कभी कभी लगता है अपुन ही भगवान है ! (सेक्रेड गेम्स )

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 18:07

नेटफ्लिक्स वर सेक्रेड गेम्स आले आहे. आधी चुकून इंग्रजी ऑडिओ मध्ये सुरू केले, मग ऑप्शन चेंज करून हिंदी घेतला आणि नवाज चा पहिलाच डायलॉग -
कभी कभी लगता है अपुन ही भगवान है !

खतरनाक वेब सिरीज. चर्चेसाठी हा धागा !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ते लिहायचं राहिलं. टायटलला स्किपचा ऑप्शन असल्याने तेवढीच ५० सेकंद वाचतात सो नेहेमी तेच करतो.. इथेही तेच केलं अनेकदा .. पण टायटलची अक्षरं बघत रहावी अशी जादू आहे त्यात.
एपिसोडची नावं भारी ठेवायचं हल्ली फॅड आहेच... ती नावावरची रांगोळी/ चित्र पण मस्त आहे. इंडियन पण टिपिकल मुंबई एअरपोर्टला उतरलं की इंडियन रंग/ शेप/ आकृत्या दिसतात आणि ते अंगावर येतात तसं अजिबात झालं नाही.

Ho

>>आत्ताशी फक्त १/४ पुस्तक संपलय.<<
साधारण २५० पानांच्या मटेरियल वरुन ८ एपिसोडस बनवणं हे जरा फार फेच्ड वाट्तंय.

बाकि, ते पौराणिक संबंध ओढुनताणुन आणल्यासारखे वाटतात. टायटल मध्येहि सेक्रड का, हा प्रश्न पडतो. गायतोंडे स्वतःला गॉड समजतो म्हणुन?

कोण जीतेंद्र जोशी?मला फार कमी लोकांची नावं माहीत आहेत. शेवटचा सिन गॅस मास्क आहे ना? मला कोणी एकेका title cha स्टोरी शी अर्थ सांगेल का?सैफ ला वडीलामुळे ही अडचण मिळाली म्हणून तो ययाती का? मला आधीच वाटलं होतं गायतोंडेने आईला मारलं असणार, वडिलांना पकडलेले बघून शॉक बसला होता.
मला बऱ्यापैकी अंगावर आली serial. कुठून बघितली असं झालंय. Sad जेवढे evil अश्या प्रकारे डिटेल मध्ये दाखवतात, तितक चांगल्या गोष्टी दाखवत नाहीत.
कोणतीतरी छान romcom बघावी लागणार आता.

कोणतीतरी छान romcom बघावी लागणार आता >> सेट इट अप बघा Wink

कोण जीतेंद्र जोशी >> Rofl अवघड आहे रे बाबा !!!

बघितली आहे already, set it up. Happy
गेल्या कित्येक वर्षं थेटरमधेय जाऊन हिंदी सिनेमे बघितले नाहीत. फक्त animation movies. घरांत पण खुलेआम हिंदी movies लावायची सोय नाही! म्हणून कोण असा प्रश्न.(गूगल केलं - काटेकर)

खूपच वास्तव वादी चित्र ण आहे. खरी मुंबई अशीच आहे. मी आता ब्रम्हहत्या एपिसोड बघत आहे. पूर्वीचे संदर्भ माहीत असल्याने खूप बरोबर घेतले आहे हे जाणव ते.

कॉपी - पेस्टः

सेक्रेड गेम्स विषयी माझ्या संमिश्र भावना आहेत. अगदी भारावून जाण्याइतकं - mind blowing - नाही वाटली सिरीज. चांगली आहे. पहिल्याच भागात नवाजुद्दीन सांगतो की २५ दिवसात मुंबईत काहीतरी घडून सगळे मरणार आहेत. त्यामुळे तो सस्पेन्स नाहीये. नवाजुद्दीन अतिशय समर्थ अभिनेता आहे, पण रसप च्या रिव्ह्यू मधल्या 'स्टिरीओटिपीकल' रिमार्क शी, आणी भिक्षुकाचा मुलगा न वाटण्याच्या कॉमेंट शी सहमत आहे. (जाता जाता, गायतोंडे हे ब्राह्मण आडनाव आहे?)

बर्याच ठिकाणी सेक्सदृष्य, शिव्या चपखल असण्याविषयी उल्लेख आलाय. मला तरी त्याचा थोडा अतिरेक वाटला. जसं बोल्ड स्त्री पात्र दाखवताना, दर वेळी तिच्या हातात सिगरेट दाखवायची गरज नसते, तितकच, प्रत्येक वेळी सेक्सदृष्यांची, शिव्यांची गरज नव्हती.

राधिका आपटे रॉ एजंट / अ‍ॅनलिस्ट वगैरे कुठेच 'वाटत' नाही. तिचं ते एका खांद्यावर भलेमोठी पर्स घेऊन पावलं ओढत चालणं अगदीच जॉली एल. एल. बी. मधल्या अर्शद वारसी ला पोलिस प्रोटेक्शन पुरवणार्या हवालदारासारखं वाटतं.)

