Submitted by कटप्पा on 6 July, 2018 - 12:55
स्थळ - कॅफेटेरिया
ती - काय रे लग्नासाठी मुली बघतोयस ना. काही प्रगती होतेय का?
तो - नाही ना. अजून काही नाही.
ती (हसून) - हुंडा वगैरे मागत नाहींयस ना?
तो - नाही. का विचारले असे?
ती - मी हुंड्याच्या अगदी विरूद्ध आहे. मुलांकडचे लोकांना पैसा सोडून काही दिसत नाही का. माझे एथिक्स आहेत, त्यामुळे मी खूप स्थळे नाकारली.
तो- बरोबर आहे. तुझे याच वर्षी लग्न झाले, तू नवरा कसा निवडलास?
ती- माझे निकष आधीच स्पष्ट होते. मुलाचा पगार माझ्या दुप्पट असला पाहिजे आणि स्वतःचा फ्लॅट हवा 2 bhk.
तो - हाच फक्त criteria होता?
ती - हो.
तो( shocked आणि मनातल्या मनात) - तू मोरल एथिक्स च्या गोष्टी करते आणि नवरा फक्त पगार च्या criteria वर निवडते?
मी हुंड्या च्या विरोधात आहे पण आयुष्यभराचा जोडीदार केवळ पैश्याच्या बेसिस वर निवडणे हे देखील चूकच आहे या मताचा आहे !!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
{उत्क्रांतीच्या दृष्टीकोनातून
{उत्क्रांतीच्या दृष्टीकोनातून स्त्रिया provider च्या शोधात असतात" असे म आं जा वरच वाचलेले. गुहेत रहात होतो तेव्हापासून स्त्रिया provider पुरुष शोधतात. पाळी, गर्भार, बाळंतपण अशी जवळपास invalid असताना अन्न आणून देऊ शकेल असा पुरुष! }
तोवर विवाहसंस्थेचा शोध लागला नसावा. लोक कळप करून राहत. एकमेकांची काळजी घेत असावेत, असा माझा समज आहे.
च्रप्स,
च्रप्स,
पूर्वी कुठल्यातरी एका धाग्यावरदेखील आपलं याबद्दल बोलणं झालं होतं ना...
मला वाटतं कि एक anonymous सर्वे व्हायला हवा फक्त स्त्रियाचा. वेगवेगळ्या वयोगट, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरांतल्या. त्याखेरीज नक्की काय ते कळणार नाही. मिसळपाववर फक्त स्त्रियांचा ग्रुप आहे किंवा मैत्रीण.कॉम ही साईट आहे. तिथे विचारू शकतील प्रश्न.
मी नाहीय दोन्हीकडे
आधीतर स्त्रीचे वयोगट, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक background जाणून घ्यायचे.
मग sexuality, sexual life बद्दल प्रश्न विचारायचे.
याच स्त्रिया आपापल्या मेडना हे प्रश्न विचारून डेटा भरू शकतील का माहित नाही. हलकल्लोळ होईल बहुतेक
झुक्यासारख्या कोणीतरी
झुक्यासारख्या कोणीतरी proposal दिलं कि तुला 3bhk देतो, 1 मुलगा एक मुलगी जन्माला घालायची. त्यांचा सगळा खर्च मी उचलेन, तुझ्याकडून lifetime sexual services, monogamy ची अपेक्षा नाही. ती कोणाला निवडेल? >>
पण याचा सूर एकंदरीत असा की, माझी सगळी जबाबदारी उचला, मला कसलीही तोशीस नको, त्याबदल्यात तुम्हाला माझ्याकडून हवं तेव्हा (?) शरीरसुख मिळेल . म्हणजे बाईच्या नाड्या आपसूकच झुक्याच्या हातात आल्या की. हा नाहीतर तो, अशी बाई जन्मभर दुसऱ्याच्या हातातली बाहुलीचं.
आर्थिक स्वावलंबन, स्वातंत्र्य याची गरजच काय ?
कदाचित अशा विचारानं आपण स्वतःहून पुरुषावरच परावलंबित्व ओढवून घेतोय, याची बऱ्याच स्त्रियांना कल्पना नसावी.
