स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे - २

Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59

मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..

आता इथे वाजू देत भांड्याला भांडी Wink

पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Fb वर the indus valley ची ad सतत येत आहे. मला बीडाची भांडी वापरायची आहेत. इथे ती preseasoned मिळतायत. कुणी घेतलेयत का या ब्रँडची भांडी? मुळात iron cast म्हणजे नक्की बीडाचीच भांडी का?

माझे नॉनस्टिक कढई , पैन, मला बदलायचे आहेत, जुने झाल्याने.. iron cast दुकानात दिसते म्हणून माहिती आहे..बीडाची कोणती असतात?
कुठली भांडी घ्यावी?

बीडा ची भांडी म्हणजेच कास्ट आयर्न. मी गेल्यावर्षी अमेझॉन वरून रॉक तवा या कंपनीचे एक स्किलेट आणि एक डोसा तवा घेतला. दोन्ही preseasoned होते. अन् तरी घरी तेल लावून 2-3 वेळा तापवून परत seasoning केलं. आता मस्त झालीत दोन्ही भांडी वापरून.
कास्ट iron चा एकच प्रॉब्लेम म्हणजे भांडी खूप जड असतात. शिवाय कामवाली साठी न ठेवता स्वतःच काम झाले की विडळून, कोरडी करून, गरज पडल्यास तेलाचा हात फिरवून ठेवावी लागतात. नाहीतर खराब होतात. स्किलेट गरम असताना एका हाताने उचलून त्यातून भाजी दुसऱ्या भांड्यात काढता येत नाही खूप जड असल्याने.

फेसबुक वर एक कोल्हापूरची तरुण मुलगी आहे प्रिया पाटील म्हणून. तिने कास्ट आयर्न manufacturing सुरू के्यापासून आहे. 4-5 प्रकारची भांडी आहेत तिच्याकडे. ही भांडी पण pre seasoned आहेत.
मदुराई ला सिकंदर स्टोअर म्हणून एक दुकान आहे. त्यांच्याकडे खूप वेगवेगळी भांडी आहेत कास्ट iron ची. ऑनलाइन पण विकतात ते.

मी गेले ३ वर्ष कास्ट आयर्नचा तवा वापरते .. डोसे, थालिपीठ, घावणे, टोमॅटो ॲामलेट आणि पॅनकेक्स सारखे पदार्थ बनवल्यावर मी तवा धूत नाही.. फक्त कधी कादा भाजला किंवा शॅलो फ्राइंगचं काम केलं तर टिश्यू पेपरने किंवा ओल्याकपड्याने पुसून घेते आणि सुकऊन तेल लाऊन ठेवते.. महिन्यातून एकदाच डिश वॅाशिंग लिक्विडने धूते

मी आताच Indus valley वरून कढई मागवली आहे preseasoned.. कशी ओळखायची seasoned आहे की नाही ? सीझन कशी करावी?

तवा मी पण नेहेमी धूत नाही. स्किलेट मात्र धुवावे लागते. हळदीची आणि मसाल्याची फोडणी असेल तर एकदा पाणी उकळून घेते त्यात आणि मग कोमट पाण्याने अगदी किंचित लिक्वीड सोप वापरून धुवून घेते.
कमी मसाल्याचे नुसतेच काही शॅलो फ्राय केलं असेल तर टिश्यू ने किंवा कपड्याने पुसून घेतलं तरी चालते.

Indus valley ची भांडी सिझन केलेली असतात. सोबत वापरायच्या सूचना पण असतील. त्यांच्या साईट वर पण ही भांडी कशी वापरायची याच्या सूचना आहेत.

माझ्यामते preseasoned भांड्यांना एक चकाकी असते.. मी युट्यूबवरचे व्हिडिओज बघून वरचेवर माझा तवा seasone करते.

कोणी मिनि ब्लेंडर वापरला आहे का? नेटवर मला पोर्टेबल, यु एस बी वाले दिसतात. ब्लेंडर - ज्युसर.
माझा मिक्सर व्यवस्थित आहे. पण थोड्या प्रमाणातलं ( २०० मिलि) द्रवरूप खाणं ब्लेंड करायचं असतं. मिक्सरचा ब्लेंडर भलामोठा आहे. त्याला चिकटून बरंच वाया जातं.

मी कास्ट आयर्न चा प्रिसिजन तवा घेतला आहे. पण तेल लावल्यानंतर दिव्याला जसं चिकटपणा येतो तसा चिकटपणा आलेला आहे.
इथे काय चुकले आहे?

जास्त तेल लावलेत....तवा स्वच्छ घासून एखादं बोट लावलं तरी चालतं... हा तुम्ही म्हटले तो सेम प्रॉब्लेम माझा ही व्हायचा... पण मग एक दिवस मला माझ्या ममी ने ही युक्ती सांगितली

कुणाकडे सूपमेकर आहे का? कसा अनुभव आहे? मला सूप खूप आवडतात, पण एकटाच राहत असल्याने कंटाळा येतो किंवा ऑनलाइन ऑर्डर केल्या जातात. अगदी आतापर्यंत मला सूपमेकर बद्दल मला अजिबात माहिती नव्हती, पण नुकतेच एका मराठी नटीची यूट्यूबवर मुलाखत ऐकून कळले. तेव्हापासून मलाही विकत घ्यायची ईच्छा आहे.

