न सुटणाऱ्या सवयी?

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 22:39

काही सवयी अशा असतात, तुम्ही कितीही चेंज व्हा, प्रगती करा, देश बदला, कल्चर बदला सुटत नाहीत.
लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात.

एखादी चप्पल उलटी असेल, मला ती सरळ करावी वाटते. मला आठवत देखील नाही ही सवय मला कधीपासून आहे.

अजुन एक - पाण्याचा पेला तोंड न लावून वरून घटघट पिणे. अमेरिकेत देखील कोणाच्या घरी गेलो आणि पाणी ऑफर झाले, वरून प्यायला सुरू करतो.

तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अजून टिकून आहेत???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चप्पल नुसती उलटीच नाही, पण डावीकडची उजवीकडे आणि उजवीकडची डावीकडे असेल तरी मी लगेच सरळ करतो.

माझी पण एक सवय - कचरा कागदाला जरी पाय लागला तरी छातीला आणि डोक्याला हात लावणे ( पाया पडणे मनातल्या मनात).

मी लहानपणी कधीतरी वाचलं होतं की नोटा आणि नाणी अनेक माणसांच्या हातातून फिरून प्रवास करत आपल्यापर्यंत पोचतात. त्यामुळे नोटांवर आणि नाण्यांवर प्रचंड प्रमाणात बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे मला अशी सवय लागली की पैसे हाताळले की शक्य तितक्या लवकर हात स्वच्छ धुवायचे. अजूनही ती सवय कायम आहे आणि राहील बहुतेक कायम.

चप्पल, पाणी दोन्हीबाबत मी पण असंच करते. कधी हॉटेलात गेल्यावर मात्र नेमकं काचेच्या ग्लासमधून वरून पिताना सांडते Lol मग तोंड लावून पिते.

मी रोज ऑफीसला स्कुटर घेऊन येते. टेबलपाशी गेल्यावर, हातातली पर्स, हेल्मेट ठेवून आधी हात धुवून येणे ही सवय गेले कित्येक वर्ष आहे. घरातून अंघोळ करुनच निघालेले असते तरी ऑफीस मधे पोहोचे पर्यंत हातावर खुप धुळ बसली आहे अस वाटत रहात Lol

घरच्यांसोबत हॉटेल मध्ये गिळायला गेलो तरी बिस्लरीचं पाणी ग्लासात बियर ओतावी तसे कडेकडेने ग्लास अन बाटली तिरका करून भरतो, शिव्या खातो.

मित्र च्यु*गिरी करताना दिसला अन त्यातही एटीट्युड देताना दिसला तरी (प्रसंगी त्याच्याच शिव्या खाऊन) त्याला आवरतो.

उकडलेल्या शेंगा खाऊन झाल्या की खारट झालेली बोटे चाटतो.

काही फरक पडणार नाही हे माहिती असूनही ऋन्मेषच्या तोंडी लागत असे

अजून आहे काय काय सुचेल तसे लिहितो (ऋन्मेष बाबा की जय)

माझ्या काही न सुटणार्‍या सवयी
* रोज रात्री एक ग्लास पाणी पिणे, आणि अगदी झोपण्यापुर्वी बाथरूमला जाऊन येणे. बाबा लहानपणी सांगायचे की झोपताना शू नाही केली तर भयानक स्वप्न पडतात. ती सवय अजूनी टिकून आहे.
* हाताला साबण लावताना नळ सुरू न ठेवणे. अशाने कधी कधी नळ उघडता येत नाही. तरिही
* घरातून निघताना सर्व लाईट्स, दरवाजे, पंखे, सिलेंडर खालून बंद आहे ना याची खात्री करणे.
* घरातून बाहेर निघताना अगदी जवळच्या अंतरावर जाताना सुद्धा मी पाण्याची बाटली सोबत ठेवते.

