स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे - २

Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59

मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..

आता इथे वाजू देत भांड्याला भांडी Wink

पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकपेटला बसनी जाऊन चालत shopping करायची ओ ताई Happy मग येताना मिळाली तर ओला/उबर नाहीतर मग रिक्षावाला म्हणेल तेवढे पैसे द्यायचे आणि घरी या! फक्त कढईच घेतलीत तर बस नी पण परत येता येईल Happy

अरे हे लोखंडी कढया, तवे इ प्रकार आठवडी बाजारात नक्की मिळतात. पुण्यात तुमच्या भागात आठवडी बाजारात विचारा किंवा घरी कामवाल्या असतात त्या जनरली लोकल असल्याने त्यांना हे माहीत असतं.
राहिली मंडईची बाब, तर आपल्या राहात्या जागेवरून एवढं लांब जाणे आणि या वस्तू आणणे हे जरा कटकटीचं होऊ शकेल तरीही चवीसाठी म्हणून करायलाच हवं Wink तर मंडईसमोर जे पार्किंग आहे त्या लेन मध्ये जरा फिरून पाहा. तसंही आपले ते हे सुप्रसिद्ध लेखक म्हणले आहेत ना - तुळशी बाग पुणे आणि रानडे रोड, दादर याठिकाणी स ग ळ्या चीजा मिळतात...!

Pages