तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

<<आणि इशाच्या न-अभिनयामुळे ती त्याच्याशी फ्लर्ट करतेय असं वाटत होतं.<< एक्झेक्टली!
इथे तिच गळेपडु आहे असे दिसते. तिचे या मेसेजमधे आय लव्ह यु आहे हे सुद्धा बोलणे कट केले सुभाने. आणि तिच्याच जास्त उड्या की आय मिस यु असा मेसेज पाठवाल ना सर मला?
तिचा मोबाईल तर स्मार्ट फोन दिसतोय. मग त्यात व्हॉ ए. नाही? Uhoh
कि ही बया... त्याचे मेसेज इकडे तिकडे दाखवत बसेल म्हणुन ही आयडीया.

सुभा मस्तच. काल चा भाग बघ्ताना असं वाटत होतं की सुभा खरं प्रेमात आहे..... त्याच अभिनय..... डोळ्यातुन दिसतो..... त्याच.... हसण कातिल आहे एकदम.....

काल पण ती सरळ सरळ लाईन देत होती आणि तो अंगठ्यानं जमीन उकरत/मोबाईलशी खेळत , "इश्श्य काहीतरीच बाई तुमचं..जावा तिकडं" म्हणत होता.

काल पण ती सरळ सरळ लाईन देत होती आणि तो अंगठ्यानं जमीन उकरत/मोबाईलशी खेळत , "इश्श्य काहीतरीच बाई तुमचं..जावा तिकडं" म्हणत होता.
>>> Lol

फारएण्ड,
गिरिकंदची विमानसेवा नाहीये ना... म्हणून बसनं जावं लागलं तिला Wink

काल पण ती सरळ सरळ लाईन देत होती आणि तो अंगठ्यानं जमीन उकरत/मोबाईलशी खेळत , "इश्श्य काहीतरीच बाई तुमचं..जावा तिकडं" म्हणत होता. >>>> उलट झाल. हि इकडे त्याला 'ILU' म्हणा बोलतेय आणि हा लाजतोय. ऑफिसात इतका मोठा पराक्रम करुन रुपालीपुढे मात्र लाजण्याच नाटक करते.

मायरा इशाच्या आईच्या चकल्यान्ना 'पर्सनल बिझनेस' म्हणून हिणवते तेव्हा इशाने तिला ठणकावून सान्गायला हव होत, "एक्सक्यूज मी, आईच्या हाताची चव आणि रस्त्यावरच्या स्टॉलच्या चकल्या यात फरक असतो. सो, माइन्ड युअर (पर्सनल) बिझनेस! ' एरवी विसपुढे हिची जीभ चुरुचुरु चालते, मायरापुढे मात्र भिगी बिल्ली बनण्याच नाटक का? Uhoh

इशाला 'इशान्येला' बसवल. Lol

इशाच नक्की ऑफिशियल टायटल काय आहे? बॉसच्या भावाला चहा देण्याच काम आणि तेही चकल्यान्सकट?

इबाळाला दिवाळीचे नवीन कपडे मिळाले वाटत. कालचा गुलाबी ड्रेस छान होता.

पुढच्या एपी मधे सुभा चाळीत दाराला टेकून उभा आहे का? काय जबरदस्त स्माईल देतोय... खल्लास ।। >>>>>>>> अगदी अगदी

तूच माझा आरसा >>> हे अस आहे का? मी आतापर्यन्त 'आर....... जा' असे ऐकत होते. Rofl

धन्स सुलू. >>>> तुमचे स्वागत आहे चम्पा Happy

पण त्या तीघांच्यात रूपाली च टी वाय लायक वाटते.
जुनिअर टील्लू ने छान काम केले आहे. प्रभावळकरां नंतर मात्र अनेक वर्षांनी अशी बावळट, बुळचट, लाजरा, सहानुभूती, विनोदी भूमीका सहज रित्या ऊभी केलेले पहायला मिळाले. मुख्य म्हणजे कुठेही ओव्हर द टॉप विनोदी वाटत नाही. बिलीव्हेबल बावळट वाटतो. >>>>>>>>>>> ++++++++ ११११११११११

aajachya eposode madhe ti isha jevha divalichya faralabaddal dnyan pajat asate jaideepla tevha to mhanto ki he adhi kadhi tari ekalel ahe.mhanje shilpa tulskar yachi mothi bahit asanar ka ani isha tai tyanacha punarjanma.

