हिपोक्रसी १ - हुंडा

Submitted by कटप्पा on 6 July, 2018 - 12:55

स्थळ - कॅफेटेरिया

ती - काय रे लग्नासाठी मुली बघतोयस ना. काही प्रगती होतेय का?

तो - नाही ना. अजून काही नाही.

ती (हसून) - हुंडा वगैरे मागत नाहींयस ना?

तो - नाही. का विचारले असे?

ती - मी हुंड्याच्या अगदी विरूद्ध आहे. मुलांकडचे लोकांना पैसा सोडून काही दिसत नाही का. माझे एथिक्स आहेत, त्यामुळे मी खूप स्थळे नाकारली.

तो- बरोबर आहे. तुझे याच वर्षी लग्न झाले, तू नवरा कसा निवडलास?

ती- माझे निकष आधीच स्पष्ट होते. मुलाचा पगार माझ्या दुप्पट असला पाहिजे आणि स्वतःचा फ्लॅट हवा 2 bhk.

तो - हाच फक्त criteria होता?

ती - हो.

तो( shocked आणि मनातल्या मनात) - तू मोरल एथिक्स च्या गोष्टी करते आणि नवरा फक्त पगार च्या criteria वर निवडते?

मी हुंड्या च्या विरोधात आहे पण आयुष्यभराचा जोडीदार केवळ पैश्याच्या बेसिस वर निवडणे हे देखील चूकच आहे या मताचा आहे !!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पगार आणि घर हा फर्स्ट क्रायटेरिया होता,
ही अट पार केली की मग स्वभाव जुळणे वगैरे...

"ती" चे अगदीच चुकले असे म्हणता येत नाहीये,

एवी तेवी ठरवूनच लग्न करायचे आहे ना? मग काहीतरी निकष लागणारच

अरेंज मॅरेजमध्ये जे प्रत्यक्षात समोर दिसतेय तेच बघावे लागते.
जसे की रंग, रूप, सौंदर्य कसेय? पगार किती आहे? भावंडे किती आहेत? सासू प्रत्यक्षात आहे की फोटोत आहे? स्वत:चे घर आहे का? त्या घरात ईतर खाणारी माणसे किती आहेत? फेसबूकवर फ्रेंड किती आहेत? त्यात पोरी किती आहेत? त्यातल्या फोटोला वरचेवर लाईक करणारया किती आहेत? पोराला व्यसने किती आहेत? दारू पितो का? रोज पितो का? कशी पितो? तोंडाला वास मारतो का? पिऊन बायकोला मारतो का? आई मीन मारेल का? .. वगैरे वगैरे...

बाकी स्वभाव बघणे, केमिस्ट्री जुळवणे वगैरे प्रकार लव्हमॅरेजला ठिक आहेत.

? पगार किती आहे? भावंडे किती आहेत? सासू प्रत्यक्षात आहे की फोटोत आहे? स्वत:चे घर आहे का? त्या घरात ईतर खाणारी माणसे किती आहेत? फेसबूकवर फ्रेंड किती आहेत? त्यात पोरी किती आहेत? त्यातल्या फोटोला वरचेवर लाईक करणारया किती आहेत?>>
माहिती काढताय की जनगणना करताय?

विलभ, छोटे कुटुंब सुखी कुटुंब. आपल्याकडे बायकोने नवरयाकडे राहायला जायची पद्धत असल्याने प्रत्येक स्त्रीला सासरचे नातेवाईक कमीच हवे असतात.

च्रप्स, ते तर महत्वाचे प्रश्न आहेत. कोणत्या स्त्रीला मारहाण करणारा पुरुषी अहंकार असलेला नवरा आवडेल?

