थालीपिठ - मराठवाडी पद्धत, बिना भाजणीचे

Submitted by किल्ली on 29 July, 2018 - 06:51
Thalipeeth
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ज्वारीचं पीठ - ३ वाट्या
बेसन /चणाडाळीचं पीठ - १ वाटी
लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
जिरे - चिमूटभर
ओवा - चिमूटभर
तीळ - चिमूटभर
हळद - चिमूटभर
धणेपूड - थोडीशी
कोथिंबीर - बारीक चिरून
कांदे बारीक चिरून - २
आवडत असतील तर टोमॅटो - १ बारीक चिरून
तेल

क्रमवार पाककृती: 

"भूक लागलीये,खमंग काहीतरी खायची इच्छा होतेय. पोटभरीचं चटकन होईल असं काय करावं बरं ?"
"थालीपीठ कर."
"भाजणी नाहीये पण "
"बिग डील. मी सांगते तसं कर ."
"सांग मग"
"ही घे कृती:"
१.. एका परातीत किंवा टोपात वरील सर्व साहित्य एकत्र करावे (तेल सोडून)
२. पाणी टाकून पीठ मळून घ्यावे
३. साधारण थालीपीठाला भिवतो तसे छान मऊ थापले जाईल असे मळावे
गोळा झाल्यांनतर तेलाचा हात लावून परत एकदा मळावे
४. नॉन स्टिक पसरत भांड्यात कडेने सर्व बाजुंनी थोडेसे तेल सोडावे.
गोलाकार थालीपिठे थापून घ्यावीत.
बरेच जण प्लास्टिक कागदावर थापून मग तव्यावर/ पसरत भांड्यात शेकतात/भाजतात
मी डायरेक्ट तव्यावरच थापले.
थापताना ज्वारीची पीठ हाताला चिकटते, म्हणून हाताला तेल लावून घ्यावे
५. थापून झाल्यानंतर त्याला ४-५ छिद्रे पडून त्यात थोडेसे तेल सोडावे
(तेलामुळे चव चांगली येते, कमी तेल टाकले तरी चालू शकते )
६. दोन्ही भिजुनी खरपूस ,खमंग आणि थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यावे
कडक झाल्यानंतर खायला आणखी मजा येते
७. भाजल्यानंतर ताटात काढून ताज्या दह्याबरोबर खावे

फोटोग्राफ्सः

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ४ थालीपिठ होतील
अधिक टिपा: 

थालीपीठ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून थोडा वेळ झाकून तसेच राहू द्यावे. मस्त कडक होतात

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त ...आजच करिन ...मी साताऱ्याची आमच्या इथे याला धपाटेही म्हणतात ......

भारी दिसतंय... Happy आमच्याकडे धपाटे म्हटलं की आधी हुरड्याचं पीठ मग इतर पीठांची एन्ट्री कधी हुरड्याचं पीठ नसेल तरी चालतं. पण आम्ही कांदा नाही घालत लसूण असतो ठेचून आणि हिरवी मिरची तीही ठेचलेलीच. तोंपासु...

मस्त आहे थालीपीठ व फोटो.

मी आधी प्लॅस्टिकवर थापून करायचे. एकदा कोकण सरसमध्ये एक बाई ओल्या फडक्यावर थालीपीठ ठेऊन तो फडका तव्यावर, फडक्याची बाजू वर येईल असा टाकून मग हलकेच सोडवून घेताना बघितले. फडके नीट ओले करून घेतले की हवे तितके जाड/पातळ थालीपीठ आरामात थापून भाजता येते.

किल्ले दंगा फोटोज.
थालिपीठ जीव की प्राण, माझी ताई सुरेख करते. आणि मी पण थेट तव्यावर थापते.
अलिकडे खूप दिवसात नाही केलं.

अहाहा! मस्स्त ! फोटो तोंपासू !
भारतातून येताना ज्वारीचं पीठ आणलेलं असतं तेव्हा केलंच जातं १-२ दा .. भारी लागतं !
नंतर मग पीठ पण संपलं थालीपिठ पण संपलं हाती राहिला तवा असं होतं Lol Wink
मग काय येऊन जाऊन भाजणीचं नैतर साबुदाण्याचं

सुरेख...! हा प्रकार घरी नेहेमी होतो. तर्‍हेतर्‍हेची पीठं, पालेभाज्या, कांदा, टॉमेटो असलं काय काय घालून करतो. यात आदल्यादिवशीचे उरलेले प्रकारही सुरेख चव जमवतात...