मायराचा चकल्यांच्या ऑर्डरमागे काय डाव असेल?>>झेंडेच्या मदतीने( सासूसून मालीकेत शिकवलेल्या कपटीपणाने ) तिखट मीठ वाढवणार असेल.

साधं अंकगणित पण येत नसल्यासारखं का वागतात हे लोक? काॅर्पोरेट गिफ्टस् फक्त 50? अरे, बाराशे कोटीचा टर्नोव्हर आहे ना तुमचा?

विक्रांत सरंजामे नसला तरी सुभा जिकडे तिकडे आहे सद्ध्या टीव्हीवर.>>> मेधावि, काशिनाथ च्या प्रोमोसाठी सुट्टी घेतली असेल.

विक्रांत सरंजामे नसला तरी सुभा जिकडे तिकडे आहे सद्ध्या टीव्हीवर.>>> मेधावि, काशिनाथ च्या प्रोमोसाठी सुट्टी घेतली असेल >>>>>> आज स्टार प्रवाहवर दिवाळी स्पेशल कार्यक्रमात सुभा परफॉर्म करणार आहे मानसी नाईकबरोबर.

पुढच्या भागात सुभाला लाडू चकल्या करंजा करताना दाखवणार आहेत. ईशा अगदी प्रेमाने चकल्याचं पीठ त्या चकल्या करण्याच्या यंत्रात मन लावून भरून देते आणि सुभा कौतुकाने तिच्याकडे बघतोय,ईशा सारण करंजीत भरते आणि ती चकती फिरवल्यावर उरलेलं पीठ पुन्हा मेन पिठात एकत्र करून एव्हढासा पीठ भी बडी चीझ होती है बाबू डायलॉग मारते, बॅकग्राऊंडला तुला पाहते चं संगीत वाजतंय, अहाहा अशी सुरेख संध्याकाळ सुभाने कधी अनुभवलीच नसेल.

इथेच वाचून कसली बोअर सिरीयल आहे असं वाटतं, एकट्या सु भा साठी मी नाही बघू शकत. कुलवधु बघायचे बरेचदा सु भा आणि पुर्वा गोखले एकदम क्युट कपल वाटायचे. मिलिंद गुणाजी प्लस पॉइंट होता.

>>>साधं अंकगणित पण येत नसल्यासारखं का वागतात हे लोक? काॅर्पोरेट गिफ्टस् फक्त 50? अरे, बाराशे कोटीचा टर्नोव्हर आहे ना तुमचा?

अगदी हाच विचार आला होता मनात..कधी नाही तर त्यादिवशी बघितलं आणि मनात आलं ही गिफ्टस फक्त ५० का ??? आणि कोणत्या कंपनी मधे असं व्हिपी ऑर्डर द्यायला जातो/जाते ??? यांच्या कंपनीत एच.आर डिपार्टमेंट नाही का ????

त्यांची व्हीपी बाॅसला शुगरच्या गोळ्या वेळेवर द्यायचं काम, व्हीपीच्या दृष्टीने यःकश्चित असणाऱ्या नव्याच रुजू झालेल्या कन्यकेला पाण्यात पाहण्याचे काम, त्याच कन्यकेला चपला घेऊन देण्याचे काम पण करते... म्हणजे व्हीपीची कामं सोडून शिपायाची कामं करत असते.
खरोखरच्या व्हीपीला ही कामं करायला वेळ मिळत असतो का?? त्याच्या कामांच्या धबडग्यातून. Uhoh

अरे हो एक राहिलंच की महत्त्वाचे म्हणजे झेंडेंशी चकाट्या पिटायचं काम पण बरेचदा करत असते. Proud

सुभा कोणते कपडे घालणार ते ही तीच ठरवते असं सुरुवातीच्या भागांत पाहीले होते. सद्ध्याचे गुलाबी निळे टी शर्ट्स पण तिनंच सुचवले का?
आज सूभादर्शन घडेल का?

