कभी कभी लगता है अपुन ही भगवान है ! (सेक्रेड गेम्स )

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 18:07

नेटफ्लिक्स वर सेक्रेड गेम्स आले आहे. आधी चुकून इंग्रजी ऑडिओ मध्ये सुरू केले, मग ऑप्शन चेंज करून हिंदी घेतला आणि नवाज चा पहिलाच डायलॉग -
कभी कभी लगता है अपुन ही भगवान है !

खतरनाक वेब सिरीज. चर्चेसाठी हा धागा !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गगा बोलताना दिलबागचे नाव घेतो.. तो चांगला होता असे म्हनुन सुचवुन जातो..
त्याला जेव्हा त्याची बॅट दिसते तेव्हा एकदम क्लिक होतं कि साधे कॉन्स्टेबल असलेल्या आपल्या वडिलांना इतकी (त्या काळात रु. ८०००/- ची ) बॅट घेणं कसं परवडणार होतं म्हणुन त्यावरुन तो आईला विचारतो.. शेवटी शेवटी आई सांगते कि गगा सतत काय हवं ते माग असं म्हणायचा तेव्हा माझ्या पोराला क्रिकेट खेळायला खुप आवडत असे तो एकदा बोलुन जातो तेव्हा गगा सरताजसाठी म्हणुन हि बॅट भेट देतो.

टीना +१.
Btw , ती जमिला , झोया असते का ?
गुरुजी नक्की कोणाच्या बाजूने असतात ?
ते त्रिवेदी ला सामिल असतात तर गगा ला का वाचवतात ?
सरताज टी व्ही वर बघत असताना कार्यक्रम live असतो का? गुरुजी २५वर्षे नंतर पण तरुण दिसतात

Btw , ती जमिला , झोया असते का ?>> दोन थेअरीज आहे माझ्यामते ह्याच्या.. झोया जर जमिला असेल तर जोयाचं वय भरपूर असायला हवं पण ते दिसत तरी नाही..अथवा झोया हि जमिलाची आई असु शकते..

गुरुजी नक्की कोणाच्या बाजूने असतात ?>>ते अजुन रिवील केलेलं नाहिए..

ते त्रिवेदी ला सामिल असतात तर गगा ला का वाचवतात ?>> कारण गगा कडून त्यांना त्यांच काम साधायचं असत म्हणुन त्यांनी आधीच गगाला हेरुन ठेवलं असत. पहिले जेव्हा डिरेक्ट त्याला ते अप्रोच करतात तेव्हा गगा त्यांना फाट्यावर मारतो म्हणुन मग त्याला निअर टू डेथ अनुभव देऊन ते त्याला राझी करतात असे आहे.. पण मग गगा पहिलेच धर्मद्वेष्टा दाखवलाय अन त्या नावावर अख्ख्या मुंबईचा बळी देणे त्याला जमणार नसावे म्हनुन तो सरताजला फोन करतो..

सरताज टी व्ही वर बघत असताना कार्यक्रम live असतो का? गुरुजी २५वर्षे नंतर पण तरुण दिसतात>> तो प्रोग्रॅम लाईव्ह होता का हे नाही माहित पण सुरुवातीला गायतोंडेच जे वय अन चेहरा दा़खवला आ।ए त्यात त्याचे केस कलप लावून काळे केल्यास तोही इतका काही वयस्कर दिसणार नाही म्हणुन पंकज त्रिपाठीचा अवतार मला बिलिवेबल वाटला..

ओके टीना. मला वाटलेलं तसं नसावं काही.
जमिला-झोया असं मलाही वाटलेलं.
सरताजच्या घरी टीव्हीवरच्या कार्यक्रमात गुरुजी २५ वर्षापुर्वीइतकेच तरुण दिसतात.

एका रॉ एजन्ट्ला क्षणात गोळी घालुन मारणार्‍या, इतक्या मोठ्या खतरनाक मिशनसाठी महत्वाचा रोल करणार्‍या माल्कमने सरताजला जिवंत सोडणं हे टिपीकल बॉलीवुडी आहे. (हिरोला कितीही मारलं/गोळी लागली तरी हिरो कसा मरेल असं आम्ही लहानपणी पिच्चर बघताना बोलायचो.सरताज हिरो आहे. Happy )

सिझन टू ची अनाउंसमेंट झाली हो!!!
फॉल मध्ये शूट चालू करणार. एका सैफच्या मुलाखतीत त्याने एकून ४ सीझन असतील सांगितलेलं.
https://deadline.com/2018/09/sacred-games-netflix-renews-indian-crime-dr...
https://www.hindustantimes.com/tv/netflix-s-sacred-games-season-2-offici...

हे ट्रेलर : पण त्यात नवीन काही नाहीये.
https://www.youtube.com/watch?v=8F2FgO4qiDs

हो आज ट्रेलर पाहिला तो. आधीच्याच सीझन्स चे क्लिप्स आणि डायलॉग्ज वापरलेत. ४ सीझन्स? म्हणजे ते २५ दिवस संपायला ३-४ वर्षे लागणार की काय!!

परवा क्रॉस वर्ड मध्ये सीझन वन व टू ची पुस्तके उपलब्ध आहेत ती बघितली. घेतली नाहीत. मला ह्या सीरीअल मधून मुंबईत कसे वागावे लागते ते जबरी शिकायला मिळाले. उपयोग झाला आहे. गोपाल मट का राजा झिंदा बाद.

बघितली प्रचन्ड ग्रिपिन्ग आहे तसच हिसाचार्,सेक्स भरपुरच आहे, व्हायोलेन्स मला झेपत नाही , इतकी न्युडिटि पण नाही पण तरी मधे मधे स्टोरी लाईन उत्कन्ठावर्धक आहे त्यामुळेच सिझन बघुन सन्पवला.
नवाझउद्दिन सारखा एखादाच अति किरकोळ शरिरयस्टी आणी उन्ची असलेला अभिनेता फक्त आपल्या जबरदस्त अभिनयावर एक क्रुर व्हिलन उभा करु शकतो
सैफ ओमकारा नतर परत एकदा खुप आवडला, तो सरताजच वाटतो सतत.. ..
कुकुच सिक्रेट गगाला कळल नाही कळल तरी त्याला काहिही फरकच पडत नसतो...गायतोन्डे भिक्षुकाचा मुलगा वाटत नाही कारण त्याची आई असते.

म्हणजे तो भिक्षुकाचा मुलगा नसावा असा एक अर्थ.
किंवा त्याने भिक्षुकासारखं होउ नये असं आईला वाट्त असणार म्हणुन तो तसा वाटत नाही हा एक अर्थ.

Pages