स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे - २

Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59

मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..

आता इथे वाजू देत भांड्याला भांडी Wink

पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार, मला पुण्यात छोटी आटा चक्की घ्यायची आहे व सिंगापूर ला न्यायची आहे. आजकाल काऊंटर टाॅप मिळताता अस कळलय कोणाला माहीती आहे का? शिवाय फिडबॅक पण पळेल. प्लीज सांगा

पनिर बनवण्यासाठी चांगले क्युब्स बनवायचे असतिल तर तुम्ही ते कसे बांधुन ठेवता?
हे भांड कोणी वापरल आहे का?
https://www.amazon.com/Gourmet-Tofu-Press-Marinating-Dish/dp/B002QO5LY8/...

एअर फ्रायर कुठला घ्यावा? गुगलवर सर्च केले असता, विविध कंपन्या आणि मॉडेल्स साडेतीन हजार ते चौदाहजार अशी किंमत दिसली.

आ.रा.रा. आपण कुठले एअर फ्रायर वापरता?

कास्ट आयर्न
मला कास्ट आयर्नचा skillet (पॅन ) आणि/किंवा braadpan (casserole झाकणासहित असलेले भांडे ) घ्यायची इच्छा आहे . त्याबद्दल भरपूर वाचल्यानंतर ठरविक काळानंतर त्यातून फारसे आयर्न मिळत नाही अशी माहिती मिळते आहे. भाज्यांच्या चवीत, नॉनव्हेज च्या चवीत आणि textureमध्ये किती आणि काय फरक पडतो. जे खूप वर्षांपासून वापरत आहे ते त्याचा किती नियमित वापर करतात ते आणि फायदे सांगू शकाल का? खूप टेम्प्ट होतं आहे पण आहे त्या चांगल्याच भांड्यात उगीचच वाढ होऊन पैसे अक्कलखाती जाऊ नयेत असे वाटतं आहे. मी फारसं नॉन-veg बनवत नाही, रोजच्या भाज्या , डाळ तडका, ऑम्लेट इद्यादीसाठी वापरायचा विचार आहेत.
कृपया माहिती असेल तर सांगा.

Majhyakade aslele cast iron skillet khup jad (heavy) aahe aani nivval tya karnasathi vaprle jat nahiye. Paise akkalkhati jama Sad

अमेरिकेत असाल तर लॉज, भारतात असाल तर लोखंडी कढई घ्या. मस्त आहेत दोन्ही. लोखंडी कढईतुन लोह नक्कीच जास्त मिळेल. योकुंचे फोटु बघून मी पण कढई घेतली. लॉज पण आहे. लॉज च्या तव्यावर डोसे मस्त होतात.

Lowes?

राजसी, आता आहेच तर वापर ना ग
थँक्स योकु, coating नसेल तर लोह जास्त मिळेल असं मलाही वाटतंय.
आभा, ओके मी बघते थँक्स
मेधा, लिंक्स वाचेन घेण्याआधी नक्कीच
सगळ्यांचे आभार

@मानव - माझे फिलिप्सचे airfryer आहे, उत्तम आहे, आठवड्यातून एकदा वापरले जाते. चिकन, बाकरवडी, पफ पेस्ट्री, ग्रिल veggies , साबुदाणा वडा, बाटी बनवणे आणि फ्रोझन मधील सगळ्या गोष्टी bake करणे (सामोसे सारख्या ) इत्यादींसाठी वापरले जाते.

लॉज चा कास्ट आय्र्नचा पॅन वापरत आहे. भेंडी वगैरे खरपुस छान होते. भाज्या पास्त्यात वगैरे घालायला त्यावर ग्रील करून घेते. जड असला तरी धुवायला उलट कमी त्रासाचे वाटते कारण काहीही चिकटत नाही. नुस्ते गरम पाण्यानी थोडस प्लॅस्टीक ब्रश ने स्क्रब केल कि काम भागते. आठवड्यातून कमीतकमी ३ / ४ वेळा तरी वापरते.
तवा पण आहे त्यावर डोसे सुरेख होतात. नॉन स्टीक पेक्षा खरपुस होतात. चिकटत नाहीत. चपातीसाठी मात्र वापरत नाही. कारण एकदा गरम झाला तवा कि थंड व्हायला वेळ लागतो त्यामुळ बरेचदा चपाती करपते. पण तेही जमवता येईल गॅस कमी जास्त करून.

