कभी कभी लगता है अपुन ही भगवान है ! (सेक्रेड गेम्स )

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 18:07

नेटफ्लिक्स वर सेक्रेड गेम्स आले आहे. आधी चुकून इंग्रजी ऑडिओ मध्ये सुरू केले, मग ऑप्शन चेंज करून हिंदी घेतला आणि नवाज चा पहिलाच डायलॉग -
कभी कभी लगता है अपुन ही भगवान है !

खतरनाक वेब सिरीज. चर्चेसाठी हा धागा !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या सीरीअलचे सहा ग्लोबल भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. व ७० देशांमध्ये रिलीज झाली आहे.
अजून आठ ओरिजिनल शोज इन द वर्क्स आहेत.

भारी आहे GHOUL चा ट्रेलर.
नेटफ्लिक्स घ्यावच लागणार आहे बहुतेक
बरं राधिका आपटे बर्‍याच वेब सिरीज, शॉर्ट्फिल्म्समधे असते का नेफ्लिच्या? आवडती आहे वाट्टं.

बोरिंग राधिका आपटे, कोणाला आवडते काय माहीत? सतत तोच त्रासलेला चेहरा.
Submitted by राजसी on 17 July, 2018 - 12:46 + १

बोल्ड सीन्स द्यायला तयार असल्याने घेत असतील.

>>Q2 नंबर नंतर नेफ्लि आज १४% पडलाय आफ्टरआवर्स मध्ये.<<
ते फोरकास्ट मिस झाल्याने; असं होतं बर्‍याचदा. सबस्क्रायबर सॅच्युरेशन इज गिवन, पण कांटेंट्च्या बाबतीत त्यांची कामगिरी चांगली आहे (एमी नॉमिनेशन्मध्ये त्यांनी एच्बीओ वर मात केलेली आहे). राहिला प्रश्न सेक्रड गेम्सचा. भारतात बंदि आ(ण)ली, ज्याची शक्यता कमी आहे तरी शो बंद होणार नाहि. आणि त्या पब्लिसिटीचा फायदा नेटफ्लिक्स्लाच होईल...

बरं होईल खरंच बंद झाली तर. कसली कसली स्वातंत्र्य आहेत म्हणून कुणी भर चौकात वाट्टेल ते केलं तर चालेल का! >> ?

चौकात जाउन काय करता येइल यावर मर्यादा आहेत म्हणून सिरीयल मधल्या कॅरेक्टरला राजकारण्यांबद्दल जे वाटते ते सिरीयल मधे दाखवायला का बंदी असावी?

राहुल गांधीने इतकी योग्य प्रतिक्रिया देउन सुद्धा काँग्रेसमधले बाकीचे राजनिष्ठ उगाचच अपमान बिपमान करत आहेत. मोठी संधी घालवली व्यक्तिस्वातंत्र्याचे आपणच पुरस्कर्ते आहोत दाखवण्याची.

काल सगळे एपिसोडस एकत्रित पाहिले. कथा वेगवान आहे, हाताळणी चांगली आहे त्यामुळे बघायला मजा आली. थोडा स्लो असता तर लुपहोल्स खटकले असते. पुढचे भागही बघणार.

काही ठिकाणी न्यूडीटी व सेक्स कथेचा भाग म्हणून येते, तेव्हा खटकत नाही. काही ठिकाणी अनावश्यक वाटले.

मी मूळ कादंबरी वाचली नाहीय त्यामुळे सध्याचा शेवट मला तरी कळला नाही. पण अधून मधून सतत होणारे 'कुणीही वाचणार नाही' चे उल्लेख व तळघरातील गॅस मास्क वगैरे पाहून मुंबईवर गॅस हल्ला होणार असे वाटले. फक्त त्रिवेदीच वाचणार तर त्याला आत बांधून का ठेवले हे कळले नाही. तो त्रिवेदीच होता ना?

