खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.

Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

- - / - ग - - - (२+५ ) चित्रपट
विषय : लग्नाविना सहजीवन

बिंगो

एका उभरत्या अभिनेत्याने दिग्दर्शित केलेले आणि ज्यात होऊ घातलेला ऑलमोस्ट 'सुपरस्टार' अभिनय करतो असे प्रायोगिक नाटक

-ली ---- व-

आहे का कोणी?
उत्तर सांगून टाकू का अजून क्लू हवाय

दोघांचीही नावे इंग्रजी ए पासून सुरु होतात
त्यांच्या नाटक कंपनीच्या दशकपुर्ती निमित्त आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवा अंतर्गत ह्याचे प्रयोग नुकतेच झाले होते.

बरोबर सस्मित

दिग्दर्शक - आलोक राजवाडे
अभिनेता - अमेय वाघ

त्याशिवाय ह्या नाटकात सिद्धार्थ मेनन ही आहे
लेखक धर्मकिर्ती सुमंत

बिंगो

- - / - हू / -
नाटक व चित्रपटाचेही नाव

Pages