मजेशीर कोट्या चॅलेंज

Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:44

मजेशीर कोट्या चॅलेंज
एखाद्या सिनेमातला, नाटकातला संवाद असो किंवा कथा कादंबरी मधलं एखादं वाक्य आपण सतत कोट्या करण्यासाठी वापरतो. थोडक्यात काय तर आपलं आयुष्य हे कोट्यांनी व्यापलेलं आहे. पावला पावला ला आपण दाखले देण्यासाठी एखादी कोटी वापरतोच. बऱ्याचदा आपण उत्साहात केलेल्या ह्या कोट्या मजेदार असतात. कधी कधी कोटी कोटी प्रयत्न करूनही कोटी साधत नाही, तर कधी कधी सहज बोलताना तोंडातून उच्चकोटीची कोटी बाहेर पडते. अश्याच मजेदार, विनोदी, मार्मिक कोट्या करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज खेळ आहे.
नियम
१) संयोजक एक शब्द देतील.
२) त्या शब्दावरून फालतू कोटी करायची आहे.
३) जो सगळ्यांत आधी कोटी लिहील तो पुढचा क्लू देणार.
उदा. माउस
माउस माऊ स घाबरतो
पहिला शब्द - रेडिओ

Group content visibility: 
Use group defaults

तिचे कुठेतरी प्रकरण सूरु आहे असा त्याला संशय आला, आणि तो विचित्र वागू लागला. हे काय प्रकरण आहे तिला कळेना. दोघांनीही या प्रकरणाचा छडा लावायचा असे ठरवले आणि त्यातून भलतेच प्रकरण सुरू झाले. हे सर्व आपल्या कादंबरीच्या कुठल्या प्रकरणात मांडावे यावर तो विचार करू लागला.

तिचे कुठेतरी प्रकरण सूरु आहे असा त्याला संशय आला, आणि तो विचित्र वागू लागला. हे काय प्रकरण आहे तिला कळेना. दोघांनीही या प्रकरणाचा छडा लावायचा असे ठरवले आणि त्यातून भलतेच प्रकरण सुरू झाले. हे सर्व आपल्या कादंबरीच्या कुठल्या प्रकरणात मांडावे यावर तो विचार करू लागला.
>>>>
यात कोटी कुठे आहे, नुसता शब्द वापर आहे. काहीतरी चुकते आहे का?

शाळेतून इकडे बघायला आले इथे काय प्रकरण सुरू आहे तर इथले सगळे कुठल्या न कुठल्या प्रकरणात बिझी आहेत वाटतं

"मी केळीचे शिकरण खाऊन राहील जॉन,
पण या कर्निकेचे प्रकरण सोडविल्याशिवाय राहणार नाही" --- इति शेरलॉक...

अकारण प्रकरण करण्यावरुन रण माजवायचे सोडुन
राधिका गुरवाला शरण गेली याचे कारण कोणत्या प्रकरणात कळेल.

अंगद ने अंगावरचा अंगरखा काढून भिरकावला आणि अंगणातल्या विहिरीत डुबक्या मारून झाल्यावर उघड्याबंब अंगाने अंगणात येत विजयी मुद्रेने अंगठा दाखवला Lol

अंगारकीचा अंगारा अंगोल्याच्या अंगठीसारख्या अंगकाठीच्या अँग्लोइंडिअन अंगठेबहाद्दराने अंगाईगीतातल्या अंगुलीनिर्देशातून अंगीकारला.

अंगणात अंगतपंगत करायाची तर असे अंग काय काढून घ्यायचे? अंगावर आले की शिंगावर घ्यायचा अंगभूत गुण हवा!

सगळेच जोरात. कोटीचं अंग अंगभूतच आहे हो सर्वांना.... म्हणूनच कोटीकोटीने कोट्या चालल्यात. अगदी अंग मोडेपर्यंत कोट्या वाचल्या. आता आजचा कोटा संपला म्हणून बास.

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१८ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

Pages