बाकी एक स्त्री स्वातंत्र्याचा पॉंईंट वगळला, तर डील एक नंबर ! मिळाली तर कुणाला नकोय ?
What am I doing wrong?
What am I doing wrong?
Okay, I’m tired of beating around the bush. I’m a beautiful (spectacularly beautiful) 25 year old girl. I’m articulate and classy.
I’m not from New York . I’m looking to get married to a guy who makes at least half a million a year. I know how that sounds, but keep in mind that a million a year is middle class in New York City, so I don’t think I’m overreaching at all.
Are there any guys who make 500K or more on this board? Any wives? Could you send me some tips? I dated a business man who makes average around 200 - 250. But that’s where I seem to hit a roadblock. 250,000 won’t get me to central park west. I know a woman in my yoga class who was married to an investment banker and lives in Tribeca, and she’s not as pretty as I am, nor is she a great genius. So what is she doing right? How do I get to her level?
Here are my questions specifically:
- Where do you single rich men hang out? Give me specifics- bars, restaurants, gyms
-What are you looking for in a mate? Be honest guys, you won’t hurt my feelings
-Is there an age range I should be targeting (I’m 25)?
- Why are some of the women living lavish lifestyles on the upper east side so plain? I’ve seen really ‘plain jane’ boring types who have nothing to offer married to incredibly wealthy guys. I’ve seen drop dead gorgeous girls in singles bars in the east village. What’s the story there?
- Jobs I should look out for? Everyone knows - lawyer, investment banker, doctor. How much do those guys really make? And where do they hang out? Where do the hedge fund guys hang out?
- How you decide marriage vs. just a girlfriend? I am looking for MARRIAGE ONLY
Please hold your insults - I’m putting myself out there in an honest way. Most beautiful women are superficial; at least I’m being up front about it. I wouldn’t be searching for these kind of guys if I wasn’t able to match them - in looks, culture, sophistication, and keeping a nice home and hearth.
it’s NOT ok to contact this poster with services or other commercial interests
PostingID: 432279810
THE ANSWER
Dear Pers-431649184:
I read your posting with great interest and have thought meaningfully about your dilemma. I offer the following analysis of your predicament.
Firstly, I’m not wasting your time, I qualify as a guy who fits your bill; that is I make more than $500K per year. That said here’s how I see it.
Your offer, from the prospective of a guy like me, is plain and simple a crappy business deal. Here’s why. Cutting through all the B.S., what you suggest is a simple trade: you bring your looks to the party and I bring my money. Fine, simple. But here’s the rub, your looks will fade and my money will likely continue into perpetuity…in fact, it is very likely that my income increases but it is an absolute certainty that you won’t be getting any more beautiful!
So, in economic terms you are a depreciating asset and I am an earning asset. Not only are you a depreciating asset, your depreciation accelerates! Let me explain, you’re 25 now and will likely stay pretty hot for the next 5 years, but less so each year. Then the fade begins in earnest. By 35 stick a fork in you!
So in Wall Street terms, we would call you a trading position, not a buy and hold…hence the rub…marriage. It doesn’t make good business sense to “buy you” (which is what you’re asking) so I’d rather lease. In case you think I’m being cruel, I would say the following. If my money were to go away, so would you, so when your beauty fades I need an out. It’s as simple as that. So a deal that makes sense is dating, not marriage.
Separately, I was taught early in my career about efficient markets. So, I wonder why a girl as “articulate, classy and spectacularly beautiful” as you has been unable to find your sugar daddy. I find it hard to believe that if you are as gorgeous as you say you are that the $500K hasn’t found you, if not only for a tryout.
By the way, you could always find a way to make your own money and then we wouldn’t need to have this difficult conversation.
With all that said, I must say you’re going about it the right way.
Classic “pump and dump.”
I hope this is helpful, and if you want to enter into some sort of lease, let me know.
मला वाटतं कि एक anonymous
मला वाटतं कि एक anonymous सर्वे व्हायला हवा फक्त स्त्रियाचा. वेगवेगळ्या वयोगट, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरांतल्या. त्याखेरीज नक्की काय ते कळणार नाही. मिसळपाववर फक्त स्त्रियांचा ग्रुप आहे किंवा मैत्रीण.कॉम ही साईट आहे. तिथे विचारू शकतील प्रश्न.