एवढ सगळ लिहून परत हेही लिहिन कि जागा भरपूर असेल तरच घ्या. कारण ही भांडी खुप जड असल्याने व्यवस्थित स्टोरेजला जागा पाहिजे. ड्रॉवर वगैरे मध्ये ठेवणार असाल तर थोड अवघड होईल. ड्रॉवर खराब होवू शकतो.

कुणी कालचट्टी (सोप-स्टोन) ची भांडी वापरता का? इथे कुठे मिळू शकतील?
(घेतल्यावर तेल-हळदीनं माखणे, उकळत्या पाण्यात ठेवणे इ. वगैरे २१ दिवसांची सिजनिंग प्रोसेस असते असं युट्यूब वर कळालं. एकदम इंटरेस्टिंग प्रकार वाटतोय.)

योकू हो इथे बर्‍याच साऊथ इंडिअयन मैत्रिणी वापरतात. मी कुठेतरी लिहिलेली सिझनिंग प्रोसेस त्यांना विचारून. लिंक आठवत नाहीये.
जनरली सांबार, वडे इत्यादीच्या फोडणीसाठी आणि उकळायला वापरतात. अ‍ॅमेझॉन इंडिया वर आहेत.

मानव , फिलिप्सने एअर फ्रायर इन्व्हेंट केला असे म्हणतात. फिलिप्सचे एअर फ्रायर महाग आहेत पण सुपर्ब! टोटली रेकमंड करीन.

लॉजची लिंक बघते आता.
योकु, पुण्यात मंडईजवळ नेमकी कुठे मिळतात लोखंडी भांडी? दुकानाचं नाव सांगू शकाल का?

तुळशीबागेतून बहुतेक मी घेतली होती लोखंडी कढई, अंधारात बोळ होता आणि खूप भांडी होती असे आठवतंय, खूप वर्ष झाली. तुम्ही चिकपेटला,गांधी बझार भागात जात असाल तर इथे पण मिळेल.

सीमा च्या प्रतिसादाला 100% अनुमोदन. तुळशीबागेत मंदिराच्या आजुबाजुला दुकाने आहेत तिथे लोखंडी तवे न कढया नक्की मिळतील. मी तिथून भाकरीचा लोखंडी तवा आणला होता. छान निघाला. बिडाचा पण घेतला होता पण तो फार आवडला नाही. लोखंडी कढई आणि काळी मातीची कढई इथे सिंगापुरात घेतली. मस्त निघाली आहे.

कालचट्टी ची भांडी वापरली नाहीत पण खूप जड वाटत आहेत. उचलायची कशी? रच्याकने, कोरिअन बीबीम्पा (भाताचा प्रकार) पण बहुतेक अश्याच भांड्यात करतात. कोणाला माहिती आहे का?

मला माझी स्टील ची 2 बर्नर वाली शेगडी exchange मध्ये देऊन 3 बर्नर वॉल ग्लास टॉप गॅस घ्यायचा आहे. कुठल्या कंपनीचा चांगला आहे?

ज्योती आणि फेबर
छोटे ब्रँड पण ग्लासटॉप विकतात पण त्यांचे टॉप थोडी चूक झाली की लगेच तडकतात.

वावे, तुळशी बागेत राममंदिराच्या भोवतीच्या दुकानांमध्ये मिळतात. मंडई च्या पुढे भांड्यांची दुकाने आहेत तिथे पण मिळतात. पण मी मध्ये पोळ्यांसाठी जो लोखंडी तवा घेतला त्यावर पोळ्या छान भाजल्या जात नाहीयेत. माहित नाही का ते?

ओके, तुळशीबागेत फेरी‌ मारते आता पुण्यात गेल्यावर.
राजसी, चिकपेटेत एकदा गेलो होतो. चुकून एका अरुंद गल्लीत शिरलो आणि गाडी परत बाहेर काढायला बरेच कष्ट पडले Wink तेव्हापासून परत गेलो नाही. हरकत नाही जायला खरं तर.
ग्लास टॉपवाली शेगडी माझी प्रेस्टिजची आहे. चांगली आहे.

Pages