काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.
लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.
एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.
"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.
"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले
"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला
"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम
"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"
"मी आणि माझी बायको"
"कुठे आहेत त्या?"
"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"
"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.
मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.
"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.
कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.
"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.
"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.
"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"
"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.
"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.
मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.
"काय झाले?" त्याने विचारले.
"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.
"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.
त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"
"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.
"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.
"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो
"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.
"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.
मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?
संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.
मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.
४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.
बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.
ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.
अरे देवा ! इंग्रजीत सुरू झाली
अरे देवा ! इंग्रजीत सुरू झाली वाटते चर्चा.
हे सुरू करावे लागेल बहुधा
प्रिन्सिपल्स ? उसूल ?!! हा!!
प्रिन्सिपल्स ? उसूल ?!! हा!! मी मुद्द्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे असे म्हणत म्हणत वैयक्तिक हल्ले करणारा हे म्हणतोय? मला पिक केले म्हणत म्हणत कुऋ आणि शालीला स्वतः पिक करणारा हे म्हणतोय?


हाब टीपापात लिहीत असे ते सोडून देऊ. पण हे लोक गॉसिप, बुलिंग इ.करत होते आणि ते त्याच्या प्रिन्सिपल च्या विरोधात होते ना? मग तो त्यांच्या व्हॉअॅ कोपच्यातही कित्येक काळ ( परवापर्यन्त) ती गॉसिप्स वाचत इतके दिवस काय करत होता माय्लॉर्ड? की आपण दुसर्या बाजूला आल्यावर प्रिन्सिपल्स आठवली?
मी पडले कंपू भगिनी. पण हाबने आम्हालाही ओढलेच आहे नाहीतरी यात त्यामुळे एकदा लिहितेच. लोकांनाही जरा दिवाळीची फटाके आतिषबाजी बघू देत
तर इतक्या पोस्टींच्या गदारोळातून असे कळले की :स्वातीने हाब ला (एकाहून अधिक बाफांवर) सातत्याने विरोधी पोस्टी लिहिल्या. मा.ल.क., दीक्षित वगैरे. नोट - तिने पोस्टींना विरोध केला. हाब या व्यक्तीला नव्हे. त्या त्या बाफांवर पुरावे अजून आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे?? वर ते दोन लोक बोलताना मधे बोलू नये वगैरे अर्थाचे लिहिलेले वाचून हसूच आले. सार्वजनिक बाफावर लिहिताय , तेव्हा हे माहित असायला हवे होते की कोणीही डिस्कशन मधे भाग घेऊ शकतो/ते!
शिवाय तशाच पोस्ट्स तिथे इतरांनीही लिहिल्या. - ज्यांचा अन टीपापाचा संबंध नाही. त्याचे काय? (पण समहाऊ स्वातीने विरोधी पोस्ट्स लिहिल्या याचा हाबला त्रास झाला. तिला त्याच्याबद्दाल आकस असावा असे त्याचे मत झाले. असे का? )
स्वातीने हाबच्या पोस्टींना डिसक्रेडिट करायचा प्रयत्न केला. तसे करून नका असे हाबने टीपापात सांगितले तरी स्वातीने ऐक्ले नाही . ( पण मग पोस्टींना विरोधच करायचा असेल तर? तिचा मुद्दा तोच असेल तर?) अगेन यांनी स्वतः मा.ल.क. वर आणि ऋन्मेष्च्या बाबतीत केले त्याला काय म्हणतात? तुमची ती "प्रिन्सिपल्स" ची लढाई आणि स्वातीच्या त्या "कारवाया" ? तुमचे ते माबोकरांना भावनिक आवाहन आणि तिचे ते टीपापावर हुकूमशाही ?हे बरंय की
पुन्हा वर मला व्हिक्टीमाइज झाल्यासारखे वाटतच नाही म्हणत पुन्हा पुन्हा व्हिक्टिम कार्ड खेळणे. महान आहेत प्रिन्सिपल्स !!