पगाराच्या अपेक्षेत काही चूक नाही. उद्या हीच पगाराची अपेक्षा मुलाने मुलीकडून ठेवली तरी तितकेच बरोबर आहे. कारण दोन्ही केस मधे लग्नानंतर त्यांना किती पैसा लागेल यावरून ती अपेक्षा आहे. आता "फक्त" पगाराची सोडून दुसरी कसलीही अपेक्षा नाही हे विचित्र असले, तरी त्यात नैतिक घोळ काही नाही. फक्त विअर्ड आहे. याउलट हुंड्याची मागणी ही मुलीच्या आई-बापांकडून आपल्या कमाईचा नसलेला पैसा उकळण्याचा प्रकार आहे.

मुलीने तिच्या अटी “तोंडावर“ सांगितल्या आणि आपलं पारडं मोजलं तर बरेच आहे ना... ठरवून केलेले लग्न हा व्यव्हारच आहे.
लग्नाच्या वेळी माझ्या आई बापाला फुकट पैसा हुंडा म्हणून दे आणि तु सुद्धा असे मागणे केले नाही ना?
दुसर्‍याचा पैसा हडपणे ते सुद्धा दुसर्‍याला कमी लेखून( “मुलीकडचे” म्हणून हुंडा द्या) हे कुठे योग्य आहे?
——-
आम्ही आपले कुठलेच निकष न लावून प्रेम विवाह केले आणि उभारले. काही मुली हुशार असतात हे बरेय. नाहितर हुंडा पण द्य॑ आणि चाळीत रहा ...

फा, सिम्बा +1
हुंडा बेकायदा आहे. बाकी कोणी पैसे, शिक्षण ते धर्म जात पोटजात काय वाट्टेल ते बघितलं तर ज्याचा त्याचा प्रश्न.

< ठरवून केलेले लग्न हा व्यव्हारच आहे.>
>> ठीक. व्यवहार म्हणजे काहीतरी देवाण घेवाण असणार. कशाच्यातरी बदल्यात काहीतरी.

===
< पगाराच्या अपेक्षेत काही चूक नाही. उद्या हीच पगाराची अपेक्षा मुलाने मुलीकडून ठेवली तरी तितकेच बरोबर आहे. कारण दोन्ही केस मधे लग्नानंतर त्यांना किती पैसा लागेल यावरून ती अपेक्षा आहे. >
>> हेदेखील ठीक. दोघेही कमावणारे, आयुष्यभर कमवत राहणारे असतील तर!

===
फक्त आता मला एक सांगा मुलीचे किंवा मुलीच्या आईवडिलांचे काहीही आर्थिक काँट्रीब्युशन नसलेला (मुलाने स्वतः एकट्याने किंवा आईवडिलांची मदत घेऊन घेतलेला) 2bhk नक्की कशाचा मोबदला म्हणून मागितला जातोय?

मुलगी नक्की काय ऑफर करतीय inreturn?

मागणी आणि पुरवठा. सिम्पल. टू बी एच के वाले संपले की वन वाले येतील बोहल्यावर. सेक्स रेशो गंडालाय, सो भोआकफ.

< मागणी आणि पुरवठा. सिम्पल. टू बी एच के वाले संपले की वन वाले येतील बोहल्यावर. सेक्स रेशो गंडालाय, सो भोआकफ. >
>> सेक्स रेशो गंडलाय. ठीक.

पण निम्न वर्गातल्या पुरुषांचं काय चालुय? मिळतायत का त्यांना बायका उपभोगायला आणि पोरं काढून द्यायला? मुलगा हवा म्हणत 4-5 बाळंतपण लादली जातायत का त्या बाईवर? चार घरी भांडी घासून घर चालवणाारी ती बाई, दिवसभर गोटया खेळत बसनाऱ्या, रात्री दारु पीऊन मारहाण करणाऱ्या नवऱ्याची शेज गरम करतेच आहे का?

गरिबांनी मुलं जन्मला घालायचीच नाहीत का हा प्रश्न विचारताना "एक अजिबात लायकी नसलेल्या पुरुषाचे जीन्स carry forward करणारे 4-5 जण आहेत पण तेच 2bhk देऊन एकच बाई मिळवणारा 1च पोर जन्माला घालतोय हे त्याच्यासाठी biological disadvantage नाही का?" असा प्रश्न पडतो का?

सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे कितीही क्रुर वाटलं तरी तेच होणारे. जास्त मुलं जन्माला घाला का कमी, पालन पोषण नाही केलत तर ऑफस्प्रिंग दुबळेच निपजतील.
फार विचार केला की फस्ट्रेशन येईल. बरं, म्हणून ग्राउंड लेव्हलला काही मी करीन तर ते सध्या तरी नाही. उन्हे अपने हाल पे छोड दो. आपण आपली आणि आपल्या ऑफस्प्रिंगची काळजी करुया हा स्वार्थी विचात बरा.

Survival of the fittest" is a phrase that originated from Darwinian evolutionary theory as a way of describing the mechanism of natural selection. The biological concept of fitness is defined as reproductive success. In Darwinian terms the phrase is best understood as "Survival of the form that will leave the most copies of itself in successive generations."

Herbert Spencer first used the phrase, after reading Charles Darwin's On the Origin of Species, in his Principles of Biology (1864), in which he drew parallels between his own economic theories and Darwin's biological ones: "This survival of the fittest, which I have here sought to express in mechanical terms, is that which Mr. Darwin has called 'natural selection', or the preservation of favoured races in the struggle for life."[1]
सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे इथे लागू पडत नाही, असं मला वाटतं.

आपला चॉइस 2BHK + माझ्यापेक्षा दुप्पट पगार असा ठेवायला त्या मुलीकडेही काही असेलच. म्हणजे मुलाला हवं तसं फॅमिली बॅकग्राउंङ, शिकलेली असूनही करियरच्या मागे न लागणारी. इ.इ.
हे इ.इ. काहीही असू शकेल.
माझा कॉलेजातला सगळ्यात जवळचा मित्र करियरमध्ये सेटल होणं ते लग्न या मधल्या फेजमध्ये असताना ट्रेनमध्ये भेटलेला. तो सीए+कॉस्ट अकाउंटंट+ कंपनी सेक्रेटरी. त्याची अपेक्षा होती, डॉक्टर वगैरे झालेली पण घरी बसायला तयार असलेली.

हा मला मोठाच शॉक होता.

पैसा असला तर मुलांना वाढवता येते/ मला जी लाईफस्टाईल हवी आहे ती ठेवता येते हे माझ्यापुरते सत्य आहे. सुदैवाने खाणे पिणे, औषध पाण्याची आबाळ होणार नाही असं सध्या तरी वाटतय, सो पुढे उद्या मुलांचा युनिवर्सिटीचा (जर गेले तर) (काही) खर्च आम्हाला करता आला तर त्यांच्या डोक्यावर नंतर कर्ज कमी राहिल. शैक्षणिक कर्ज फेडणं महाकठिण असतं. मी माझ्या ऐपती पेक्षा जास्त मुलं जन्माला घातली तर सगळ्यांचा खर्च अर्थातच मला परवडणार नाही. आता प्रत्येकाच्या ऐपती नुसार आणि ठोकताळ्यांनुसार काय दिलं म्हणजे चांगलं/ वाईट हे प्रत्येक जण ठरवेल.
मी दुसर्‍याने काय निर्णय घ्यावा हे कदापि जज करणार नाही. कोणाला काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे यावर दुमत नाहीच.

सर्वायवल अशा साठी म्हटलं की आजारपण आलं आणि पैसे नसले, आई/ बाप संसाराची घडी सावरुन धरायला दोन/ तीन कामं करत असले तर मुलांकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. मॉस्लोच्या गरजांप्रमाणे पिरॅमिडचा खालील भाग भरत नाही तोवर माणूस वर जात नाही. आणि वर गेलेली व्यक्ती लौकिकार्थाने यशस्वी मानली (हे अझम्शन आहे हे ही मान्य आहे, पण मी याच वृत्तीचा आहे, संत नाही) तर ...
मी समजावण्यात कमी पडत असेन, पण सर्वायवल हे जीवन मरण/ ऑफस्प्रिंग च्या पुढे काही तरी विचार डोक्यात होता. कदाचित चुकीचा असेल शब्द. आय डोंट नो.

