खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.

Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनेक पुरस्कार प्राप्त ह्या जोडगोळीच्या ह्या चित्रपटाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या कॅटेगरीबाबत आश्चर्य व्यक्त केले होते.

चार अक्षरी

- - /- - / - -
नाटक. स्वीडिश नाटकाचे मराठी रुपांतर. गेल्या २ वर्षांतील

By the way
संयोजकांचा पहिला क्लू चुकला आहे.
चित्रपटाचे नाव 'बनवाबनवी' नसून 'अशी ही बनवाबनवी' आहे.

By the way
संयोजकांचा पहिला क्लू चुकला आहे.
चित्रपटाचे नाव 'बनवाबनवी' नसून 'अशी ही बनवाबनवी' आहे.
>>>

नको रे असा कठोर होऊस Proud

उत्तर करेक्ट आहे असे समजून पुढचा क्ल्यू देतो

या चित्रपटाची नायिका जी एक डॉक्टर असते ती अचानक पूर्वायुष्यात घेतलेल्या एका निर्णयामुळे डिप्रेशनमध्ये जाते
पण कालंतराने नवऱ्याच्या मदतीने त्यातून बाहेर पडते

_ _ _ _

Pages