अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
मी पहिल्यांदाच हे नाव ऐकले!
मी पहिल्यांदाच हे नाव ऐकले!
खुप धन्यवाद मनिम्याऊ! आता लक्षात राहिल हे नाव.
निरुदा आणि शाली खुपच सुंदर
निरुदा आणि शाली खुपच सुंदर फोटो आहेत.
धन्यवाद देवकी.
आजची फुले .

१)
२)

३)

४)

सर्वच फोटो मस्त...
सर्वच फोटो मस्त...
बटन गुलाब डिट्टो मायाकडे सुद्द्धा आहे जागू
तिसरा फोटो काय सुरेख दिसतोय!
तिसरा फोटो काय सुरेख दिसतोय! ग्रीन, रेड आणि ग्रे. मस्तच आलाय फोटो.
खूप दिवसांनी इथे आले.
खूप दिवसांनी इथे आले. नेत्रसुखद एकेक फोटो, आहाहा.
मृण्मयी यांचं मनोगत पण आज वाचलं, खूप सुंदर.
खाली कुंड्या ठेवल्यात त्यात
खाली कुंड्या ठेवल्यात त्यात बरेच बाठे घातलेले आंब्याचे. दोन रोपे आली आहेत. ती आता सोसायटीत योग्य ठिकाणी लावेन. घरी वर तुळशीच्या कुंड्या ठेवल्यात त्यात एकात पावटे टाकलेले तो वेल छान फोफावलाय. खूप फुले आली आहेत, शेंगा येतील आता.
खूप दिवसांनी इथे आले.>>अन्जू
खूप दिवसांनी इथे आले.>>अन्जू इसरली आपल्याला...
खाली कुंड्या ठेवल्यात त्यात
खाली कुंड्या ठेवल्यात त्यात बरेच बाठे घातलेले आंब्याचे. दोन रोपे आली आहेत. ती आता सोसायटीत योग्य ठिकाणी लावेन. घरी वर तुळशीच्या कुंड्या ठेवल्यात त्यात एकात पावटे टाकलेले तो वेल छान फोफावलाय. खूप फुले आली आहेत, शेंगा येतील आता.>> ज्जे ब्बात.. फोटो दाखव तर..
सुदुपार!
सुदुपार!

शोभा गुलाब मस्त.
शोभा गुलाब मस्त.
अन्जू खरच फोटो दाखव ना.
माझ्याकडील तीन प्रकारचे अडेनियम.
कुंभारगाव, भिगवण येथील
कुंभारगाव, भिगवण येथील Backwater च्या बेटावरील Small Pratincole..
आणि हा तिथल्याच एका होडीच्या
आणि हा तिथल्याच एका होडीच्या टोकावर बसून मासे हेरणारा बगळा...
सज्जनगड.
सज्जनगड.

वाव! बगळ्याचा फोटो भारीच आलाय
वाव! बगळ्याचा फोटो भारीच आलाय.
खूप दिवसांनी इथे आले.>>अन्जू
खूप दिवसांनी इथे आले.>>अन्जू इसरली आपल्याला. >>> नाय गो टीना.
इथे येणं stress buster माझ्यासाठी. निवांतपणे वेळ मिळाल्यावर बघायला आले.
फोटो दाखव तर.. >>> आता
फोटो दाखव तर.. >>> आता फुलांचे काढेन, मग शेंगांचे आणि मग टाकेन इथे.
सर्व फोटो वरचे आहाहा अगदी.
बगळ्याचा फोटो खुप सुंदर आहे.
बगळ्याचा फोटो खुप सुंदर आहे.
कुंभारगाव : अग्निपंख
कुंभारगाव : अग्निपंख (Flamingos in Flight)
मनिम्याऊ , मनोगत खुप खूप
मनिम्याऊ , मनोगत खुप खूप छान लिहलंय. त्यात वापरलेली राजस्थानी लोकगीताची झिमझीम धुंदावणारी, मैफलीत रागाच्या वातावरणाची निर्मिती करणारी आहे. त्यानंतर माबोवरील निसर्गमय सदस्यांनी टाकलेल्या प्रतिमांंनी या धाग्याची रंगत वाढतच गेली आहे . धागाकर्तीला व सर्वांना चिंब पावसाळी शुभेच्छा .
धन्यवाद भुईकमळ.
धन्यवाद भुईकमळ.

सुप्रभात.
१)
२)

३)

४)

फ्लेमिंगोंची भरारी भारी!
फ्लेमिंगोंची भरारी भारी!
गुलाब तर सुंदरच!
Wow!!! किती सुंदर फोटो...
Wow!!! किती सुंदर फोटो...
बदलापूरच्या नदीकाठची ओसाडी..
बदलापूरच्या नदीकाठची ओसाडी..
Catweed, crofton weed, eupatory, hemp-agrimony, Mexican devil, sticky eupatorium, sticky snakeroot, white thoroughwort ही त्याची इतर नांवं...
वाह! सुंदरच आहेत ही फुले.
वाह! सुंदरच आहेत ही फुले.

ही काही रानफुले.
१
२
ओसाडीच्या बाजूलाच ही Redshank
ओसाडीच्या बाजूलाच ही Redshank किंवा Lady's-thumb म्हणशील जाणारी फुलं होती.
ह्यांचं Botanical name: Persicaria maculosa..
(जाणकारांनी नांव कृपया कन्फर्म करा..)
शाली, रानफुले मस्तच..
शाली, रानफुले मस्तच..
भिगवण ला आमचा Night Trail
भिगवण ला आमचा Night Trail होता..
त्यावेळी दिसलेली ही Leopard Gecko...
शेवटचा फोटो बापरे, मी
शेवटचा फोटो बापरे, मी पहिल्यांदा हे बघतेय.
सर्वच फोटो मस्त निरु, आकाश फ्लेमिंगोज सर्वात अप्रतिम. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात हे गाणं आठवलं पटकन.
जागू, शाली फार सुरेख फोटो सर्वच.
शेवटचा फोटो बापरे, मी
शेवटचा फोटो बापरे, मी पहिल्यांदा हे बघतेय.
सर्वच फोटो मस्त निरु, आकाश फ्लेमिंगोज सर्वात अप्रतिम. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात हे गाणं आठवलं पटकन.
जागू, शाली फार सुरेख फोटो सर्वच.
>>>>>>>> +१.
शेवटची पाल भारीच.
शेवटची पाल भारीच.
शालीदा ते रानफुल नाही. हे फुल झाडावर सात आठ दिवस टिकते. बरेच रंग असतात त्याचे. तुम्ही टाकलेल्या फोटोतील फुल खुप जुने झाले आहे म्हणून त्याचा रंग उतरला आहे. त्याची लागवड करतात. पावसाळ्यात ह्याचे बी दुकानातून आणून टाकतात आणि गणपती, दसर्या दरम्यान ह्याला फुले येतात. लोकल नाव गाजरा आहे. शास्त्रिय नाव आता आठवत नाही. मी पण बी आणलय पण लावायच राहून गेलय. आज लावेन.
हे मागील वर्षीचे.

२)

ह्या मध्ये चांगली डबलची भरगच्च फुलांची जातही असते. बी आणल्यावर लॉटरी लागली तर फुले भरगच्च येतात. रंग फार सुंदर असतात. ऑरेंज, कुंकूवासारखा, गुलालासारखा खुप वेगळे रंग असतात.
Pages