मायबोलीवरच्या चर्चा वाचून आता
मायबोलीवरच्या चर्चा वाचून आता माझा आत्मविश्वास दुणावला आहे, कॉलेजच्या डिबेट स्पर्धेत कशी ठासतो बघा आता एकेकाची. पहिला बक्षीस मलाच मिळणार, समोरच्याचे हात पाय थरथर कापतील, अनेकांना तर भोवळ येईल, HOD पण व्हायवाला जरा जपूनच प्रश्न विचारत जाईल मला, धन्यवाद मायबोली
Why does it happen so often
Why does it happen so often here?
Are these people same in person with their friends and family?
And i thought all those serials are imaginary!
I am not talking abt if its person a or person b or group c etc. But ekhadyavar tuToon padaNe hee paddhat duvasendivas bokaLatey ase vatate.
It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities.
Dumbledore
पतंगाला धागा बांधतात.
पतंगाला धागा बांधतात.
धागा पतंगाला बांधला आहे.
टिपापाचे सभासदत्व कुठे मिळते.
टिपापाचे सभासदत्व कुठे मिळते. फेसबुकसारखे प्राइवेट ग्रुप अहे वाटतं.
त्यासाठी एक परीक्षा द्यावी
त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. मग धावण्याची स्पर्धा, उंच उडी, लांब उडी, योगासनांच्या स्पर्धा पार पाडाव्या लागतात. यानंतर सर्वांना एका उंच डोंगरावर घेऊन जातात. तिथून बोंब ठोकावी लागते. जर तुमच्या आवाजाने समोरच्या देवळातली घंटा हलली तर मग मुलाखतीला बोलावतात.
मुलाखतीचे डिटेल्स जाणकारांकडून समजून घ्या.
आत्ता वादाच्या दोन बाजू नक्की
आत्ता वादाच्या दोन बाजू नक्की काय आहेत? (आजचा भाव काय? या चालीवर वाचले तरी चालेल)
दिवाळीचे सर्व फटाके
दिवाळीचे सर्व फटाके वाजवण्याचे मोकळे मैदान यंदा ह्याच धाग्यावर असणार बहुतेक !
400
400
अरेरे, मैत्रेयी तुम्ही एकदम
अरेरे, मैत्रेयी तुम्ही एकदम सिरिअस झालात की ह्यावेळी.
तुमच्यासाठी हे सगळे आता विनोदी राहिले नाही का? का बरे? जरा चित्र वगैरे येऊ द्यात की अजून.
ओके सिरिअस झालाच आहात तर....
) be aware of this strategy ..ह्यांचा प्रत्येकवेळीच गैरसमज कसा होतो हे कोडे मला बरेच दिवस पडले होते.
जसे स्वातींच्या कारवायांना कॉल आऊट केले आहे आणि करतो आहे तसेच ऋन्मेषच्या कारवायांना सुद्धा केले होते. त्या कारवाया काय होत्या हे कोणालाही वेगळे सांगायची गरज नाही.
तुम्हाला अचानक ऋन्मेषचे कवर घ्यावेसे का वाटावे बरे? तुम्ही स्नेहसंमेलनात ऋन्मेषच्या कारवायांना कॉल आऊट केल्याबद्दल माझे कौतुक केले नव्हते का? तुम्ही ऋन्मेषचे फेबु अकाऊंट शोधून (अगदी 'ऋन्मेष' नावाच्या ऊगमासहित) मला आनंदाने दाखवत नव्हतात का? तेव्हाही मी तुम्हाला म्हणालो होतो - (जे आधी बेकरीवरही म्हणालो) 'जे ऋन्मेषने केले ते अयोग्य होते आणि आयडीमागच्या व्यक्तीवर मायबोलीकरांनी एवढे प्रेम केलेले असतांना त्याने असे करणे अनाकलनीय आहे.. and I feel for him'.
