नाना तनुश्री वाद

Submitted by कटप्पा on 6 October, 2018 - 15:38

या वादाबद्धल तुमचं मत काय आहे.

कृपया हा धागा चालू घडामोडी मध्ये कसा हलवायचा कोणी तरी सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरुषांवर केलेले आरोप खोटे निघाले तर स्त्रीयांना कोणती शिक्षा मिळते?
खरे निघाले तरीही अर्थिक अणि राजकिय दृष्ट्या बलाढ्य पुरुषांचे काही वाकडे होत नाही. परंतु जे तसे नाहीत ते पुरुष बर्बाद होतात.

{{{ 6) "आमचा रमेश असा नाही "सिन्ड्रोम.
एका राजकीय नेत्याने अशी बाजू घेतलेली आपल्याला कौतुकास्पद वाटत असेल तर कथुआ मध्ये या मुलांनी बलात्कार केलाच नाही म्हणत केलेला मोर्चा सुद्धा कोणाला खटकू नये.
स्वतः चा बाप आणि मुलगा याना चारित्र्य प्रमाणपत्र देताना 10 वेळ विचार करावा अशी परिस्थिती आज आहे, त्यामुळे अमूक पुरुष जज/लेखक/तमुक वंशाचा/ढमूक जातीचा/ वयस्कर/इ इ इ आहे म्हणून त्याने काही केले नाही हा सगळ्यात मूर्ख बचाव आहे.}}}

इथे अमूक एक जण अमूक जातीचा असल्याने त्याने बलात्कार करणे शक्य नाही असा बचाव तुम्हाला कुठे दिसला? रमेश भाटकर यांना व्यक्तिशः ओळखत असल्याने बाळासाहेबांनी त्याची बाजू घेतली होती. तसेही आरोप सिद्ध होत नाही तोवर आरोपीला बदनाम करणे त्याचे करिअर बरबाद करणे हा नुसताच मूर्खपणा नाही तर क्रौर्य देखील आहे. त्याचप्रमाणे अमूक एक जातीच्या / धर्माच्या (अर्थातच त्या धर्मियांविषयी मनात शत्रुत्व वाटत असल्याने) मुलीवर बलात्कार केला म्हणून आरोपीचा सत्कार करणे आणि आरोपीचे आजवरचे चारित्र्य पाहता त्याने बलात्कार केला नसल्याचे खात्रीने वाटत राहिल्याने त्याचा बचाव करणे या दोन्हीत गल्लत करण्याचा अजून एक मूर्खपणा वरच्या प्रतिसादात दिसत आहे. सुदैवाने अशा मुर्खांची संख्या अजुनही मर्यादित आहे अन्यथा बलात्काराच्या आरोपीला वकीलही न मिळण्याचा काळ येईल. असा काळ आलाच आणि त्यावेळी सिंबा यांचेवर (हा आयडी धारणकर्ती व्यक्ति पुरुष आहे असे मानून) असा आरोप झाला तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल?

आरोप सिद्ध होईपर्यंत नाना / रमेश (किंवा अजुन कुणी पुरुष असेल) या आरोपींची बाजू घेण्याचे स्वातंत्र्य असावे. आरोप सिद्ध होऊन ते गुन्हेगार ठरलेच त्यांचा नक्कीच निषेध करु. पण तोवर जसे तनुश्री समर्थक आहेत तसेच नानाचेही समर्थक असणारच. उभय बाजूंनी एकमेकांना डिवचणे / मूर्ख ठरविणे टाळायला हवे.

पुरुषांवर केलेले आरोप खोटे निघाले तर स्त्रीयांना कोणती शिक्षा मिळते?
खरे निघाले तरीही अर्थिक अणि राजकिय दृष्ट्या बलाढ्य पुरुषांचे काही वाकडे होत नाही. परंतु जे तसे नाहीत ते पुरुष बर्बाद होतात.
नवीन Submitted by हेला on 9 October, 2018 - 13:54

अतिशय सहमत. सिम्बा प्लिज नोट द अबाव्ह कॉमेंट.

या संक्रमणाच्या काळात काही पुरुषांचा बळी जाईलही, पण होणार बदल जास्त फायदेशीर ठरेल.

-- वॉव.... हाच तो अमानुष फेमिनिझम.
Submitted by हेला on 9 October, 2018 - 13:48

पुन्हा एकदा सहमत. सिम्बा प्रतिसाद लिहिताना बळी जाणारा पुरुष आपण / आपला आप्त परिचित असू शकतो ही जाणीव नव्हती का? आणि समजा कुणी नसला तरीही एका निरपराध पुरुषाचा (मानवाचा) बळी जाणे सद्सद्विवेकबुद्धीला रुचते का? की इतकी वर्षे अनेक स्त्रिया बळी पडल्याच आहेत तर काही काळ थोडे पुरुष बळी पडणे इष्ट वाटते?