सुभा कोणते कपडे घालणार ते ही तीच ठरवते असं सुरुवातीच्या भागांत पाहीले होते. >>>> नाहि तरी ती actual life madhye kapdyacha बिसनेस करते तेजस्वनी pandit barobar

त्यांची व्हीपी बाॅसला शुगरच्या गोळ्या वेळेवर द्यायचं काम, व्हीपीच्या दृष्टीने यःकश्चित असणाऱ्या नव्याच रुजू झालेल्या कन्यकेला पाण्यात पाहण्याचे काम, त्याच कन्यकेला चपला घेऊन देण्याचे काम पण करते... म्हणजे व्हीपीची कामं सोडून शिपायाची कामं करत असते. >>>>>> इशा तरी वेगळ काय करते? विसला आणि त्याच्या भावाला हिच चहा देण्याच काम करते.

सद्ध्याचे गुलाबी निळे टी शर्ट्स पण तिनंच सुचवले का? >>>>>> नाही, हि सगळी इबाळाची कृपा.

मायरा स्वत: क्रेडिट घेण्यासाठी इश्याच्या आईला चकल्यान्ची ऑर्डर देते. हा तिचा जगावेगळा प्लॅन.

मायरा इशाच्या आईच्या चकल्यान्ना 'पर्सनल बिझनेस' म्हणाली ते बरोबर होत तर. मला इशाई चकल्यान्चा बिझनेस करतेय ते माहितच नव्हत. Proud बाकी इशाची आई निमकरान्पेक्षा प्रॅक्टिकल आहे. स्टॉल्समध्ये नातेवाईकान्ना चकल्या विकण्यापेक्षा कॉर्पोरेट ऑफिसेसना विकणे केव्हाही बेस्टच!

जयदीप फायनली कामाला लागला हे चान्गल झाल. अगदी मनापासून काम करत होता तो. Happy नाहितर दरवेळी बघाव तेव्हा ऑफिसमध्ये मोबाईलमध्ये डोक खुपसण आणि इझी मनीचे स्किमज शोधण यापलीकडे काहीच करत नव्हता. सॉनियाचा सल्ला मनावर घेतला वाटत.

इशाला जयदीपच्या डिसीजनमध्ये इन्टरफिअर करण्याची काहीएक गरज नव्हती. ते कॅलेन्डर काही वाईट नव्हत. जनरली साडयान्च्या कम्पनीचे कॅलेन्डर्स असेच असतात की. जयदीपचे डिझाइन्सबद्दलचे डिसीजन्स योग्य होते. Except झोपलेल्या अवस्थेतल्या मॉडेलचा फोटो घेणे. ( साडयान्च कॅलेन्डर आहे ते, किन्गफिशरच नाही )

बादवे जयदीप एका कॅलेन्डरवाली मॉडेलला एकदा भेटला होता म्हणे. सॉनयाला हे माहितीय का? Wink Proud

नाहितर दरवेळी बघाव तेव्हा ऑफिसमध्ये मोबाईलमध्ये डोक खुपसण आणि इझी मनीचे स्किमज शोधण यापलीकडे काहीच करत नव्हता. >>> आणि अनावश्यक एक्स्प्रेशन्स चेहर्‍यावर आणत काही न बोलताही ओव्हरअ‍ॅक्टिंग करणे, हे ही Happy

ईशाच्या आई ची व्यक्तिरेखा टोटली अशी वाटते की असे पूरक उद्योग नक्की करत असेल.

आणि कोणत्या कंपनी मधे असं व्हिपी ऑर्डर द्यायला जातो/जाते ??? यांच्या कंपनीत एच.आर डिपार्टमेंट नाही का ???? >>> एक्झॅक्टली! पूर्वी इथे ही चर्चा झाली होती. कोणतीही कॉर्पोरेट प्रोसेस वगैरे प्रकार इथे नाही. ईशाला पर्सनली दिलेले ५ लाख तिच्या पगारातून मायरा कापून घेणार वाला सीन लक्षात आहे ना? Happy

वास्तविक मायरा असे करू शकते. सीनियर लोकांना discretionary budgets असतात अनेकदा. एका लेव्हलच्या रकमेपर्यंत फारशी प्रोसेस न फॉलो करता ते पैसे खर्च करू शकतात. किमान तसे दाखवायचे. पण या ष्टोरी मधले एकूणच कंपनीच्या माहितीबद्दलचे अज्ञान पाहता तसे काहीतरी नक्कीच गृहीत धरलेले नसावे.

इबाळने जयदीपला manipulate केले. तिला सगळा माल फक्त आणि फक्त सामान्य लोकांनाच विकायचा आहे. Happy

Pages