शालींच्या ज्या दोन धाग्यांवर (मार्मिक कथा) चर्चा झाली पैकी एक धागा वर आलाच आहे... मी त्यावर शालींच्या मागे पडलो होतो की मला पडलेल्या प्रश्नाचा पाठपुरावा करत होतो ते जो तो वाचून ठरवू शकतो... (ईथेही स्वातींनी 'मी लोकांच्या प्रतिसाद देण्यास हरकत घेतली वगैरे' असा तद्दन खोटा ट्विस्ट दिलाच आहे.)
प्रतिसादातला ईंटेंट ट्विस्ट करून लिहिला की.. आपोआप समोरचा 'अरेरे ह्यांचा गैरसमज झाला वाटते' समजून स्पष्टीकरण देण्यास ऊद्युक्त होतो.. मग पुन्हा ते स्पष्टीकरण ट्विस्ट केले (त्यांनीच किंवा सायो वगैरे) की अजून त्या स्पष्टीकरणाच्या जाळ्यात ती व्यक्ती अडकत राहते.. आणि यशस्वीरित्या त्या व्यक्तीला डिसक्रेडिट केल्याचे समाधान मिळते. (हाच प्रकार नंतर प्रत्येक धाग्यावर आणि ह्या धाग्यावरही झाला 'फिअर मॉंगरिंग' चा ट्विस्ट.. पण ह्यावेळी मी आजिबात त्याचे स्प्ष्टीकरण देत न बसल्याने स्वातींची संताप/ऊद्वेग दाखवणारी पुढची पोस्ट आली
तुम्ही म्हणालात मी टीपापावर का होतो, स्नेहसंमेलनाला का आलो, वॉट्स अॅप ग्रूपवर का होतो... त्यावर मी म्हणेन मी तिथे होतो म्हणूनच मला तुमच्या कारवायांबद्दल माहित आहे आणि तुमची स्ट्रॅटेजी कळते. तुम्हाला मी तिथे होतो म्हणजे तुमच्या कारवायात सामील होतो असे म्हणायचे आहे का? असल्यास खाली वाचा.
तुम्ही वॉट्स अॅप ग्रूपचा विषय काढलाच आहे तर
( गॉड गिव मी स्ट्रेन्ग्थ ) ..
आय होप तुम्हाला कल्पना असेल की मी आता त्या ग्रूपचा मेंबर नसलो तरी मला ईन्वाईट केल्यापासूनचा चॅटलॉग अॅक्सेस करू शकतो. तुम्ही अनेकानेक मायबोलीकरांबद्दल तिथे जे काही मॅलिशिअस गॉसिप लिहिले आहे... मला वाटते सगळे मायबोलीकर ते वाचण्यास अतिशय ऊत्सुक असतील. तुमच्याच प्रतिसादाच्या संदर्भाने सांगायचे झाल्यास ईथली दिवाळी आतिषबाजी दोनेक महिने नक्की चालेल.
आणि मी ईथे पुढे एकही शब्द न लिहिता...आकस, प्रिंसिपल, लॉयल्टी काय असते एका क्षणात सगळे लख्खं स्पष्टं होईल.
सध्यापुरते एवढेच लिहिन तुम्ही तुमच्या चॅट वर थोडे मागे स्क्रोल केल्यास.. "मी काही ईतर माजी मायबोलीकरांसारखा टीपापाच्या कारवायांचा टीकाकार आहे' हे मी दोनेक महिन्यांपूर्वी लिहिलेले सुद्धा सापडेल. सापडत नसल्यास विचारा म्हणजे नेमकी डेट सांगता येईल.
तिथे तुम्हाला काय सापडणार नाही तेही लिहितो... तुमच्या कुठल्याच मॅलिशिअस गॉसिपमधून आनंद मिळवण्याच्या गप्पात माझा एकदाही सहभाग वा साधी स्मायलीही तुम्हाला सापडणार नाही..
