Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल पण काही सेकंदांसाठी सुभा
काल पण काही सेकंदांसाठी सुभा दिसला...अहाहा.....काय पर्सनॅलिटी... त्या ईशापेक्षा जास्त आनंद मला झाला.
बादवे, इशा जयदीप चांगले दिसतात की एकमेकांबरोबर.
काऊचिऊच्या गोष्टी सांगत ऐकत चांगले जाईल की आयुष्य.
काल पण काही सेकंदांसाठी सुभा
काल पण काही सेकंदांसाठी सुभा दिसला...अहाहा.....काय पर्सनॅलिटी... त्या ईशापेक्षा जास्त आनंद मला झाला.>>>>> हो ईशापेक्षा आपण च सुभा ची वाट बघत असतो...काल सूर नवा ....मध्ये आला होता.... काय दिसत होता... खुप सारे बदाम डोळ्यात... मराठी भाषे वर प्रभुत्व खुप आहे..संगीता ची पण जाण आहे
बहुतेक आजच्या भागाची जाहिरात
बहुतेक आजच्या भागाची जाहिरात काल पाहिली. मायराक्का आणि चि.सौ.कां. ईशा फोन वर बोलतायत.


"मॅडम आपल्या कंपनीच्या फराळाच्या डब्यातले पदार्थ माझ्या बाबांनी बाहेर स्टॉल लावून विकले !!!!"
काहीsहीsहीsहीsही दाखवतात राव हे लोक. कल्पनादारिद्र्याची परिसीमाच अगदी !
आपल्या कंपनीच्या फराळाच्या
आपल्या कंपनीच्या फराळाच्या डब्यातले पदार्थ >>>> अय्य्यो , सरंजामे ग्रुप्स ऑफ इंडस्ट्रीज , फराळाचे डबे पण विकतात ???
संदर्भासहीत स्पष्टीकरण .. प्लीज
स्वस्ति..
स्वस्ति..
अगं...सरंजामे ग्रुप कडून चि सौ कां ईशाच्या आईला चकल्यांच्या पाकिटां ची ऑर्डर मिळालीय . त्या तिने बनवून ठेवल्या होत्या तर इशाच्या बाबांनी न विचारता बाहेर नेऊन विकल्या...!!
आरारा...काय ते कल्पना दारिद्र्य!
आणि ईशा चकल्यांच्या पाकिटांना
आणि ईशा चकल्यांच्या पाकिटांना फराळ म्हणत्ये
डिसक्लेमरः मुळात ही मालिका
डिसक्लेमरः मुळात ही मालिका केवळ सुभा च्या रोमांस व अभिनयासाठी लिहिली आहे.. इशा च्या जागी दगड ठेवला तरी सुभा व मालिका हीट च आहे. तेव्हा बाकी ईतर सर्व गोष्टींकडे सुजाण प्रेक्षकांनी दुर्लक्ष करावे.
बाकी, इशा ची डायलॉग डिलीव्हरी पंचतंत्र गोष्टींसाठी परफेक्ट आहे.
काल इशा ची आई वाईट्ट रागावली होती... फराळाचे डबे स्टॉल वर सोडून खरे तर निमकरांनाच ऊचलून नेते का काय असे वाटले होते.
पंचतंत्र गोष्टींसाठी परफेक्ट
पंचतंत्र गोष्टींसाठी परफेक्ट आहे>>>> +१
ईबाळाने , हाताचा चंबू करणं
ईबाळाने , हाताचा चंबू करणं सोडावे आता
मायराला चकली म्हणता येत नाही
मायराला चकली म्हणता येत नाही का, ती चिवडा बरोबर म्हणते पण चकलीला चमचातला च वापरते. ते सायकल प्रकरण काय आहे. मी कुणाचं देणं ठेवत नाही म्हणे, सुभा एवढ्या भेटवस्तू देतोय त्याची कशी परतफेड करणार.
पण चकलीला चमचातला च वापरते.
पण चकलीला चमचातला च वापरते. >>>> मग बरोबर आहे की.
चिवडामधला च, चकलीसाठी वापरला तर चूक.
दोन्ही च वापरुन म्हणतात. मी
दोन्ही च वापरुन म्हणतात. मी चिवडयाचा च च वापरते चकली म्हणताना. पण चमच्याचा च वरुन पण चकली म्हणतात काही जण. दोन्ही उच्चार ऐकायला येतात.
