नाना तनुश्री वाद

Submitted by कटप्पा on 6 October, 2018 - 15:38

या वादाबद्धल तुमचं मत काय आहे.

कृपया हा धागा चालू घडामोडी मध्ये कसा हलवायचा कोणी तरी सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिग बॉस चा काय संबंध आहे, ती स्वतः म्हणतेय बिग बॉस काही स्वर्ग नाही आणि सलमान काही देव नाहीय की मला बिग बॉस जाण्यात इंटरेस्ट असेल.

कार्यकर्ते चे विडिओ खतरनाक आहेत youtub वर - हा वाला बघा :
https://youtu.be/WF7KeY2Qb7k

After so many years I don't think police can find anything concrete to punish Nana. But given the reputation Tanushree may be talking the truth. So I think it will be media trial only. Now the elections are declared for 4 states so Media has lot more interesting to cover than this issue.

व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात ज्यांच्या नावे सुविचार खपून जातात त्यातल्या एकाला बदनाम करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट असू शकतो. आता जर अविनाश धर्माधिकारी, विश्वास नांगरे पाटील आणि अण्णा हजारे यांच्या बाबतीतही असेच काही समोर आले तर सिद्धच होईल ते.

#मीटू दोन्ही बाजूंनी (अक्युजर आणी अक्युजी) ज्या प्रकारे हाताळलं जातंय ते बघून घाबरायला होतं.
#मीटू वर न्युज मिडीया, फेसबुक वर आलेलं अत्यंत घाण ट्रोलिंग पाहून घाबरायला होतं.
#मीटू चा अर्थही माहित नसताना शोषण सहन करणार्‍या, रिपोर्टही न करण्याच्या परिस्थितीत्/गरीबीत्/छळात ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल घाबरायला होतं.
शेवटी वरील प्रकरणातल्या #मीटू बद्दल मी स्वतःही या सर्व शंका घेतल्या आहेत हे जाणवून घाबरायला होतं.
पण बहुधा #मीटू योग्य प्रकारे योग्य लोकांना न्याय मिळवून देत असावी असं समजूया.

कोण बरोबर हे ठरवण्याची माझी क्षमता नाही त्यामुळे मत मांडण्याच्या ऑफरला पास.
हे ठरवू शकणा-या सक्षम संस्थांकडे दोन्ही पक्ष गेलेले आहेत. तिथे सत्य समोर यावे आणि सत्याच्या बाजूने न्याय व्हावा एव्हढीच अपेक्षा.

पण तिने हा वाद आता उकरून काढण्याचे कारण काय?
>>> 2008 मध्ये जे झाले त्यामुळे तिने इंडस्ट्री सोडली होती आणि ती बाहेर सेटल झाली होती, सध्या ती वेकेशन साठी भारतात आली आहे तेंव्हा मीडिया ने तिचा इंटर्व्हिएव घेतला. तेंव्हा या घटनेबाबत तिला विचारले गेले.
2008 मध्ये सोमी इतका स्ट्रॉंग नव्हता, त्यामुळे प्रकरण तेंव्हा लाईम लाईट मध्ये नव्हते, आता मात्र ते सगळीकडे पसरले आहे.
त्यामुळे ...

तिला 2008 मध्ये न्याय मिळाला नाही, आता मिळायला हवा !

चप्रस, खरं तर तीही शंका नाकारता येत नाहीये. मराठी माणूस 'सज्जन' असं या केस मध्ये नसेल, पण कदाचित 'हाऊ डेअर धिस बिलो स्टँडर्ड मॅन टच मी' असं असू शकतं. (ग्लॅमरस माणसाकडून झालेले ते हेल्दी फ्लर्टिंग्/साध्या लुकिंग माणसाकडून झालेली ती छेडछाड असे काहीतरी)
दत्ता बरोबर झालेला प्रसंग खरा असण्याची शक्यता जास्त आहे.पण यात मूळ कारण्+अनेक सब कारणे असू शकतात.