धन्यवाद हेमंत.

सगळे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत सिम्बा.

2) तनुश्रीने २००८ मधेदेखील तक्रार केलीच होती ना? त्यामुळे 'आत्ताच का' हा प्रश्न असू शकत नाही. 'आत्ता परत का' असू शकेल कदाचित.
4) > ज्या रेट ने लोक नावे घेत आहेत ते पाहता 3 4 दिवसात आपल्या स्वतः च्या वर्तुळातील एखादी मुलगी me too म्हणून पुढे येईल, किंवा आपल्या वर्तुळातील एखाद्या व्यक्तीचे नाव घेईल, > मी आतापर्यंत जितक्या मुलींशी या विषयावर बोलले आहे त्या सगळ्यांना मोलेस्टेशनचा कमीतकमी एक अनुभव आला आहे. अगदी वय ४ वर्ष असल्यापासूनचे अनुभव आहेत. बस, लोकल वगैरेने प्रवास करणाऱ्याना यात नवीन काहीही नाही. पण सगळ्या केसमध्ये पुरुष अनोळखी होते.
7) > या कॅम्पेन मुळे स्त्रियांच्या एम्प्लॉयमेंट वर परिणाम होईल का? जसा एम्प्लॉयर कडून ML बद्दल विचार केला जातो , तसा या अँगल ने विचार होईल का? > होऊ शकतो जर या Me_Too मध्ये ऑफिसातल्या/कॉर्पोरेट क्षेत्रातल्या केस बाहेर येऊ लागल्या तर!

> पुरुषांवर केलेले आरोप खोटे निघाले तर स्त्रीयांना कोणती शिक्षा मिळते?
खरे निघाले तरीही अर्थिक अणि राजकिय दृष्ट्या बलाढ्य पुरुषांचे काही वाकडे होत नाही. परंतु जे तसे नाहीत ते पुरुष बर्बाद होतात. > हे आता थोडं 498A सारखं होतंय... मूळ कायद्याला विरोध करता येत नाही; पण त्याचा गैरवापर होऊ शकतो हे मान्य करावे लागते...

सिम्बा मागच्या पानावरची पोस्ट छान आहे.
बाकी या विषयावर बोलण्यास मी पात्र आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे इथे वाचनमात्र राहते.

अमूक एक जण अमूक जातीचा असल्याने त्याने बलात्कार करणे शक्य नाही असा बचाव तुम्हाला कुठे दिसला>>>>>>
या वादाला मराठी विरुद्ध अमराठी असा ट्विस्ट आधीच देऊन झालाय, तुमच्या वाचनात कदाचीत आले नसेल.

आरोपीचे आजवरचे चारित्र्य पाहता त्याने बलात्कार केला नसल्याचे खात्रीने वाटत राहिल्याने त्याचा बचाव करणे

मी मागेच म्हंटले आहे, स्वतःचे अगदी निकटवर्तीय लोक कसे वागतील याची खात्री आजच्या जमान्यात देता येणार नाही, तेव्हा केवळ वैयक्तिक ओळख आहे म्हणून अग्रलेख लिहून हमी घेणे हा भाग तुम्हाला वाटत नसला तरी मला इन्फ्लुएनसिंग द प्रोसिडिंग प्रकारातील वाटतो.
मुळात एका मनुष्यावर गैरवर्तनाचा आरोप झाला तर त्याच्या बचवसासाठी एक राजकीय पक्षाच्या सुप्रीमो ला अग्रलेख लिहावासा वाटतो हेच पुरेसे बोलके आहे.

दुसरी गोष्ट आपण जनरल लैंगिक छळा बद्दल बोलत नाहींयोत (eve टिसिंग) की रोहतक सिस्टर्स चा हवाला देऊन मला प्रश्न करावा (इंटेरेस्टिंगली मागच्या एक धाग्यांवर मी हेच उदाहरण देऊन गुन्हा सिद्ध होई पर्यंत आरोपीचे पब्लिक शेमिंग करणे चुकीचे आहे असा स्टॅन्ड घेतला होता)
इकडे आपण कामाच्या ठिकाणी होणारे शोषण याबद्दल बोलत आहोत, कँपन्यांमध्ये याचे नियम स्पष्ट असतात, आणि एम्प्लॉईज नि ते पाळावे अशी अपेक्षा असते, आपल्या "मैत्री" वर फाजील विश्वास, किंवा निष्काळजी पणा करून कुणी या गाईडलाईन्सकडे दुर्लक्ष केले तर त्याची शिक्षा त्याला मिळाली असे मी म्हणेन. कमप्लायन्स मध्ये ढिलाई दाखवल्यावर नोकरी इमिजीएत इफेक्ट जाऊ शकते, त्या बद्दल आपण हळहळतो, पण तिकडे दयामाया दाखवली जात नाही, तोच नियम इकडे लावावा.