बोल्ड केलेला भाग आधीपासून माहीत आहे.
हे या धाग्यावर फारच अवांतर आहे, तरीपण.
प्रामुख्याने अविकसित देशांतले गरीब लोक मुलं जन्माला घालण्याचा, त्यांच्या संख्येचा निर्णय कसा घेतात याची (मायक्रोइकॉनॉमिक ) हाउसहोल्ड थियरी ऑफ फर्टिलिटी आहे.
यात एक महत्त्वाचा मुद्दा number of surviving children, that too male children असा आहे. म्हणजे मुलांचा मृत्यूदर अधिक असणार हे गृहीत धरूनच निर्णय होतो.
मूल ही एक गुंतवणूक असते. त्यामुळे मूल जन्माल घालून त्याला वाढवण्यात येणारा खर्च आणि त्या तुलनेत मिळणारे आर्थिक लाभ यांचा विचार होतो.
मुलं लवकर कमवायला लागत असल्याने आणि जन्माला घालण्याचा आणि वाढवण्याचा खर्च तुलनेने कमी असल्याने (मुलांना महागड्या शाळेत घालणं, उच्च शिक्षण देणं, इ. खर्च त्यांना लागू होत नाहीत.
बाळंतपणात आईचा रोजगार बुडणार आहे का? मुळात तो आहे, का? असेल तर किती बुडेल हे आणखी मुद्दे.
शिवाय मुलांपेक्षा बाकीच्या गुड्सबद्दल किती आकर्षण आणि त्यांची उपयुक्तता किती, यावरही कल मुलांकडे जाईल की अन्य गरजा पुरवण्याकडे , हे ठरते. (अन्य गरजा आवाक्यात असतात का?)
ही झाली आर्थिक कारणं.
बाकी सामाजिक, राजकीय, धार्मिक कारणं वेगळी.
म्हणूनच कुटुंबागणिक मुलांची संख्या आटोक्यात ठेवायला आणि जननदर घटवायला
१. अर्भकांचे मृत्यूदर घटवणं, २. स्त्रियांना शिक्षण आणि रोजगार (बाळंतपणामुळे रोजगार बुडणार असेल, तर ते नको) ३. सोशल सेक्युरिटी बेनेफिट्स अमुक इतक्या मुलांपर्यंतच लागू, असे उपाय केले जातात.

याच कारणांमुळे जसजसं वरच्या आर्थिक स्तरात जाऊ, तशी मुलांची संख्या कमी होत जाते. प्रगत किंवा अप्रगतही देशांतल्या अतिसंपन्न लोकांना मुलाची गरजच नाही किंवा ते नकोच हा निर्णयही या थिअरीत बसतोय.

वरील लेखातील जी बाई आहे तिच्या अपेक्षा मुलाचा 10 लाख वार्षिक पगार ( तिचा स्वतःच 5 लाख आहे समजू ) आणि 2bhk आहे. समजा तिला 15 लाख पगार आणि 3bhk वाले स्थळ आले तर ती कोणाला निवडेलं??

2-3 भेटीत
• केस 1: स्वभावाने दोघेही उन्नीसबीसच वाटतायत.
• केस 2: पहिला शारीरिकदृष्ट्या जास्त आकर्षक आहे.

तिने कोनाला निवडावे याबद्दल समाजच/ पुरुषाचं मत नकोय. what will actually happen याचा अंदाज हवाय.

