नाना तनुश्री वाद

Submitted by कटप्पा on 6 October, 2018 - 15:38

या वादाबद्धल तुमचं मत काय आहे.

कृपया हा धागा चालू घडामोडी मध्ये कसा हलवायचा कोणी तरी सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वादात मनसे कशी ओढली गेली हे तनुश्रीच्याच अर्णब गोस्वामी बरोबरच्या या मुलाखतीत बघा. यात ती म्हणतेय कि कॅमेरामन आणि इतरांनी तिच्या गाडीचं नुकसान केलं. मनसे हि एक आय्डियॉलजी आहे. ती दंगा करणारी माणसं त्यांच्या या वर्तनावरुन मनसेचे कार्यकर्ते असु शकतात, असा काहिसा तर्क तिने लढवलेला आहे. त्यावेळेस अर्णबने जास्त खोलात न जाता बिषय बदलला; का ते तोच जाणे. असो, ती क्लिप २४:१० पासुन पुढे पहा.

असो, या सगळ्या गदारोळात हुमा कुरेशीचं आवाहन/प्रतिक्रिया सेंसीबल आहे. मीटू मोहिम एक प्रभावी अस्त्र आहे/होउ शकेल, पण तिचा गैरवापर या अस्त्राची धार बोथट करत आहे...

वॉव.... मतलब कुच्छ भी? मनसे इज आयडिओलॉजि... सो जगात कुणीही कुठेही हुल्लड बाजी केली तर ती मनसेच्या खात्यावर टाकणार.?

चला! मंडळी लैंगिक छळाच्या आरोपाबद्दल बोलायचं थांबली आणि बाकीच्या गोष्टी भिंगातून तपासताहेत, हे बरं झालं.
थर्ड रेट कमेंट करणारे परतले नाहीत, तरी त्यावर हातभर असंबद्ध स्पष्टीकरण द्यायला दुसरे लोक पुढे सरसावताहेत.

Union Minister for Women and Child Development Maneka Gandhi या बाबतीत बोलताना म्हणतात,

“There must be an investigation. Men in position of power (इकडे पॉवर चा अर्थ केवळ राजकीय सत्ता इतका घेतला जाऊ नये, सिनिओरिटी, वय, कौटुंबिक स्थान अशी कोणतीही पोझिशन जी त्या व्यक्तीला कमांडिंग पोझिशन मध्ये ठेवते.
म्हणजेच A ग्रेड वाली व्यक्ती , c ग्रेड वाल्या व्यक्तीचे शोषण करण्याचे चान्सेस जास्त असतात ) often indulge in such acts,” Maneka told a news channel,

Maneka noted that women in India have so far been scared to speak up against such behaviour. “Now when women have gathered the courage to speak up, the allegations must be taken seriously,” she said
(मी टू च्या बाजूने बोलणारे याहून फार वेगळे बोलत नाहीयेत)

She also reiterated her earlier stand that all sort of allegations of sexual misconduct must be investigated whenever they come to light, no matter how dated they are. “I even wrote to the Law Ministry to scrap the time frame clause in the law as far as sexual harassment allegations are concerned,” said Maneka.
(आत्ताच का? 10 वर्षे झोपा काढत होती का? वगैरे प्रश्न या बाईंना पडत नाहीत ही चांगली गोष्ट आहे)
https://www.nationalheraldindia.com/twitter/metoo-maneka-gandhi-breaks-r...

बाकी मंत्री गुळमुळीत भूमिका घेत असताना, स्ट्रॉंग भूमिका घेऊन बाईंनी गांधी घराण्याचे नाव राखले हो Happy

all sort of allegations of sexual misconduct must be investigated whenever they come to light, no matter how dated they are.

मी पण काहीच वेगळे बोलत नाहीये.

But if incident is too old there are hardly any chance for police to find concrete evidence. This will benefit the criminal especially in rape case where eyewitness or cctv footage is not easily available. Also in Aloknath case it is not easy to prove the rape medically. So only media trial or public shaming is possible.

काही जणांवर अन्याय होऊ नये हे ठीक आहे. पण ती काळजी घेण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होत आहे तो अविरत चालू राहू दे असे म्हणणे आहे का ? मानवी स्वभाव आहे कि काही जण फायदा उचलणार. पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. ख-या केसेस मधे न्याय मिळत नाही हे वास्तव आहे. स्त्रिया खोटारड्या असत्या तर आपण सगळेच जेल मधे असतो. इम्रान हाश्मी वर अजून कुणी आरोप केलेले नाहीत किंवा सनी लिओनीने कुणाबद्दल तक्रार केलेली नाही असा एक विनोद वाचला. पण नेमकं हेच समजून घेत नाहीत लोक. इम्रान हाश्मीने चुंबनदृश्ये दिली ती त्या त्या अभिनेत्रीची सहमती होती म्हणून. त्या अभिनेत्र्यांनी तक्रारी केलेल्या नाहीत. सगळ्या बोल्ड दृश्ये देणा-या अभिनेत्र्या या कॅरेक्टरलेस आणि खोटं बोलतात हे गृहीत धरणा-यांनी हा विचार करावा.