मायबोलीचे बॅगेज दुसरीकडे नेऊन त्यावर मायबोलीकरांबद्दल मॅलेशिअस गॉसिप करून आणि पुन्हा ईथे येऊन संयत/ सभ्यपणाचा आव आणू नये हा एक साधा सरळ प्रिंसिपल आहे. तो बाजूला ठेऊन तुम्हाला असे करण्यात काही वावगे वाटत नसल्यास मी कॉल आऊट केलेले (ट्विस्टिंग लाईन्स, फाल्स अॅक्युझेशन्स) करण्यात सुद्धा तुम्हाला वावगे वाटत नाही ह्याचे मला आजिबात नवल वाटत नाही.
पण घाबरू नका.. सध्या तरी असे काही करण्याची माझी ईच्छा नाही.. ज्यांनी मला स्नेहसंमेलनाला आणि ग्रूपमध्ये ईन्वाईट केले ते आणि अजून काही टीपापा मेंबर्स ज्यांचा ह्या वादात सहभाग नाही ते माझे मित्र आहेत.. (अॅट लीस्ट ऑन माय पार्ट) त्यांनी विश्वासाने मला बोलावले होते आणि मी त्यांचा विश्वासाला तडा जाऊ देऊ ईच्छित नाही.
त्या चॅटमध्ये लिहिलेले ईथे देणे माझ्यासाठी एवढा सोपा मार्ग आहे की त्यानंतर काहीच सांगणे/लिहिणे करण्याची गरज ऊरणार नाही. पण तसे करणे माझ्या मते अनएथिकल आहे (बिलीव ईट ऑर नॉट...द वेरी सेम प्रिंसिपल्स)... त्यापेक्षा वादविवादाचा हा अवघड मार्ग घेणे मी पसंत करेन.
पण हा वाद कुठवर न्यायचा आहे कुणाला कुठे क्लोजर मिळवायचे आहे ते माझ्या हातात नाही आणि हो मी अजूनही स्वातींकडून दिलगिरी व्यक्त केली जाईल ही अपेक्षा करतो आहे.
आत्ता वादाच्या दोन बाजू नक्की
आत्ता वादाच्या दोन बाजू नक्की काय आहेत? >>>>> त्याने काय फरक पडतो? एका बाजुला टीपापा कम्पू आणि त्यांची आंबोळे बाई आहे. ते चुकीचे असणारच आहेत. त्यामुळे तू दुसऱ्या बाजूने खेळ. शिवाय ह्यावेळी 'व्यक्तीचित्रण' बाफसारखी बिनशर्त माफी यायचा धोकाही नाहीये.
अमेरिकेत हॉटेलमध्ये चेकइन
अमेरिकेत हॉटेलमध्ये चेकइन करताना प्रत्येकाचे आयडी प्रूफ स्कॅन करून स्टोअर करून ठेवतात का? असा लोकांचा डेटा खाजगी व्यवसायिकांनी साठवून ठेवायला तिकडे परवानगी आहे का?>> नाही. आयडी legit आहे एवढे पडताळून परत देतात. शंका वाटल्यास दुसरा आयडी मागतात. फार तर आयडी वरचा unique number टिपून घेऊ का विचारतात. तुमच्या बरोबरच्या दुसर्याच्या आयडी मागत नाहीत.... तुम्हाला गृहीत धरत नाहीत... तुमच्या केस मध्ये तुम्ही केले ते योग्य केले.. आपली, आपल्या माणसांची, लहान मुलांची identity सांभाळणे आपला lookout आहे आणि अधिकार सुद्धा........