Raw एजेंट दिसायला agent दिसो वा न दिसो, वावरण्यात तरी सफाई हवी. त्रिवेदीच्या घरी रा आ जाते तेव्हा आरामात आत फिरते. टेबल लॅम्प पेटलेला आहे व टेबलावर कागद पसरले आहेत हे बघून एकतर माणूस तिथेच आजूबाजूला आहे किंवा तो कामात असताना त्याला कुणीतरी उचललाय एवढे तर समजायला हवे एजेंटला. फोनवरून सूचना देतानाही कुणी ऐकत असेल, फोन कुणी टॅप करत असेल हे माहितीच नसल्यासारखे बोलणे. RAw गुप्तहेर खरेच असे असतात? आणि IFS मध्ये काम करणाऱ्या त्रिवेदी/शर्माचे घराचे कुलुपही केवळ केसातल्या पिनेने उघडते? त्या खात्याला व तिथे काम करणाऱ्या लोकांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काहीतरी महत्व आहे की नाही? Happy Happy

तेच सरताजचे. ट्रेनवॅगनमधून उतरून आरामात निघालाय, आपल्याला धरले जाईल याची जाणीव नाही. कथेची गरज म्हणून रा आ ला संधीही न देता मारले, सरताजला मात्र बांधून ठेवले. आणि एवढा मोठा फौजफाटा जखमी माल्कमला शोधू शकत नाहीत.

वर काही जणांनी शेवटी जे पाहिले त्यावरून पुढच्या भागात हिंदुत्ववादी भडकणार म्हटले, ते का हे कळले नाही. तळघरात काही देवांचा सेटअप किंवा बळीची तयारी वगैरे काही दिसले नाही किंवा मला कळले नसेल.

बाकी हि वा भडकायचे असते तर एव्हाना भरपूर भडकले असते. 60 व्या दशकात परंपरेने भिक्षुकी करणारे खूप होते व त्यांना भिकारी म्हणत नसत. धार्मिक कर्मठपणा जास्त होता, भिक्षुकी करणारा ब्राम्हण स्वतःच्या मुलाला केस वाढवू देईल, स्वतःबरोबर नुसताच फिरवेल, भिक्षुकी करवून घेणार नाही यावर विश्वास बसत नाही. त्याच्या बायकोचे उद्योग शाळेतल्या मुलांना माहीत होते तर त्यांच्या बापांनाही माहीत असणार. अशा माणसाला भिक्षुक म्हणून घरे फिरायला कुणी दिले नसते, कारण भिक्षुकीचे काही नियम होते. आक्षेप घ्यायचाच तर यावर घेता आला असता. ग गाला त्याच्या धर्मामुळें काही त्रास झाल्याचे दाखवले नाही, वडिलांनी मुद्दाम धर्म गळ्यात अडकवला असेही केले नाही, तरीही तो नंतर धर्माच्या नावाने खडे का फोडत होता कळले नाही. अर्थात काही खडे योग्यच होते ही गोष्ट वेगळी.

नवाज सिद्दीकीचे काम चांगले आहे पण तोंडची भाषा नॉर्थ इंडियन का दिली कळले नाही. बाकीची सगळी पात्रे स्वतःच्या मातृभाषेत बोलत असताना ह्याच्या घरात इतके मराठी भरूनही हा हिंदी व तेही श चा स करणाऱ्या हिंदीत का बोलत होता कळले नाही.

सैफचे काम आवडले. पण लव आजकल मधला तरुण हिम्मतवान सरदार व यातला मानसिकरित्या त्रस्त, एकूण आयुष्याला कंटाळलेला सरदार यात फारसा फरक दिसला नाही. तरीही असो, बघायला बरे वाटले.

रा आ चा कंटाळा यायला लागलाय आता. भूमिका कुठलीही असो, तिचे तेच ते एकसारखे बेअरिंग असते.

यात राजीव गांधीच्या बोफोर्सचा व संजय गांधीच्या नसबंदी कार्यक्रमाचा उल्लेख आलाय. पहिल्या भागाबद्दल राहुल गांधी जे बोलला त्यात मतस्वातंत्र्याचा आदर वगैरे काही नसून निवडणूका तोंडावर आलेल्या असताना उगीच बोचणारे विषय नकोत हा हेतू असावा हेमावैम.