अनु - कोणाकडून फ्लर्ट करून घ्यायचे आणि कोणाकडून नाही हा फक्त स्त्री चा निर्णय असावा ना.
शेवटी consent महत्वाचा ना.

सोमी वर लोक असा युक्तिवाद करत आहेत की आशिक बनाया आपणे मध्ये हिला इम्रान हाश्मी बरोबर किस सीन्स द्यायला प्रॉब्लेम नव्हते इथे हात लावला वगैरे तर काय बिघडले.

Consent प्रकार लोकांना, कळत नाहीय.
इच्छे विरुद्ध स्पर्श मग तो एखाद्या प्रोस्टिट्यूट ला का असेना, चूकच आहे.

दोन्ही बाजू, मीडिया, फिल्म इंडस्ट्री, राजकारणी, सामान्य माणसं या सगळ्यांचाच आपला अजेंडा.
कुणीही दिसतं तितकं सरळ नाही अन वाटतं तितकं वाईटही नाही.

कायदेशीर मार्गानी जाऊन कोर्टात न्याय मिळवत असतील तर चांगलेच, नसतील तर ट्रकभर पुराव्यांच्या घोषणा करणार्‍यांच्यात आणि यांच्यात काही फरक नाही.

इच्छे विरुद्ध स्पर्श मग तो एखाद्या प्रोस्टिट्यूट ला का असेना, चूकच आहे.>> +१

या केसमध्ये काय खरं काय खोटं माहीत नाही
पण असले युक्तीवाद चुकीचे आहेत.

कंसेंट बद्दलच्या मुद्द्याशी सहमत.
तिने सांगितलेला दुसरा प्रसंगही विचीत्र आहे. इरफान खान च्या चेहर्‍यावर क्लोजप मध्ये अमुक एक्स्प्रेशन पाहिजे म्हणून तिने समोर नाचावे असे काहीतरी.इरफान खान ने 'मी अ‍ॅक्टर आहे, एक्ष्प्रेशन देऊ शकतो, त्यासाठी कोणी क्युज द्यायची गरज नाही' सांगून तिला डिफेंड केले होते.
एकंदर हे सर्व चित्रपट सृष्टीत फारच सर्रास चालत असावे.

मी वाचलेल्या काही गोष्टी. एखादी घटना बरोबर नसेल तर सांगा.

1. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार तिला गणेश आचार्य स्टेप्स समजावत होता. त्यावेळी नानाने तिला मिठी मारली. हे गणेश आचार्यच्या सांगण्यावरून की स्वतः:हुन हे (मला) माहीत नाही. तिच्या म्हणण्याप्रमाणे नाना आधी त्या गाण्यात नव्हता. त्याला ऐनवेळी घेतले.
2. हॉर्न ओके प्लिजचा प्रोड्युसर समीर सिद्दीकीच्या म्हणण्याप्रमाणे डान्सची रिहर्सल सुरू असताना अचानक ती संतापून तिच्या वँनिटी मध्ये जाऊन बसली आणि सेटवर यायला तिने नकार दिला. प्रोड्युसरने अनेक वेळा सांगूनही ती सेटवर गेली नाही. मग प्रोड्युसर तिच्या सेक्रेटरीशी बोलला तेंव्हा ती सेटवर गेली. तिथे तिने नानाबरोबर डान्स करायला नकार दिला. त्यावर प्रोड्युसर तिला- असं कसं चालेल? नाना या गाण्यात हवाच असं काहीसं म्हणाला. त्यानंतर तिने शुटिंग पुढे सुरू ठेवायला नकार दिला आणि त्या दिवसाचं शुटिंग कॅन्सल करायला लागल्यामुळे प्रोड्युसरचं नुकसान झालं.

या दोन्ही गोष्टी कनेक्ट केल्यानंतर खरचं काय झालं असावं याचा अंदाज लावता येऊ शकतो.

एका रिपोर्टरची स्टोरी - https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/tanushree-had-filed-f...
अर्थात रिपोर्टर स्टोरीसाठी खोटं लिहीत आहे असं म्हणता येऊ शकतं.