सरळ तव्यावरच लावायचे. पहीलं लावतांना तर तवा गारच असतो, पुढल्यावेळी लावतांना तव्यावर जरासं पाणी शिंपडायचं आणि मग पाण्याचा हात घेत घेत थालीपीठ पातळ पसरवता येतं... प्लॅस्टीक, कापड वगिरे मला उगा कुटाणा वाटतो (अर्थात मलाच ब्रका)

सरळ तव्यावरच लावायचे. पहीलं लावतांना तर तवा गारच असतो, पुढल्यावेळी लावतांना तव्यावर जरासं पाणी शिंपडायचं>> yes आणि एकावेळी २ २ तवे असतात चालू Happy खाणारी तोंडं बरीच असतील तर तसे फार्फार सोप्पे जाते

सरळ तव्यावरच लावायचे. पहीलं लावतांना तर तवा गारच असतो, पुढल्यावेळी लावतांना तव्यावर जरासं पाणी शिंपडायचं आणि मग पाण्याचा हात घेत घेत थालीपीठ पातळ पसरवता येतं... प्लॅस्टीक, कापड वगिरे मला उगा कुटाणा वाटतो >>>

मलाही तसंच आवडतं. पटपट थालिपीठं लावून होतात सरळ तव्यावर असली की.

सगळ्यांचे आभार Happy Happy
पाकृ टाकताना जरा धाकधूक होती.. आत हुरूप वाढला आहे ..
टाकत जाईन बिनधास्त इथून पुढे Happy

सुरेख...! हा प्रकार घरी नेहेमी होतो. तर्‍हेतर्‍हेची पीठं, पालेभाज्या, कांदा, टॉमेटो असलं काय काय घालून करतो. यात आदल्यादिवशीचे उरलेले प्रकारही सुरेख चव जमवतात... +१११
आई करते अस.... भारी होतात

एकावेळी २ २ तवे असतात चालू>>हो अग्दी अगदी Happy

छान रेसिपी आणि फोटो.

>> मलाही तसंच आवडतं. पटपट थालिपीठं लावून होतात सरळ तव्यावर असली की.
मी कायम प्लास्टिक वर (झिपलॉक बॅग) थापते. गरम तव्यावर व्यवस्थीत थापता येणार नाहीत असं वाटतं. प्लास्टीक वर थापून तव्यावर घातली तरी पटापटा होतात Happy

इ ना चॉलबे अन्जू... दोन्ही तवे गॅसवर एकापाठोपाठ. पहिल्या गार तव्यावर एक थालीपीठ थापून लावायचं आणि तो गॅसवर चढवला की लगेच दुसर्‍यावरही थालीपीठ लावून तो ही गॅसवर... आता पहिल्या थालीपीठाची उलटण्याची वेळ. ते झालं की दुसर्‍याची ही तीच वेळ... तोवर पहिलं पानात वाढायला तयार... अ‍ॅन्ड सो ऑन...

माझ्या स्टाइलचे कमी तेलाचे दिसते आहे.

गरम तव्यावर्/भांड्यात व्यवस्थीत थापता येतं. हाताला तेलाऐवजी गार पाणी लावावे. पट्पट हात उचलला की छान जमते.

मी तव्यावर लावायचा प्रयत्न केला. हात भाजेल या भीतीने पसरता येईना.>>>>> मी तो प्रयत्नही केला नाही.कारण तव्याची,गॅसची आच लागते.प्लॅस्टिक उत्तम.नुसती कांदावाली आवडत नाहीत.त्यात काहीतरी भाज्या घालून आवडतात.त्यामुळे मऊपणा येतो.मात्र तांदळाच्या पिठात कांदा,ओली मिरची कोथंबीर असली की एकदम झकास लागते.त्यातही उकडीचे पीठ राहिले असेल तर अजूनही मस्त लागतात.

दोन्ही तवे गॅसवर एकापाठोपाठ. पहिल्या गार तव्यावर एक थालीपीठ थापून लावायचं आणि तो गॅसवर चढवला की लगेच दुसर्‍यावरही थालीपीठ लावून तो ही गॅसवर... आता पहिल्या थालीपीठाची उलटण्याची वेळ. ते झालं की दुसर्‍याची ही तीच वेळ... तोवर पहिलं पानात वाढायला तयार... अ‍ॅन्ड सो ऑन...+११११११११११११११११११११

आमच्याकडे मी गरम गरम आधी नवऱ्याला करून वाढते थालीपीठ वगैरे असेल तर, मग निवांत मी खाते. त्यामुळे चालते एकानंतर एक Lol

Lol नाही हो, उलट तीच जास्त चांगली होतात.

जास्त कोणी पाहुणे, नातेवाईक असतील तर थालीपीठ न करता भाजणीचे वडे करते, ते सोपं पडतं.

Pages