काल रात्री उशिरा सहज म्हणून सेक्रेड गेम्सचा पहिला भाग बघायला घेतला ती मोठीच चूक झाली. कारण नंतर डोळ्यांवर झोप असतानाही सगळे भाग पहायला चार साडेचार तास सलग गेले. मधे थांबता येत नाही ही मालिका पाहताना. आता झोपेतून जागा झालो. ( प्रतिसाद वाचून मग लिहीतो)

साधना ताईंच्या प्रतिसादाशी ब-याच अंशी सहमत.

सूचना : ( इटॅलिक केलेला भाग आपल्या जबाबदारीवर वाचावा. मालिकेतल्या न्युडीतीबाबतचं लिखाण आहे)

अभिनय कुणाचा डावा कुणाचा उजवा याबद्दल फारसे सांगता येत नाही. राधिका आपटे वगळता जवळपास सर्वांचा अभिनय चांगला आहे. ब-याच कलाकारांची नावे ठाऊक नाहीत ही अडचण आहे.

मला गिरीश कुलकर्णी अजिबात खटकला नाही. जितेंद्र जोशीचा नेहमीचा सहजपणा इथे भावखाऊ ठरला आहे. त्याचा रोल वेल डिफाईन्ड आहे. पोलीसाचे बेअरिंग त्याने अभ्यासपूर्वक आणि सहजतेने साकारलेले आहे. नाईक वगैरे पदावरचे पोलीस साधारण असेच असतात. पात्रांची घरं, आजूबाजूचे वातावरण यावर खूपच अभ्यास केला गेलेला आहे.

सैफ अलीने साकारलेले पात्र अवघड होते. ते भावखाऊ अजिबात नव्हते. हा रोल सैफने प्रचंड संयमाने साकारलेला आहे. मागे पडलेल्यांवर काही तरी करून दाखवायचे एक प्रेशर असते ते इथे बरोबर उभे केले गेले आहे. मात्र रॉ अधिका-याकडून नोकरीची हमी लिहून न घेता हा रिस्क का घेतो हे डिफाईन झालेले नाही. सरकारी नोकरीतल्या वरीष्ठांच्या ऑर्डर्सबद्दलचा अभ्यास कमी पडला आहे. रॉ कडून थेट ऑर्डर्स घ्यायला मुंबई पोलीसातल्या कॉन्स्टेबलला कुठलेही अधिकार नाहीत.
नायक एका कमी महत्वाच्या (हिंदी सिनेमाने ग्लॅमरस केलेल्या इन्स्पेक्टरच्या पदाच्या बरंच खाली) पदावर दाखवलाय हा बदल सुखद आहे. वेगळेपणा आहे.

नवाजुद्दीनच्या पात्राला अनेक रंग आहेत. ते त्याने नेहमीच्या सहजतेने साकारले आहेत. तो कधी अभिनय करतो असे वाटतच नाही. ते पात्र त्याने कमालीच्या सहतेने जिवंत केले आहे. मुसा वगैरे पात्रांना महत्व आहे पण वाव कमी आहे. मात्र त्यांनी छाप सोडली आहे.

स्त्री पात्रांमधे कुक्कू हे अजिबात न पटलेलं पात्रं. सुरूवात ठीक होती. पण नंतर शेवटचा धक्का अनावश्यक होता. त्यामुळे ते पात्र ठोस न राहता ठिसूळ होऊन गेले. हा धक्का दिला नसता तर त्याने कथेला काय फरक पडत होता हे समजत नाही. टॉयलेट सीन नंतर बेसावधपणे अचानक येणारा सीन हा धक्कादायक आणि अनावश्यक वाटला. इनसिक्युअरच दाखवायचं तर ती आधीपासून विवाहीत आहे असा धक्का देता आला असता . थोडंसं गुगल करावं लागलं. तरी पण कन्फ्युजन आहेच. अशा ०.०००१ टक्के शक्यता का घ्याव्यात ? शिवाय कुणी तरी म्हटले तसे इतक्या वर्षात ते जाणवू नये ? हल्ली वेगळं काही तरी दाखवायचं म्हणून थोडं फार विकृतीकडे झुकणारे उपकथानक घुसडण्याची पद्धत आली आहे. महेश भटच्या सिनेमात एकेकाळी तृतीयपंथी पात्र नसेल तर तो फाऊल समजण्यात येत होता. क्राईम पेट्रोलच्या एका भागात तर एक मुलगी मुलांसारखी वाढलेली आणि तसेच वागणारी दाखवली आहे. ती मुलींना आपल्या जाळ्यात ओढून लग्न करून संबंध न ठेवता नंतर लुटून पसार व्हायची असे दाखवले आहे. ही गोष्ट किती अशक्य आहे.