चकली विकली
काहीही
"मॅडम आपल्या कंपनीच्या
"मॅडम आपल्या कंपनीच्या फराळाच्या डब्यातले पदार्थ माझ्या बाबांनी बाहेर स्टॉल लावून विकले !!!!" >>>
सिरीयसली? हा कहर आहे, या सिरीज ची आत्तापर्यंतची लेव्हल बघता सुद्धा
मात्र सरंजामे ग्रूप ला १४
मात्र सरंजामे ग्रूप ला १४ व्या कंपनीची कल्पना सापडलेली दिसते. दिवाळी फराळ!
ईशाच्या मोबाईलवरून, मायराच्या
ईशाच्या मोबाईलवरून, मायराच्या मोबाईलवर केलेल्या फोनवर "मायरा हिअर" असं का बरं म्हणते मायरा?
लंडनमधे आहे म्हणून मागे लंडन ब्रिज दाखवलाय का?
इशा काल आईचा फोन आला म्हणून पळून गेली, आज आईबाबांना पैसे पोचवायला गेली. मायराची दया येते आहे.
काय पाहिलं सुभाने असल्या
काय पाहिलं सुभाने असल्या कामचुकार पोरीमध्ये! अरे दुसरी कोणी मिळाली नाही का । वैताग नुसता। एका रात्रीमधे भाजणी सकट चकल्यापण झाल्या! लेखकाला किचनमधलं सुद्धा काहीही माहित नाही हे सिद्ध झालं !!
सुभा किती मायेने कुरवाळतो तिच्या बोटाला
बिचाऱ्या बिपीन आणि रुपाली ला
बिचाऱ्या बिपीन आणि रुपाली ला फुकटात राबवून घेते ई. बाळ. बिपीन काय आत्याकडेच पडीक असतो काय सतत?
Btw शिरेल मधल्या सुभाचे फोटो कोणी टाकू शकेल का इथे?
बिपीन काय आत्याकडेच पडीक असतो
बिपीन काय आत्याकडेच पडीक असतो काय सतत?>> ते काय नक्कि ते कळतच नाही, घर नक्कि कुणाच आहे ते? आत्याच कि टिल्लुच? सौ टील्लु आणी आतोबा दोन्ही मिसिन्ग आहेत पटकथेतुन... झी च्या अॅवार्ड मधे या शिरेलच्या लेखकुला अॅवार्ड दिल म्हणे अर्थात स्व्तःच स्वतची आरती ओवाळायला झीला काय लागतय...
इशा काल आईचा फोन आला म्हणून
इशा काल आईचा फोन आला म्हणून पळून गेली,.. >>>> seriously , काय वैताग पोरगी आहे . आणि आईला फोन केला त्या calendar पुराणानंतर तर किती मोठ्या आवाजात बोलत होती. आणि मग ती चपटी पर्स उचलून निघून गेली.
Btw , ईआई बाळाला डब्यात सुका खाऊ देते का ? परवा स्टीलचा टीफीन असाच टाकला पर्समध्ये. आम्ही किती गुंडाळून नेतो पोळीभाजीचा डबा.
एका रात्रीमधे भाजणी सकट
एका रात्रीमधे भाजणी सकट चकल्यापण झाल्या! >>>
तेही भाजणी जात्यावर दळून!!
त्याच्या जस्ट आधी मिक्सरवर भाजणी दळण्याची आयडिया भिरकावून लावलीन ईशाच्या आईने..
दंडवत आहे पटकथा- संवाद लेखकाला
बाकी आजच्या एपिसोडला कल्पनादारिद्र्याचं नोबेल द्यायला हरकत नाही
एकट्या सुबोधच्या जीवावर
एकट्या सुबोधच्या जीवावर चाललंय सगळं बाकी हिरोईन पटकथा संवाद सगळयाचीच बोंब!!