तरीही तनुश्रीवर झालेला हल्ला, तिला काम न मिळणं, ती फिल्म इंडस्ट्रीमधून गायब होणे म्हणजे काहीतरी घडलं होतं हे नक्की आणि त्याचा तिला फायदा न होता उलट प्रचंड नुकसान झालेलं आहे.

आत्ताच पाहिलं. हा FIR - https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/tanushree-had-filed-f...

अवांतर - आता जुन्या मुलाखती किंवा न्यूज वाचल्या की जाणवतं, ऐश्वर्या एवढी टॉपची हिरॉईन असताना सुद्धा जेंव्हा तिला सलमान खान त्रास देत होता तेंव्हा तिच्या सपोर्टला इंडस्ट्रीमध्ये कोणीच पुढे आले नाही. तिलाच अनेक पिक्चर गमवावे लागले. शेवटी सलमानविरुद्ध एक पत्रक काढावे लागले. (जेव्हा आपल्यासारख्या सामान्य लोकांना या घटना कळल्या. )

मीटू मुवमेंटच्या नांवाखाली जुने स्कोर सेटल करण्याची लाट मुंबई पर्यंत पोचलेली आहे. आता कोणितरी थर्ड ग्रेड अ‍ॅक्टरने नानावर गँगरेपचा आरोप केला कि हे सर्कल पूर्ण होईल. आपली स्टोरी करॉबरेट करता येण्यासारखी नसुनहि ती छातीठोकपणे सांगण्याचं धाडस कुठुन आणि का येतं हे सूज्ञांस सांगण्याची गरज नाहि. हल्लीच्या एका मुलाखतीतच तनुश्री दत्ता म्हणाली आहे कि यावेळेला मनसे/नाना माझं काहिहि वाकडं करु शकत नाहि कारण मला असा सपोर्ट आहे कि त्यांनी तसा विचारहि मनात आणला तरी ते त्यांना महागात पडेल... Proud

गणेश आचार्य ला काही संघटना त्रास देतायेत म्हणजे त्याचे शुटिंग थांबवणे, जीवे मारण्याची धमकी देणे etc. (त्यातील एकाच नाव अशोक दुबे.)
अस वाचल ह्या सर्व गोष्टिंचा नाना-तनुश्री वादाशी काही संबंध आहे का? कुणाला माहिती आहे का याबद्दल.

आज बाळासाहेब ठाकरेंची फार आठवण येते. मागे रमेश भाटकरांवर एका नवख्या मुलीने बलात्काराचा आरोप केला होता तेव्हा "आमचा रमेश असा नाहीच" या शीर्षकाखाली त्याची बाजू घेणारा संपूर्ण अग्रलेख सामनात छापला होता. त्याची उघडपणे बाजू घेण्याची हिंमत दाखविणारे ते एकमेव राजकीय नेते होते. बाकी, शायनी आहूजा नावाच्या गुणी कलाकाराचं अशाच एका आरोपामुळे करिअर बरबाद झालं होतं याचीही यानिमित्ताने आठवण झाली. मधूर भांडारकर आणि प्रीती जैन हेही असंच एक प्रकरण होतं. मीडिया ट्रायलमुळे सेलिब्रिटी पुरुषांची जी अब्रुनुकसानी होते ती कोण भरून काढणार? नाना जर आता अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असतील तर बरं होईल.

मी-टू ला बरीच वाटचाल आणि ती ही खडतर! इतकंच जाणवलं. अत्याचार झाल्यावर का कोणी पुढे येत नाही? हे ही अधोरेखित झालं. या आरोपात तथ्य आहे नाही याची १००% खात्री कुणालाही नसताना ज्याने तक्रार केली आहे त्याच व्यक्तीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करुन गरळ ओकायची़ हाच काय तो पुरुषार्थ!
ही भावना ही वैश्विक का काय आहे!

या पानावरील craps च्या सर्व प्रतिसदाबरोबर सहमत.

1) नाना ,तनुश्री यातील कोण खरे बोलत आहे हे आपल्यापैकी कोणालाच ठाऊक नाही, त्यामुळे प्रकरणात कॉम्पितंत अथोरिटी ने लक्ष घालावे, आणि प्रकरण निकाली काढावे इतकेच बोलू शकेन.