बाकी पात्ररचना मस्त आहे. सैफ अली खान, जितेंद्र जोशी बाकीचे दोन पोलिस अधिकारी, गिरीश कुलकर्णी, बंटी ई. सगळेच जमून आले आहेत.

कॉंग्रेसला काय प्रॉब्लेम आहे ह्या वेबसिरिजचा ?
नेट फ्लिक्स व नवाझुद्दीन सिद्धीकी विरोधात त्यांनी FIR दाखल केली आहे.

मरोत. मूर्ख आहेत लेकाचे. सगळ्याचाच प्रॉब्लेम सगळ्यांना.
(हेच उद्या बीजेपीने केलं तरी हाच प्रतिसाद कॉपीपेस्ट)

फेरफटका ह्यांच्याशी १००% सहमत. मला तरी शेवट कळला नाही बहुतेक. मेलेला माणूस नक्की कोण असतो? त्रिवेदी का? पण ग गा तर त्रिवेदी मरणार नाही असं म्हणतो ना? नॉट झेपेश आणि मेबी टू डार्क फॉर मी.

मेलेला माणूस नक्की कोण असतो? त्रिवेदी का? पण ग गा तर त्रिवेदी मरणार नाही असं म्हणतो ना? >> हो त्रिवेदी असतो. त्या नंतर सरताज काय बघतो ते बघा लक्षात येईल, त्रिवेदी कुठे असतो ते लक्षात घ्या लक्षात येईल.

ते काय लक्षात आलं याचं संत्र सोललं तर चालेल का इकडे?
ओके... पूर्ण संत्र सोलत नाही. बंदुका हा खरा गेम प्लान नाहीचे... धमाका वेगळ्याच प्रकाराने होणारे असं वाटलं.

नवाज पहिल्या एपिसोडच्या पहिल्या काही मिनिटात मरतो. त्याने काही म्हणजे काही सस्पेंस जात नाही.

सुरुवात केली फायनली. पुस्तक आधी वाचलेले असल्यामुळे थोडा बायस होता पण एकंदरीत छान अ‍ॅडॅप्ट केली आहे. एस्पेशिअली तो क्रेडिट्सचा फाँट मस्त आहे. थोडी थोडी पळवली आहे पहिल्या एपिसोडमध्ये पण तरी या वेगाने सगळं पुस्तक कव्हर करायचं झालं तर अजून दोन सीझन्स तरी लागतील. सरताजचं कॅरेक्टर एवढं का बदललं आहे काही कळत नाही. पुस्तकात सरताज आणि परुळेकर-सरताज कॉन्फ्लिक्ट जास्त चांगला हाताळला आहे.

मला प्लीज सांगा ना शेवटच्या एपिसोडचा शेववटचा भाग. जुने दिलबागच्या काळचे सीन कोणते आणि सरताजचे कोणते ते शेवटी कळलंच नाही. सगळेच नुसती अंधारात झाकणं उघडत होते आणि सापडलेली सगळीच माणसं अर्धमेली होती. कोण कोणाला कुठे सापडलं? Cliff hanger नक्की काय आहे? पुन्हा नाही बघायचंय मला रात्री काही. भीती वाटते खूप.
आणि सेक्स सीन्स दाखवलेत ते ठीक आहे, पण गायतोंडेची फ्रीक्वेन्सी वाढीव आहे जरा. कळला की एकूण पॅटर्न...किती वेळा!?
बरं, ती मेघा सरताजला सोडून का गेली हेही कळायचंय.

काल आठ भाग संपले. आता पुढील भागाची उत्सुकता आहे. नेक्स्ट सीझन कधी येइल? आता कामाच्या बाई आल्या मी एक ते आठ सलग बघत होते. त्या बेडरूमात आल्या आणि बघतच राहिल्या. मी त्यांना माफी मागून बंद केला व्हायोलन्स ने घाबर ल्या. बाबौ. नशीब. बाकी काही सीन्स चालू नव्हते. वर ना अपनी इज्जत तो जाती रही. Wink

गणेश गायतोडे पात्र आमच्या पिढीतले वाट्ते. १९६९ मधे तो सात आठ वर्शाचा दाखवला आहे. कारण जे राजकीय संदर्भ दाखवले आहेत ते माझ्या पि ढीतल्या लोकांनी रोजच्या बातम्यांत घडताना बघितले आहेत. काय की सीरीअल
बघून मला मुंबईत कसे जगायचे त्याची नस सापडली इतक्या वर्शांनी असे वाटते आहे. थोड्या थोड्क्या अपमाना नी मी हर्ट होत असे गोंधळत असे पण आता मन घट्ट झाले हा एक वैयक्तिक इंपॅक्ट.

