स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे - २

Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59

मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..

आता इथे वाजू देत भांड्याला भांडी Wink

पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला लोखंडी भांडी पुण्यात कुठे मिळतील?
दोन लोखंडी कढया बर्‍यापैकी दणदणीत हव्यात (जरा मोठी ५/६ लोकांची सुकी भाजी मावेल इतपत आणि एक त्याहून जरा लहान २/४ लोकांची भाजी बसेल अशी) + एक तवा (हँडल असलेला) घ्यायचा आहे.

योकु , हे चालेल का?
https://www.amazon.in/Dutch-Oven-1-5-Quart-Red/dp/B00TWXR4SW/ref=lp_1380...

किंवा लॉज ची थोडी स्वस्त आहेत.
मी हल्ली ती वापरत आहे. इथे कंपनी वेगळी आहे. मी भारतात सिमिलर प्रोडक्ट शोधायला गेल्यावर वरची लिंक मिळाली.
पण मला फार छान वाटली ती भांडी.

योकू, लोखंडी कढया मंडईच्या पुढे लोखंड-पितळ्याची दुकानं आहेत तिथेही चांगल्या मिळतात. मी नुकत्याच तिथून दोन कढया घेतल्या.

आणि मंडईच्या समोर पार्किंग लॉट आहे तिथे बाहेर रस्त्यावर लोखंडी तवे - हँडलवाले मिळतात. तिथून मी एक लोखंडी कढईही घेतलीय हँडलवाली. ती केवळ सही आहे वापरायला.

धन्यवाद लोक्स!
मी आज नेहेमीप्रमाणे भाजी आणायला लोहगांव मार्केट मध्ये गेलो होतो. तिथे मिळाल्या मला कढया आणि तवाही.
कुणी या भागात असाल तर हा रवीवार बाजार बर्यापैकी असतो.

मंडईच्या समोर पार्किंग लॉट आहे तिथे बाहेर रस्त्यावर लोखंडी तवे - हँडलवाले मिळतात>> मी ही तिथुनच घेतली आहे. मस्त आहे.
माझ्या असं लक्शात आलं आहे की लोखंडी कढईत कमी तेलात न चिकटता पोहे किंवा साबुदाणा खिचडी होते. (तुलना Aluminium कढईशी आहे, non-stick शी नाही) फक्त करुन झाले की लगेच दुसर्या भांड्यात काढावे लागते.

इथे कुणी एअर फ्रायर वापरतं का? अनुभव कसा आहे?>>
आमच्याकडे आहे , सुरुवातीला २,३ महिने वापरला पण आता माळ्यावर ठेवला आहे !

आमच्याकडे आहे , सुरुवातीला २,३ महिने वापरला पण आता माळ्यावर ठेवला आहे !>>> ओह! म्हणजे काही फार उपयोगी वस्तू नाही का? काय काय तळून पाहिलंत ?

मी वापरते पण फक्त फ्रोझन fries आणि तत्सम readymade frozen प्रकारांसाठी. खूप तेल वाचते आणि चव छान लागते. इतर रेसिपीज फक्त बघितल्या आहेत youtube वर. स्वतः केल्या नाहीत. मला 50% deal वर philips चा मिळाला दोनेक वर्षे आधी. 2 -3 महिन्यातून एकदा जरी ते फ्रोझन प्रकार खाल्ले जातात. बाकी पुऱ्या, वडे माझ्या हातून फार होत नाही त्यामुळे त्याचा प्लान केला तर कुटुंब मला त्याच्यासाठी एअर fryer वापरू देत नाही. अजून तरी अक्कलखाती पैसे असे वाटलेलं नाही.

काय काय तळून पाहिलंत ?>>
फिश,ब्रेड चा पिझ्झा , पोटॅटो फ्राईज, पाणीपुरीच्या पुऱ्या [रेडिमेड पाकीट आणले होते ] करून पाहिले .
चिकन, पनीर टिक्का पण चांगले होतात . पण उगाच जागा अडवतो आणि हे पदार्थ हल्ली केले जात नाही . त्यात त्याची जाळी साफ करण्यापेक्षा पॅन ,ओव्हन वापरणे सोपे वाटते .

ओके राजसी आणि स्वराली. मी frozen fries कधी आणत नाही. जेव्हा पुर्या, शंकरपाळे, ब. वडे, कांदा भजी असे प्रकार करते, तेव्हा उरलेल्या तेलाकडे बघून प्रत्येक वेळी मनात येतं की air fryer ने हे टाळता येईल का? Happy
शंकरपाळे बेक करून पाहिले, फार काही आवडले नाहीत.
पण म्हणजे भजी/वडे होत नाहीत का चांगले याच्यात?