१) लहानपणापासुनची सवयः जेवताना पहिला घास घेण्याआधी घोटभर पाणी पिउन घसा ओला केल्याशिवाय घास गळ्याखाली उतरत नाही.

२)सार्वजनिक बस/ जीप मधुन जाताना... शक्यतो सीटचे हॅन्डल, वर पकडायचे हॅन्डल, बार यान्ना हात न लावता चढण्याचा प्रयत्न करते. आणि समजा नाईलाजाने धरावे लागलेच तर पुर्ण प्रवासात काही खात नाही. मग कुठेतरी उतरल्यावर हात धुवुनच खायचे. किती लोकान्चे हात त्या बार ला लागले असतील, हा (मायक्रोबायॉ)लॉजिकल विचार सतत डोक्यात चालु असतो. Proud

मला बोटं मोडायची सवय आहे Sad काही सुचत नसेल ; कश्याची वाट बघत असेन; काही वाचत असेन तर लग्गेच बोटं मोडणे चालू होतं

आर्या...डिट्टो. Lol
कधीही बेडवर पाय वर घेऊन बसताना किंवा झोपायला जाताना तळपाय स्वच्छ आहेत की नाही हे बघतेच. रात्री लाइट नसेल तर मोबाईलच्या उजेडात हा प्रकार करते. कधी आळस आलाच असेल तर प्रयत्न करते तसेच पाय वर घेण्याचा, पण मग सतत पायाला माती वगैरे लागली असेल का असे प्रश्न पडतात. So शेवटी पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

जेवताना किन्वा स्वयंपाक करताना आजूबाजूला पसारा आवडत नाही .
बाहेर जेवायला गेलो की ऑर्डर केलेला पदार्थ सगळ्याना वाढून कधी एक्दा ते भांड रिकाम होतयं असं वाटत राहतं .
दोन तीन रिकामी भांडी किन्वा डिशेस असल्या तर एकात एक घालून ठेवायची सवय आहे.
एक दोन ठिकाणी असं झालायं की बफे ब्रेक्फास्ट केल्यावर टेबलावर बरीच भांडी जमा झाली होती .
सगळ्या बशा एकात एक , वाडगी नीट एका मोठ्या ताटात रचून , सगळे काटे-चमचे एका वाडग्यात , रॅपर्/टिश्यु पेपर वेगळ्या डिशमध्ये गोळा करून . असं जमा करून ठेवलं .
शेवटी टेबल आवणाराही माणूसच आहे , त्याला पसारा करून त्रास का द्या हा विचार नेहमी डोक्यात असतो .

>>* घरातून निघताना सर्व लाईट्स, दरवाजे, पंखे, सिलेंडर खालून बंद आहे ना याची खात्री करणे.<< दक्षे, कन्या रास काय गो तुझी Wink

कोणी लिंबू आणि पाणी असलेल्या फिंगर बाऊल मध्ये हात पुसलेला टिश्यू टाकला किंवा पोह्यातली कढिपत्त्याची पानं ताटात बाजूला न काढता बाहेर टेबलवर काढून ठेवली की माझा हल्क होतो.
काही लोक कॉफी, बोर्नव्हिटा ची पाकिटं तिरकी त्रिकोणी फुल कट न देता फक्त एक आडवी चीर येईल (आणि वरचा भाग तसाच राहील) अशी कापतात.त्याने बहुधा हवा कमी जात असली तरी प्रत्येक वेळी ती गॅप बरबटून त्यावर कॉफी किंवा बोर्नव्हिटा चा थर साठून तो चिकट होतो. असे पाकिट कोणी फोडलेले पाहिले की माझा हल्क होतो.
(गाडीचे दार चुकून जोरात आपटले की नवर्‍याचा हल्क होतो.)