मला तो गायतोंडे राहतो ते घर म्हणजे सिमेंटची बांधलेली जागा त्याचे आर्ट डिरेक्षन फार आव् डले. ज्युक बॉक्स, कंप्युटर स्टेशन, खुर्च्या, कोक डिस्पेन्सर टाइप मशीन कोल्ड स्टोअरेज वगैरे रंग व ती काचेची एक वॉल मस्त बनवली आहे.
सर्व लैंगिक संबंधांची दृश्ये ही पुरु ष पात्रांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग म्हणून येतात. ती तशी बघितली तर ऑफेंड होत नाही. कुकू चे पात्र आवडले. मॅक्झिम म सिटी मध्ये पण एका फार फेमस ट्रान्स जेंडर ची स्टोरी आहे. त्याची आठवण येते. त्या तिच्या फ्रॉट्ल सीनचे सात टेक झाले असे आले आहे. ती नटी आहे ती प्रत्यक्षात फक्त कधी कधी वाइन घेणारी आहे. पण ह्या आधी तिला डिरेक्टरने एक व्हिस्की पेग दिला, व संवाद वाचायला दिले,
बोलायला सांगितले जेव्हा ती रडवेली झाली आहे त असे दिसले तेव्हा सर्व टीम ला सूचना दिल्या की आता एक शब्द कोणी बोलायचे नाही. व तिला अजून एक व्हिस्की पेग देउन सेट वर पाठवले. टेक्स फायनल झाल्यावर दिग्दर्शकाने तिची माफी मागितली. तू मला वाइट समजू नकोस असे म्हट ले असे त्या नटीच्या एका मुलाखतीत वाचले. ती नाचते ते सीन किती खरंच मॅजिकल आहेत.

गाय तोंडेची स्वगते तर अफलातून आहेत. अगदी अगदी फीलिन्ग येते बर्‍याच वेळा. काटेकर व सैफ चा ब्रोमान्स
फिटिंग आहे. शेवटच्या भागातील धक्का तर परफेक्ट आता पुढे काय होईल असे वाट्ते आहे. तिसरा बाप कोण आहे?

तिसरा बाप कोण आहे?>>>

खन्ना आहे नाव सिरीज मध्ये,

साकारणारा पंकज त्रिपाठी खरंच "बाप" आहे अभिनयाच्या बाबतीत

अर्निका - फक्त सरताजचे सीन्स बघितलेस तरी क्लिफहँगर लक्षात येइल. शेवटच्या एपिसोड मधले गायतोंडे-दिलबाग चे सीन केवळ जुना संदर्भ मिक्स करतात. कथेत "सध्या" पुढे काय चालू आहे हे कळायला तो थ्रेड पूर्ण मिस केला तरी काही फरक पडणार नाही. तो फक्त गायतोंडे-दिलबाग बद्दल आहे.

सातव्या एपिसोड मधे सैफ आणि राधिका चा मोटरसायकल वर जात असताना परूळकर चा फोन येतो तो छोटा सीन प्रचंड आवड्ला. संवाद आणि अभिनय दोघांचाही परफेक्ट आहे. अत्यंत गंभीर सीन्स च्या मधे तो सहजपणे येतो. राधिका ची "क्या बात है" वाली अ‍ॅक्शन आणि तोपर्यंत पूर्ण वैतागलेल्या सैफ ने शेवटी किंचित हसणे - दिग्दर्शनातले मॅजिक आहे टोटली.

बाकी बंटी चा ब्लूपर आहे. त्याची ओळख दीपक शिंदे उर्फ बंटी अशी आहे सुरूवातीला. नंतर एकदा तो गिरीश कुलकर्णीला तेच मूळ नाव सांगतो. नंतर मात्र त्याचा "बंटी शर्मा" केला आहे.

दुसरे म्हणजे ती सुभद्रा बंदुकीच्या गोळीला एकदा घाबरून किंचाळते, तर त्याआधी एकदा जणू काहीच झाले नाही अशा थाटात गायतोंडेला लाइफचे फंडे देते.

>>जुने दिलबागच्या काळचे सीन कोणते आणि सरताजचे कोणते ते शेवटी कळलंच नाही. <<
गोंधळ होतो सीन्स पटापट येत असल्याने. पहिला एपिसोड वर्तमानात घडत असल्याने, आणि त्यात गायतोंडेचा मृत्यु दाखवलेला असल्याने पुढे ज्या सीन्स मध्ये गायतोंडे आलेला आहे ते सर्व भूतकाळातले आहेत. अजुन एक हिंट म्हणजे - जेंव्हा दिवसांच्या काउंटडाउन्चा कॅप्शन येतो, त्यापुढचा सीन वर्तमानातला आहे, हे नक्कि समजा... Happy

सुभद्राच्या बाबतीतली एक गोष्ट मला हि वेगळी (ब्लुपर) वाटली. ती गायतोंडेच्या घरात सुरुवातीला आली तेंव्हा गळ्यात मंगळसूत्र होतं. नंतर ते गायतोंडेच्या लग्नाची तयारी करतानाच्या सीन्स्मध्ये गायब झालं...

Pages