लक्षात ठेवा कि < अरेंज मॅरेजमध्ये जे प्रत्यक्षात समोर दिसतेय तेच बघावे लागते. >

===
https://www.maayboli.com/node/52929 हि एक कथा वाचली. त्यातल्या नायिकेची एकदा दोनदा पाळी आली कि हणम्यासारखा कोणीतरी शोधून, हुंडा देऊन तीच लग्न लावून दिल असणार आहे, atulpatil ने धागा काढला होता त्या पद्धतीने...
त्या बाईला त्याचवेळी जर खोतसोबतची arrangement करता आली असती तर ती तिने केली असती का (कोणताही सामाजिक, कौटुंबिक दबाव नसेल तर!! हा दबाव निर्णयात फार मोठा भाग व्यापतो)

===
आता परत वरील लेखातील बाईकडे जाऊ.
समजा तिला तिसरे एक स्थळ आले. झुक्यासारख्या कोणीतरी proposal दिलं कि तुला 3bhk देतो, 1 मुलगा एक मुलगी जन्माला घालायची. त्यांचा सगळा खर्च मी उचलेन, तुझ्याकडून lifetime sexual services, monogamy ची अपेक्षा नाही. ती कोणाला निवडेल?

===
डार्विन असो किंवा (मायक्रोइकॉनॉमिक ) हाउसहोल्ड थियरी ऑफ फर्टिलिटी असो यात बायका आणि त्यांच्या निर्णयाचा, निर्णय घेण्यास मिलणाऱ्या स्वातंत्र्यचा कितपत विचार केलाय? कि 'कुटुंब' हेच युनिट समजून सगळे लिहीले आहे?

कोणताही सामाजिक, कौटुंबिक दबाव नसेल तर!! हा दबाव निर्णयात फार मोठा भाग व्यापतो)>>>>>>>
हे एक्दम मान्य,

पहिल्या उदाहरणात मध्ये , अशावेळी दुसरे फॅक्टर्स काम कटू लागतात
1) आकर्षक म्हणजे किती? एक्दम रिथिक रोशन? की दुसर्यापेक्षा 10%बरा दिसतो
२) दुसरा साधारण म्हणजे किती साधारण आहे? अगदी कुरूप आहे? की ok ओक आहे?
हे सगळे रिलॅटिव्ह स्केल वर असेल असे मला वाट्ते

पुढची 2 उदाहरणे मला ओव्हर अनलिसिस वाटली, जी 99% केसेस मध्ये येणार नाहीत , त्यामुळे त्यांच्यासाठी पास.

तिची एलिमिनेशनची अट इतका पगार, एवढं घर असेल, तर मग त्यातून समोर येणार्‍या चॉइसमध्ये ती बाकीच्या गोष्टींचा विचार करू शकेल.
आता प्रत्येक व्यक्ती कसा विचार करत असेल, याची कल्पना नाही.
मालिकांमध्ये दाखवतात, तसं जावेच्या किंवा बहिणीच्या मुलीला असा असा नवरा मिळालाय, तर मला त्याच्या वरचढ हवा.
माझ्या मैत्रिणीला असा मिळालाय, तर मला त्याच्या वरचढ हवा; असा विचार करतात का?
आता कोणत्य गोष्टीत वरचढ हे पुन्हा वेगवेगळं.

अगदी टूबीएचकेची मागणी नसेल, खाली उतरू. किमान स्वतःची जागा, स्थिर नोकरी अशी अपेक्षा ठेवत असतील.
अजूनतरी लग्न म्हणजे (माहेरच्या तुलनेत) एक स्थिर, सुखावह आयुष्य, असा विचार करणार्‍या मुलीच संख्येने अधिक असाव्यात.

सहजीवनासाठी लग्न असा विचार करणार्‍या किती? करणारे किती?

(म.म. पुरता विचार केला तर )रूढार्थाने दबाव नसला तरी कंडिशनिंग झालेले असणे आणि विचार करायला शिकलेले नसणे आणि घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी हा घटक ही असावा.

<गरिबांनी मुलं जन्मला घालायचीच नाहीत का हा प्रश्न विचारताना "एक अजिबात लायकी नसलेल्या पुरुषाचे जीन्स carry forward करणारे 4-5 जण आहेत पण तेच 2bhk देऊन एकच बाई मिळवणारा 1च पोर जन्माला घालतोय हे त्याच्यासाठी biological disadvantage नाही का?" असा प्रश्न पडतो का?>

मुलं पोसण्याची लायकी इतकाच क्रायटेरिया नसेल, तर हे वाक्य पटलं नाही. म्हणजे सगळ्यालाच पैशाच्याच फुटपट्ट्या लावणं.