हेला , तुमचा मूळ मुद्दा बरोबर आहे , मीडिया ट्रायल नको, मात्र त्याची दुसरी बाजू सुद्धा तितकीच बरोबर आहे की बोलणाऱ्या व्यक्तीला मसल पॉवर च्या जोरावर गप्प बसवले जाऊ नये (जे या केस मध्ये आधीच झाले आहे) जेव्हा एक पार्टी दुसरीला गप्प बसवायला गुंड वापरते तेव्हा दुसऱ्या पार्टी कडून कोणत्या तरी स्वरूपात प्रतिक्रिया येणारच.
त्यामुळे, आधी गुंडगिरी करून विषय मीडिया समोर आणायचा आणि मग जोरकस प्रतिक्रिया आल्यावर मीडिया ट्रायल नको म्हणून ओरडायचे हे चुकीचे आहे.

एका बाईच्या म्हणण्यावर पुरुषाला सजा द्यायची का?
मुद्दा चुकीच्या दिशेने नेताय, सजा द्यायची की नाही ही खूप पुढची गोष्ट आहे, पण बाई ने आरोप केल्यावर तुम्हि तिच्या इतर कामाचा हवाला देऊन चॉकशीच होऊ नये असा पवित्रा घेताय तो चुकीचा आहे.

अन्यथा बलात्काराच्या आरोपीला वकीलही न मिळण्याचा काळ येईल. असा काळ आलाच आणि त्यावेळी सिंबा यांचेवर (हा आयडी धारणकर्ती व्यक्ति पुरुष आहे असे मानून) असा आरोप झाला तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल?
हा मी वैयक्तिक हल्ला आहे असे समजतो.
कदाचित माझ्या समजण्यात चूक असेल,
हा वैयक्तिक हल्ला वाटतो/नाही वाटतो या वर कृपया मत प्रदर्शन करावे, त्या नुसार माझी काय प्रतिक्रिया असेल ते सांगेन

या संक्रमणाच्या काळात काही पुरुषांचा बळी जाईलही, पण होणार बदल जास्त फायदेशीर ठरेल.>>>>

असे होऊ नये ही ईच्छा. हजारो वर्षे कुणी अन्याय केला, आता त्यांच्यावर थोडा अन्याय झाला तर काय बिघडले ही मानसिकता सगळ्यांना खड्ड्यात घेऊन जाणारी आहे.

(जे या केस मध्ये आधीच झाले आहे) जेव्हा एक पार्टी दुसरीला गप्प बसवायला गुंड वापरते
-- हे तनुश्रीने म्हटले म्हणून का? ह्या विधानाची (नानाने गुंड वापरल्याची) सत्यता अजून स्पष्ट नाहीये. झाली असल्यास कृपया प्रकाश सोडा....

आता त्यांच्यावर थोडा अन्याय झाला तर काय बिघडले ही मानसिकता सगळ्यांना खड्ड्यात घेऊन जाणारी आहे. >>>> लखनौत आल्यासारखे वाटतेय. पहले आप, पहले आप. पुरूष म्हणतात कि आमच्यावर थोडा अन्याय झाला तरी चालेल पण स्त्रियांना न्याय मिळू देत. स्त्रिया म्हणताहेत कि नाही नाही, जे चालू आहे ते तसेच राहू देत पण पुरूषांवर थोडाही अन्याय होऊ देणार नाही.
अब भारत को महासत्ता बनने से कोई नही रोक सकता.

बळेच. असे मी म्हटलेले नाही. आता स्पष्टीकरणे द्यावी लागणार असतील तर मी चाललो कराओके कन्सर्ट मधे. Lol

>>झाली असल्यास कृपया प्रकाश सोडा....<<
नाना-तनुश्रीच्या या वादात मनसे कुठुन, आणि कशी आली. त्या स्टुडिओतला हल्ला हा पत्रकारांचा उद्वेग होता हे बातम्यांवरुन (क्लिप्सवरुन) समजतंय. ते मनसेचे गुंड होते असा तनुश्रीने तिच्या कुवतीनुसार समज करुन घेतला काय? पुढे मनसेने केलेला प्रकार हि त्यांची तनुश्रीच्या आरोपांवर दिलेली रिअ‍ॅक्शन होती, अर्थात त्यांच्या स्टाइलमध्ये....