भजी, वडे पीठ सरसरीत असतं त्यामुळे अवघड आहे. कांदा भजी (घट्ट पिठाची) दडस होतील. कूकिंग ट्रे फार काही मोठा नसतो. त्यामुळे साधारण चार - पॅटिस आकाराच्या गोष्टी एका वेळेस होतात. तेल नसल्यामुळे बेसिक cooking time किमान दहा मिनिटे आहे. चारजणांचे जरी वडे- भजी करायचे म्हंटले तरी 2 अडीच तास सहज मोडतील.
टिक्का, पॅटिस, कबाब अश्या सेमी-कूकिंग साठी ठीक आहे पण भजी, वडे अश्या कच्चे ते शिजलेले साठी तितके उपयोगी नाही. माफिन बेकिंग, मिनी पिझ्झा (रेडिमेड बेस वापरून) साठी चांगले पडेल.

चकली मेकर आणि अप्पम पात्र घ्यायचे आहे. कोणत्या कंपनीचे चांगले असतात? अॉनलाइन घ्यावा की दुकानातून घेणे चांगले?

Dukan

स्टँड मिक्सर घ्यायचं होतय. किचनएड मध्ये एवढे पैसे घालावे की नाही कळेना.
मुख्य उपयोग विविध कणका भिजवणे. फूप्रो इतके वर्ष इमाने इतबारे वापरला पण त्यात पराठे इ कणिक होत नाही छान. माझ्या फू प्रो ला चिरण्याचंच ब्लेड आहे ज्यात मी कणिक भिजवते.
तर जरा अनुभव सांगा प्लीज. ब्लॅ फ्रा सेल तर गेला आता पोस्ट ख्रि काही मिळतय का बघेन.

मुख्य उपयोग विविध कणका भिजवणे. >> फक्त इतकाच वापर करणार असाल तर स्टँड मिक्सर नका घेऊ. जर कुकीज, केक वगैरे गोष्टी पण करणार असाल तर नक्की घ्या. मस्त असतो स्टँड मिक्सर. माझ्याकडे किचनएडचाच आहे. कुकीज वगैरेचे मिश्रणाचे काम अगदी आरामात होते. कणीक भिजवून नाही पाहिली पण कधी त्यात Lol

हे आणि https://www.maayboli.com/node/12777
हे पण https://www.maayboli.com/node/35310 वाचून पहा.

मी कणीक कधी मळून पाहिली नाही. पण पिझ्झा , ब्रेड, पास्ता, कूकीज, याकरता मस्त आहे. ओट्यावर मांडून ठेवण्या इतकी जागा ( आणि आवड ) नसेल तर ४.५ किंवा ५ क्वार्ट साइझ पुरे. त्याहून मोठा असला तर खाली वर करताना फार त्रास !

आजकाल इतरही ब्रँडचे आकर्षक आकार आणि रंगाचे स्टॅंड मिक्सर आले आहेत. ऑन्लाइन रिव्ह्यू पण चांगलेच वाटतात. किचन एड महाग ब्रँड आहे .

चिवा माझ्याकडे किचनएड तर नाहीये. ऑस्टर ब्रँडचा वॉलमार्ट मधून घेतलेला स्टँड मिक्सर आहे. पण मला त्यात भिजवलेली कणीक चांगली वाटते. तिंबली जाते मस्त. आता २-३ वर्ष झाली घेऊन. खूप सवय झाली आहे. हा बिघडला तर कदाचित किचनएड घेईन आता किमती उतरल्या आहेत त्याच्या बर्यापैकी. बाकी ऑस्टर बरोबरचे कोणतेच अटॅचमेंट्स नाही वापरले. मी म्हणेन कणीक मळण्यासाठी स्टँड मिक्सर बेस्ट...जास्त कटकट नाही धुवायची. मोठे भांडे आणि 'एस' शेप हुक एवढे डिशवॉशर मधे टाकायचे काम संपले. काही चिकटत नाही. एकदा पाणी, तेलाचा अंदाज आला की.

साधारण हा स्टँड मिक्सर आहे माझ्याकडे, पण जार आणि ज्यूसर नाही.
कणिक मळायलाच मुख्य वापरते. खूप सोपं काम आहे. मस्त मळली जाते त्यामुळे लगेच चपात्या करता येतात.
वर अ‍ॅटॅचमेंट लावून स्लाईसर, ग्रेटर लावता येतात.
केक २-३ दाच केला, तोपण मस्त झाला.

http://www.foodmixitup.co.uk/product/review-of-the-bosch-mum46a1-food-mi...

मस्त आहे हा धागा

किचनएड आहे माझ्या कडे आणि रोज कणिक मळायला वापरते. मी पण गेली १० वर्ष फुप्रो वापरत होते पण आता माझे मत किचनएड ला.

Pages