स्पर्म बँका आठवल्या.

विल & ग्रेसच्या परवा दाखवलेल्या भागतून
GRACE: You bought Nathan a motorcycle! I'm the girlfriend. I'm the one who's supposed to give the best gift, and now, thanks to four credit cards, 100,000 frequent-flyer Miles and an application to sell Will's sperm on the Internet, I do.

< 1) आकर्षक म्हणजे किती? एक्दम रिथिक रोशन? की दुसर्यापेक्षा 10%बरा दिसतो
२) दुसरा साधारण म्हणजे किती साधारण आहे? अगदी कुरूप आहे? की ok ओक आहे?
हे सगळे रिलॅटिव्ह स्केल वर असेल असे मला वाट्ते>
>>
मी दिलेल्यापैकी
• केस 1 मध्ये 99.99% शक्यता दुसऱ्याला निवडणार अशीच असणार याबद्दल दुमत नसावं. So woman choose highest bidder/ provider among available options म्हणता येईल.
• केस 2 मध्ये पहिल्या आणि दुसर्यातला जो पैशाचा फरक आहे तो शारीरिक आकर्षकता मुद्यातून भरून निघतोय. म्हणजे एकूण गुण दोघांचे समान होतायत. हा आता ट्रीकी भाग झाला. मग कोणाची निवड करेल ती? जैविक/नैसर्गिक instinct ला महत्व दिले जाईल कि पैसा या अनैसर्गिक गोष्टीला? दुर्दैवाने मला वाटते कि 85-90% स्त्रिया पैशाला महत्व देतील. कारण < अरेंज मॅरेजमध्ये जे प्रत्यक्षात समोर दिसतेय तेच बघावे लागते.>

===
< हिपुढची 2 उदाहरणे मला ओव्हर अनलिसिस वाटली, जी 99% केसेस मध्ये येणार नाहीत , त्यामुळे त्यांच्यासाठी पास. >
>> over analysis आहे असं मला तरी वाटतं नाही. प्रतिसादात लेखातल्या बाईचे basic criteria defend केले आहेत बर्याचजणांनी, त्या विचारसरणीचंच हे extension आहे.

===
< अजूनतरी लग्न म्हणजे (माहेरच्या तुलनेत) एक स्थिर, सुखावह आयुष्य, असा विचार करणार्या मुलीच संख्येने अधिक असाव्यात. >
>> हो उच्चं, मध्यम वर्गात असच असणार.

< सहजीवनासाठी लग्न असा विचार करणार्या किती? करणारे किती? >
>> ह्ये ह्ये Lol सहजीवनसाठी लग्न वगैरेची गरज नसावी. दोघे भिन्नलिंगी असायचीदेखील गरज नसावी. आपण सहजीवनासाठी लग्न केलं अशा समजूतीत कोणी असेल तर ते स्वतःला आणि इतरांदेखील फसवतायत.

===
< (म.म. पुरता विचार केला तर )रूढार्थाने दबाव नसला तरी कंडिशनिंग झालेले असणे आणि विचार करायला शिकलेले नसणे आणि घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी हा घटक ही असावा. >
>> सहमत आहे.

