निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोकळ साहेब आहात कुठे? तुमची नेहमी आठवण काढतो आम्ही. मध्यंतरी राजू भटसाहेब संदर्भात एकाशी बोलणे झाले तेव्हाही तुमची आठवण निघालेली.

फोन करा प्लिज, नाहीतर तुमचा नंबर द्या.

माझ्या घरची रातराणी

IMG_20181110_230559_1.JPG

सुगंधी अभ्यंगस्नान
रातराणीची फुले रात्रीची उमलतात. सुगंधी स्नानासाठी रात्री एक टब पाण्यात 15-20 फूलांचे गुच्छे टाकायचे आणि टब शयनकक्षात ठेवावा,पंख्याच्या हवेने टबमधील पाणी थंड होऊन रातराणीचा सुगंध आणखीन दरवळू लागेल.
सकाळी या सुगंधित पाण्याने स्नान करायचे.
दिवसभर ताजेपणा जाणवत राहील.

Drosera indica  ( Flycatcher )   गवती दवबिंदू

Flycatcher is an insectivorous plant  native to India.
The tips of the tentacles are formed by sparkling dots of sticky liquid. That probably earns it the common name Sundew. The sticky liquid helps trap insects.
Webp.net-resizeimage_1.jpg

विजयजी तुमचे नव्याने स्वागत. तब्बेत कशी आहे? तुमच्या शेतावरचे फोटो दाखवा इथे.

जिल्ल्हा म्हणजे काय लिहायचे होते तुम्हाला?

सायु माझ्याकडेही तेरडा छान फुलतोय. मला यो रॉक्सने बी दिल होत. आता झाडावर येईल ते बी जपून ठेवेन. सगळे लाल रंगाचेच आहेत.
१)

२)

३)

४)

मनिम्याऊ काय सुंदर रातराणी फुलली आहे. आणि ते पाण्यात ठेवणही आवडल सुगंधासाठी.

त्या कोंबड्याच्या फुलाचीमाझी आठवण म्हणजे लहानपणी रंग रंग खेळताना मद्रासी कलर म्हटल की आम्ही ह्या फुलाला हात धरायला जायचो.

सर्व फ़ोटो सुंदर!
जागू, तेरडा मस्तच. मला भेटशील तेव्हा बी दे. Happy

Pages