Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
यस
यस
रिक्शा - इथला नियम-३
https://www.maayboli.com/node/11010
भारी आहेत. परत एकदा वाचून मजा
भारी आहेत. परत एकदा वाचून मजा आली.
कालच्या एपि मधे इशाच्या आईचं वागणं जरा अतिच होतं. चकल्यांचे एवढे पैसे मिळाले का कि लंडनचं तिकिट काढणार होती म्हणे
ईशाला धरुन आपटावसं वाटतं कधी
ईशाला धरुन आपटावसं वाटतं कधी कधी !! (उदाहरणार्थ आजचा ऑफिस मधला सीन जयदीप, मायरा इत्यादि बरोबर सुभाचा पत्ता विचारते तेंव्हा ) तिचं कॅरॅक्टर आणि पटकथा एकूणच आनंदीआनंद आहे . केवळ सुभासाठी किती सहन करणार
मायरा सतत दात-ओठ खावुन बोलते
मायरा सतत दात-ओठ खावुन बोलते ते पण हॉरिबल वाटत, इशा तर मन्दाड साम्राज्याची राणिच आहे.
कॉर्पोरेट ऑफिस कधीही पाहिलेले
कॉर्पोरेट ऑफिस कधीही पाहिलेले नाही आणि चाळकरी जीवनाबद्दल नॉस्टॅल्जिक आठवणी आहेत असे लोक (असतील तर) हा या मालिकेचा टार्गेट ऑडियन्स असावा. असो.
आज आपल्या सुभाचा हॅपीवाला
आज आपल्या सुभाचा हॅपीवाला वाढदिवस
हा विक्रांत सरंजामे साड्या
हा विक्रांत सरंजामे साड्या विकतो का कॅलेंडंरं? नक्की बिझनेस कसलाय?
सगळं विकतो. सद्ध्या रिचार्ज
सगळं विकतो. सद्ध्या रिचार्ज कार्ड, साड्या, कॅलेंडर एव्हढेच दाखवतात. इबाळाला कोणती भारी कल्पना सुचते त्यावर चालणार आता सरंजामे उद्योग.
पगार जमा करून इबाळ पुढच्या
पगार जमा करून इबाळ पुढच्या वर्षी आईला लंडनला पाठवणार. मग बहुतेक विस सगळ्यांची देणी देणार :।
सुभा बारावी नापास पण आहे तो
सुभा बारावी नापास पण आहे तो म्हणतोय की हे अपयश पाहिलंय तर आता नापास व्हायची भिती वाटत नाही. रिस्क घेत राहतो.
ईथले प्रतीसाद वाचून करमणूक
ईथले प्रतीसाद वाचून करमणूक होते आहे..
इशा ऊपदेशकर असे नाव हवे खरे तर. जरा संधी मिळाली की ताई, ओठ व बोटांचा चंचू करून सुरू होतात आणि जोडीला तो पंचतंत्र टोन.
पण एकंदरीत सुभा चे फॅन फॉलोईंग भयंकर वाढलेले दिसते.. तेही 'सिनीयर' वयोगटात
शेवटी सिनेमा पेक्षा सिरीयल्स मधे काम करून व रोज टीव्ही वर दिसूनच ब्रेंड व्ह्यॅल्यू जास्त वाढते हेच खरे!
इशा ऊपदेशकर असे नाव हवे खरे
इशा ऊपदेशकर असे नाव हवे खरे तर. जरा संधी मिळाली की ताई, ओठ व बोटांचा चंचू करून सुरू होतात आणि जोडीला तो पंचतंत्र टोन. >>>
न बघता डोळ्यासमोर उभं केलंत charactor.
सुभा बारावी नापास पण आहे तो
सुभा बारावी नापास पण आहे तो म्हणतोय की हे अपयश पाहिलंय तर आता नापास व्हायची भिती वाटत नाही. रिस्क घेत राहतो. >>> मस्त झाल्या सु भा शी गप्पा एबीपी माझावाल्यांच्या. भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे, बोलत पण किती छान होता अगदी ऐकत राहावं असं.