2) मात्र, "तनुश्री आताच का बोलतेय" या प्रश्नाचा राग येतोय.
कारण हा प्रश्न ऐकताना मला " (कदाचित न )झालेल्या प्रकरणाचा फायदा घेऊन तनुश्री काहीतरी मिळवायचा प्रयत्न करते आहे, असे काहीतरी हे तिला तिच्या अब्रू पेक्षा महत्वाचे वाटते आहे" असे विधान ऐकू येते.
गोष्ट घडलेली असो व नसो, घडलेल्या गोष्टी बद्दल कधी बोलायचे हा निर्णय सर्वस्वी तिचा आहे, जेव्हा बोलण्याइतके धैर्य ती एकवटू शकेल, किंवा बाहेरची परिस्थिती तिला अनुकूल वाटेल तेव्हा ती बोलेल. नाहीतर मंत्र्यांनि केलेल्या बलात्काराचा बद्दल लागोलग पाठपुरावा करून काय मिळते? बापाचा कोठडीत मृत्यू.
त्यामुळे "आत्ताच का?" हा प्रश्न मुळातच गैरलागू आहे.

2) काय केले म्हणजे लैंगिक छळ होतो, याचा सीमारेषा अतिशय पुसट आहेत, आणि त्या व्यक्तिपरत्वे बदलतात.
एक बाईला डोक्यावरचा पदर खांद्यावर घ्यायला सांगणे म्हणजे लैंगिक छळ वाटेल, दुसरीकडे राजकीय सभेला उपस्थित राहणाऱ्या मुली अगदी स्ट्रीप सर्च होऊन सुद्धा काही बोलणार नाहीत.

परत या सीमारेषा एकाच व्यक्ती साठी प्रसंगानुसार बदलू शकतात.
कामाचा भाग म्हणून नग्न रुग्ण पाहणाऱ्या नर्स किंवा डॉक्टर ला कोणी भर रस्त्यात झिप उघडून दाखवली तर तो लैंगिक छळ होतो.
त्यामुळे, तनुश्रीने दुसऱ्या गाण्यात काय केले vs या डान्स प्रॅक्टिस मध्ये नानाने काय केले हा मुद्दा सुद्धा गैरलागू आहे

3) कँसेंट चा मुद्दा वर मांडला आहेच

4) किरण नगरकर, कोळसे पाटील, अलोकनाथ, अकबर, चेतन भगत....ही लिस्ट मोठी होत चालली आहे. ज्या रेट ने लोक नावे घेत आहेत ते पाहता 3 4 दिवसात आपल्या स्वतः च्या वर्तुळातील एखादी मुलगी me too म्हणून पुढे येईल, किंवा आपल्या वर्तुळातील एखाद्या व्यक्तीचे नाव घेईल,
घटना अर्थातच भूतकाळातील असेल, तेव्हा आपण काय स्टॅन्ड घेणार याची मनाशी तयारी करून ठेवा.

5) असा कोणत्याही मुलीने आरोप केला तर पुरुषावर अन्याय नाही का?
हो , आहे, पण हे कालचक्र फिरले आहे, इतकी वर्षे हे बायकांबरोबर होत होते, अमुक लेखिकेने XYZ बरोबर झोपून तमुक पुरस्कार मिळवला वगैरे बाजारगप्पा उठवणे हा लैंगिक छळाचाच भाग नव्हता काय?
पुरुषाबरोबर एकांतात राहु नको, दार लावून एक खोलीत गप्पा मारू नकोस, फोटो पाठवू नकोस हे मुलींना सांगितले जायचे , वर मुलीची अब्रू म्हणजे काचेचे भांडे वगैरे सांगितले जायचे,
या प्रकरणामुळे पुरुषाची अब्रू म्हणजे अगदी काचेचे नाही तर चिनिमातीचे तरी भांडे आहे याची जाणीव लोकांना होतेय,

या संक्रमणाच्या काळात काही पुरुषांचा बळी जाईलही, पण होणार बदल जास्त फायदेशीर ठरेल.

