तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेतील रेल्वे क्रॉसिंग... ऑटोमॅटिक बरीयर्स खाली येतात.
आणखी एक शॉक म्हणजे उड्डाणपूल नाहीत ट्रकस वर.. भारतात लहान लहान गावातही रेल्वे ट्रॅक वरून रस्त्याचा पूल असतो.

समोर रस्ता अरुंद असेल तर वाहनाच्या अप्पर डीपर लाईटचा वापर आपण समोरून येणाऱ्या ड्रायवर ला "मी फास्ट आहे. मला रस्ता दे. मी आधी जाणार" हे सांगण्यासाठी करतो. जो आधी अप्पर डीपर देतो त्याला आधी जाण्याचा अधिकार. पुढच्याने मग आपली गाडी स्लो करावी असे अपेक्षित आहे. (समोरच्याने आधी अप्पर डीपर दिला तर काहीजण वेग कमी करण्याऐवजी उद्दामपणे स्वत:सुद्धा त्याला अप्पर डीपर देतात हा भाग वेगळा)

पण अमेरिकेत मात्र अशा वेळेस अप्पर डीपर दिला कि "तू आधी जा" असा होतो असे ऐकले आहे. नक्की माहित नाही. पण मला हे कन्वेंशन आपल्यापेक्षा जास्त सेफ वाटते.

पण अमेरिकेत मात्र अशा वेळेस अप्पर डीपर दिला कि "तू आधी जा" असा होतो असे ऐकले आहे. नक्की माहित नाही. पण मला हे कन्वेंशन आपल्यापेक्षा जास्त सेफ वाटते. >>>
हेच बरोबर आहे... इथे गाडी चालवतांना कमीपणा घेणे म्हणजे ब्बाब्बो! ते नडला त फोडला वगईरे वाचलए नाइ काय?
आपण आपलं गुमान ६०-७० पकडून आरामात कडेकडेनं रस्ता मोजावा गप...

इथे एखाद्या चुकीच्या बाजूने ओव्हरटेक्या मुलाकडे थोडे डोळे उघडून पाहिल्यास 'ए, काय खुन्नस मारतो बे' म्हणून मारामार्‍या होऊ शकतात Happy
आम्हाला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केलेल्या बर्‍याच माणसांनी त्यांना काय म्हणून प्रश्नचिन्ह हात दाखवल्यावर "ए, आमच्या राज्यात यून आवाज नाय करायचा" वगैरे वाक्यांनी सुरुवात झालेली आहे Happy
आमच्या सारखे अती टिपीकल मराठीत्व चेहर्‍यावर घेऊन एम एच १२ आणि १४ च्या गाड्या चालवणारे यांना उत्तर भारतीय कुठून वाटतात काय माहित Happy

पुण्यात एक ' तू आधी जा' असं ( चौकात ) सांगण्यासाठी हनुवटीने इशारा करण्याची विनोदी पद्धत आहे
अशी पद्धत आहे?
बादवे, असे पुणे कुठे आहे?
दुसरे बुद्रुक वगरे नाही ना..?

बादवे, असे पुणे कुठे आहे?
दुसरे बुद्रुक वगरे नाही ना..?>> अरेच्चा. ती पद्धत आता नाही की काय! दहा बारा वर्षांपूर्वीपर्यंत तरी होती बुवा.
अतुलडीपाटील, येस Lol

>>आणखी एक शॉक म्हणजे उड्डाणपूल नाहीत ट्रकस वर.<<
बरोबर आहे. पण ते रेलरोड्स मालवाहु ट्रेनचे असतात ज्यांची फ्रिक्वेंसी कमी असते (वेळ पीक अवर्सला नसते). शिवाय, त्या भागातलं कमी ट्रॅफिक हा हि एक फॅक्टर आहे. आमच्या गावांत एका मेजर हायवेवर गेल्या पांच वर्षांपर्यंत रेलरोड क्रॉसिंगला फाटक होतं. आता अंडरपास बनवलेला आहे...