पंचतंत्र..
पंचतंत्र..
विक्रांत सरंजामेचा नानू
विक्रांत सरंजामेचा नानू सरंजामे झालाय. ह्या विक्याच्या हापीसात शिपायापासून मालकापर्यंत मोजून काढलं तरी पन्रासच्या वर आकडा नाही भरत, ह्याची काॅर्पोरेट ऑर्डर एकटा माहीमकर दळून देतो, आणि निघालाय बाराशे कोटीच्या बाता करायला.
याचं टायटल साँग आर्या
याचं टायटल साँग आर्या आंबेकरनी गायलंय. मला नव्हतं माहित.
तिलाच इशाच्या रोल साठी का घेतलं नाही? निदान विक्रम सरंजामेचं वागणं जस्टीफाय तरी झालं असतं. अभिनयात कमी पडली असती . पण ते चाललं असतं. कारण ही इशा सगळ्यातच कमी पडतीय
ह्या विक्याच्या हापीसात
ह्या विक्याच्या हापीसात शिपायापासून मालकापर्यंत मोजून काढलं तरी पन्रासच्या वर आकडा नाही भरत, ह्याची काॅर्पोरेट ऑर्डर एकटा माहीमकर दळून देतो, आणि निघालाय बाराशे कोटीच्या बाता करायला. >>>
शुगोल +१२३४५६७८९
शुगोल +१२३४५६७८९
इशाला अभिनय येत नाही मान्य.
इशाला अभिनय येत नाही मान्य..पण ती निरागस आणि गोड दिसते आणि ही सिरीअल तिनं गोग्गोड दिसावं एवढ्यासाठीच आहे फक्त. आणि गोविंदापटाप्रमाणे, कोणतीही सिरीअल फॅन्टसी म्हणूनच बघायचं म्हटली की लागतं जमायला. आठवा....भाग्यलक्ष्मी
अभिनय बघायचा तर सुभाला बघा. इतक्या टुकार कथेतही किती जीव ओतून काम करतोय बिचारा.
सूर नवा ....मध्ये आला होता...
सूर नवा ....मध्ये आला होता.... काय दिसत होता... खुप सारे बदाम डोळ्यात >>>>>>>>>बापरे! सुभा दिसला की वाटते आधी त्याचा चेहरा साबणाने खसाखसा धूवून पावडर,लावली पाहिजे.मेणचट चेहरा, थकलेले डोळे,एकंदरीत निरुत्साही चेहरा सतत बघून वीट आलाय.
इशाचे बाबा किती निरागस
इशाचे बाबा किती निरागस हिर्याचा नेकलेस विक्याईने मुलीला फक्त प्रेमापोटी दिला असेच त्याला वाट्ते. आणि दिवाळी गेल्यावर फराळ मिळेल बनवून असा बोर्ड लावून काय उपवेग. अंगत पंगत वर दीड महिने आधी पासून मार्केटिंग चालू आहे विक्रेत्यांचे. जयदीप लायनीला लागला म्हणून इशाला नेकलेस? की लगेच मनमें लड्डू फूटे म्युजीक. दोन दोन हार!!! किती प्रेम निरपेक्ष प्रेम फक्त प्रेम.
विकुनं बाय वन गेट वन वर आणलेत
विकुनं बाय वन गेट वन वर आणलेत का हार? PNG & sons कडं स्कीम चालू दिसते.