6) "आमचा रमेश असा नाही "सिन्ड्रोम.
एका राजकीय नेत्याने अशी बाजू घेतलेली आपल्याला कौतुकास्पद वाटत असेल तर कथुआ मध्ये या मुलांनी बलात्कार केलाच नाही म्हणत केलेला मोर्चा सुद्धा कोणाला खटकू नये.
स्वतः चा बाप आणि मुलगा याना चारित्र्य प्रमाणपत्र देताना 10 वेळ विचार करावा अशी परिस्थिती आज आहे, त्यामुळे अमूक पुरुष जज/लेखक/तमुक वंशाचा/ढमूक जातीचा/ वयस्कर/इ इ इ आहे म्हणून त्याने काही केले नाही हा सगळ्यात मूर्ख बचाव आहे.

6) पुरुषांनी घ्यायची काळजी,
साधारण प्रत्येक मोठ्या कम्पनी मध्ये याबद्दल ची नियमावली असते, ती बऱ्यापैकी सर्व समावेश असते,
परत एकदा ,कशाला लैंगिक छळ म्हणावे या गाईडलाईन्स अतिशय लूज आहेत,
माझ्या मोबाईल वर पॉर्न पाहताना मी मोबाईल तिला दिसेल असा धरला पासून, मुलगी समोर आली की मी (माझीच) जीभ (माझ्याच) ओठावरून फिरवतो ते तिला सोशल मीडिया वर सतत मेसेज करतो पर्यंत काहीही यात येऊ शकते.
कोणी एक वेगळा धागा काढला तर बरे होईल , या सगळ्या गोष्टी एकेठिकाणी मिळतील.

7) या कॅम्पेन मुळे स्त्रियांच्या एम्प्लॉयमेंट वर परिणाम होईल का? जसा एम्प्लॉयर कडून ML बद्दल विचार केला जातो , तसा या अँगल ने विचार होईल का?

7 साठी हो परिणाम होउ शकतो छोट्या कंपन्यांमधे. कशाला डोक्याला ताप म्हणुन. We don't have any rules for maintaining male / female ratio.

सिम्बॅ(सॉरी मोबाईल मला सिमबा किंवा सिम्बॅ असे दोनच पर्याय ठेवतोय), मुद्दे अतिशय व्यवस्थित मांडले आहेत.
ज्या प्रकारे या घटना जास्त प्रमाणात समोर येत आहेत त्याने चित्रपट सृष्टीत नवे नियम बनतील.थोडी सुरक्षितता येईल.
कॉर्पोरेट लाईफ मध्ये फार काहीही फरक पडणार नाही.तिथल्या लढाया खूप वेगळ्या प्रकारे लढल्या जातात.
मी हे कबुल करते की तनुश्री च्या तक्रारी बद्दल मला अजूनही शंका आहे.पण यात तनुश्री चा एकही पिक्चर पाहिलेला नसणे,तिच्याबद्दल काहीच माहिती नसणे आणि अपॉझिट पार्टी अभिनयातून जास्त ओळखीची असणे हा सॉफ्ट कॉर्नर आणि बायस आहे.व्हरडीक्ट देणारी मी कोणी नाही.सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शी वृत्त घेऊन योग्य तो निर्णय कोर्टाने करावा.

सिम्बा +1
सगळे मुद्दे मस्त मांडले आहेत.
दुर्दैवाने प्रत्येक वेळी तक्रार करणारीकडे पुरावे असतील आणि प्रत्यक्षदर्शी तिच्या बाजूने बोलतीलच याची खात्री नसते.
आजच आलोकनाथबद्दल आले आहे. विनिता नंदाची सगळी पोस्ट अगदी हादरवून टाकणारी आहे.

या संक्रमणाच्या काळात काही पुरुषांचा बळी जाईलही, पण होणार बदल जास्त फायदेशीर ठरेल.

-- वॉव.... हाच तो अमानुष फेमिनिझम.

Pages