नाना तनुश्री वाद

Submitted by कटप्पा on 6 October, 2018 - 15:38

या वादाबद्धल तुमचं मत काय आहे.

कृपया हा धागा चालू घडामोडी मध्ये कसा हलवायचा कोणी तरी सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

2008 मध्ये नाना नी sexuaली harass केले असे तनुश्री चे म्हणणे आहे. आणि जेंव्हा तिने प्रोटेस्ट केले, मनसे च्या लोकांनी येऊन तिची कार तोड फोड केली असेदेखील म्हणणे आहे.

हा व्हिडिओ बघा अदिती - https://youtu.be/FuQitwjkc00

मला तनुश्री बद्धल सहानुभूती आहे, आणि माझे वैयक्तिक मत असे आहे की ती खरे बोलत असावी.
#Me Too ला दाबण्याचा प्रकार वाटत आहे हा.

नक्की काय प्रकार आहे? नेटवर वाचून उलटसुलट माहिती मिळतेय.

हे शोधत असताना क्वीनच्या दिग्दर्शकबद्दलही वाचायला मिळाले.

पण दोन्ही केस मध्ये अजून पोलीस तक्रार झालेलयाचे वाचले नाही. तक्रार केल्याशिवाय अपराध्याना शिक्षा कशी होणार? तनुश्रीचा जुना विडिओ बघितला, गाडीवर हल्ला होताना. त्यात एक कॅमेरामन हातातला कॅमेरा काचेवर आपटताना व 1 जण गाडीवर चढून उड्या मारताना बघितला, बाकी लोक नुसते गोळा होते गाडीभोवती. भीती दायक वाटले.

<धागाकर्ता - डिटेल्स ऍड करा लेखात.>
धागाकर्ता कटप्पा आणि हा प्रतिसाद लिहिणारे कटप्पा एकच की वेगवेगळे?

या इलाही ये माजरा क्या है?

अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ताने अखेर पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. नाना पाटेकर यांच्या सह गणेश आचार्य यांच्या नावाचा देखिल तक्रारीत उल्लेख आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तनुश्रीने ही तक्रार केली.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने एका मुलाखतीत केला होता. यानंतर तिला नाना पाटेकर यांनी नोटीस बजावली होती.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तनुश्रीने आता थेट पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता चौकशीला सुरुवात केली असून यामुळे नाना पाटेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

(लोकसत्ता मधील बातमी)

तनुश्री दत्ता चित्रपट महामंडळाची (बहुतेक) अध्यक्षा होती. त्यानंतर तनुश्री दत्ता बरीच तणावाखाली गेलेली. कुठल्या तर आश्रमात मन:शांती साठी दाखल झालेली. साध्वीच्या रुपातील तिचा एक फोटो काही वर्षापुर्वी आजतक ने शेअर केलेला.
हे प्रकरण बिग बॊस मधे सहभागी होण्यासाठी पुन्हा उकरुन काढले असावे असे वाटते.

https://m.indiatimes.com/entertainment/cintaa-apologises-to-tanushree-fo...
CINTAA strongly condemns any act that outrages the modesty of any individual and any form of sexual harassment is unacceptable to us. After going through Ms Tanushree Dutta's complaint, which was filed with the then Executive Committee of CINTAA in March 2008, we feel that the decision taken in the Joint Dispute Settlement Committee of CINTAA & IFTPC (then known as AMPTPP) in July 2008 was not appropriate, as the chief grievance of sexual harassment wasn't even addressed.

Although it was a different Executive Committee at that time, yet as CINTAA we find it highly regrettable and no apologies can suffice, hence we must resolve today to never allow such lapses to occur again. CINTAA stands strongly for the dignity and self respect of its members.