स्त्रीने दिलेलं स्टेटमेण्ट हेच सत्य आहे असे गृहीत धरून न्यायालय निकाल देऊ शकते. पण अर्थातच काही गोष्टी विचारात घेऊन. तनुश्रीच्या केस मधे तिच्यावर जो हल्ला झाला ते भयानक आहे. हल्ला झाल्यानंतर तिने तक्रार दिली. तक्रार न देताही माध्यमांमधे प्रसारीत झालेले फुटेज तपासून पोलिसांनी त्या हल्लेखोरांना अटक का नाही केली हा प्रश्न उपस्थित होतो. अजूनही फूटेज पाहून त्या व्यक्तींना शोधून ताब्यात घ्यावे म्हणजे कुणाच्या सांगण्यावरून आणि का हल्ला झाला हे उघड होईल.

तिने तो पब्लिसिटी स्टंट केला होता तर त्याचा तिला फायदा झालेला नाही. निर्मात्यांच्या संघटनेने तिला बोलावून तिला दोषी धरले होते. तिची बॉलीवूड कारकिर्द समाप्त झाली.

आपली कायदा राबवणारी यंत्रणा आणि न्याययंत्रणा हे एकमेकांवर अवलंबून आहेत. तपासच ढिसाळ झाला तर न्यायव्यवस्थेला दोष देता येणार नाही. तपासयंत्रणा या प्रभावी व्यक्ती, संस्थांच्या प्रभावाखाली काम करतात हे उघड गुपीत आहे. प्रभावी व्यक्ती या स्त्रिया अथवा पुरूष देखील असू शकतात. जिथे व्यक्ती प्रभावी नाहीत तिथे पैसा, लाचलुचपत हे घटक प्रभावी ठरतात. त्यामुळे न्याय मागणे हे शहाणपणाचे ठरत नाही. सोबतीला कुणी उभे राहत नाही. त्यासाठीच तू हो पुढे आम्ही पाठिशी आहोत असा दिलासा अत्यंत आवश्यक आहे.

मात्र हे सर्व प्रकरण पोलिसात गेले पाहीजे. पोलीस निष्पक्ष पणे वागतात ना हे पाहण्यासाठी दबाव निर्माण करणे हे ही आवश्यक असते. तनुश्रीने जे सांगितलेले अनुभव आहेत ते खरेच आहेत असे गृहीत धरण्यात अर्थ नाही. मात्र ऐकायला काय हरकत आहे ? पोलिसांनी तुझ्यावरही केस होईल, यात काही अर्थ नसतो असे सांगितले. तक्रार दाखल करून घेतली. तो एफ आय आर होता कि नाही हे तनुश्रीला समजले नाही या गोष्टी अविश्वासार्ह न वाटण्याचेही कारण दिसत नाही.

जसे मूठभर पुरूषांना वाईट अनुभव आलेत तसेच स्त्रियांनाही अनुभव येतात. जनरलायझेशन कशाला ?
माझ्या ओळखीतल्या एका मुलीसाठी आम्ही सहा महीने पोलीस, कोर्ट असे दरवाजे ठोठावत होतो तेव्हां हे सारे अनुभव घेऊन झालेले आहेत. पुढे मुलीच्या इज्जतीचा पंचनामा नको म्हणून माघार घेतली. ज्यांनी कोर्टाचे, पोलीस चौकीचे तोंडही पाहीलेले नाही त्यांनी तक्रार केली का विचारणे हे मनोरंजन आहे.

When you’re a star they let you do it. You can do anything.” अशा बढाया मारणारी व्यक्ती जगातल्या सर्वाधिक सामर्थ्यशाली जागेवर असताना, तर me too movement ची गरज सर्वाधिक आहे असंच मी म्हणेन.

तनुश्री दत्ताला शिव्या घालणार्‍यांसाठी आणखी एक अँगल. या असल्या प्रकरणांना मुद्दाम हिंदूंच्याच सणाच्या वेळेला हवा दिली जाते.
त्यातून तनुश्रीने ख्रिस्ती धर्म स्वीकारलाय, म्हणजे यामागे ते हे कनेक्शनही असू शकेल. इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी आहे ही.

भरत अगदी बरोबर,
गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर me too याच सुमारास चालू झालेले, तेव्हा काही लोकांनी हे ताशेरे झोडलेले,
या वर्षी ऐन नवरात्रात , स्त्री शक्ती जागृत होताना दिसत आहे.

एखाद्या विशिष्ठ केसबद्दल सर्व लिंका नीट लागत नसतील. तार्किक पातळीवर काही खड्डे जाणवत असतील व त्यातून काही प्रश्न निर्माण होत असतील तर ते प्रश्न विचारणेच चूक आहे असे काहीसे मला पाटेकर-दत्ता प्रकरणामुळे वाटू लागले आहे. मिटू चे अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. अलोक नाथ पासून एम जे अकबर पर्यंत आणि एआयबी च्या कॉमेडीयंस पर्यंत काही लोक फायर सुद्धा झालेत. मागे TVF च्या अरुनभ कुमार ला अशाच आरोपांवरुन सीइओपदावरुन पायउतार व्हावे लागले. मी तर अरुनभचा डायहार्ड फॅन असून सुद्धा त्याने जे केले त्याबद्दल चिडच उत्पन्न झाली आणि त्याच्यासोबत जे झाले ते योग्यच झाले असे मनापासून वाटले. ह्या सर्व प्रकरणांमध्ये आणि द-पा प्रकरणामध्ये जरा फरक दिसत आहे म्हणून इथे ह्या विशिष्ट प्रकर्णाबद्दल प्रश्न उपस्थित करत आहे.