बाकि, कार्पोरेट जगात सेक्शुअल हॅरॅसमेंट पॉलिसी कंपनीच्या हिताकरता कशी बेंड केली जाते हे फणिश मूर्तीच योग्यरित्या सांगु शकेल... Wink

अन्यथा बलात्काराच्या आरोपीला वकीलही न मिळण्याचा काळ येईल. असा काळ आलाच आणि त्यावेळी सिंबा यांचेवर (हा आयडी धारणकर्ती व्यक्ति पुरुष आहे असे मानून) असा आरोप झाला तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल?
हा मी वैयक्तिक हल्ला आहे असे समजतो.
कदाचित माझ्या समजण्यात चूक असेल,
हा वैयक्तिक हल्ला वाटतो/नाही वाटतो या वर कृपया मत प्रदर्शन करावे, त्या नुसार माझी काय प्रतिक्रिया असेल ते सांगेन
नवीन Submitted by सिम्बा on 9 October, 2018 - 18:09

बोल्ड केलेले विधान वैयक्तिक हल्ला वाटत असेल तर तुमच्या प्रतिसादातील हे विधान काय आहे?

या संक्रमणाच्या काळात काही पुरुषांचा बळी जाईलही, पण होणार बदल जास्त फायदेशीर ठरेल.>>>>

बाकी तुम्ही पेडगावचं नॉन रिटर्नेबल तिकीट काढलं असल्यास आम्ही कोण तुम्हाला अडवणार?

@ बिपीन चन्द्र हर...
तुमच्या सर्व प्रतिसादांशी सहमत !
---
बाकी,
मागील पानावरिल @सिम्बा यांचा >>Submitted by सिम्बा on 9 October, 2018 - 10:52<< हा प्रतिसाद प्रचंड गंडला आहे. मला वाटते ज्या झिलतोड्यांनी ह्या प्रतिसादाचे समर्थन केले आहे त्यांनी तो प्रतिसाद संपूर्ण वाचला आहे की नाही हाच प्रश्न आहे.
--
बाकी त्या नान्याने ह्या 'C' ग्रेड नायिकेबरोबर काही गैरवर्तन २००८ मधे केले होते व या 'C' ग्रेड नायिकेने त्या गैरवर्तनाची तक्रार, त्याचवेळी पोलिसांकडे केली होती तर त्या तक्रारीचा सोक्षमोक्ष लागायच्या आत अमेरिकेला पळून जाण्यापाठी काय कारण होते ? का नाही त्याच वेळी या 'C' ग्रेड नायिकेने या ठरकी व तापट नान्याला जेल मधे पाठवले ?

C grade नायिका हे फार महत्त्वाचे दिसतेय. सात ओळींत तीनदा तसं म्हटलंय.

लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रियांना मदत करण्यासाठी सरकारची एक योजना आहे. तिचे नाव मनोधैर्य आहे. असं नाव का ठेवलं असावं?

C grade नायिका हे फार महत्त्वाचे दिसतेय. सात ओळींत तीनदा तसं म्हटलंय.

लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रियांना मदत करण्यासाठी सरकारची एक योजना आहे. तिचे नाव मनोधैर्य आहे. असं नाव का ठेवलं असावं?
नवीन Submitted by भरत. on 9 October, 2018 - 21:22

तनुश्रीचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून अभिनय क्षेत्रात असणार्‍या नाना पाटेकरांना तनुश्रीने चिंधी अभिनेता (चीप अ‍ॅक्टर) म्हंटल्याचे लाडक्या लोकसत्तात छापलेले वाचले नाहीत का? तनुश्रीचा नेमका काय प्रॉब्लेम आहे? तनुश्रीच्या मते तिच्यासोबत नाना पाटेकरांनी गैरवर्तन केले आणि मनसे कार्यकर्त्यांनी तिच्यावर हल्ला केला; मग तिने पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी. त्याप्रमाणे तिने ती केली देखील आहे. पोलिस संबंधित कलमांखाली आरोपपत्र दाखल करतील कोर्टात दोन्ही बाजूंनी साक्षी पुरावे तपासले जाऊन न्याय्य कारवाई होईलच की. त्याच साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाबला देखील आपल्या न्याययंत्रणेने त्याच्या बचावाची संपूर्ण संधी देऊन मगच त्याला फासावर लटकविले. तनुश्रीचा न्याययंत्रणेवर विश्वास नाही का? शिवाय नानाला अभिनय येत नाही, राज ठाकरेंना नकला करण्याशिवाय काही येत नाही त्यांना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती, ती न मिळाल्याने ते बिथरले. मीडियात अशी संदर्भहीन विधाने करुन तनुश्री उगाचच खळबळ माजवित आहे. नानाचा चेहरा टिपीकल हिरोसारखा नसुनही तो गेल्या चाळीस वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. शिवाय तो कमर्शिअल आर्टिस्टही आहे. राज ठाकरेंनीही चित्रकला आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत तीसेक वर्षांत आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. या लोकांविषयी जी तक्रार असेल तेवढीच करावी. त्यांच्या क्षेत्रात ते कसे अकुशल आहेत हे मीडियात सांगायची गरजच काय?