Submitted by हायझेनबर्ग on 1 November, 2018 - 17:23
===> हायझेनबर्ग आपल्या या प्रतिसादाबद्द्ल आणि माहितीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. प्रगल्भ समाजव्यवस्था म्हणजे काय तेच यातून आपण दाखवून दिलेत. आपल्याला तिथवर जायला अजून कित्येक वर्षे लागतील असे वाटते. एकमेकांवर संशय घेणे, झुंड करून बरोबर काय चूक काय ते ठरवणे आणि त्याव्यतिरिक्त वेगळा कोणी वागला/ली तर त्याचा विपर्यस्त अर्थ काढणे हे गुलामगिरीच्या मानसिकतेचे लक्षण आहे. भारतात मोठ्या शहरांत चित्र वेगळे आहे पण छोट्या शहरांत अजूनही आपण ब्रिटिशांच्या काळात जगतो आहोत असे वाटते.
तर, परिचित, या अनुभवावरून जरा
तर, परिचित, या अनुभवावरून जरा शिका की
- तुम्हाला कायद्यातील बारीक सारीक गोष्टी माहित नसतील, तर त्याचा फटका बसू शकतो.
- नाहीतर कोर्टात जाऊन फिर्याद करण्याची तयारी असायला पाहिजे.
- जगात सर्वच लोक सज्जन नसतात.
- लोक आपल्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही.
पुढच्या वेळी हॉटेलात जागा बूक करण्यासाठी सही करण्या आधी नीट चौकशी करा.
Submitted by नन्द्या४३ on 2 November, 2018 - 02:08
===> मान्य आहेत सगळे मुद्दे. पण हे शेवटचं "सही करण्याआधी नीट चौकशी करा" हे खरं असलं तरी गमतीशीर आहे. अनेकदा असा अनुभव येतो. "आधी का सांगितलं नाहीत?" असे विचारल्यावर डोक्यात तिडीक जाणारा उलटा प्रश्न समोरून येतो "तुम्ही का विचारलं नाहीत?". बोंबला, म्हणजे आम्हीच सगळ्या गोष्टी anticipate करायच्या. जसे काय भविष्यात जाऊन डोकावायचे ग्यान आम्हाला आहे.
Ministry of Tourism ची
Ministry of Tourism ची वेबसाईट आहे. तिथे ह्या चर्चेचे उत्तर मिळेल.
Submitted by लंपन on 2 November, 2018 - 12:05
==> ह्यात कुठेही आयडी प्रुफ स्कॅन करून ठेवावे किंवा आयडी नसेल तर फोटो काढून घ्यावा असे लिहिलेले नाही.
mabo lodge_0.png
mabo lodge_0.png
Submitted by maitreyee on 2 November, 2018 - 07:22
==> मी मायबोलीवर नवीन आहे. कुणाला ओळखत नाही किंवा कोणत्या ग्रुपचा वगैरे सभासद नाही. त्यामुळे आपल्या चित्राचा अर्थ नीट लागला नसला तरी रेखाटन अतिशय सुंदर आणि बोलके आहे इतके कळते. धन्यवाद.
ओ पण धागाकर्त्याला अपेक्षित
ओ पण धागाकर्त्याला अपेक्षित असलेली गुदगल्या करणारी, तुमचे विबासं असेल अशी चर्चा इथे झालीच नाही. शेम शेम !
Submitted by मेरीच गिनो on 2 November, 2018 - 07:22
==> नाही. असा काही ठराविक चर्चा व्हावी वगैरे हेतुपुरस्सर धागा मी काढलेला नाही. धाग्यात उल्लेख केल्यानुसार केवळ हा प्रसंग शेअर करून मन मोकळे करायचे म्हणून मी इथे जे घडले ते तसे लिहिले इतकेच. विबांस हा लॉज व्यवस्थापनाला आलेला संशय आहे म्हणून धाग्यात तसा उल्लेख आला आहे. बाकी काही नाही.
नानबा,
नानबा,
तुमच्या हॅपॉच्या कोटच्या पुढेच मी लिहिन
"It takes a great deal of bravery to stand up to our enemies, but just as much to stand up to our friends." .. Dumbledore
"तुम्ही का विचारलं नाहीत?".