लेखकाने कित्ती निर्बुद्ध असाव
लेखकाने कित्ती निर्बुद्ध असाव ह्याच example म्हणजे ही सिरियल. एकतर लेखक डोक्यावर पडलाय किंवा त्याला वाटतय प्रेक्षक पडले आहेत. ह्या ईशाच लग्न मोडायला एम्प्लॉई contract मधला clause responsible होता ना ज्यात एम्प्लॉईचे आप्तेष्ट सरंजामे industry बरोबर काही बिझनेस करू शकत नाही मग ईशाच्या आईला दिवाळी ऑर्डर कशी मिळाली? बर मिळाली तर मिळाली पण एका रात्रीत जात्यावर दळून बिळून चकल्या तयार. बर तयार तर तयार पण पॅकिंग... अरे दिवाळी गिफ्ट आहे की किराणा समान. आवरा कोणीतरी
सुबोधला लंडनवासी दाखवायला टी
सुबोधला लंडनवासी दाखवायला टी शर्टावरून कोट घातलाय. खरंच आवरा.
सुभा किती मायेने कुरवाळतो
सुभा किती मायेने कुरवाळतो तिच्या बोटाला >>>>> कप्पाळ , मला वाटलं आता तोंडात घालतो का बोट!
स.ग्रु.ईं. च्या स्टाफला असं दिवाळी गिफ्ट , कागदाच्या पुड्यात बांधून ??? Packing तरी नीट करायचं ना
मला वाटलं आता तोंडात घालतो का
मला वाटलं आता तोंडात घालतो का बोट!>>>+१
Packing तरी नीट करायचं ना>>> तरी बरे कि बॉक्स होते. मला आधी वाटले कि चार डबे तसेच्या तसे नेतील.
काल पण काही सेकंदांसाठी सुभा
काल पण काही सेकंदांसाठी सुभा दिसला...अहाहा.....काय पर्सनॅलिटी... त्या ईशापेक्षा जास्त आनंद मला झाला. >>>>>>>> +++++++ १११११११११ तो टाळया वाजवत येतो तो सीन, चाळीतला सीन, आणि बोट कुरवाळताचा सीन सगळेच सीन्स अहाहा!!!!
मला वाटलं आता तोंडात घालतो का बोट >>>>> मलाही
काल सूर नवा ....मध्ये आला होता.... काय दिसत होता... खुप सारे बदाम डोळ्यात... मराठी भाषे वर प्रभुत्व खुप आहे..संगीता ची पण जाण आहे >>>>>> अगदी अगदी पण मला सूर नवा मध्ये सुभाला बघताना का माहित पण जाम घाबरायला झाल. त्याचा धीर- गम्भीर चेहरा पाहताना मनात धडकी भरत होती. वाटल, हयाच्या बरोबर न्यूकमर्स कसे काम करत असतील. बाकी हर्षदबरोबर तो क्यूट वागला. आनन्द इन्गळे, महेश काळे मस्त फिरकी घेतली.
'गोमू सन्गतीने' गाण्याच्यावेळी सुभा मला नाचायला आवडत नाही, पण अभिजीतला ( चित्रपटाचा डायरेक्टर अभिजित देशपान्डे) नाही म्हणू शकलो नाही' असे काहीसे म्हणाला. फटाक्यान्च्या आवाजामुळे नक्की काय म्हणाला ते ऐकू आले नाही मला. पण नन्तर त्याने नॉन डान्सर असलेल्या महेशला नाचवले गाण्यावर.
बादवे, सुभा अस्सल पाहुणे इरसाल नमुने आणि नवरा असावा तर असा मध्येही येणार आहे.
बघताना का माहित पण जाम
बघताना का माहित पण जाम घाबरायला झाल. त्याचा धीर- गम्भीर चेहरा पाहताना मनात धडकी भरत होती. वाटल, हयाच्या बरोबर न्यूकमर्स कसे काम करत असतील.>>>>>> पण तो नाही आहे तसा धीर- गम्भीर... खुप छान बोलतो ...khup cool ahe..personality ekdam down to earth ..
सुबोध खूप दमलेला दिसतोय. खूप
सुबोध खूप दमलेला दिसतोय. खूप न झेपेबल काम चाल्लंय बहुतेक. काळजी वाटली. तब्येतीची हेळसांड करू नये त्यानं.
माहीमकर येडा दाखवलाय पण हसतो भारी गोड
असे परदेशातले सीन्स असतील की
असे परदेशातले सीन्स असतील की लंडनला काम, न्यू यॉर्क ला काम की खिडकीतून बाहेर फेमस ठीकाणे हमखास दिसलीच पाहिजेत.
Pages