्तांच्या फौजा... Rofl किती
दोस्तांच्या फौजा... Rofl किती व्हर्सेटाईल असावं माणसानं...!! कुठली गोष्ट कुठे आठवावी !! >>>
नुकताच एक पिक्चर पाहिल्याने तेच पहिले डोक्यात आले 
म्हणजे भारी म्युझिक मारताना पडद्यावरची घटना किमान त्याच्या तोलामोलाची असावी? इथे कसल्याही फालतू सीन ला डेडली पार्श्वसंगीत असते.
फार नाही पण थोडस भोकाड पसरल
फार नाही पण थोडस भोकाड पसरल ईशाबाळने.आता कळल उद्या तिचा हीरो येत आहे.म्हणून थोडी रंगीत तालीम.
राजनंदिनी साडीवरून एक शंका -शिल्पा तुळसकरच नाव नंदिनी तर नसेल.
पैसे सापडले तेव्हा 500 च्या
पैसे सापडले तेव्हा 500 च्या नोटा दिसल्या. ऑफिसात नेल्या तर दोन हजारचं बंडल होतं. लईच बंडला मारतात.
वाडकर बाई व परांजपे दार का लावून घ्यायला सांगतात? आणि मग एवढी मोठी खिडकी तशीच सताड उघडी का ठेवतात?
लंडनमधला विक्या तिथंही इशाच्या हुषारीचं डेमो द्यायला उत्सुक होता हे समजल्यावर जयदीप आणि त्याच्यात हुषार आणि मठ्ठ कोण ह्याचा फेरविचार करावासा वाटतोय.
आजची पिसे
आजची पिसे
तेव्हढाच स्टाफ ए त्यांचा! >>>>>>>>>>>मग एवढी ५० पाकिटं कोणासाठी चकल्यांची?
ऑफिसचे नियम तर मायरा जयदीप आयत्या वेळी जे सुचेल त्यावरून बनवतात असं वाटतं.
इशाचा तो ओरखडेवाला आवाज स्वगत मधे किंवा हळू बोलताना अजूनच वाढतो.
सग्रृईं मधून कधीही घरी जाता येतं. कधीही हाफ डे मिळतो. बोनस मिळतो, प्रमोशन होतं. २-४ टुच्च्या आयडीया दिल्या की वाहवा पण होते.
अजूनही दिवाळी चालूच आहे.
विसं स्काईप वर बोलताना तो बॅकग्राऊंड पडदा आणि समोरचं ते टेबल खूप विनोदी दिसत होतं.
तिकडेही ईशा? उद्या अचानक
तिकडेही ईशा? उद्या अचानक राणीच्या मीटिंग मधे घुसून बकिंगहॅम पॅलेस च्या रॉयल चेंज ऑफ गार्ड मधे बायकांचा समावेश करावा व त्यांना राजनंदिनी साडी घालून चेंज ऑफ गार्ड सेरेमनीमधे भाग घ्यायला सांगेल ती. फिर मायरा और झेंडे का क्या होगा? जयदीप ला तर तो प्रसंग बघताना दिलेल्या एक्स्प्रेशन्स व माना हलवणे, यावर ऑस्कर मिळेल.
Pages