"तुम्ही का विचारलं नाहीत?". बोंबला, म्हणजे आम्हीच सगळ्या गोष्टी anticipate करायच्या. जसे काय भविष्यात जाऊन डोकावायचे ग्यान आम्हाला आहे.
<<
बबडू,
"ही थाळी केवढ्याला भेटते?" हा गावंढळ प्रश्न विचारल्याबिगर जर जेवण केलं, तर बिल जे येइल, ते गुप्चुप फेडायला लागतंय. नाही, तं आपलं कायकाय फेडलं जातंय.
इतकी शिंपल गोष्ट तुम्हा जेंटलमन लोकांना समजेना हे पाहून मला हसाया बी येईना आता.
बाकी गेली काही पाने हाब अन टिपापा, दांडपट्टा, शमशेर, बिचवे, वाघनखे, खंजीर, अन असलीच हत्यारे बाहेर येताना पाहून राजा केळकर म्युझियम पहातोय असा भास होऊ लागला मला.
तर बॅक ऑन ट्रॅक फॉर बबडू,
That too, in the language he DOES understand.
Read. And repeat after me.
"Ignorance of LAW, is NOT an excuse."
आता फेडण्याच्या कोट्या येऊ
आता फेडण्याच्या कोट्या येऊ द्या. फेडणे हे फेडण्याशी फेडरली निगडीत आहे असेही नोंदवितो
"Ignorance of LAW, is NOT an
"Ignorance of LAW, is NOT an excuse"
नवीन Submitted by आ.रा.रा. on 4 November, 2018 - 21:29
==> रजिस्टरमध्ये सही करणे म्हणजे लॉज बुक झाला (ते हि पैसे देण्याच्या आधीच?) असा कोणता कायदा आहे हे सांगू शकाल का? त्याला "वाटले" मी पैसे देईन आणि बुक करेन. म्हणून त्याने आधीच सही घेतली असावी ह्यात माझी चूक नाही. आणि जर तसा कायदा असेलच तर
Submitted by नन्द्या४३ on 2 November, 2018 - 02:08
यानुसार
"कोर्टात जाऊन फिर्याद करण्याची तयारी असायला पाहिजे"
हा नियम त्यांना लागू नाही का? हात घाईवर का आला तो?
<<<बोंबला, म्हणजे आम्हीच
<<<बोंबला, म्हणजे आम्हीच सगळ्या गोष्टी anticipate करायच्या. जसे काय भविष्यात जाऊन डोकावायचे ग्यान आम्हाला आहे.>>>
असे ज्ञान हळू हळू जमा करावे लागते, अनुभवांवरून. आता निदान लॉज बुकिंगच्या आधी तरी तुम्ही विचारू शकता की बाबा कायदे काय आहेत ते मला आधी स्पष्ट सांगा त्याशिवाय मी सही करणार नाही!
पुढच्या वेळी इतर काही करायला जाल नि फसाल त्यानंतर आणखी थोडे ज्ञान वाढेल!!
सगळेच काही पुस्तकात लिहीले नसते.
त्याने काय फरक पडतो? << हे
त्याने काय फरक पडतो? << हे विचारणारा तू कोण?
एका बाजुला टीपापा कम्पू आणि त्यांची आंबोळे बाई आहे. ते चुकीचे असणारच आहेत.<< हे १००% सत्य आहे. आता आता तुला समजायला लागलेलं दिसतंय.
त्यामुळे तू दुसऱ्या बाजूने खेळ. << तुला विचारले काय करू ते?
शिवाय ह्यावेळी 'व्यक्तीचित्रण' बाफसारखी बिनशर्त माफी यायचा धोकाही नाहीये. <<< काहीही संबंध नाहीये. तुला जी काय चिडचिड करायचीये ती तुझ्या ग्रुपात कर. तिथेच वाफ काढ आपली.
