कभी कभी लगता है अपुन ही भगवान है ! (सेक्रेड गेम्स )

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 18:07

नेटफ्लिक्स वर सेक्रेड गेम्स आले आहे. आधी चुकून इंग्रजी ऑडिओ मध्ये सुरू केले, मग ऑप्शन चेंज करून हिंदी घेतला आणि नवाज चा पहिलाच डायलॉग -
कभी कभी लगता है अपुन ही भगवान है !

खतरनाक वेब सिरीज. चर्चेसाठी हा धागा !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निम्रत कौरची द टेस्ट केस ही आता जिओ सिनेमा वर संपूर्ण आहे असे इतक्यात कळाले. बालाजी आल्ट डालो केले नाही तरी पाहता येईल. ब्रेथ वर कुणीतरी धागा काढतंय का ? (काढला नसेल तर ? ) त्यात लोचे पण बरेच आहेत आणि तितकीच उत्कंठावर्धक पण. तिकडे बोलता येईल.

अ‍ॅमी Lol

वरचा प्रसंग नेमका आठवत नाहि, पण दॅट्स मुंबई. जिथे शिव्यांचा वापर प्रेम, असुया, आदर, कौतुक, आपुलकि इ. भावना व्यक्त करण्याकरता सुद्धा होतो... Proud>> शिव्या मला खटकल्या नाहीच.. मी म्हणतेय कि ओढूनताणून दिलेली वाटली उगाच.. त्या सो कॉल्ड अभिनेत्याचे लिमिटेशन्स असतील ते अन डिरेक्टरने ते सुधरवण्याऐवजी तसेच ठेवुन कामात केलेली कुचराई वाटली.. असो.. बघा तुम्ही पहिल्या भागात अगदी सुरुवातीचाच सीन आहे..

इतके सीन्स तर इंग्लीश मूव्हीज मधे पण नसतात>> पण हि तर सिरीज आहे ना.. हॉली सिरीज बघा ना तुम्ही गॉट बघा आणि इतरही.. इथे गोष्टच अश्या लोकांची आहे.. विकृत, वासनांध आणि काय तर मग पडद्यावरपन तेच दिसेल ना.. दाखवल नाही तर तसा काही फरक पडत नाही पण पात्राची बाजु कशी मांडता येईल..

कीफर सदर्लंड्च्या "२४" ची आठवण झाली.
अभिनय आणि संवाद चांगले आहेत.
पण कथा त्याच (अतिरेकी, न्यूक्लिअर वेपन्स इ.इ.) वळणावर जाणार असं वाटतंय.
२४ बघणं पहिल्या सीझन नंतर सोडून दिलं होतं.

इंग्लिश २४ इतकं भारी, वेगवान आणि खिळवून ठेवणारं होतं की अनिल कपूरच्या २४ चा एक एपिसोड पाहून पुन्हा हिंमत झाली नाही बघायची.
सेक्रेड गेम्समध्ये पकड शेवटपर्यंत टिकून आहे आणि फ्लो ही. पात्रंही ऑलमोस्ट (राधिका आपटे सोडून) सगळीच आपापल्या जागी फिट वाटली.

राधिका आपटे सामान्य अभिनेत्री आहे. लुक्स तर अतिसामान्य आहेत (असेनात का ). बहुधा बापटांची प्रिया (तीच असे नाही, नात्यातली , ओळखीची कुणी ही) जर अभिनेत्री होऊ शकते तर मी का नाही अशा जिद्दीतून ती आलेली दिसतेय. सुरूवातीला कश्यप वगैरेंनी साईन केल्यामुळे ती खरंच जबरदस्त असेल असे वाटले होते.

वरचा प्रसंग नेमका आठवत नाहि, पण दॅट्स मुंबई. जिथे शिव्यांचा वापर प्रेम, असुया, आदर, कौतुक, आपुलकि इ. भावना व्यक्त करण्याकरता सुद्धा होतो... >>>>

चित्रपटात कुणीही सामान्य दाखवले नाही, सगळे एकतर पोलीस किंवा गुंड. त्यामुळे त्यांच्या तोंडी शिव्या असणार , त्यात खटकण्यासारखे काही नाही.

पण हे वरचे वाक्य, ज्यात प्रेम वगैरे दाखवायला मुंबईकर शिव्या घालतात हे वाचून गम्मत वाटली. आदर दाखवायला अगदी थेट गां***वरून घालत असतीलही. माझा ह्या मुंबईशी परिचय नाही व मराठीत प्रेम आदर वगैरे दाखवायला अजून बरेच चांगले शब्द असल्याने कधी थेट शिव्यांचा आधार घ्यायचा प्रसंगही आला नाही.

फौजेत किती शिव्या चालतात हे एकदा माहीत करून घ्या. शिव्या आणि पुरूषार्थ असे समीकरण रूजलेले आहे. खरं तर ग्रामीण मराठी भाषा ही अश्लील आहेच तसेच ग्रामीण हरियाणवी, भोजपुरी, मालवणी, मैथिली या भाषांत शिव्या सहज येतात. या सर्व बोलीभाषेत म्हणी सुद्धा अश्लील आहेत. अश्लील हा शब्द पण आता सापेक्ष वाटू लागला आहे. त्याचं त्यांना विशेष वाटत नाही. भारताच्या ब-या भागात बायका सुद्धा शिव्या देतात. नतद्रष्ट कार्ट्या असे म्हणणे आणि रां_च्या असे म्हणणे या मागची भावना एकच असणार !

