तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

तेव्हा अनपेक्षित पणे फ्रीज चालू झाल्याचा आंनद दाखविणारा सुबो खूप छान वाटला बघायला, >>>> एकदम छान एक्सप्रेशन्स होते त्याचे, अरेच्चा हा कसा चालू झाला टाईप Happy

सुभा साठी पाहतोय सध्या

"2 रुपये भी बहोत बडी चीज होती है बाबू ', हा डायलॉग गाजणार वाटतं या मालिकेत आता...
निमकर कुटुंबाला डायरेक्ट पार्टीचे आमंत्रण मिळालेय सरंजामेकडून! 8 रुप्याचे सिमकार्ड लॉन्च करतायत सरंजामे.
चांगली पकड घेतेय सीरिअल.. मला आवडलं बुवा! आमिरच्या गझनी सिनेमाचा पूर्वार्ध सारखी वाटतेय थोडी थोडी.. !

सुभा आणि निमकर्स पेक्षा मायराच जास्त फुटेज खातेय असं सध्या तरि वाटतंय मला.. पहिल्या भागापसुन एकदम फर्स्ट गीअरवर बुंगाट सुटलीय ती..

आमिरच्या गझनी सिनेमाचा पूर्वार्ध सारखी वाटतेय थोडी थोडी.. ! >>> मला पण ’गझनी’ आठवला होता.

सुबोध भावे तिच्या घरून निघताना खालून परत वर तिच्याकडे वळून पाहतो, तेव्हा कसला दिसतो! Blush त्याचं बेअरिंग एकदम कडक्क आहे सध्या! त्याच्यासाठी अधूनमधून बघणार. २ रुपयांच्या आयडियाचं कार्ड लाँच होणार हे कळलं, आता ३-४ एपि.नंतर बघणार एखादा भाग... :फ़िदी:

आई बोअर मारतेय...

मायरा आणि आई बाबा bored. बाबा अति अति bored actually. किती दीनवाणेपणा आणि हात जोडत असतात सतत. जाम फुटेज खातात बाबा आणि इरीटेट करतात त्या आईपेक्षाही.

मला फक्त सु भा आणि ते कोण किल्ला मध्ये होते आणि त्याच्याबरोबर सतत असतात ते आवडले.

सुबोध भावे आणि त्याचा उजवा हात rocking एकदम. ह्या दोघांसाठी बघावी असं वाटतं. पण बाकी इतका कंटाळा आणतात की बास रे बास.

ह्या दोघांचं casting perfect एकदम.

सुबोध भावेच्या जीवावर मालिका चालली आहे. बिचाऱ्याला चित्रपटामधून मालिकेत म्हणजे फुल्ल डिमोट केल्यासारखे आहे, Software Architect ला Trainee Engineer बनवल्यासारखे.

इथे वाचून २-३ भाग पाहिले. आणखी पहावे असे वाटत नाही.
सु. भा. चे सूट्स एखाद्या हिंदी सिरियल कडुन सेकंड हँड घेतल्यासारखे लो बजेट वाटतात. त्याची श्रीमंती इ. पण बळंच.
त्याचे वय ४५ दिसतेय. आणि ती नायिका वय १८ पण बाल कलाकाराचे बेअरिंग सोडायला तयार नसल्यासारखे बोलते डायलॉग्ज. वडील - मुलगी इतपत वयाचा फरक असल्यामुळे त्यांच्यात रोमान्स वगैरे दाखवला तर क्रिन्जी वाटेल अगदीच.

Hmm point to hai.. nayikene agadich chouthi madhe asalyasarakh wagal nahi tar jara juLel

तांगडे आठवत होतं पण नक्की कुठे ते नव्हतं आठवत कारण दुरावा क्वचित बघायचे
>>> तुझं माझं ब्रेक उप मधला वकील.

हिरोइनीचे डायलाॅग्ज ऐकून जूना सिनेमा बघितल्याचा फील येतो. 'आमच्याकडे किनई', 'एक माणूस रागावलंय वाटतं' etc वाले आणि त्याच हावभावांचे डायलाॅग्ज. तिला इनोसंट दाखवायच्या नादात पार पचका होऊन जातोय. बोअर. एकटा सुभा किती दिवस रेटणार सिरियल कोण जाणे.
इतर कलाकार खरंच नसतील तरंच बरे असं वाट्टंय. एडिटिंगमधे फुल्ल धुसर वगैरे करुन टाका बघु त्यांना. Wink

तुझं माझं ब्रेक उप मधला वकील. >>> ही तर दुराव्याइतकी पण नाही बघितली. पहिले दोन भाग फक्त.

किल्ला पिक्चर थेटरात जाऊन बघितलाय त्यामुळे तिथे तो आहे हे जास्त लक्षात राहिले. तेव्हा माझी छोटी भाची त्याला तांगडे तांगडे म्हणत होती, ती आज्जीबरोबर सिरीयल्स बघते, जेव्हा आज्जीकडे येते तेव्हा म्हणून तिला जास्त माहिती असतं माझ्यापेक्षा Lol .

