मजेशीर कोट्या चॅलेंज

Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:44

मजेशीर कोट्या चॅलेंज
एखाद्या सिनेमातला, नाटकातला संवाद असो किंवा कथा कादंबरी मधलं एखादं वाक्य आपण सतत कोट्या करण्यासाठी वापरतो. थोडक्यात काय तर आपलं आयुष्य हे कोट्यांनी व्यापलेलं आहे. पावला पावला ला आपण दाखले देण्यासाठी एखादी कोटी वापरतोच. बऱ्याचदा आपण उत्साहात केलेल्या ह्या कोट्या मजेदार असतात. कधी कधी कोटी कोटी प्रयत्न करूनही कोटी साधत नाही, तर कधी कधी सहज बोलताना तोंडातून उच्चकोटीची कोटी बाहेर पडते. अश्याच मजेदार, विनोदी, मार्मिक कोट्या करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज खेळ आहे.
नियम
१) संयोजक एक शब्द देतील.
२) त्या शब्दावरून फालतू कोटी करायची आहे.
३) जो सगळ्यांत आधी कोटी लिहील तो पुढचा क्लू देणार.
उदा. माउस
माउस माऊ स घाबरतो
पहिला शब्द - रेडिओ

Group content visibility: 
Use group defaults

त्याला समज आहे असे समजून समज दिली नाही तेव्हा समजले की त्याला समज नाहीये, तर मग त्याला समज देऊनही समजेल का की हा आपल्याला समज देतोय आपण समजवून घ्यावे म्हणुन?

"स ला ते स ला ना ते" या प्रत्ययांतील स मज समजत नाही असे समजून सरांनी स मजला समजावला तेव्हा स मजला समजला.

जुई, जमत नाही पण समजतय ना? मग तेच खुप झालं असं समजा. काय समजले? Lol >> Rofl समजायला समजायचा प्रयत्न केला पण समजूनही न समजल्यासारखं वाटलं, पण काय करायचं, शेवटी स्वतःलाच समजवून खरोखर समजलं असल्याचा समज दिला! Proud

तुचि एक गणेशु
कोटी कोटी प्रकाशु
बाप्पाचे चरित्र, असेचि पवित्र, पामरा नीट समजावे
अंधार दाटता प्रकाशमार्गे आपणही त्यासम जावे

समज या शब्दाचा एकच अर्थ पुन्हा पुन्हा वापरला तर ती कोटी होते का ?>>> कोटी करण्याला काही नियम नाहीत भाषेत. पण एकच अर्थ पुन्हा पु्न्हा वापरला तर होणरी कोटी फारशी मजेदार होत नाही. ओढून ताणून केलेला विनोद वाटतो. पण कधी कधी त्या शब्दाने लय साधली तर वाक्य वाचायला मस्त वाटते. आता द्या तुम्हीच एखादा सुरेख शब्द समजुन उमजून.

समज समज कर समज को समजो
समज समजना भी एक समज है
समज समज कर भी जो न समजे
मेरी समज में वो नासमज है

शब्द वरून काय बरं....

त्याने शब्द शब्द जोडून महत्प्रयासाने शब्द उच्चारत आपल्या नव्या बाईकसाठी रागीट अण्णांकडे शब्द टाकून पाहिला, पण आज अण्णा खूश असल्याने त्यांनी त्याला बाईक घेऊन देण्याचा शब्द दिला.

शब्दाने शब्द वाढत गेला शेवटी तिला शब्द च सुचेना. ... त्याने हलकेच तिला मिठीत घेतले.... शब्दावाचून कळले सारे..

वाह मंजूताई!
उपक्रम आवडला! भा, मानव कोटीच्या कोटी उड्डाणे सुरेख Happy

Pages