ह्या मीटू च्या लाटेत आता जितकी प्रकरणे येतील त्यांची चर्चा व्हावी, पुरुषांना चांगलीच जरब बसावी, कोणी स्वप्नात सुद्धा आपल्या कलिग, ज्युनियर, सिनियर अथवा घरातल्या कामवाल्या स्त्रीलाही गृहित धरु नये, त्यांच्याबद्दल वाईट विचार करु नये असेच मला वाटते. तसेच मीटू हे ब्लॅकमेलिंग चे एक सोपे, पटकन परिणाम देणारे साधन बनू नये अशीही अपेक्षा गैरवाजवी नव्हे. आजकाल टेक्नॉलॉजिच्या जमान्यात खोटे स्क्रीनशॉट तयार करणे, ते वेगाने सोशलमिडियात पसरवणे, हे फार कठिण नाही. त्यावर सफाई आणि खुलासा, माफि वगैरे येईपर्यंत संबंधित व्यक्तिची करिअर्स, आयुष्यं बरबाद होण्याचे चान्सेस आहेत. याचा अर्थ असाही नाही की गैरवापराच्या भीतीने लेजिटिमेट तक्रारींना खोटेपणाचा रंग दिला जावा. मनेका गांधींनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावेल अशी इन्क्वायरी इन्वेस्टीगेशन व्हायला हवे. आता पुढे त्यात अशी खोच आहे की सर्वसाधारणपणे लैंगिक अत्याचाराचा आरोप सहकारी व्यक्तीवर केल्यावर सध्याच्या प्रोसेसनुसार जे होते त्यात खर्‍या पिडितेला न्याय मिळण्याचेही चान्सेस फारच कमी असू शकतात. मांडवली, पॉवरगेम, इगोक्लॅश ह्या सगळ्यांचा अनुभव या कंपनी आयोजित न्यायदानाच्या प्रोसेसमध्ये येतो हे काही गुपित नाही.

वर काही प्रतिसादांत मनेका गांधी यांचे नाव आले आहे. या महान बाईंनी बाबू जगजीवन राम यांच्या पुत्रासोबत जे काही साधारण पंचेचाळीस वर्षांपूर्वी केले त्यानंतर त्यांना आता या विषयाबाबत बोलण्याचा काहीएक नैतिक अधिकार आहे असे वाटत नाही. त्यांनी आपले मुक्या प्राण्यांच्या विषयात आणि बोनचायनाच्या भांड्यांबाबतच मर्यादित राहावे.

आले ,नैतिक पोलीस आले....
नवीन Submitted by सिम्बा on 11 October, 2018 - 12:24

सिम्बा नैतिक पोलिसगिरी तर मनेकाबाईंनी केली होती आणि तीही एका कुटुंबाला आयुष्यातून उठवून टाकणारी...

मला पुन्हा प्रतिसाद द्यायचा नव्हता. पण लोकांचा गोंधळ जेन्युईन आहे असे आता जाणवले.

१. मी टू मोहीम ही दिसेल त्या पुरूषाला तुरुंगात डांबण्यासाठी अथवा आयुष्यातून उठवण्यासाठी नाही.

२. तनुश्री दत्ता ही सेलेब्रिटी होती. इतर महिलांच्या मानाने सुरक्षित आणि वजनदार असामी होती. पण तिला सुद्धा त्या वेळी फार काही करता आलेलं नाही. अशा महिलांना केवळ वाचा फोडणे आणि कारवाईसाठी बळ देणे हा यामागचा हेतू आहे.

३. निष्पाप पुरूषांवर खासगी आस्थापनांमधे कारवाई झाली असेल तर तो त्या आस्थापनेच्या व्यवस्थापनाचा दोष आहे. संबंधिताने कायदेशीर दाद मागावी. अशा तुरळक उदाहरणांचे दाखले देऊन महिलांनी दाद मागणे अथवा वाचा फोडण्यासाठी समोर येणे हे कसे चुकीचे आहे हे आग्रहाने प्रतिपादन करण्याची तशी आवश्यकता नाही. मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होते ही वस्तुस्थिती आहे. थोड्या समोर यायला लागल्या कि अनेकींचा कायद्यावर विश्वास बसेल आणि त्या कायद्याने कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न तरी करतील. यश येईल न येईल हे अलाहिदा.

४. आरोप केले म्हणजे त्या पुरूषाचा बाजार उठवणे हे जितके चुकीचे आहे तितकेच सार्वजनिक जीवनात एखादा महात्मा किंवा संत आहे म्हणजे बाईच चुकीची असणार असा समज बाळगणे देखील. आपला समाज प्रगल्भ नाही कारण पृष्ठभागावर अनेक गोष्टी येत नाहीत. त्यामुळे समाज कधीही एका मर्यादेच्या पलिकडे ढवळून निघत नाही. वारंवार पाणी ढवळले गेले की ते नितळ होते. समाजाचे असेच आहे. यातून पुढची पिढी नक्कीच शिकेल. संक्रमणाला घाबरून बदल नाहीत होत.

५. हीन लेखली गेलेली कामे करणारी व्यक्ती (स्त्री / पुरूष) हे चुकीचेच असणार असे मानणे देखील चूकच. बोल्ड दृश्ये दिली म्हणजे स्त्री सार्वजनिक मालमत्ता होत नाही कि तिला कुणीही स्पर्श करावा. माणूसच काय जनावराला सुद्धा आपल्या इच्छेविरुद्ध मालकी हक्क गाजवलेला आवडत नाही. या इच्छेचा सन्मान करता येणे ही आपण माणूस म्हणून जगण्याचे पहिले लक्षण आहे.