या पार्श्वभुमीवर डिंपलची प्रतिक्रिया उठून दिसते. तिने मीडियाला दिलेल्या स्टेटमेंटनुसार तिने नानाच्या स्वभावाची नकारात्मक बाजू अर्थात त्याचा तापट स्वभाव पाहिला आहे. परंतु नानाचा अभिनय चांगला असल्याने त्याच्या नकारात्मक बाबीही खपवून घेतल्या जातात. ही प्रतिक्रिया रास्त वाटते. परंतु तनुश्रीचे नानासोबत काही भांडण झाले म्हणून तिने नाना चिंधी अभिनेता आहे अशी टीका करणे फारच हास्यास्पद आहे.

अनिरुद्ध. धन्यवाद.

ऍक्टर वेगळा आणि हिरो वेगळा. हिरो भोवती एक वलय असते.
नाना क्याराक्टर ऍक्टर बनून राहिला त्याला हिरो व्हायचं होते असे ती म्हणतेय.
चिंधी म्हणणे चूक आहे - सहमत.
बाकी मनसे तोड फोड करते, आणि बाकी आरोप जे तिने लावलेत, ते मनसे कार्यकर्ते मुलाखती आणि धमक्या देऊन जास्तच सिद्ध करू पाहत आहेत.

एका बाईच्या म्हणण्यावर पुरुषाला सजा द्यायची का?
मुद्दा चुकीच्या दिशेने नेताय, सजा द्यायची की नाही ही खूप पुढची गोष्ट आहे, पण बाई ने आरोप केल्यावर तुम्हि तिच्या इतर कामाचा हवाला देऊन चॉकशीच होऊ नये असा पवित्रा घेताय तो चुकीचा आहे.

सहमत. बाईच्या आणि पुरुषाच्या पण इतर कामाचा हवाला देऊन मूळ आरोप सोडून लगेच बाकी गोष्टीवर चर्चा नेऊ नये.

इथे तर काही प्रकरणात पुरुष (रजत गुप्ता वगैरे ) कबुली देऊन माफी पण मागत आहेत. पण बरीचशी जनता अजूनही ज्या स्त्रियांनी आरोप केले किंवा करत आहेत त्यांच्यावरच बोट दाखवत आहेत.

तनुश्रीचे से हर्रासमेंटचे आरोप ठिक आहे. पण तिचे जे इतर स्टेटमेंट आहेत आणी राज ठाकरेंबद्दल अनावश्यक टिप्पणी हे उचकवण्याचे प्रकार वाटत आहेत. सुटीवर आली आणी मग कोण्या एका चॅनेल ने मुलाखत घेतली इतका सरळ मामला दिसत नाहीये. सिरीज ऑफ मिडिया इन्टरॅक्शन आणि प्रेस कॉन्फरंस आहेत. त्यात प्रकरण अजून भडकत कसं नाही अशा आवेशाने राज ठाकरेंवर चिखलफेक करणे संशयस्पद वाटते....

बरीचशी जनता अजूनही ज्या स्त्रियांनी आरोप केले किंवा करत आहेत त्यांच्यावरच बोट दाखवत आहेत.

-- अपना अपना नजरिया होता है... बर्‍याचशा लोकांना असंही वाटतंय की तनुश्रीची बाजू लाखो लोक घेत आहेत: संदर्भ च्रप्स.

. त्यात प्रकरण अजून भडकत कसं नाही अशा आवेशाने राज ठाकरेंवर चिखलफेक करणे संशयस्पद वाटते....
नवीन Submitted by हेला on 10 October, 2018 - 18:54

सहमत. त्यातही राज ठाकरेंनी अजून पर्यंत तरी या प्रकरणात संयमी भूमिका बाळगलेली दिसून येत आहे. हे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलपेक्षा निश्चितच वेगळे आणि अर्थातच प्रशंसनीय आहे.

Pages