निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचे पाहुणे..
1
IMG-20180820-WA0018.jpg

2
IMG-20180820-WA0020.jpg

3
IMG-20180820-WA0023.jpg

आणि ही फुले वापरून सहजच केलेली ताटाभोवती महिरप
IMG-20180819-WA0009.jpg

आमच्या बागेतले अननस...

IMG-20180329-WA0039.jpg

आणि हा त्याचा क्लोजअप

IMG-20180329-WA0038.jpg

गंमत म्हणजे उन्हाळ्यात जागोजागी रस्त्यावर अननसाचा रस किंवा कापं कापून देणारे गाडीवाले असतात त्यांच्या कडून १०/१२ शेंडे घेउन (त्यांचा कचरा) ते बागेत लावले होते त्याची ही फळं...

सगळे फोटो अप्रतिम.

निरुदा मी पण असाच अननस लावला आहे गाडीवरून आणून छान जगला आहे.

मनिम्याउ महिरप मस्तच.

स्मिता गुलाब सुरेखच.
जागुताई ‘ब्लिडिंग हार्ट‘ नावाप्रमाणेच दिसतय चक्क. सुंदर कसं म्हणू? Happy
4123C74E-1BB2-4A4C-AD64-F3C5B61FB7F3.jpeg

कुंभारगाव, सुर्यास्त...
पाण्यात सांडलेले केशर आणि दूर उजव्या कोपर्यात : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात..

IMG-20180427-WA0080.jpg

आणि हे मावळत्या सूर्यबिंबावरुन उडणारे अग्निपंख...

IMG-20180505-WA0065.jpg

फारच मस्त फोटो सगळे. ते ३ गुलाब बघून तर अगदीच मस्त वाटलं. ह्या धाग्यावर नवीन प्रतिसाद आहेत असं दिसलं की आता काय बघायला मिळणार याची उत्सुकता लागते Happy

निरु, फोटो अवर्णनिय! निव्वळ अप्रतिम!

ह्या धाग्यावर नवीन प्रतिसाद आहेत असं दिसलं की आता काय बघायला मिळणार याची उत्सुकता लागते>>> अगदी अगदी. आणि विशेष म्हणजे अपेक्षापुर्ती होतेही.

मस्स्तच आहेत सगळे फोटो त्रिदेव अननस महिरप सुरेखच
कृष्णा हे तिळाचं फुल आहे का ?(पण खरं याच्या डबल आहेत पाकळ्या तिळाच्या सिंगल च असतात ना ?)
गोकर्ण आणि सोनचाफा पण मस्त !
निरुदा, कमलपत्राचा फोटो सुंदर!पाण्यात सांडलेले केशर पण मस्तच
शालीदा सुंदर फोटो

२ दिवस इकडे फिरकले नाही तर काय एकेक पोष्टी पडल्यात सुंदर सुंदर आणि जबरदस्त!.. किती बघू आणि किती नेत्रसुख घेऊ असं झालंय

बुलबुलांसाठी लावलेल्या घरच्या कुंडीतील मलबेरी..

IMG-20180818-WA0019.jpg

आणि हा त्यांचा घोस...

IMG-20180818-WA0017.jpg

ज्या बुलबुलांच्या बालसंगोपना वर मायबोलीवर लेख लिहिलाय त्या आमच्या बुलबुल जोडीची आंघोळ...

https://youtu.be/UY-DRhStm2Q

निरु दा मल्बेरी कशी लावायची...कमी उन्ह येत असेल टेरेस मद्धे तर वाढेल का ?
माझ्या टेरेस मद्धे खुप बुल्बुल आणि चिमण्या येतात...म्हणून मी त्याना खाउ घालायला सुरु केले...पण मेल्या दुष्ट कबुतरांनी नुसता वात आणला.
बुलबुल न चिमण्यांचा खाउ त्याना हुसकाउन खाउ लागले...आणि परत वर सतत माझ्या टेरेस मद्धे बसुन गुटर गुटर करत घाण करतात नुसती.
मग मी खाउ घालायचा बंद केलाय पण अजुनही बिचारी बुल्बुल ची जोडी न चिमण्या अधुन मधुन येउन बघुन जातात काही खाऊ आहे का ते... Sad
यावर काही उपाय आहे का ?
नेट लावयचं नाहिये...कबुतरांनी येउ नये असं काय करु ?

नेट लावयचं नाहिये...कबुतरांनी येउ नये असं काय करु ?>>> मीही नेट लावणे इतकी वर्षें टाळत होते.पण कबुतरांनी खूप उच्छाद मांडल्यावर नेट लावले.त्याअधी काळी बाहुली,प्लस्टिकची पिशवी,सीडी असं लटकवून पाहिले होते.पण त्रास कमी झाला नव्हता.

कबुतरांनी येउ नये असं काय करु ?>>कबुतरांवर जोरदार पाण्याचा फवारा मारला कि नाही येत असं म्हणतात ,
बागेला पाणी घालायच्या नळीने किंवा स्प्रिंकलर ने मारले तरी चालते ..
मी एकदाच असे करून पाहिले ..पण तेव्हा २ ३ कबुतरच येत होती ती यायची बंद झाली आता हा योगायोग आहे कि काय ते माहित नाही .. पण करून बघा
आणि त्यांना अज्जीबात खायला घालायचे नाही अतिशय लोचट आणि चिवट पक्षी .. एकदा सवय झाली आणि जरा माणसाळले कि जाता जात नाहीत Sad

@ स्मिता-श्रीपाद
<<<निरु दा मल्बेरी कशी लावायची...कमी उन्ह येत असेल टेरेस मद्धे तर वाढेल का ?
माझ्या टेरेस मद्धे खुप बुल्बुल आणि चिमण्या येतात...म्हणून मी त्याना खाउ घालायला सुरु केले...पण मेल्या दुष्ट कबुतरांनी नुसता वात आणला.
बुलबुल न चिमण्यांचा खाउ त्याना हुसकाउन खाउ लागले...आणि परत वर सतत माझ्या टेरेस मद्धे बसुन गुटर गुटर करत घाण करतात नुसती.
मग मी खाउ घालायचा बंद केलाय पण अजुनही बिचारी बुल्बुल ची जोडी न चिमण्या अधुन मधुन येउन बघुन जातात काही खाऊ आहे का ते... Sad
यावर काही उपाय आहे का ?
नेट लावयचं नाहिये...कबुतरांनी येउ नये असं काय करु ?>>>

वेळ मिळाल्यास ही लिंक वाचा.
पहिल्या २,३ परिच्छेदात शंकासमाधान होईल.. Bw

मध्यम उन्हात टेरेसमधेही येईल..
https://www.maayboli.com/node/62609

Pages