मी नेटवर बघितला एपिसोड कालचा. फार bored.

सुबोधला जास्त एजेड दाखवलाय. एवढी गरज नव्हती. मला तो आवडतो पण दुरावातला लुक चांगला होता. इथे वय जरा जास्तच दाखवतायेत.

पार्टी पण bored. Flashback दाखवा एकदाचा म्हणजे कळेल तरी तो निमकर family ला का महत्व देतोय एवढं, स्पेशली ईशाला.

ह्या बाल हिरवणी आणि तिच्या नेभळट बॉरींग फॅमेली पेक्षा आमची म म जानुबै आणि तिची फॅमिली परवडली.
गझनी का आठवतोय लोकांना? गझनीत हिरोनीला कधीच कळत नाही की हिरो रीचीरीच आहे ते.
सुभा का एवढा भाळलाय? हिरोइण आणि त्या बोरींग फॅमिलीवर?
लगेच दो रुपये वाला ड्वायलॉग? आणि प्लॅन मधे दोन रुपयाची सुट?
आणि एवढा वयस्कर का दाखवलाय त्याला?
बरं त्याला वयस्कर दाखवलाय तर त्या हिरोइणीला एवढी लहान का दाखवलीये?
नुकतीच शिक्षण संपवुन जॉबला जाणारी वैगेरे चालली असती की. एकदम कॉलेज मधली कशाला दाखवली?
आणि वर भरीस भर म्हणुन ती ज्युनियर कॉलेजातली वाटतेय.

खरं आहे सस्मित... अगदीच बारावीतली वाटत्ये ती...आणि सु भा पन्नाशीचा......!! निदान चाळीशीतला दाखवायचा...आणि ही वीस बावीस ची तरी...?
एकदम मुलीच्या वयाचीच दिसते ना....मग तिच्या बद्दल 'असं' काही वाटणं हे ऑड वाटू शकतं....

हो आंगो. पण मुलीच्या वयाची नको म्हणुया आपण.
फारतर सुभाचे केस लवकर पांढरे झालेत. तो चाळीशीचाच आहे.
आणि ती बालिका वयापेक्षा कमी दिसते. ती २५ ची आहे असं म्हणुया. Happy

अरे पहिल्याच भागात ती त्याला काका म्हणाली होती. Lol

काल तिची मैत्रीण तिला त्याच्यावरुन चिडवत होती तेही जाम विचित्र वाटत होतं. आणि ईशा पण लटक्या रागाने गप हं वगैरे म्हणत होती. Uhoh

Biggrin
फारतर पंधरा ते वीस वर्षांचं अंतर ठीक वाटतं...... लम्हे तल्या अनिल कपूर - श्रीदेवी सारखं...... त्याहून जास्ती म्हणजे बाप लेकीचंच वय होतं की...!!
Happy

लम्हे मधे अंतर अजिबात खटकलं नाही, इथे ते प्रचंड खटकेल अशी पुरेपुर काळजी घेतायेत. जरा उंच वगैरे तरी हवी होती नायिका. फार बालीश वाटतेय. कॉलेजात जाणारी ठीक पण निवड नायिकेची सुबोधबरोबर चुकलीच असं वाटतंय.

ती कुठली हिंदी मालिका त्यात रोनित रॉयचं लग्न त्याच्या मुलीपेक्षा लहान मुलीशी होतं, रसिकाओक जोशी बहीण असते त्याची, कुंकु मधे पण सेम . दोन्हीकडे इतकं खटकलं नाही, इथे मात्र मला तरी फार ऑड वाटतंय.

आणि सुभाच्या डोळ्यात बापाचं वात्सल्यच दिसतं.. कुंकूमध्ये तर जानकी सुनील बर्वेच्या मुलीची मैत्रीण असते.. तरी ऑड वाटलं नव्हतं एवढं..
सौमित्रचे बाबा आणि गार्गी फुले इथे अति बोअर करतायत.. चाळीतल्या फॅमिलीचं बेअरिंग जमलंच नाहीये..
शिवानी रांगोळे चालली असती इथे..
चाळिशीतले लोक एवढे म्हातारे दिसत नाहीत.. काहीही दाखवतात..
सुभा acting बाकी कडक करतोय

एकच भाग पाहिला चुकून रविवारी सगळे एकदम लावले होते तेव्हा. त्यात डायलॉग ऑफ द इयर काय असावा
" १० रुपयांची नोट हि अशी ?" तोही सुभा च्या तोंडून Uhoh अरे काय चाललंय काय राव एव्हडा श्रीमंत आहे कि १० रुपये नाही बघितले कधी ?? सिरिअसली ? असे रोल का घेतो सुभा ? त्याच्या कडून खूप अपेक्षा होत्या. अगदीच कै च्या कै वाटला तो सिन. आणि हा एकटा नक्की किती दिवस तारणार आहे सीरिअल ? असो. गॉड ब्लेस देम.
मैत्रेयी च्या वरील प्रतिसादालाही अनुमोदन

Pages