एक साधा प्रश्न होता. कुणालाही उद्देशून नव्हता पण त्यावर तू छू केल्यासारखा अंगावर धावून आलास. गृपात छू केले असावे. चालूदे तुझं.
सगळेच काही पुस्तकात लिहीले
सगळेच काही पुस्तकात लिहीले नसते.
Submitted by नन्द्या४३ on 4 November, 2018 - 21:39
==> रजिस्टरमध्ये कस्टमरने सही केल्याचे पैसे मालक आपल्याकडून घेणार असेल तर ती सही होण्यापूर्वी आपण कस्टमर कडून पैसे घ्यायला हवेत हि साधी अक्कल कुणी चालवायला हवी? कस्टमरने कि लॉज चालवायला ज्याला बसवलंय त्याने?
लॉज बुकिंगचा एक अत्यंत
लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव धाग्याचा धक्कादायक अनुभव.....
असे धगकर्त्याला वाटत असावे.
रजिस्टरमध्ये कस्टमरने सही
रजिस्टरमध्ये कस्टमरने सही केल्याचे पैसे मालक आपल्याकडून घेणार असेल तर ती सही होण्यापूर्वी आपण कस्टमर कडून पैसे घ्यायला हवेत हि साधी अक्कल कुणी चालवायला हवी? कस्टमरने कि लॉज चालवायला ज्याला बसवलंय त्याने? >>>>> रामाची सीता कोण चौक आला पुन्हा. अवघड आहे.
<<<हा नियम त्यांना लागू नाही
<<<हा नियम त्यांना लागू नाही का? हात घाईवर का आला तो?>>>
हातघाईवर येण्याचे कारण त्याला "वि ऑल आर नॉट टू ओल्ड टु नॉट बी पोलायट... " याचा अर्थ नीट समजला नाही.
<<सही होण्यापूर्वी आपण कस्टमर कडून पैसे घ्यायला हवेत >>
त्याला वाटले असेल तुम्ही त्याच्या पेक्षा जास्त शिकलेले, शहरातले, उच्च्भ्रू कुळातले, तुम्हाला सगळे माहितच आहे, तुम्ही प्रामाणिक आहात, द्यालच पैसे.
शिवाय पैशासाठी अडून बसला तर तुम्हीच बोंबलाल, च्यायला. देतो ना, एव्हढाहि विश्वास नाही?
थोडक्यात म्हणजे तुमची स्वतःची बाजू अगदी बरोब्बर आहे नि त्याची चुकली यावर तुमचा इतका विश्वास आहे की तुम्ही त्याचे काही चुकले असेल, मुद्दाम केले नसेल, पैसे कुठे पळून जातात का असे त्याला वाटले असेल, इ. कारणांमुळे हा प्रकार घडला असेल असे तुम्हाला वाटतच नाही.
काही का असेना, झाले ते झाले. तो आणि इतर जग सुधारायला पाहिजे यात शंकाच नाही. पण तोपर्यंत, जेंव्हा तुमच्या लक्षात येईल की जगातले सगळे शहाणे नाहीयेत, तुम्हीच एकटे शहाणे, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे.
धागा गोलगोल फिरत १००० धावा
धागा गोलगोल फिरत १००० धावा पूर्ण करणार
परिचित, तुम्हाला काही सांगणे
परिचित, तुम्हाला काही सांगणे व्यर्थ आहे. हा शेवटचा प्रयत्न.
भोजनालयात जाऊन एखादी थाळी मागवा. ती आल्यावर रद्द करून पैसे न देता बाहेर जाऊन दाखवा बरं. त्याने नक्कीच आधी पैसे घेतलेले नसतात. तुमचा नियम इथे लागू झाला पाहीजे. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.
हातघाईवर येण्याचे कारण त्याला
हातघाईवर येण्याचे कारण त्याला राज यांच्या Not too old not to be polite का असे काहीतरी लिहीले आहे त्याचा अर्थ कळला नाही!
Pages