निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिता श्रीपाद गुलाबाची पाने उलटसुलट करून पहाल का?माझ्यामते एखादी अळी असावी.तिचे काम असावे हे >>
नाही . मी पहिलाय चोर Happy ..तो एक छोटा भुंगा किंवा भुंग्यासारखा कीडा आहे..
एकदम नजाकतीने पाने कातरतो आणि पानाचा तुकडा आपल्या पायात धरुन उडुन जातो...
खरतर त्याला तसं पानं कातरताना बघणं भारी वाटतं..आज मी त्याचा फोटो काढायचा प्रयत्न केला पण नाही जमलं...बघते परत प्रयत्न करुन उद्या .

माझ्या प्रश्णाचं उत्तर मलाच सापडलं Happy

https://laidbackgardener.blog/tag/what-to-do-with-leaf-cutter-bees/

हिच नी लीफ कटर माशी ...
इथे लिहिल्याप्रमाणे ती झाडाला काही अपाय करत नाहिये...तिचं घरट बनवतेय Happy
चला छान आहे..माझ्या झाडाचा तिला फायदा होउदेत Happy

जागू, निरु, कृष्णा, भुत्याभाउ, मनिमाऊ, काय फोटो आहेत एकेक. अफलातून. निग वर निसर्ग फुललाय . Happy
जागू, मी तो शेवाळी गुलाब म्हणत होते ना? तो मनिमाऊने दिलाय बघ फोटो. पांढरी, गुलाबी फुले आहेत तो फोटो. Happy

अरे खरंच की!
२ महिन्यांपूर्वी साळुंक्या, लिंबाची पाने अशाच तोडून काढताना पाहिले होते.प्रथम वाटले की मातीत किंवा झाडावर अळ्या असतील्,म्हणून साळुंक्याजमत आहेत.पण एके दिवशी तिच्या तोंडात पाने पाहिली.घरट्यासाठी असावीत म्हणून गप्प राहिले.त्याची आठवण झाली.

स्मिता श्रीपाद - मला नाही वाटत भुंगा पाने खाली ... जरा सगळ्या पानाखालती बघा नक्कीच आळी असेल ... माझ्या कडे झाले होते असेल चेक केला तेव्हा मोठी हिरवी आळी सापडली ...

माझया बहाव्याची पानेही अशी गोल कातरुन नेली जाताहेत. कौतुक वाटते त्या कीटकाचे, जो अशी वर्तुळे बरोब्बर काढतो.

कुंडीतल्या मिरचीची पाने मऊ पडायला लागली.म्हणजे पाने एकदम पाणचट होऊन मान टाकायला लागली.कदाचित पावसाची झड जास्त येत असेल म्हणून तसे झाले असेल असं वाटलं.वरची पाने कापली.३-४ दिवस बाहेरगावावरून आल्यावर बघितले तर अजून पाने खराब झाली होती.जरा रोपाचे निरीक्षण केले ,पाने वरखाली केली तर अकस्मात १ व्ही आकारात सुमारे ३- इंचाची अळी दिसली.मजा म्हणजे मिरचीच्या पानाच्या देठाइतकीच पातळ आणि तशाच रंगाची होती.त्यामुळे अळी वाटलीच नाही.पण ती काढल्यावर रोप तरारले.आज एक फूल उमलले आहे.

सुप्रभात आज खुप दिवसांनी आले.
सध्या रानफुले खुप फुलू लागली आहेत. कवळा, भेंडी, रानतिळ, जंगली घोसाळी जागोजागी फुललेली दिसतायत. खुप छान वाटत हे निसर्गाचे रंग डोळ्यात साठवताना.

आपोआप उगवलेल्या पावट्याला शेंगा धरू लागल्या आहेत.

गच्चीत शिराळ्याचा वेल सोडला होता त्याला एक शिराळ धरल आहे.

कोरांटी फुलू लागली आहे.

सुंदर...
माझ्याकडे जागा, माती अन कुंड्या या तिन्हीच्या एकत्रित तुटवड्यामुळे इतर कुंड्यात उगवलेल्या चारपाच जांभळाच्या रोपट्यांच, जोडीला एक चिंच, एक सिताफळ, १ दिड डझन टमाट्याच्या रोपट्यांच काय करावं हा गहन प्रश्न पडलाय मला.. कुणाला द्यायची सोय नाही अन जवळपास कुठं रुजवायची सुद्धा सोय नाही कारण सद्ध्या तितका वेळ हाताशी नाही.
एखाद्या जांभळाला बोन्साय करुन वाढवायच्या विचारात आहे पण इतर दोघा तिघांच काय हा यक्षप्रश्न मी आत्ता लिहिता लिहिता सोडवला बहूतेक. ताईकडे लावते हि सारी झाडं. बस तिथल्या आजुबाजुच्या लोकांना यांची मुळं भिंत तोडणार नाही सहजासहजी हे पटवून देणं जरा जिकरीच काम आहे. बघु होईल काहीतरी सोय.