तर या अशा फोडण्या का देतात ?
सेक्सचे बरेचसे सीन्स नको होते किंवा हिंदीत पहायची सवय नाही. पण नसते तर चालले असते किंवा इतके उघडे नागडे दाखवले नसते तरी चालले असते असे वाटून गेले. मला न्युडीटीचा प्रॉब्लेम नाही. इंग्रजी सिनेमात मी अनेकदा पाहीले आहे. फक्त एकच सीन कथेच्या ओघात आला असे वाटले तो म्हणजे लग्नानंतर नवाजुद्दीन बायकोबर शारीरीक संबंध ठेवण्यात असमर्थ ठरतो तेव्हां ती त्याचे कारण त्याला सांगते. हा संपूर्ण प्रसंगच दाद द्यावासा वाटला. किती बारकावे आहेत त्यात. मानसिक कोंडी बायकांना लगेच समजते हे सुद्धा छान मांडले आहे. आवडले.
( मायबोलीवर हा परीच्छेद खूपच खटकेल का ? लवकर सांगा म्हणजे तेव्हढा भाग संपादीत करेन).

कथेत बरेच बरेच बरेच निसरडे पट्टे आहेत. शेवट अपूर्ण वाटतो. प्रेक्षकावर सोडून दिले असले आणि काय झाले याचा विचार करणे अशक्य नसले तरीही नववा भाग शूट करणे काही अवघड नव्हते. सीझन टू मधे वेगळी कथा असेल कदाचित.

एकंदरीतच वेब सीरीज टीव्हीवरच्या मालिका किंवा सिनेमा या पेक्षा अत्यंत प्रभावी आहेत.

बालाजीवाल्यांच्या बालाजी आल्ट या अ‍ॅपवर निम्रत कौर ची द टेस्ट केस ही मालिका आजवर पाहिलेल्या वेबसीरीज मधे सर्वात दमदार आहे.
बोस - अ फर्गॉटन हिरो ही पण अर्धवट आहे. बालाजीवरच आहे .
राधिका एमएमएस ही वेबसीरीज गाजतेय

अ‍ॅमेझॉन प्राईमवरची ब्रीथ ही मालिका वेगवान आहे. पण त्यावर नक्कीच चर्चा होऊ शकेल. अजून काही वेबसीरीज आहेत. सेक्रेड गेम्स ही सर्वात बहुचर्चित आणि मोठी जाहीरात केलेली ठरतेय.

हम्म तसे असेल तर त्याला बऱ्याच आधी मारले असणार, जेव्हा गायतोंडे जिवंत होता तेव्हा व सरताजला फोन केला नव्हता तेव्हा... तसेही त्या सुरवातीच्या प्रसंगाचे गुपित उलगडायचे आहे. जोजो जखमी होऊन दरवाजाकडे सरपटत जात असते, गायतोंडे थोड्या वेळाने येतो, मृत्यू समोर असूनही ती त्याला तोंडावर हसते 20 22 वर्षे तुला मूर्ख बनवले म्हणून. तिला मारून अर्धवट कपड्यातील गायतोंडे खुर्चीत येऊन बसतो तो मरेपर्यंत तिथून उठत नाही.

एक फार विचि त्र मुद्दा आहे खरेतर. शेव टा च्या भागात गायतोंडे मुस्लिम मुलांशी तुरुंगात दंगा व खू न खराबा करतो. तेव्हा सचमे ं गले काट ने में कसमसे सेक्स से ज्यादा मजा आता है अश्या अर्थाचे वाक्य आहे. हे जरा मनन करून बघितले तर असा भयानक खुलासा होतो की जितक्या वेळेला त्याला सेक्स करताना किंवा वुमनायझ र म्हणून वागताना दाखवले आहे तेव्हा खरेतर त्याला मर्डर करायला मिळत नव्हते म्हणून ती मजा तो शोधू बघत होता. अश्या ने त्या दृश्यां च्या वारंवारितेची संगति लागते. खरा सायको पाथ पर्सन.