Sexual harassment is a serious criminal offence, unfortunately CINTAA's Constitution bars us from taking up any case which is more than three years old. Hence we appeal to the authorities to take cognisance of Ms Dutta's statements and conduct an impartial and speedy enquiry so that truth and justice may prevail. We also appeal to all our members to report any such incidents to us immediately. We are duty bound to give them our complete moral and legal support to ensure just and safe working conditions."
तिने २००८ मध्येही तक्रार केली होती.
सध्या जगभरातच आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल / छळाबद्यल बोलायची लाट आली आहे, त्यामुळे तिला आता पुन्हा बोलावंसं वाटलं असेल.
भारतातल्या अन्य काही स्त्रियांनीही अशा प्रकरणांबद्दल आता वाच्यता केली आहे.

तिच्या गाडीवर हल्ला हा मनसे सैनिकांनी केलेला नाही, कारण तेव्हा मनसेची स्थापनासुद्धा झाली नव्हती. तिच्या गाडीवर झालेला हल्ला हा कोण्या जमावाने का केला हे स्पष्ट नाही पण जो कॅमेरामन कॅमेराने गाडीची काच फोडतोय हवा सोडतोय त्याने दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की तनुष्री च्या बापाने त्याच्यासोबत हाथापाइ करुन त्याचा कॅमेरा तोडला. इतरही लोक असेच भडकलेले असावेत.

तनुश्री प्रत्येक चॅनेलवर जाऊन हे उकरुन काढत आहे. आणि नानाकडून काहीच खुलासा किंवा काही नाही. ज्यापद्दतीने दत्ताचे स्टेटमेंट्स येत आहेत त्यावरुन हा प्रकार सरळ नाही हे दिसत आहे. खस करुन राज ठाकरेंवर असभ्य भाषेत आरोप करणे हे मनसेला उचकवण्याचे प्रकार आहेत. काहीतरी राजकिय अजेंडा आहे.

कारण तेव्हा मनसेची स्थापनासुद्धा झाली नव्हती

मनसेची स्थापना २००६ मध्येच झाली होती.

ह्या तनुश्री दत्ताची बिग बॉस मध्ये सामिल होण्याकरता चाललेली ही एक केविलवाणी धडपड आहे. सध्या बॉलीवुड मधे हिला काळकुत्र देखील विचारत नाही, काही करुन प्रसिद्धी मिळावी ह्यासाठी चाललेले एक कारस्थान, ह्यापेक्षा ह्या विषयाला फार महत्व द्यायची अजिबात गरज नाही.

श्री नाना पाटेकर यांनी ह्या आधीच तीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे व कालच्या प्रेस वार्तेत "अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांना अभिनेते नाना पाटेकर यांनी आज उत्तर दिलं. 'जे खोटं आहे ते खोटचं असतं', असं म्हणत नानांनी तनुश्री दत्ताचे आरोप सपशेल फेटाळून लावले."

तनुश्री गांजा मारून होती, मासिक पाळीत होती असली विधाने करून दुसरी पार्टी आणखी खड्ड्यात जात आहे.
Twitter वर लाखो लोक तनुश्री ला सपोर्ट करत आहेत.
याउलट मनसे ज्यांच्यावर गुंडागर्दी चा आरोप लावण्यात आलाय, त्यांचे कार्यकर्ते आरोप फेटाळून लावत आहेत पण youtube वर त्यांचे विडिओ पाहिले तर उघड धमक्या देत आहेत मारू, तोडफोड करू म्हणून.

तनुश्री दत्ता चित्रपट महामंडळाची (बहुतेक) अध्यक्षा होती. त्यानंतर तनुश्री दत्ता बरीच तणावाखाली गेलेली. कुठल्या तर आश्रमात मन:शांती साठी दाखल झालेली. साध्वीच्या रुपातील तिचा एक फोटो काही वर्षापुर्वी आजतक ने शेअर केलेला. >>> ममता ताई कुलकर्णी म्हणायचे होते का ?

Twitter वर लाखो लोक तनुश्री ला सपोर्ट करत आहेत.
--- मग काय म्हणता? नानाला फाशी द्यायची का? कोणाला लाखो लोक सपोर्ट करत आहेत म्हणून तो इनोसंट आहे असे मागे बहुतेक आसाराम बापू का कोण्या बाबासंदर्भात कोणी बोललेले आठवले.