===
< मुलं पोसण्याची लायकी इतकाच क्रायटेरिया नसेल, तर हे वाक्य पटलं नाही. म्हणजे सगळ्यालाच पैशाच्याच फुटपट्ट्या लावणं. >
>> "उत्क्रांतीच्या दृष्टीकोनातून स्त्रिया provider च्या शोधात असतात" असे म आं जा वरच वाचलेले. गुहेत रहात होतो तेव्हापासून स्त्रिया provider पुरुष शोधतात. पाळी, गर्भार, बाळंतपण अशी जवळपास invalid असताना अन्न आणून देऊ शकेल असा पुरुष! लिहिणारे, defend करणारे प्रखर स्त्रीवादी, पुरोगामी वगैरे होते.
जनानखाना किंवा अल्फा मेलची रखेल बनून राहणे यात स्त्रियांचा खरोखरच loss होता का? कि निम्नवर्गातल्या/ nonalpha पुरुषच्या दृष्टीने भीतीदायक असल्याने तो विचार तिच्यावर थोपवला गेला याचा विचार करतेय.

म्हणूनच आता कितीही hypothetical वाटल्या तरी overanalysis वाटणाऱ्या त्या दोन उदहरणांची/प्रश्नांची उत्तरं स्त्रियानी शोधायला हवीत.

<"उत्क्रांतीच्या दृष्टीकोनातून स्त्रिया provider च्या शोधात असतात" असे म आं जा वरच वाचलेले. गुहेत रहात होतो तेव्हापासून स्त्रिया provider पुरुष शोधतात. पाळी, गर्भार, बाळंतपण अशी जवळपास invalid असताना अन्न आणून देऊ शकेल असा पुरुष!>
माझ्या वाचनात आलंय की शेतीचा शोध लागेपर्यंत स्त्रीपुरुष समानच होते. शेतीचा शोध लागला आणि स्त्री दुय्यम ठरू लागली. कारणं आठवत नाहीत.

आपल्याकडच्या मातृसत्ताक कुटुंबपद्धतीचं पितृसत्ताक कसं झालं आणि त्याला विरोध करणार्‍या स्त्रियांचं(कुलांचं) काय झालं याबद्दलही एका स्त्रीवादी मासिकात वाचलेलं. त्यावर मत बनवावं इतकं वाचन/विचार केलेला नाही.
त्या सुप्रसिद्ध होमो सेपियन्समध्ये आहे का याबद्दल?
(अवांतर : तुम्ही ग्रुपपुरती मर्यादित वाहती पानं वाचता का? अशा अवांतर चर्चा करायला बरी पडतात Wink )

लग्न ही एक कमिटमेंट/४५-५० वर्षांची नोकरी मानल्यास, ज्यात शारीरीक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक आणी भरपूर कौशल्ये लागतात.
अश्या नोकरीत शिरताना दोन्ही पार्टीनी स्किल्स, वर्क प्लेस, तिथे कॉफी मशिन आहे का/इतर पर्क्स आहेत का/जागा ऐसपैस आहे का/उमेदवाराच्या अपेक्षा/कोलॅबोरेशन कडून दुसर्या पार्टीच्या उमेदवाराबद्दल अपेक्षा वगैरे सर्व थोडेफार जुळतेय हे पाहून मग पुढे पाऊल टाकणे यात फार काही गैर नसावे.
थोडे चांगले लोक याला सामंजस्याने एक जॉइंट व्हेंचर मानून एकमेकांना चांगले वागवतील, माहिती नीट विचारतील.थोडे वाईट लोक याला धंद्याचे स्वरुप देऊन घराचा एरिया, मुलीचा रंग, कार चा ब्रँड वगैरे विषय थेट तोंडावर काढून डायरेक्ट डिल चे स्वरुप देतील इतकेच.
बट इट्स अ डील.

AMi - तुमचे प्रतिसाद पटतात पण एक गैरसमज तुम्हाला आहे की स्त्री ला सेक्स नको असते. आणि एखाद्याने ऑफर दिली की फक्त 2 मुले जन्माला घातली की सेक्स नाही करणार तर मला नाही वाटत ती मुलगी अशी ऑफर ऍक्सेप्त करेल.
हा वेगळा विषय आहे पण sexual pleasure स्त्री ला तितकेच हवे असते जितके पुरुषाला आणि कित्येक घटस्फोट या कारणाने देखील होतात , कित्येक विबांस देखील याच मुख्य कारणाने होतात.

Pages