मेधावि, नानू सरंजामे पोस्ट
मेधावि, नानू सरंजामे पोस्ट
विक्रांत सरंजामेचा नानू
विकुनं बाय वन गेट वन वर आणलेत का हार? PNG & sons कडं स्कीम चालू दिसते. >>>
विक्रांत सरंजामेचा नानू सरंजामे झालाय. >>>
आज तर माझी खात्री पटली की
आज तर माझी खात्री पटली की इशा शिल्पा तुळसकरचा पुनर्जन्म आहे आणि ती आईसाहेन्बान्ची मुलगी आहे. इशाला नेकलेस देताना आईसाहेब म्हणाल्या ना, ' लाजू नको, तुला तुझी आईच हि गिफ्ट देत आहे असे समज.' तसच ती जयदीपचा 'माझा मुलगा' असा उल्लेख करते. विक्याचा तसा उल्लेख केलेला निदान मला तरी आठवत नाही. सो, विक्या त्यान्चा जावई असावा, म्हणूनच सॉनियाचा त्याच्यावर राग आहे, जयदीप सरन्जामे घराण्याचा वारस असूनही घरजावई असलेल्या विक्याला जास्त भाव मिळतोय घरात. तिचा राग अगदीच नाही पण थोडासा पटण्यासारखा आहे म्हणा.
काल झेन्डेचा चेहरा फोटो काढण्यासारखा झालेला.
इशाचे बाबा 'आधीच तुमची मेहरबानी आमच्या इशावर आहे. आणखी हा नेकलेस कशाला? ' म्हणत गिफ्ट नाकारत होते, तेव्हा इशाची आई मान हालवत बाबान्कडे स्माईल देत होती. पण मनातल्या मनात चरफडत असणार, "बोलले"
काल बर्याच दिवसान्नी मोठे टिल्लू आणि आत्या दिसले.
तीन एपिसोडस झाले आणि नो सुभा दर्शन.
सुलू बरोबर असणार तुमचा अंदाज.
सुलू बरोबर असणार तुमचा अंदाज. पण मग विक्याचं आडनाव सरंजामे का असेल?
जयदीपला लहानपणी ताई गोष्टी सांगत असणार. आता इशा सांगते तेव्हा त्याला त्या पूर्वी कधीतरी ऐकल्या आहेत असं वाटतं. "मी नेहमी खरंच बोलतो" असं पण सांगतो दर वेळी...त्याचाही काहीतरी संदर्भ असणार.
रंजीचा नवरा कास्टच नाही केला.
इशाला एकसारखे दोन हार मिळणार मग ती काय करेल? विक्याला हाणायचं म्हटलं तर अजून लग्नही नाही झालं त्यांचं.
सुलू बरोबर असणार तुमचा अंदाज
सुलू बरोबर असणार तुमचा अंदाज >>>> हा अन्दाज माझा नाहिये, हया धाग्यावर कुणीतरी हा अन्दाज काढला होता. मला फक्त कालच्या एपिसोड मध्ये त्याची खात्री पटली.
पण मग विक्याचं आडनाव सरंजामे का असेल? >>>>>> विक्याला जयदीपच्या वडिलान्नी/ आजोबान्नी दत्तक घेतल असेल, अस इथे कुणीतरी म्हणाल होत.
इशाला अभिनय येत नाही मान्य.
इशाला अभिनय येत नाही मान्य..पण ती निरागस आणि गोड दिसते आणि ही सिरीअल तिनं गोग्गोड दिसावं एवढ्यासाठीच आहे फक्त >>>>> objection my lord !!! हे काहींच्या काही स्टेटमेंट अजिबात खपवून घेतलं जाणार नाही
इशा गोड??? बावळट तेलकट आणि किती ordinary दिसते ती. म्हणजे दिसण्याबद्दल हरकत नाही घेऊ शकत, पण मग मिलियनर प्रेमात पडण्याइतकी आकर्षक तरी हवी ना. आणि इनोसंट तर ती दिसतच नाही, फार तर धूर्त आणि लबाड म्हणता येईल.
बरं बाबा....काकूंची शरणागती.
बरं बाबा....काकूंची शरणागती.
ईशाच्या परीक्षेच काय झाल
ईशाच्या परीक्षेच काय झाल?विक्रांत सर अभ्यास घेणार आहेत का?कारण ही कधीच करताना दिसत नाही.☺️
Pages