मजेशीर कोट्या चॅलेंज

Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:44

मजेशीर कोट्या चॅलेंज
एखाद्या सिनेमातला, नाटकातला संवाद असो किंवा कथा कादंबरी मधलं एखादं वाक्य आपण सतत कोट्या करण्यासाठी वापरतो. थोडक्यात काय तर आपलं आयुष्य हे कोट्यांनी व्यापलेलं आहे. पावला पावला ला आपण दाखले देण्यासाठी एखादी कोटी वापरतोच. बऱ्याचदा आपण उत्साहात केलेल्या ह्या कोट्या मजेदार असतात. कधी कधी कोटी कोटी प्रयत्न करूनही कोटी साधत नाही, तर कधी कधी सहज बोलताना तोंडातून उच्चकोटीची कोटी बाहेर पडते. अश्याच मजेदार, विनोदी, मार्मिक कोट्या करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज खेळ आहे.
नियम
१) संयोजक एक शब्द देतील.
२) त्या शब्दावरून फालतू कोटी करायची आहे.
३) जो सगळ्यांत आधी कोटी लिहील तो पुढचा क्लू देणार.
उदा. माउस
माउस माऊ स घाबरतो
पहिला शब्द - रेडिओ

Group content visibility: 
Use group defaults

"असलात तुम्ही कितीही तालेवार, तरी येता रविवार तुम्हाला घातवार आहे, लक्षात असू द्या! तलवार जवळ असू द्या. वार लावून जेवतो म्हणून मला कमी समजू नका. अन्यथा वार चुकवता येणार नाही!" उद्वेगाच्या भरात घसरलेली स्वतःची सुरवार सांभाळत वारकरीबोवा जमीनदारांना म्हणाले.

लिहिण्याच्या ओघात चुकून 'जमीनवार' लिहिणार होतो. Proud

वा हिम्सकूल!

हा उपक्रम आणि इतरही ग्रुपचे सभासद नसल्याने सहजी नजरेस पडले नाहीत. त्यामुळे गणेशोत्सव ग्रुपचा प्रसार करा वाहत्या पानांवर. Happy

भाचा +११
वा रं गड्या ! एकदम बैजवार माहिती गावली !

येताजाता बाभळीचे काटे टोचायचे त्यामुळे मी बाभळीचाच काटा काढला आणि तिला वखारीच्या काट्यावर चढवले. लाकडाच्या वखारवाल्यानेही वजनात काटा मारलाच हा भाग वेगळा. आता तो वखारवाला माझ्या डोळ्यात काट्यासारखा सलायला लागलाय. त्याचाही काटा काढावाच लागेल एकदा.

"चांडाळा! असा वार करून का वार कापलीस?" एक वार अंतरावर बसलेली नऊवारी साडी नेसलेली सुईण कळवळली.

ह्यातले सर्व अर्थ आता वापरात नसावेत, पण मला सगळं बरोबर तरी वाटतंय ...

त्याला समज देऊनही जर काही समजत नसेल तर आपण काय समजायचं? असते एखाद्याची समज कमी असं जरी समजलं आपल्याला तरी समोरच्याला कसे समजावं की त्याची समजच कमी आहे? आता मला समजेना की त्याला कसं समजाऊन सांगू?

"हे पा, सम जं आली तं गाण्यातली समज येते!"

"अहो, हो, सम मज आली, तरच सम्मज आली! ह्याः ह्याः ह्याः द्या टाळी!"

आपण कोटीबहाद्दर असल्याच्या गैरसमजात जेव्हा त्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या, तेव्हा कॉलेजातून परतणाऱ्या 'स'कडे पाहून "'स' मज मिळावी" असा विचार करणार्‍या शाळकरी गण्याला वेगळीच समज येत होती.

Proud

Pages