>>पण अमेरिकेत मात्र अशा वेळेस अप्पर डीपर दिला कि "तू आधी जा" असा होतो असे ऐकले आहे. नक्की माहित नाही. <<
अगदि सिंगल लेन कंट्रीसाइड रस्तेहि पुरेसे रुंद असल्याने हा प्रकार सहसा इथे होत नाहि. पण एक गुड समॅरिटन या नात्याने काहि बाबतीत मात्र आवर्जुन केला जातो -
१. समोरच्याला वॉर्न करणे - त्याच्या गाडीत काहि अ‍ॅबनॉर्मल आढळल्यास (रात्री हेडलाइट्स बंद, किंवा एकच चालु, गॅसटँकची लिड उघडी इ.), पुढे कोपर्‍यात मामा लेझरगन घेउन बसलेला असल्यास, पुढे ब्लाइंडस्पॉटला मेजर रेक झालेला असल्यास...
२. लेफ्ट टर्न नसलेल्या सिंगल लेन रोडवर, समोरुन डावीकडे वळणार्‍याने मागे ट्रॅफिक तुंबवुन ठेवलेलं असेल तर आपण थांबुन त्याला हा सिग्नल देउन जाउ देणे...
३. फ्रिवेवर, बाजुच्या लेनमधुन टर्न निगोशिएट करणार्‍याला पुरेशी जागा देउन हा सिग्नल देणे...

आता कल्चर शॉकचं उदाहरण म्हणजे - मुंबईत गाडीचा अ‍ॅक्सिडंट, अगदि फेंडर-बेंडर असलातरीहि, झाला तर कोणाची हि चूक असली/नसली तरीहि डायरेक्ट हातघाइचा प्रसंग पहाण्याची सवय. पण इथे मात्र मस्तपैकि, हसत-खेळत लायसंस, फोन, इंशुरंस एक्स्चेंज झाल्यावर गप्पा मारत पोलिस यायची वाट बघत रहाणे हे दृश्य नेहेमीच दिसतं... Proud

>>तुमच्यात फेंबेंसाठी पोलिसांना बोलवतात हे वाचून मला कल्चरल शॉक बसला<<
हो कारण पोलिस ठरवतो, चूक कोणाची ते आणि पोलोस रिपोर्टवरुन इंशुरंस कंपनी (तुमची वा समोरच्याची) क्लेम सेटल करायची जबाब्दारी घेते. तुमची चूक नसली तर आउट-ऑफ-पॉकेट शून्य होतो; समोरच्याची इंशुरंस कंपनी सगळे पैसे देते...

आणि कांप्रिहॅंसिव अंतर्गत क्लेम केला (नो पोलोस रिपोर्ट, नो थर्ड पार्टी इंशुरंस इन्वॉल्व्ड) तर कमीतकमी डिडक्टीबल भरावाच लागतो. मेक्स सेंस?.. Wink

"मेक्स सेंस?" -
राज, "एवढं हातघाईवर यायचं काय कारण?" - मला तरी ह्यात वक्रोक्ती ज्याला सरळ साध्या मराठीत 'सार्कॅझम' म्हणतात, ती दिसली. बाकी २२/७ खुलासा करतीलच.

फेरफटका इज म्हणींग द राईट Happy
बाकी इन्शुरन्स चे नियम पाठ झालेत आता माझे! आत्तापर्यंत चार बायांनी ठोकलाय मला (म्हणजे माझ्या गाडीला हो, उगाच गैरसमज नको) मी तर माझ्या गाडीला 'chick magnet' म्हणतो. बाई प्रामाणिक दिसत असेल तर मीच उलट तिला 'लागलं बिगलं नाही ना?' विचारतो आणि इन्शुरन्स इन्फो घेऊन निघून जातो.
हिमवादळ वगैरे असेल त्या दिवशी तर पोलिसच अनाऊन्स करतात, बाबांनो, फेंडर बेन्डर असेल तर एकमेकांचे इंशु इन्फो घ्या आणि खचका, उगाच आमचा टाइम बरबाद करू नका!

>>फेरफटका इज म्हणींग द राईट<<
आशा करतो तुम्ही सगळे इंसिडंट्स इंशुरंसला रिपोर्ट केले आणि सगळे रिअर एंडेड (चिक मॅग्नेट) असल्याने रिपेअर करता तुमच्या खिशातुन एकहि पैसा गेला नाहि... Wink