जगजीवनराम यांच्या मुलाचा दाखला इथे देणे चुकीचे आहे. मनेका गांधी फक्त महिलाच आहेत असे नाही. त्या वेळी त्या पत्रकार होत्या. त्यांच्या जागी कुणीही असते आणि राजकीय नाट्य पाहता नेत्याच्या मुलाची छायाचित्रे हाती लागत असतील तर तो फायदा उचलणारच. जगजीवनराम यांनी घाबरून राजीनामा देण्यापेक्षा मुलाच्या बाजूने कायदेशीर लढा द्यायचा होता. मात्र नैतिकतेच्या त्या काळच्या कल्पनांचे ते स्वतःच बळी ठरल्याने त्यांचा राजकीय बळी गेला. मनेका यांच्या मुलावर सुद्धा आरोप झाले आहेत.

या घटनेचा मनेका गांधी बाई असल्याशी आणि आता त्यांनी काही न बोलण्याशी शून्य संबंध आहे.

{{{ या पत्रकार होत्या. त्यांच्या जागी कुणीही असते आणि राजकीय नाट्य पाहता नेत्याच्या मुलाची छायाचित्रे हाती लागत असतील तर तो फायदा उचलणारच. }}}

तो बलात्कार नव्हता आणि परस्पर संमतीने ठेवलेले शरीरसंबंध होते. तसेच त्या दोघांनी आधीच ठरविल्याप्रमाणे पुढे लग्नही केले. तरीही त्या प्रसंगाची जराही ब्लर न करता सुस्पष्ट नग्न छायाचित्रे छापणे ही अतिशय घाणेरडी मानसिकता होती. यात पत्रकारितेचा भाग शून्य होता. त्याचे समर्थन केले जाऊ नये. ज्येष्ठ पत्रकार खुशवंत सिंहांनीही याबाबत मनेकांना दोषीच मानले होते.

या घटनेचा मनेका गांधी बाई असल्याशी आणि आता त्यांनी काही न बोलण्याशी शून्य संबंध आहे.
नवीन Submitted by किरणुद्दीन on 11 October, 2018 - 12:53

यात मनेका बाई असल्यामुळे नव्हे तर त्यांनी एका संपुर्ण कुटुंबाला निरपराध असुनही आयुष्यात उठविल्याबद्दल त्यांना दोष दिला आहे. ही असली पीत पत्रकारिता त्यांनी केली नसती तर बाबू जगजीवनराम कदाचित पंतप्रधानही झाले असते. एका दलित व्यक्तिला या पदावर येण्यापासून रोखण्याचे आणि दलित समाजाला प्रगतीपासून वंचित ठेवण्याचेही पाप त्यांनी केले आहे. पुन्हा त्यांनी आता कुठल्या निरपराध व्यक्तीची कारकीर्द खराब करु नये म्हणूनच त्यांना याविषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे लिहिले आहे.

ओ बिपीन चन्द्र, आता अती होतंय. बाबू जगजीवनराम दलित होते म्हणून इथपर्यंत गेले. त्यांचा वापर झाला आणि त्यांनी तो होऊ दिला. त्यांच्यात कुठले गुण असतील असे वाटत नाही. त्यांनी कधी दलित समाजाचे प्रश्न संसदेत मांडले असतील तर मला कळवा. मी आपली क्षमा मागेन. नसेल तर मग मनेका बाईंनी दलित समाजाची अशा नेत्यांच्या तावडीतून सुटका केली असेच म्हणा.

महात्मा अँगल झाला, समाज सुधारक अँगल झाला, आता दलित अँगल. तुम्ही नॉर्मल चर्चा करताय की कसलेले राजकारणी आहात हेच समजेनासे झाले आहे.

बीपीनचंद्र,
कोणाला कशावर बोलायचा अधिकार आहे वा नाही हा आत्ता मुद्दाच नाहीये,
मनेका गांधी यांच्या स्ट्रॉंग विधानाला तुम्ही उत्तर देऊ शकत नाही म्हणून त्यांच्या नैतिकते वर तुम्ही घसरत आहात,
जे तनुश्री च्या बाबतीत इतरांनी केले नेमके तेच तुम्ही करत आहात.

भूतकाळातील प्रकरण कितीही जुने असले तरी त्याची चौकशी व्हावी या विधानाचा इतका धसका बसावा ?
की या id मालकाने (id चालवणारा पुरुष आहे असे गृहीत धरून) भूतकाळात केलेली कांड आता कधीही उघडकीस येतील अशी भीती वाटत आहे ?

{{{ ओ बिपीन चन्द्र, आता अती होतंय. बाबू जगजीवनराम दलित होते म्हणून इथपर्यंत गेले. त्यांचा वापर झाला आणि त्यांनी तो होऊ दिला. त्यांच्यात कुठले गुण असतील असे वाटत नाही. }}}

हे काँग्रेस नेत्या सोनियाजींना कळवा जेव्हा त्यांनी जगजीवनरामकन्या मीराकुमार यांना लोकसभेच्या सभापती केल्यावर आम्ही दलित महिलेला सभापती बनविलं असा प्रचार केला तसेच जेव्हा भाजपने राष्ट्रपतीपदाकरिता रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांच्या विरोधात मीराकुमार यांना उभं करुन भाजप दलित महिलेला राष्ट्रपती होऊ देत नाही असा कांगावा केला.

बाकी जगजीवनराम यांच्यात कुठले गुण असतील असं तुम्हाला वाटत नसलं तरी काँग्रेसमध्ये असलेल्या काही मोजक्याच प्रामाणिक व तत्वाधिष्ठित राजकारण्या नेत्यांपैकी ते एक होते. काँग्रेस विरोधक देखील त्यांचा आदर करीत - करतात.