मुंबईत येउन तो मुंबईकर च होतो व परि तोष भाई शी जानी मैत्री होते घरचे उठणे बसणे वगिअरे त्यात तो त्यांचे मॅनरिझम्स उचलतो व गुजरात्यांसारखे हिंदी बोलू लागतो. आपण कसे मोकलाईदे ने , कुच्छ तो लोच्या है म्हणतो वगैरे तसे. गावाकडचा मराठी मुलगा मुंबईत येउन हरवला .

आई वडिलांचा पार्ट खरेतर जी ए कुलकर्णी ह्यांच्या एखाद्या कथेतला असावा तसा आहे.

मग त्याने गुजरातीत बोलायला हवे होते. Happy Happy

परुळकर व भोसले, काटेकर व इतर पोलीस , काटेकरचे घरातले सगळे पूर्ण वेळ मराठीत बोलताना दाखवले, उगीच नावाला मराठीतून सुरू करून नंतर हिंदी असे केले नाहीय. सरताज आईशी पंजाबीत बोलतो. अजून एका दृश्यात एक वेगळी भाषा दाखवलीय, आता आठवत नाही. सहभाषिक लोक त्याच भाषेत बोलणार हे एकदा स्वीकारले की त्यातले एकच पात्र त्याला न शोभेलश्या भाषेत बोलताना विचित्र वाटते.

बालपणीचा गणेश बघून जब्या आठवला, थोडा उजळ असलेला जब्या.

त्यातले एकच पात्र त्याला न शोभेलश्या भाषेत बोलताना विचित्र वाटते.>. हो खरे आहे. पण तो बॉस ची भा षा बोलतो. आणि मुंबईत सर्वच एक सलग भा षा वर्क्स्पेस मध्ये किंवा पब्लिक प्लेस मध्ये नाही बोलत सर्मिसळ असते. सुभध्रेची लेक्चर त्यामाना ने पूर्ण हिंदीत आहेत ती मध्यप्र देशाची असावी.

परवा रात्री सलग बसुन पाहिले ८ही भाग.. वाटल ते सर्व चघळुन झालय...

मलापन वाटल कि कोकोला पूर्ण दाखवण्याची अशी खास काही गरज नव्हती..आणि हा प्रश्न पडलाच कि इतक्या दिवसात हे कळू नये म्हणजे कायच्या काय..

सुरुवातीला बंटी किधर है असं म्हटल्यावर तो क्लास ३ गुंडा शिवी देऊन बोलताना त्या शिवीची खरच गरज होती का असं वाटल.. ओढूनताणून दिल्यासारखी वाटली तेव्हा बिचकली मी एकदम पण मग नवाजमुळे बेअरिंग शाबुत राहीलं..

मला नवाज आवडला.. सैफपन बर्‍यापैकी सुसह्य आहे.. जि जो नाही आवडला.. या अश्या हवालदाराच्या भूमिकेत कित्येक चित्रपटात मराठी अभिनेत्यांना बघुन विट आला खरतर.. त्याला मारताना जेव्हा ते चिरकुट पोट्ट खिशातून धारदार पातं काढून जिजोच्या गळ्यावर वार करत तिथे एडिटींग वाईट्ट गंडलय.. बंटीच पात्र खरच खुप चिड आणणारं होतं..
न्युडीटी मला नाही खटकली एवढी.. देसी पॉर्न सारखी वाटली जरा.. दिसायला याईक्स.. पण रिअल.. काही काही ठिकाणी फिस्सकन हसु आलं..