मागे आणलेल्या कॅलेंचोईच्या पिल्लांच, शांकली कडल्या आयरिसच पन रिपॉटींग करावं लागेल.
ढिगभर काम पण वेळ अन वस्तु नसल्यातच जमा आहे.. Sad

चांगला इंडियन समर आहे आमच्या इथे अजून ( निदान कॅलेंडरवर तरी , तापमान ७८ च्या आतच घुटमळतंय ). इतक्यात कशाला ते बर्फाचे फोटो ? तीन चार महिन्यात हेच बघावं आणि भोगावं लागणार आहे Happy

@ मेधा - तुमची मानसिक तयारी करून घेतोय. असो.... हा फोटो मागच्या वर्षातील आहे ... इकडे अजून तापमान ८० आहे अजून १०-१५ दिवस तरी काळजी नसावी... मग सुरु होईल कि गारे वारे Happy Happy

नमस्कार निगकर्स. बर्‍याच दिवसांनी धाग्यावर आले.

गुलाबाला चांगला बहर आहे सध्या.

प्राजक्ताची मुक्त हस्ते उधळण चालू आहे.
१)

२)

३)

पाऊस कमी झाला तरी रेन लिलिचा वर्षाव चालू आहे.

कोरांती बहराला आलीसुद्धा की हो.

हे जंगली कृ. कमळ जंगली असल तरी लावण्याच्या बाबतीत बागायती कृ. कमळावर बाजी मारत हे फुल.

सायलीच्या सुगंधची लयलूट चालू झाली आहे.

आतापर्यंतच्या गुलाबात हा सगळ्यात माझा लाडका गुलाब.

जागु ग जागु..किती ग तु नशीब्वान आहेस...माझं जळकुट झालय इथे तुझी बाग बघुन Happy
( दिवे घे ग प्लीज )

नवीन घरात शिफ्ट झाले तेव्हा एक गोष्ट ठरवली होती ती म्हणजे बाकी काही फर्निचर, ईंटीरीअर याव नी त्याव नाही केलं तरी चालेल पण टेरेस मद्धे एक छोटासा कोपरा बागेचा करायचा, त्याच्या शेजारी काहीतरी छोटीशी छान बैठक करायची आणि रोजचा सकाळचा चहा तिथेच घ्यायचा..
शिफ्टींगची गडबड संपली तशी बागेच्या मागे लागले...काय काय झाडं लावु ? काहीच माहिती नव्हतं..बागेत उन्ह कितपत येतं की नाही याचा पण अंदाज येइना...घर पूर्व पश्चिम असलं तरी बाग उत्तर दक्षिण त्यामुळे फारसं उन्ह येतच नाही...दुपारचं ४ चं उन्ह एका कोपर्यात तासभर येतं..हा पण उजेड भरपूर...मग काही नर्सरीतुन न काही कुठुन कुठुन गोळा करुन झाडं लावायला सुरु केली...१ देशी गुलाब, १ जास्वंद लावली.रेन लिली लावली,ऑफिस मधुन मनिप्लांट तोडुन आणला न तो पण लावला..मामीच्या घरुन गवती चहा आणुन लावला, थोडा कढिपत्ता पण लावला, कोणीतरी गिफ्ट म्हणून दिलेली चमेली घरात आली...अजुन एक शोभेच्या पानांचं झाड जुनचं होतं..हळुहळू माझी बाग बहरायला लागली...पण मला बरेच दिवसांपासुन गोकर्ण हवा होता आणी तो कुठे मिळेना,खुप जणांना विचारुन झालं की तुमच्याकडे आहे का ? काहींकडे शेंगा धरल्या नव्हत्या. काहींकडे शेंगा होत्या पण त्या वाळल्या नव्हत्या..मग तो विषय मागेच पडला.. मग एक दिवस अचानक आई कुठेतरी भजनाला गेलेली तेव्हा येताना ३-४ शेंगा घेउन आली. पांढरी गोकर्ण आहे की निळी असं विचारल्यावर म्हणाली दोन्ही वेल एक्मेकांत मिसळले होते गं त्यामुळे नक्की माहित नाही.म्हटलं बर असुदेत उमलली की कळेलच...