भूतकाळातील प्रकरण कितीही जुने असले तरी त्याची चौकशी व्हावी या विधानाचा इतका धसका बसावा ?
की या id मालकाने (id चालवणारा पुरुष आहे असे गृहीत धरून) भूतकाळात केलेली कांड आता कधीही उघडकीस येतील अशी भीती वाटत आहे ?
Submitted by सिम्बा on 11 October, 2018 - 13:32

माझे वरचे प्रतिसाद न वाचताच हे लिहिलंय तुम्ही. मी वर लिहिलंय की तक्रार अवश्य करावी, चौकशीही व्हावी. दोष सिद्ध झाल्यास न्यायालय तर शिक्षा देइल त्याचा आदर आहेच शिवाय समाजानेही अशा लोकांशी संबंध ठेवू नये पण सिद्धता होइस्तोवर मीडिया ट्रायल / सामाजिक बदनामी चिखलफेक यांना विरोध दर्शविला आहे.

बीपीनचंद्र,
कोणाला कशावर बोलायचा अधिकार आहे वा नाही हा आत्ता मुद्दाच नाहीये,
मनेका गांधी यांच्या स्ट्रॉंग विधानाला तुम्ही उत्तर देऊ शकत नाही म्हणून त्यांच्या नैतिकते वर तुम्ही घसरत आहात,
जे तनुश्री च्या बाबतीत इतरांनी केले नेमके तेच तुम्ही करत आहात.

मनेका यांनी पत्रकार असल्याचा गैरफायदा घेत एका कुटुंबाला समाजात बदनाम केलं हे वाचायचं का टाळताय? इदी अमीनला अहिंसेवर बोलायचा अधिकार असेल का

कोणाला कशावर बोलायचा हक्क आहे कि नाही हा मुद्दा चर्चा भलतीकडे घेउन जाइल...

प्रत्येक आरोपाची व्यवस्थित चौकशी व्हावी. व्हिक्टीमला सपोर्ट मिळावा व आरोपीला गुन्हेगार सिद्ध झाल्यास (आणि आरोप खोटा असल्यास फिर्यादीलाही) योग्य ते शासन व्हावे इतकी साधी मागणी आहे.

कामाच्या ठिकाणी (विशेषतः बिग कॉर्पोरेट) होणार्‍या लैंगिक छळाच्या आरोपांचे इन्वेस्टीगेशन व न्यायदान कसे होते, त्या दरम्यान काय काय होऊ शकते हे अर्जुन रामपाल व चित्रांगदा सिंह अभिनित 'इन्कार' ह्या चित्रपटात चांगले मांडले आहे. चित्रपट असला तरी कथा व दिग्दर्शन चांगले आहे व आरोप असलेल्या व करणार्‍या दोन्ही पार्टीजना कशा मानसिकतेतून जावे लागते तेही नीट मांडले आहे.

#MeToo पुराण :

सत्याला जाग येणं,
अन्यायाविरूद्ध आवाज उठवणं वगैरे स्वागतार्ह आहेच.. पण मला इतके दिवस कळत नव्हतं की, इतकी वर्ष कुठेही न दिसणारी ही तनुश्री दत्ता ताई अचानक गेल्या महीन्यात का जागी झाली बुवा..? ते ही थेट 10 वर्षांनी?
बरं "तेव्हा ती नाना पाटेकरांच्या तुलनेत नगण्य होती नी आता थेट 'ऐश्वर्या राय' लेव्हलला पोहोचल्ये नी म्हणून धैर्य एकवटून बडबडत्ये" तर तसंही काही नै.. अजूनही तनुश्री दत्ता म्हटल्यावर 99%लोकांना डोकं खाजवायलाच लागेल..मग हा प्रकार आहे तरी काय? जे दिसतंय ते तितकं साधं सोप्प आहे का? नी अचानक सगळेच कसे जागे झालेत? बातम्यांमधेही महत्वाचे विषय सोडून ह्याच संबंधीच्या गोष्टी का येताहेत....?
हे असले प्रश्ण तुमच्या पैकी अनेकांना पडले तसेच मलाही पडले....

ऑगस्ट महिन्यात केरळच्या कुठल्यातरी बिशपनं नन'वर बलात्कार केल्याची बातमी आली. बातमी ख्रिश्चन धर्मगुरूबद्दल असल्यानं आधी दाबलीच गेली, पण नंतर त्या पीडीतेच्या बाजूनी उभा राहात सर्वसामान्य मंडळींनी आवाज उठवायला सुरवात केल्यावर मात्र मिडीया क्चरमधल्या पोलीसांसारखं उशीरानं जागं झालं.
बलात्कारी बिशपला क्लीनचीट देणार्या चर्चची यथेच्छ निंदा व्हायला लागली आणि मग, त्या विकृत बिशपला अटक झाल्यावर तर मागे आसाराम, रामरहीम च्या कुबड्यांच्या आधारे मिडीयातल्या दलालांना हाताशी धरत इतरांना झोडपणार्या चर्चचं धाबंच दणाणलं... हे सगळं सुरू होतं, तेव्हाच त्याच दरम्यान देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असे 'शहरी नक्षल्यांना बांबू, रोहीग्यांची हकालपट्टी' वगैरे अनेक निर्णय होत होते...