परवा दुपारी सत्यनारायण पुजेला गेले होते (माझी गुजराथी कलिग आहे तिच्याकडे). पूजा झाली, लगोलग गुरुजींनी आवरून पण ठेवली. सगळे साफसूफ झाले. बेसमेंट मधे जेवण लागले. आम्ही जेवायला गेलो खाली. तर हिच्या घरच्या पुरुष मंडळींनी बिअर पाहिजे का व्हिस्की विचारयाला सुरू केले होते आणि १-२ गोल टेबलं लावून पेग भरायला सुरवात पण केली. तिने मला आधीच सांगितले होते तुला कदाचित शॉक बसेल आमच्याकडे हे नेहमीचं आहे. पण मी नवर्‍याला काहीच सांगितले नव्हते तो बिचार कल्चरल शॉक मधेच होता पूर्ण वेळ Lol की पूजेच्या ठिकाणी आणि तेही भर दुपारी १२ वाजता हे काय? म्हणून. म्हट्ला नशीब जेवण व्हेज ठेवलंय.

मी दुसर्‍या दिवशी तिला विचारलं पूजा लगेच आवरून ठेवता का? ती म्हट्ली नाही एक दिवस ठेवतो ती पुजा तशीच पण त्या दिवशी काय माहित त्या पंडितजींनी सगळं आवरलं लगेच. म्हणजे नसतं आवरलं तर वर पूजा आणि खाली मदिरापान Uhoh

इतरत्र माहित नाही, पण सातारा ला गेल्यावर हॉस्पिटलच्या बाहेर मन्दिरात गेल्यासारख चपला बुट काढवे लागतात.

हॉस्पिटल बाहेर चपला बूट काढणे समजण्यासारखेच तर आहे. स्वच्छता आणि म्हणून इन्फेक्शन्स होण्याची शक्यता कमी करणे.

मला वाटल पंडितजी पण नंतर खाली येउन श्रमपरिहाराला बसतात कि काय?>>>>>>>>>> तसं झालं असतं तर् डबल शॉक Wink

तुम्ही घेतली कि नाही मग >>>>>>>>>>>>> नाही हो . मी नाही घेत . नवर्‍याला आग्रह करून करून बिअर प्यायला लावली.

मी माझा नवरा नोर्वे मध्ये जाऊन ८-१० महिने झाल्यावर भेटायला गेले असता त्याच्या अपार्टमेंटचे जिने चढत असताना २ जणांनी हसून आम्हालाwish केले. ओळखितल्या किंवा अनोळखी कुणाशीही जास्त न बोलणार्या अजातमित्र अशा माझ्या नवर्याने तिथे गो-यांशी मैत्री कशी काय केली म्हणून मी shock मध्ये. पण नंतर त्यानेच सांगितले की तिथे सर्व जण एकमेकांना अशा प्रकार greet करतात. आपणही हसून प्रतिसाद द्यायचा . बाकी कुणी कुणाच्या अध्यात मध्यात नाही

तिथे मला बसलेला अजून एक धक्का म्हणजे एखादी गोष्ट आपण एखाद्या ठीकाणी विसरलो तरी ब-याच कालावधीनंतरही ती होती त्या स्थिति त त्याच जागी सापडणे. दोनदा अनुभव आला. एकदा नव-याचे wallet changing room मध्ये दुस-या दिवशी सर्व कार्ड्स पैसे सहित सापडले , तर एकदा एका दुकान त किराणा मालाने भरलैली पिशवी विसरलो, घरी आल्यावर फोन केला तर त्यांनीपिशवी तिथे आहे व घेऊन जा सांगितलं !

Common shower room मध्ये बिना कपड्याचे गप्पा मारत उभे राहणे हा माझ्या नवर्यासाठी मोठ्ठा shock होता.

जपानमध्ये काम करत असताना पाहिलं की ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर जपानी लोक डेस्कवर डोके ठेऊन सरळ एक छोटी झोप घेत आहेत. Happy

फार वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या जंगलात आदिवासी ( माडिया ) भागात कांहीं महिने वास्तव्य करायचा योग आला. माडियांचा पेहराव, लग्नाची पद्धत इ.इ. म्हणजे ' कल्चरल शॉक 'ची एक मालिकाच होती. तिथे फिरताना गुरांचे कळप सर्रास दिसत पण आम्हाला मात्र दुधाच्या पावडरच्या चहावरच भागवावं लागत असे. कारण, सर्वात मोठा शाॅक हा होता , कीं माडिया गाईंचं दूध काढत नसत; त्यावर फक्त तिच्या वासरांचाच अधिकार आहे, ही माडियांची ठाम श्रद्धा असे !!

Pages