तनुश्रीने काही चित्रपटात/ ऑनस्क्रीन बोल्ड दृश्ये दिली मग नानाने काही केलं तर हिला काय होतंय?या नट्या असल्याचं असतात, आमचा नाना समाजसेवक आहे तो असे काही करूच शकत नाही, झालंच तर नाना मराठी आहे आणि हि बया परप्रांतीय आहे असले सॉल्लिड युक्तिवाद नानाच्या बाजूने बरेच ( त्यात मराठी जास्त ) लोक करत आहेत. एरवी हास्यास्पद वाटणारी राखी सावंतपण अनेकांना या प्रकरणात नानाच्या बाजूने उभी राहली म्हणून बाणेदार मराठी मुलगी वाटतेय!! तनुश्रीने पोलिसात जायला हवं होत मीडियासमोर नाही असं म्हणणारे पण आहेत. बरं आता तनुश्रीने पोलिसात पण तक्रार केली आहे. बायकांना संशयाने पाहणे, शिव्या घालणे आणि जरी काही झालं तरी त्यांनी जास्त बोभाटा न करता गप्प राहणे अशी अपेक्षा असणं हा आपला राष्ट्रीय स्वभाव आहे आणि सगळीकडे प्रांतीय , जातीय- धार्मिक रंग आणल्याशिवाय आपल्याला करमत नाही हेच खरं.

साकल्य. लोकांना काय वाटते ह्याबद्दल चर्चा करायची आहे का ह्या धाग्यावर? तसे असेल तर तनुश्री च्या बाजूने बोलणार्‍यांचीही मापे काढल्या जाऊ शकतात. पण हा विषय नाना आणि तनुश्री या दोघांतला आहे. तो फौजदारी खटला असेल तर कोर्टात होऊ द्या दूध का दूध आणि नाना का पानी... मिडिया ट्रायल गॉसिप ट्रायल करुन तनुश्री किंवा नाना ह्या दोघांपैकी कोणाही एकाला व्हिलन व दुसर्‍याला व्हिक्टीम करण्यात काय पॉइंट आहे?

हेला, या वादावर आपलं काय मत आहे असा हा धागा आहे. तनुश्रीची तर भरपूर मापं काढून झालेली आहेतच की. बाकी तुम्ही पण मनसेचा यात हात नाही, २००८ साली मनसे अस्तित्वातच नव्हती वगैरे निष्कर्ष काढून मोकळे झाल्यातच की. मनसेची स्थापना २००६ ची आहे, २००८ साली तर मनसे ऐन भरात होती.
जो आरोप करतोय तोच (किंवा ती बाई) दोषी आहे असं एका फटक्यात निष्कर्ष काढू नये हे माझं मत आहे बाकी पण ऑलरेडी वर लिहिलेलं आहेच. शेवटी पोलीस/कोर्टच काय ते ठरवणार आहे.

ज्या पद्धतीने तानुश्री ला घाणेरड्या कंमेंटस केल्या जातायत, मराठी माणसासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

ममता ताई कुलकर्णी म्हणायचे होते का ? >>> नाही तनुष्री दत्ताच. एका बातमीत तिला अध्यक्ष म्हणुन दिपप्रज्वलन करताना पाहिलेल .

नाना सारखा जबरी गडी एका पोरीला घाबरून मनसे च्या लोकांना बोलावून घेईल हे पचत नाही बुद्धीला ...त्याचा तापट स्वभाव आणि प्रेमप्रकरणे हि इंडस्ट्री मधील ओपन सेक्रेटस आहेत त्यांचा संबंध इथं जोडणं चुकीचं आहे ...
बाकी त्याच्या पेक्षा २१ वर्ष लहान आयेशा झुल्काने काय पाहिलं त्यात देव जाणो

आशिक बनाया आपने मधील गाणं मोबाईलमध्ये पाहून कदाचित सुटला असेल नानाचा स्वतःवरचा ताबा. त्याने माफी मागून विषय संपवावा.

Pages