मग सुरू झालं डॅमेज कंट्रोल....
नन-बलात्कार प्रकरणात नी नंतर आरोपी बिशपला पाठीशी घातल्यानं चर्चचे रोजच्यारोज वाभाडे निघत होते.. कोर्टानं चपराक हाणल्यानं शहरी नक्षली कोमात होते... आणि अचानक एक दिवस इतके वर्ष अमेरिकेत, जवळजवळ अज्ञातवासात असणार्या तनुश्री ताई पुन्हा भारतात उगवल्या... नी नुसत्या उगवल्याच नाहीत तर, एका टीव्ही चॅनल ला मुलाखत देऊन 'नाना पाटेकरांवर' थेट आरोप कर्त्या झाल्या... त्याच दिवशीपासून सुरू झाली #MeToo ची लाट... प्रत्येक चॅनल, वृत्तपत्र हे ह्या आरोपांनी भरून गेलं... नी ती बिच्चारी नन, तो हरामखोर बिशप, त्याला पाठीशी घालणारं चर्च, ते शहरी नक्षलवादी नी त्यांचे समर्थक सगळं एका रात्रीत टीव्ही न्यूज वरून गायब झालं बरं का...!

इतकं की गेल्या दहा-बारा दिवसात एकाही टीव्ही चॅनलवर नी वृत्तपत्रात साधी बातमी नै त्याबद्दल... आहे की नै गम्मत...!

आता ह्या सगळ्या घटनांना तुम्ही योगायोग किंवा 'मी केलेले बिनबुडाचे तर्क' म्हणणार असाल तर जरूर म्हणा...

फक्त त्याआधी एक-दोनच गोष्टी लक्षात घ्या...

1. तनुश्री'ताईंना 2009 ला जो साक्षात्कार झाला तो 'थेट आकाशातल्या बापाच्या पुत्राकडून' तथा 'जीझस'रावांकडून बरं...! नी त्यानंतर तिनं किरीस्ताव धर्म स्वीकारलान नी पुनर्जन्मासाठी अमेरीकेत गेली.. (असं तिनंच म्हटलंय हो.. मी नै..)

2. तनुश्रीताईंनी आरोप केल्या दिवसापासून बातम्यांमधून ती बलात्कारीत नन नी तो बिशप गायब आहेत.. एक शब्दही कुठे कुणी बोललेलं नै...

3. तनुश्रीताईंनी आरोप केल्या दिवसापासून बातम्यांमधून #अर्बननॅक्सल्स गायब आहेत..

बाकीच्या #MeToo कथांबद्दल वा मिडीयामार्फत केलेल्या आरोपांच्या सत्यतेबद्दल मला देणंघेणं नै काहीच... संबंधितांनी कोर्टात जावं नी न्याय मागावा.. पण एकच सांगतो, मुळात हा #MeToo चा कांगावा ज्या तनुश्री दत्ता ताईंच्या तथाकथित धैर्यामुळे सुरू झाला, त्याचीच पार्श्वभुमी इतकी भयंकर शंकास्पद आहे की त्यामुळे अगदी एखादी #MeToo कथा खरी जरी असेल तरी मी तरी जोवर ते प्रकरण न्यायालयीन साक्षीपुराव्यांनीशी सिद्ध होत नाही तोवर त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. आणि मंडळी, एक लक्षात ठेवा... सर्वसामान्यांना भ्रमीत करण्यासाठी नी स्वतःचं खरं करण्यासाठी हे लोक मिडीयाला हाताशी धरून आपल्याला वाट्टेल ते विकू शकतात नी कुठल्याही थराला जाऊ शकतात... नी त्यामुळेच आजचं #MeToo असो वा ते दोनवर्षापुर्वीचं #NotInMyName असो.. आपल्या समोर येणार्या गोष्टी वरवर कितीही सरळ साध्या दिसत असल्या तरी त्या कधीच तशा नसतात.. तेव्हा कृपया करून जरा सारासार विचार करत चला नी कुठल्याही प्रोपोगांडाला बळी पडू नका.

धन्यवाद

घ्या... वाचा आता इथपासून तिथपर्यंत.... सत्य परेशान हो सकता है पराजित नही...

मूळ पोस्ट समीर गायकवाड यांच्या फेसबुकवॉलवरुन...

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर - एक बाजू अशीही ....

आभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर बेफाम आरोप लावल्यानंतर भारतात #मी_टू मोहिमेला खऱ्या अर्थाने जोर आला.
तिने नानावर किती गंभीर आणि दखलपात्र आरोप लावलेत हे एव्हाना सर्वांना ठाऊक झाले आहे.
दशकभर विदेशात राहिलेल्या तनुश्रीने भारतात परतताच एक सनसनाटी आरोपांची मालिका लावली होती याचा आपल्याला आता विसर पडला असेल. आपली ती जुनीच सवय आहे !
यातलाच एक आरोप होता की, 'मनसे'च्या लोकांनी तिच्या गाडीवर हल्ला केला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 'मनसे'ने असे का केले हे सांगताना नानाविरुद्धची तक्रार आणि 'मनसे' यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न तिने केला होता.
सुरुवातीला तिने एक व्हिडीओ देखील या आरोपाच्या समर्थनार्थ पुढे आणला होता जो जाणीवपूर्वक सोशल मिडीयावर व्हायरल केला गेला. 'मनसे के गुंडे' वगैरे टिपिकल टायटल देत हा व्हिडीओ फिरवला गेला.
पण नंतर तनुश्रने 'मनसे'चे नाव देखील तोंडातून काढले नाही. आपल्यापैकी कुणालाच हा प्रश्न पडला नाही की तिने असे का केले असेल. प्रश्न पडणार तरी कसा ? कारण आपल्याकडे रोज इतकं काही घडतं की तासातासाला आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज होतात. असो ..