कुणाकडे सूपमेकर आहे का? <<>>> वंडरशेफचा आहे. चांगला आहे फक्त त्यात जास्त क्वांटीटीमध्ये सूप होते. अगदी १ लि घेतला तरी. एकदा करुन २/३ दिवस प्यायची तयारी असेल तर ठिक आहे. बाकी शिजवा, गाळा, उकळा हा त्रास नाहीये. स्मूथ, चंकी हवे तसे सूप तयार होते. मँगो शेक सारखे शेक्स करता येतात. साफ करायला सोपा आहे. आम्ही थंडीत भरपूर वापरला.

वंडरशेफ चा Nutri-blend कुणी वापरला आहे का? तुमचा अनुभव कसा आहे? मला स्मूदी, जूस, मसाले, चटणी साठी हवा आहे.
जर चांगला नसेल तर दुसरा कोणता चांगला ब्लेंडर आहे?

मी क्रोमाचा पर्सनल ब्लेंडर घेतला. चांगला आहे. मला ब्लेंडिंगसाठीच हवा होता आणि मला हवा होता तसाच आहे.
ड्राय ग्राइंडिंग मिक्सरपेक्षा चांगलं करतो. प्रमाण कमी आणि जार लहान असल्यामुळे असेल.
वंडरशेफ न्युट्री ब्लेंडसारखाच दिसतोय. मला त्यापेक्षा बराच स्वस्तात मिळाला.

आधी दोनशे रुपयांचा एक चायनीज ब्लेंडर घेतला होता. त्याची बॅटरी चार्ज करायला लागायची. ती मेली.

थँक्स भरत, nutri‑blend ला सध्या सिम्पल घेऊन चांगला वाटला तर फूड प्रोसेसर attachment घेता येईल असा विचार आहे , ऍमेझॉन ला चांगले review नाही आहेत म्हणून कुणी वापरला असेल nutri‑blend तर माहिती हवी आहे. nutri‑blend सध्या २४४३ ला मिळतो आहे.

राईस कुकरवर चर्चा कुठल्या धाग्यात आहे?
त्यात वरणभात वेगवेगळं (नेहमीच्या कुकरसारखं) करता येतं का? किती वेळ लागतो?

डाळी, रवा, शेंगदाणे, कडधान्ये इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी माझ्याकडे गेली बरीच वर्षे सेलो कंपनीचे प्लॅस्टिकचे, झाकणाला लॉक असणारे, चांगले डबे आहेत. पण ते आता जुने झाले त्यामुळे बदलावेसे वाटताहेत. पण सेलोचे तसे डबे आता दुकानात किंवा ऑनलाईन दिसत नाहीयेत. झाकणाला लॉक असणारे चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकचे डबे खूप शोधूनही त्यात फारशी व्हरायटी दिसली नाही. काचेच्या बरण्या एवढ्या संख्येने घ्याव्या असं वाटत नाही कारण त्या वजनदार असतात, शिवाय फुटण्याची धास्ती. स्टीलच्या डब्यांची झाकणं घट्ट असतील की नाही याची शंका वाटते. शिवाय ते गोल असतात. चौकोनी असले तर डबे ठेवायला बरे पडतात.नवीन डबे घ्यायला तर हवे आहेत, पण कुठले घ्यावे?

@ धनश्री >>> माफ करा, मी जरा उशिरा प्रतिसाद देतोय. तुम्ही सुचवल्याप्रमाणे वंडरशेफचा सूपमेकर बघितला, आवडलाही. पण त्याची क्षमता (Carrying capacity) मला एकट्याला फार मोठी होत असल्याने विकत घेण्याचे धाडस झाले नाही. दुर्दैवाने त्यात कमी क्षमतेचा येत नाही.

@दिप्ती, झाकण लॉक होणारे डबे हवेत. सेलोचे तसे डबे आता दिसत नाहीयेत. दुसऱ्या एखाद्या चांगल्या कंपनीचेही चालतील.

धन्यवाद भरत. लॉक & लॉकचा एक चार कप्प्यांचा डबा आहे माझ्याकडे हे आत्ता आठवलं. बरीच व्हरायटी दिसते आहे. बघते. Happy

भारतातुन 2 नॉनस्टिक पॅन्स / कढ़या आणायच्या आहेत. सध्या कोणते ब्रँड चांगले आहेत? त्यातल्या त्यात सेफ ऑप्शन सुचवा प्लिज. मला स्वतःला वजनाने जड भांडी आवडतात. घरी कास्ट आयर्न किंवा स्टील आहे त्यामुळे सध्या ते नको आहे. पण घरी 1/2 नॉन स्टिक भांडी लागतातच म्हणून हवी आहेत. ऍमेझॉनवरून मागवणार आहे. प्लिज नावे द्या.

हॉकिन्स चे नॉनस्टिक्स नो नॉन्सेन्स बेस्ट बाय असतात. यांचे सेट्स घेतल्यास ऑफर मिळून चांगलं डील पडू शकतं.

Pages