सकाळी झोपेतून उठल्यावर पांघरुणाची आणि जमिनीवर असेल तर अंथरुणाचीही घडी घालून ठेवणे (घडी घालण्यात ओसीडी सिच्युएशन- टोकाला टोकं मिळाली पाहीजेत कापडाची)

टॉयलेट्स बाथरूम्स वापरायला जाताना कोरडीच हवीत आणि बाहेर पडतांना पाणी वगैरे वाईप करून साबण इ त्या त्या जागेवर ठेवूनच निघणे
टॉयलेट मध्ये पुस्तक, चत्राफोन/पॅड नेणे

हळू-हळू रमत-गमत जेवण खाणं अजिबात जमत नाही

कश्याही अवस्थेत पुस्तक वाचणे - पडून, लोळत, आपण पलंगावर आणि पुस्तक खाली जमिनीवर इ...

नखं कुरतडणे, हाता-पायाची बोटं, मान मोडणे

किचन मध्ये काम करतांना पसारा चालतो पण जेवायच्या आधी सगळं चकाचक करून मग जेवायला घेणे

री प्रत्येक वेळी ती गॅप बरबटून त्यावर कॉफी किंवा बोर्नव्हिटा चा थर साठून तो चिकट होतो. असे पाकिट कोणी फोडलेले पाहिले की माझा हल्क होतो.>>>+१११
अगदी अगदी .. त्यातलाच दुसरा प्रकार म्हणजे फिरकीच्या झाकणाच्या बरणीच झाकण घट्ट फिरवून न लावता तसच वरच्यावर ठेऊन जाणे .. म्हणजे मागच्या माणसाचा पोपट झालाच पाहिजे आणि वर सांडलेल्या गोष्टी भरायचा व्याप आहेच ..
अवांतराबद्दल सॉरी ..

तळपाय अस्वच्छ झालेले अजिबात सहन होत नाही.
कारमध्ये म्युझिक व्हॉल्यूम १२, १५ किंवा २१ च ठेवतो.
कुणाकडे जेवायला गेलो तर प्रथम जेवढे वाढले तेवढेच खातो, पुन्हा घेत नाही.
अनोळखी मानसासमोर जेवण जात नाही.

* घरातून निघताना सर्व लाईट्स, दरवाजे, पंखे, सिलेंडर खालून बंद आहे ना याची खात्री करणे.<< दक्षे, कन्या रास काय गो तुझी Wink >> लग्न रास.

सकाळी झोपेतून उठल्यावर पांघरुणाची आणि जमिनीवर असेल तर अंथरुणाचीही घडी घालून ठेवणे (घडी घालण्यात ओसीडी सिच्युएशन- टोकाला टोकं मिळाली पाहीजेत कापडाची) >> तु माझा भाऊच.
कपडे वाळत घालताना मला जाम सिमेट्री लागते.

मला काहीही काम करताना मोजायची सवय आहे.
म्हणजे जेवताना आपण चार चपात्या खातो तर मोजून खातो. दहाबारा पुर्‍या खाल्या तर त्याही मोजून खाऊ शकतो. पण मी ६०-६५ शंकरपाळ्या खाल्या तर त्याही मोजून खातो. किंबहुना नकळत मोजल्या जातात. म्हणजे मोजणे एके मोजणेच करतो असेही नाही. एखादे पुस्तक वाचत वा मायबोलीवर टाईमपास करत शंकरपाळ्या खात असलो तरी बॅक ऑफ द माईण्ड ६१-६२-६३-६४ अशी मोजमजा चालू असते.
खाणे हे एक मोजदादाचे उदाहरण झाले.
पण मी लिहिताना शब्दही मोजतो, चालताना पावले मोजतो, कधीतरी शून्यात नजर लागली असते आणि सेकंद काट्याची टिकटिक मोजत असतो. ते देखील सहज चार-पाच मिनिटे हे करत ३००-३५० आकडे मोजून मोकळा होतो Happy

आता या मोजमापाच्या कौशल्याला मी अधूनमधून चेकही करतो.