राधिका चांगलेच काम करते. मी फोबिया, अहल्या, parchd, बदलापूर पाहिलाय तिचा.

सॅ गे मध्ये फसलेल्या agent चे काम केले. तिला हे काम जमणार नाही हे तिच्या reporting मॅनेजर चे मत असते व शेवटी तेच होते.

कदाचित असेच बोरिंग वाटत राहायचे व agent कसा नसावा हे दाखवायचे हे स्क्रिप्ट दिले असेल तिला. तसेच असेल ते तिने यशस्वीपणे केले म्हणायला हवे.

एका गां०००० ने हगणे हा वाक्प्रचार सांगली कडे वापरला जातो. दोन लोक्स किंवा घरे फारच गळ्यात गळे घालून वागत असली की जरा तुच्छते ने असे म्हटले जाते. हे कधीतरी फाटेलच अश्या अर्थाने. एक्सॅक्ट सेम वाक्प्रचार हिंदी करण करून परितोष भाई व गायतों डेची मैत्री होते तिथे वापरला आहे. ते दोघे पेढी वर बसून चहा पीत असतात तेव्हा.
ते ऐकून फार मौज वाटलेली. खरे सांगायचे तर

मुंबईचे कल्चर हेच आहे. बाकी सर्व फुकट ग्लॉस. त्या अर्थाने सीरीअल खूप कॅथार्टिक आहे.

प्रिया बापट असती तर मी दूर पळून गेले असते. किड्स मूव्ही बघितल्या असत्या. ती असह्य आहे.

प्रिया बापट असती तर मी दूर पळून गेले असते >>> नसतो पळालो. वेळेत भेटली असती तर लग्नाचे विचारले असते.

परवा आणि काल पहिला सिजन संपवला पाहून... आवडले सगळे भाग.

रा आ सामान्य वाटते अगदीच... पाट्या टाकायचं काम केलय फक्त

पाहिली आणि आवडली.

सैफचा वावर एक्दम सुखद धक्का आहे. त्याची देहबोली, शरीरयष्टी, पंजाबी मधे बोलणे, टर्बन, बंडाना, सगळं शोभून दिसलंय त्याला मस्त. रादर पहिल्यांदाच सैफ आवडला म्हणता येईल.
बाकी नवाजुद्दीन तर अफलातून च काम करतो. तो इतर वेळी कसा दिसतो कुणास ठाऊक. त्याचा हा आणि असाच लूक डोळ्यात भरून राहिलाय. त्याचं कॉमेडी टायमिंग पण मस्त वाटतं. बायकोला म्हणत असतो पिछले जनम मे चिडिया थी क्या? तो ठीक से खाना खाओ ना?
जितेंद्र जोशी पण मस्त. साहेबांना मनापासून साथ देणारा, बायको मुलांवर प्रेम असलेला, प्रसंगी गरम डोक्याचा, कधी हलकाफुलका काटेकर छान उभा केलाय.
राधिका आपटे तशीही फारशी आवडती अभिनेत्री नाहीये आणी दखल घेण्याजोगे काम पण नाही वाटले यात तिचे.
बाकी सगळे कॅरेक्टर्स एक से एक.

कथानक नवीन नसले तरी सादरीकरणामुळे आणि वेगामुळे चांगले वाटले.

अंजली, तलाशमध्ये तैमूरचं काम मस्त केलंय नवाजुद्दिनने. रामन राघवमध्ये मात्र मला तो बघवला नाही थंड डोक्याने लोकांना मारताना दाखवलाय त्यामुळे.

हो मी बघणार होते रमण राघव.. पण अजून मुहुर्त लागेना. नवर्‍याने पण फारसे काहि बरे सांगितले नाहीये म्हणून राहिलाच.
तैमूर येस्स... तेव्हाच पहिल्यांदा एकदम त्याचं काम वेगळं आहे लक्षात आलं

तलाश मधे नवाझुद्दीनचाआ रोल खूप कमी ठेवला आहे. कदाचित हा सगळ सिनेमा खाऊन टाकेल असा हिशेब आमीरने केला असणार.

मला कोणी ते क्रिकेट बॅटची लिंक सरताज ला कशी काय लागली ते सांगा.
म्हणजे ती बॅट गायतोंडेने त्याच्या वडीलांना दिलेली आहे हा क्ल्यु कुठुन लागला?

आईने नाही ग.
तो झोयाचे डॉक्युमेण्ट्स बघताना अचानक येउन लॉफ्ट्वरुन बॅट काढुन बघतो. ते म्हण्तेय मी.
आईशी शेवटच्या भागात बॅट बद्दल बोलणं होतं. तेव्हा ती सांगते ना की एकदा दिलबाग सिंग मुलाला क्रिकेटर व्हायचं आहे असं सहज बोलुन गेले तेव्हा ही बॅट आली.
माझं बघुन झालंय संपुर्ण.

त्याच्या वडिलांनी माणुसकी जपत गगाला जी काय सहानुभूती दाखवलेली त्याची परतफेड म्हणून गगा काय करू विचारत असे. याच्या वडीलांनी कधी काही मागितलं नाही. एकदा बोलताना मुलगा क्रिकेट खेळतो बोलून गेले म्हणून गगा ने बॅट पाठवली.

अमितव, हे कळलं.
पण मधेच तो बॅट काढुन बघतो तेव्हा त्याला काही क्ल्यु लागतो का?

Pages