२ कुंड्या मोकळ्या होत्या त्यात बिया टाकल्या.रुजतील की नाही, फुटतील की नाही ही धाकधुक...२-३ दिवसांनी त्यांना एकदम नाजुन हिरवे कोंब फुटले..ते ईतके नाजुक आणि सुंदर होते की मी त्या २ दिवसात १०-२० वेळा टेरेस मद्धे डोकावुन आले...दोन्ही कुंड्यांमद्धे गोकर्णं झपाट्याने वाढायला लागला होता..जवळ जवळ १ ते १.५ फुट झाला वेल..नाजुन कोवळी गोलसर पाने..बघायला मस्त वाटायची..डोळ्यांना एकदम गारवा..आता याला कळी न फूल कधी येणार...मग बरेच दिवस गेले वेल भरपूर दाट झाला...त्याच सुमारास माझ्या बागेत त्या लीफ कटर कीड्यांनी मुक्त संचार चालवला होता...गुलाबाची पानं खाउन मग त्यांनी गोकर्णावर मोर्चा नेला होता...आधीच इइतका नाजुन वेल न त्याची कोवळी नाजुक पानं ते किडे कातरुन घेउन जायचे..आता कुठली येतात फुलं न बिलं :-(...मग फुलाचं मी विसरुनच गेले...

रविवारी सकाळी नेहेमीप्रमाणे चहा घेउन टेरेस मद्धे गेले आणि गोकर्णाला पाणी घालायला गेले तर एक छोटुसं, नाजुन, पांढरं आणि थोडी पिवळी झाक असलेलं गोकर्णाचं फुल माझीच वाट बघत बसलं होतं...डोळ्यात पाणीच आलं माझ्या एकदम...सृजनाचा आनंद किती मोठा असतो ना Happy

हेच ते माझं पहिलं फुल..
IMG_20180922_093905.jpgIMG_20180922_093822.jpg

ईतकुस फूल न पोस्ट फारच मोठी झाली...भावना समजुन घ्या लोकहो Happy

थँक्यु जागू...

स्मिता, कसलं सुरेख वर्णिलायस आनंद तुझा.. वाचता वाचता मीच आता काय होईल कसं होईल विचार करायला लागली. मी इतकी रोमँटीक आहे कि मला वाटल आईला जसं माहिती नव्हतं कि पांढरा आहे कि निळा तो तर त्या कॉम्बिनेशनचं फुलं उगवत कि काय Lol Biggrin .. सो ऑप्टिमिस्टिक हय ना.. छानच वाटलं.

माझ्या रुमवरचा वेल मेला गोकर्णाचा.. कुंडी पुरली नसावी त्याला पाय पसरायला म्हणुन तसं झालं असावं असा अंदाज माझा. वाढं खुंटली तर काधून टाकल मग मी. त्याच्या दोन चार शेंगा मात्र ठेवल्या होत्या जपून त्या आता नव्या दोन कुंडीत दुसर्‍या झाडाच्या संगतीत उगवल्याय.. बघू आता.. हातभर लांब झालेयत वेल.

स्मिता किती मनातून लिहिलयस ते जाणवल. खुपच छान. मलाही काही फुले पाहीली की भरून येत. आपण इतके ह्या फुलांशी एकरुप होउन जात की आपल त्यांच्याशी भावनीक नात निर्माण झालय.'
टिना एक बालदी घे आणि लाव त्यात सरळ.

ह्याचा हळदी/ऑरेंज असा वेगळाच रंग मनाला स्पर्शुन जातो.

आज जणू कोरांटीच्या झाडाने स्वतःलाच कदंबा करून सजवल आहे.

सतत सायुची आठवण करुन देणारी ही फुले.

कर्दळीचा लाडका अबोली रंग.

लावण्य ह्याहुन अजून वेगळ काय असेल?

गुरुवारच स्वागत करायला आज तिन पिवळे गुलाब फुलले. त्यातील हे एक गोंडस.

सगळ्या सवंगड्यांमध्ये उठून तर दिसायलाच हवे म्हणून छोटे असलो तरी आमचा लाल भडक रंग आकर्षित करतो.

मस्तच ग जागु
मी एकदा तुझ्या बागेला भेट देणारे..

हे आजचे माझ्याकडचे बटन गुलाब..
IMG_20180906_080533.jpg

हा फोटो माझ्या ८ वर्षाच्या लेकीने काढला आहे.. आजकाल ती उठली की बागेत नवीन फुले आलीत का बघते न फोटो सेशन करत बसते Happy

वा स्मिता मस्त. लेकीला शाबासकी दे. खुप छान फोटो काढला आहे. माझ्याकडे तुझ स्वागत आहे.

Pages