सकाळी आंघोळीला बादली भरायला लावली तर मी मनातल्या मनात आकडे मोजतो. नळाच्या पाण्याचा स्पीड फिक्स करतो आणि डोळे बंद करून मनातल्या मनात आकडे मोजतो. नेमक्या आकड्याला बादली बरोबर भरली असते.

वाटीत शेव खायला घेतो. एकदा नजरेनेच अंदाज घेतो की किती शेव असतील. आणि मोजत मोजत खातो, आपला अंदाज बरोबर आहे का हे चेक करतो. जवळपास बरोबर्रच असतो.

एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी चालत जायचे आहे. मनातल्या मनात हिशोब करतो की किती पावले असतील. आणि पावले मोजत चालतो. १ ते दोन टक्के ईकडे तिकडे, अंदाज बरोबरच निघतो Happy

बरंच आहे, स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पहिल्याच सवयीबद्दल निबंध लिहू लागलो तर बाकीच्या राहतील.

व्हय दक्षे, मलापण कपडे वाळत घालतांना कसेही घातलेले अजिबातच आवडत नाहीत. टोकाला टोकं जुळलेली हवीतच...

वरच्या माझ्या लिस्टीत चा राह्यला. दिसभर नाही मिळाला तरी चालेल पण सकाळी पहिला चा (तो ही स्वतः केलेला शक्यतो) टंपाळभर हवाच. ते १०-१५ मिंट फुलटू 'मी टैम'.

आमच्या घरी सर्वांची सकाळ या क्रमवारीत सुरू होते,
१. ब्रश
२. टू नंबर
३. आंघोळ
४, ५. चहा सोबत नाश्ता

माझी क्रमवारी अशी आहे.

१. उठल्या उठल्या मला चहा लागतो. एकेकाळी मी ब्रश केल्याशिवाय काही खायचो नाही. टिपिकल मिडलक्लास मेंटेलिटीचा होतो. आता मात्र बेड टी शिवाय अंगावरची चादर हलत नाही.
२. चहा पिऊन तरतरी आली की आंघोळीला जातो. या क्रमांक एक आणि दोन ने झोप उडते.
३. आंघोळ झाली की पाण्यात भिजल्याने थोडी भूक लागते. पुन्हा चहा. पण आता सोबत काहीतरी खातो.
४. ब्रश नंतर सावकाश करतो. जे खाल्लेले असते ते तोंड साफ होते. तोंडाला छान वासही येतो. ट्रेनच्या प्रवासात कोणी शेजारी असेल त्यालाही बरे वाटते.
५. टू नंबरला ब्रश करायच्या आधी वा नंतर कधीही जातो. ऑफिसला उशीर होत असेल तर ऑफिसलाच जातो. तर कधी वेळेवर तयारी झाली असली तरी टू नंबरला न जाता त्या वाचलेल्या वीस पंचवीस मिनिटांत पुन्हा झोपून घेतो.

सुट्टीच्या दिवशी मात्र सारी गडबड होते.
आंघोळ करतच नाही.
टू नंबरला फुल्ल प्रेशर येईल तेव्हाच जातो.
ब्रश मूडनुसार करतो
आणि चहा नाश्ता स्वत:च्या हातानेच गरम करून घ्यावा लागतो. त्यामुळे कडकडून भूक लागेल तेव्हाच ते कष्ट घेतो Happy

दक्षिणाच्या सगळ्या सवयी सेम माझ्या साबांसारख्याच आहेत. मला वाटले साबांनी दक्षिणाचा आयडी हॕक केला की काय Proud
पण आता मलाही त्या सवयी लागल्या आहेत फक्त कपडे वाळवणे व घड्या घालण्याची पद्धत सोडून, त्या सवयी नवर्याला आहेत.

भभा चा पहिला प्रतिसाद वाचताना जाणवले नाही त्यांचा आहे मला सचिन काळे नाव असेल खाली असे वाटत होते, निघाले भास्कर शेठ.

दुसरा मात्र वाचायला सुरू केला की ओळखला.

Pages