तर मूळ मुद्द्याकडे वळूया.
२६ मार्च २००८ रोजी तनुश्रीच्या तर्फे तिचे वडील तपनकुमार दत्ता यांनी एक एफआयआर दाखल केला होता जो मराठीत टंकलिखित केला आहे आणि तो त्यांना वाचून दाखवून त्याचा अर्थ समजावून सांगितला गेला. त्यांची तशी त्यावर स्वाक्षरी घेतलेली आहे.

या चार पानी एफआयआरमध्ये पहिले पान एफआयआरच्या तांत्रिक माहितीचे आहे.
पान क्रमांक तीनवरती तनुश्रीवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख असून तो कुणी केला त्या पत्रकारांची आणि छायाचित्रकारांची नावे आहेत. ज्या वृत्तवाहिनीने हे घडवून आणले असा दावा केलाय तिचेही नाव आहे. ज्यांनी काचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि मागील व पुढील बाजूस धक्के दिले, टपावर उड्या मारण्याचा प्रयत्न केला त्यांचे वर्णन आहे. ही माहिती आणि तनुश्रीने भारतात आल्यावर 'मनसे'च्या नावाने शंख करत समोर आणलेला व्हिडीओ यात साम्य आहे. विशेष म्हणजे पूर्ण पान भरून या घटनेचा तपशील आहे मात्र 'मनसे'चा थेट वा अप्रत्यक्ष उल्लेख देखील नाही. मग तनुश्रीने मनसेला मध्ये गोवण्याचे कारण काय होते ? असो ...

आता नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांकडे वळूया.
पान क्रमांक दोनवरती तनुश्रीचे वडील आपल्या जबाबात अगदी स्पष्ट उल्लेख करतात, तो त्यांच्याच शब्दात - .
"ते म्हणतात की मला जमशेदजीचा फोन आला की - 'तुमच्या मुलीचे (तनुश्रीचे) शुटींग बंद झाले आहे. तुम्ही फिल्मीस्तान स्टुडीओ येथे चला...
('हॉर्न (खरं तर पॉर्नच) ओके प्लीज'चे शुटींग जिथे सुरु होते तिथे ते गेले) त्यावेळी तिने सांगितल्यानुसार वर नमूद चित्रपटाचे शुटींग सुरु असताना सुमारे १५.३० वाजता नाना पाटेकर यांचेसोबत माझी मुलगी तनुश्री हिचा एक सीन तिला न आवडल्याने तिने सदरचा सीन करण्यास नकार दिला व सदरचा सीन बदलून टाकावा असे तिने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना सांगितले. त्यावेळी गणेश यांनी सदरचा सीन बदलता येणार नाही असे तिला सांगितले म्हणून माझी मुलगी आणि गणेश यांच्यामध्ये चर्चा चालू होती. त्यामुळे शुटींग बंद झाले होते आणि माझी मुलगी मेकअप व्हॅन मध्ये जाऊन बसली होती. सदरची माहिती माझ्या मुलीने मला सांगितल्यानंतर मी, माझी पत्नी शिखा आणि मुलगी तनुश्री असे वरील फिल्मच्या सीनमध्ये बदल केला जाईल म्हणून आम्ही मेकअप व्हॅनमध्ये बसून राहिलो. त्या नंतर सुमारे १७.३० वाजता नाना पाटेकर सेटवरून निघून जाताना आम्ही पाहिले. त्यावेळी मुलीचे सेक्रेटरी जमशेद अली यांनी दिग्दर्शक श्री. राकेश यांना फोन केला व आम्ही काय करावे असे विचारले असता त्यांनी सांगितले की, 'नाना पाटेकर निघून गेले आहेत व शुटींग बंद झाले आहे, तुम्ही सुद्धा जा."...

या नंतर तिसऱ्या पानावरील मजकुराची लिंक लागते.
येथून तनुश्री आणि तिचे कुटुंब बाहेर पडताना तिथं तिची वाट बघत थांबलेले पापाराझी फोटोग्राफर्स आणि वार्ताहर तिच्या गाडीच्या मागे लागले. या गदारोळात तिच्या वडीलांनी कारच्या आत बसताना ज्या पद्धतीने दार बंद केले आणि काच वर केली त्याच्या परिणामी एका फोटोग्राफरचा किंमती कॅमेरा मोडला गेला. (हे एफआयआर मध्येच नमूद आहे) मग चिडलेले फोटोग्राफर तिच्या मागे लागले. अभिनेत्री तनुश्री दत्ता तेंव्हा बिनधास्त फोटोशूटसाठी खूपच फेमस होती, 'आशिक बनाया आपने' मध्ये तिने काहीच कसर बाकी ठेवली नव्हती !
या घटनेच्या वेळी ती तब्बल तीन तास गाडीत बसून होती. चार तास सेटवरती थांबून नाना निघून गेले हे तिच्या वडीलांच्या जबाबावरून स्पष्ट होते. नाना अभिनेता होता त्याला मानधन होते पण तिचे फोटो घेण्यासाठी दिवसभर ताठकळत बसलेल्या फोटोग्राफर्सना वाटाण्याच्या अक्षता देखील मिळाल्या नाहीत. शिवाय जी वागणूक तिच्या वतीने मिळाली त्यामुळे ते चिडले आणि त्यांनी तिच्या गाडीवर हल्ला केला. (मिडीयाचा हा हल्ला असमर्थनीयच होता आणि तिच्या वतीने पत्रकारांशी झालेलं वर्तनही अशोभनीयच होतं हे ही नमूद करतो)