नवाजचं पात्र अगदी लहान वयात येतं मुंबईत म्हणुन त्याची बोली हिंदी होते असं मला वाटल त्यामूळे त्याच्या भाषेचं इतक काही वाटल नाही. तेच सरताजने जिजोची शिवी वापरणं मात्र ऐकायला कन्विंन्सिंग नाही वाटली.. तेच परुळेकरची मराठी सुद्धा.. फार कष्ट करुन जीभ वळवायचा प्रयत्न करत होता अस वाटल..

रा आ चं पात्र फार काही वाटल नाही.. ती सरताजची गन घेऊन इतर संख्येने एवढ्या मोठ्या असलेल्या सो कॉल्ड गुंडाना वॅगन मधे बंद करते ते काईच्या काही होतं माझ्यामते..

कोको ग गा ला तो तिला किस का करत नाही हे विचारतो त्यावर गगा जे काही बोलतो ते मला फार आवडल..

अजुनही बरच काही आहे.. आठ्वलं तस लिहिते..

न्युडीटी आणि हिंसा याबाबतीत गॉटने जो बेंचमार्क सेट केलाय त्यापुढे सेक्रेड गेम्स काहीच नाही माझ्यामते...

अर्र टिना, जितेंद्र जोशीचा काटेकर मला फारच आवडला. त्याची बायकोही.
शेवटच्ता सीनमध्ये जी व्यक्ती मेलेली दाखवली आहे ती नक्की त्रिवेदी आहे? बघा परत एकदा.

< न्युडीटी मला नाही खटकली एवढी.. देसी पॉर्न सारखी वाटली जरा.. दिसायला याईक्स.. पण रिअल.. काही काही ठिकाणी फिस्सकन हसु आलं.. >>>
हा हा न्यूडीटीबद्दलची चर्चा वाचून मलापण "दिसायला याईक्स" हेच वाटत होतं Lol

न्युडीटी असण्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. ती अनावश्यक आहे एव्हढेच. संस्कृती बुदाली बिडाली असे काही नाही. फक्त असं वाटलं की आम्ही पण खूप अ‍ॅडव्हान्स झालोय बघा हे दाखवण्यासाठीचा अट्टाहास म्हणून अती केलंय. इतके सीन्स तर इंग्लीश मूव्हीज मधे पण नसतात , बेसिक इन्स्टिन्क्ट्स सारखे सोडून.

इतके सीन्स तर इंग्लीश मूव्हीज मधे पण नसतात>> अरे सेक्स अँड द सिटी टू ही जी टंप्डू मूव्ही आहे त्यातले ही फुल सीन्स नेट फ्लिक्स वर आहेत. मला पण ते सीन अचान क आल्यावर दचकायला झाले होते . स्टार मूव्हीज वर एडिट करू न दाखवतात बहुतेक. नेट फ्लिक्स वर सेन्सरशिप नाही त्याचा फायदा घेणे आहे.

>>क्लास ३ गुंडा शिवी देऊन बोलताना त्या शिवीची खरच गरज होती का असं वाटल.. <<
वरचा प्रसंग नेमका आठवत नाहि, पण दॅट्स मुंबई. जिथे शिव्यांचा वापर प्रेम, असुया, आदर, कौतुक, आपुलकि इ. भावना व्यक्त करण्याकरता सुद्धा होतो... Proud

या ज्या वेबसिरीज आहेत त्या नेमक्या भागांच्या आहेत. यांना सिनेमा का म्हणू नये हा प्रश्न पडतो. आपल्या मालिकांचे व्हिडीओ कॅमेरे आणि या वेब सिरीजेस मधे वापरलेले कॅमेरे यातला फरक जाणवतो. सिनेमा पाहतोय असेच वाटत राहते. शिवाय आउटडोअर शूटींग पण खूप आहे. युवा मराठी वरची रूद्रम पण अशीच होती. वेबसिरीजचा टीव्हीसिरीज वर परिणाम होईल का ?
की झी वाले तसेच राहतील अपौरुषेय वगैरे ?

मला शिव्या किंवा न्युडिटी किंवा सेक्स सीन्स काहीच खटकले नाहीत. सुरुवातीला म्हटल्यामुळे भारतीय सिरिजकडून अपेक्षित नसल्यामुळे म म मनाला जरा धक्का बसला एवढंच. Wink

Pages