एक मुद्दा असाही आहे - आता तनुश्री म्हणतेय की तिने नानाविरुद्ध तक्रार केल्याने तिच्यावर हल्ला झाला. पण घटना घडला तो दिवस -२३ मार्च २००८ आणि पोलीस स्टेशनमधील तक्रारीचा दिवस २६ मार्च २००८ यात तीन दिवसाचे अंतर आहे. मग तिच्या वडीलांनी एफआयआर दाखल करण्याआधीच घटनेच्या त्याच दिवशी हल्ला कसा झाला ? ती गाडीत होती आणि नाना दोन तास सेटवर तिची वाट बघत बसून होता असं एफआयआरमध्येच नमूद आहे. तो हल्ला तिच्या कडून झालेल्या वर्तनाविरुद्धची चुकीची प्रतिक्रिया होती हे इथं सिद्ध होतं. पण आता ती जे सांगत्येय की तिने नानाविरुद्ध तक्रार दिली म्हणून तिच्यावर हल्ला झाला. या आरोपावर मात्र इथे प्रश्नचिन्ह लागते !

त्याच बरोबर चार पानी एफआयआरमध्ये सेटवर नानाकडून गैरवर्तन झाल्याने सीन रद्द केल्याचा तीळमात्र उल्लेख नाही उलटपक्षी सीन न आवडल्याने गाडीत जाऊन बसल्याचा उल्लेख आहे. त्या दिवशी फिल्मीस्तानमध्ये असलेल्या सिनेपत्रकारांनी आपल्यावर खटला दाखल करण्याआधी तनुश्रीने हुशारी करत त्यांच्यावर खटला दाखल केला असा तर्कही तेंव्हा लावला गेला होता.

सध्या एक चर्चा अशीही होती की कलर्स वाहिनीच्या 'बिग बॉस' या कार्यक्रमात तनुश्रीची एन्ट्री फिक्स होती पण त्यासाठीचं मार्केट तिला गरम करणं भाग होतं. कारण अनुप जलोटा प्रकरणाचा फायदा होण्याऐवजी टीआरपीला तोटाच जास्त झाला. तनुश्रीने जुने प्रकरण उकरून काढत मार्केट मिळवण्यासाठी आधी 'मनसे'ला घेरण्याचा प्रयत्न केला पण नंतर 'मनसे'ने थेट कलर्सलाच तंबी दिल्याने तिच्या बोलवित्या कलर्स धन्याने तिला आवरते घ्यायला सांगितले असावे. मात्र पुढे जाऊन तिने नाना आणि गणेश आचार्य यांच्यावर आरोप लावले. आता तिने नव्याने एफआयआर दाखल केलाय पण तिच्या वडीलांनी अकरा वर्षांपूर्वी नोंदवलेला एफआयआर हाच तिच्या नव्या एफआयआर विरुद्ध मोठा पुरावा ठरेल.

विशेष बाब म्हणजे एरव्ही तोंडपाटीलकी करत फिरणाऱ्या राखी सावंतनेही तेच मत व्यक्त केलेय जे तनुश्रीच्या वडीलांनी एफआयआरमधे सांगितले आहे. राखी त्याच गाण्याच्या चित्रीकरणासाठी तिथं उपस्थित होती हा मुद्दा इथे महत्वाचा ठरतो. आणि आता तनुश्री त्या घटनेबद्दल जे सांगते आहे त्याच्याशी हे कुठंच जुळत नाही. गणेश आचार्य यांनी देखील हेच प्रतिपादन केलं आहे. दरम्यान मराठी चित्रपट सृष्टीने या घटनेवर धारण केलेलं मौन नक्कीच खेदजनक आहे.
असो...
यात रीतसर चौकशी व्हावी. जे दोषी असतील त्यांना सजा व्हावी.

मात्र आज मुंबई काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी 'नानाला बेड्या ठोका' असा शंखनाद करत ओशिवरा पोलीस स्टेशनबाहेर जे आततायी आंदोलन केलं त्याची कीव आली. त्यातल्या किती बायकांना हा पूर्वेतिहास ठाऊक होता हा औत्सुक्याचा भाग असेल. उगाच वाहत्या पब्लिसिटीच्या गंगेत हात धुवून आपणही महिलांचे त्राते आहोत असं भासवण्यासाठी असला गाढवपणा करण्याची कुणाला काही गरज नाही. माहिती घेऊनच काय ते बोलावे...

ही पोस्ट नाना निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी लिहिली नसून हे प्रकरण वाटते तितके साधे सोपे सरळ नसून त्यात बरीच लपवाछपवी आहे हे लोकांना कळावे हा उद्देश आहे. नाना दोषी की निर्दोष हे न्यायालयच ठरवेल आणि तो निर्णय मलाही मान्यच असेल यात शंका नाही...
नाना भला माणूस आहे त्याची छबी इतकी सहजासहजी खराब होऊ नये असे मनापासून वाटते. याही उपर तो अपराधी सिद्ध झाला तर त्याला नक्कीच सजा व्हावी पण त्या आधीच कुणी मिडिया ट्रायल्स घेऊ नये वा जज'मेंटल' होऊ नये...

- समीर गायकवाड.

https://www.facebook.com/sameerbapu1/posts/1861554973897898

Pages