>>> कटप्पा- घ्या मनावर एवढे
हा बाफ इतक्या दिवसांनंतर वर
हा बाफ इतक्या दिवसांनंतर वर आला हे माहीत नव्हते.
फक्त आता मला एक सांगा मुलीचे किंवा मुलीच्या आईवडिलांचे काहीही आर्थिक काँट्रीब्युशन नसलेला (मुलाने स्वतः एकट्याने किंवा आईवडिलांची मदत घेऊन घेतलेला) 2bhk नक्की कशाचा मोबदला म्हणून मागितला जातोय?
मुलगी नक्की काय ऑफर करतीय inreturn? >>> इण्टरेस्टिंग पॉइण्ट, अॅमी. मुलाने हुण्डा मागणे आणि मुलीने मुलाचा फ्लॅट असणे ही मागणी करणे यात तसा फरक नसावा.
अहो कटप्पा चा बाफ मग पहिल्या
अहो कटप्पा चा बाफ मग पहिल्या पानावर येणारच ना.
मजा आली असती जर रूनमेश असता माबो वर आणि कॅम्पेतिशन झाली असती धाग्यांची.
ही काय चर्चा चालू आहे इथे???
ही काय चर्चा चालू आहे इथे???
(मला नीट कळत नाही आणि हा पूर्णपणे माझ्या बुद्धीचा दोष असू शकतो)
पण, कुठल्या जमान्यात तुम्ही या चर्चा करताय?
>> पाळी, गर्भार, बाळंतपण अशी जवळपास invalid असताना अन्न आणून देऊ शकेल असा पुरुष!
सिरीयसली?? ह्याचा आत्ताच्या जमान्यात काय संबंध?
>> मुलीने मुलाचा फ्लॅट असणे ही मागणी करणे यात तसा फरक नसावा.
लग्नानंतर फ्लॅट चे emi नवरा बायको जोडीने आपापल्या कमाईतून भरणार असतील तर तो हुंड्याशी इक्विव्हॅलन्ट कसा काय?
की मुलीची अशी अपेक्षा आहे/होती/असते की नवर्याचा फुल ओनरशिप चा 2 BHK असावा ज्यात सासू सासरे किंवा कोणीच सासरचा गोतावळा नसेल?
असं असलं जरी प्रत्यक्षात तरी नवरदेवाला ही अट मान्य असेल तर मिया बीबी राझी ना?
लग्नानंतर फ्लॅट चे emi नवरा
लग्नानंतर फ्लॅट चे emi नवरा बायको जोडीने आपापल्या कमाईतून भरणार असतील तर तो हुंड्याशी इक्विव्हॅलन्ट कसा काय? >>> तसे असेल तर नाही. स्पेसिफि़क्स काय आहेत त्यावर हे ठरेल. आता फ्लॅट एक महिन्यापूर्वी घेतला असेल आणि दोघांनी त्याचे लोन फेडायचे असे असेल तर नक्कीच हुंड्यासारखे नाही.
मी एकूणच असे म्हणतोय की लग्नानंतर दोघांनी स्वकमाईचे जे काही कुटुंबाकरता करावे अशा मागण्या मुलाकडून किंवा मुलीकडून आल्या तर ती हिपोक्रसी नाही. याउलट हुंडा, ऑलरेडी असलेला (व लोन बर्यापैकी फिटलेला, किंवा अत्यंत जुन्या किमतीत मिळालेला) फ्लॅट वगैरे स्वकमाईचे नाही म्हणून त्या अर्थाने सारखे.
>> याउलट हुंडा, ऑलरेडी असलेला
>> याउलट हुंडा, ऑलरेडी असलेला (व लोन बर्यापैकी फिटलेला, किंवा अत्यंत जुन्या किमतीत मिळालेला) फ्लॅट वगैरे स्वकमाईचे नाही म्हणून त्या अर्थाने सारखे.
बरोबर.
पण लिहीणार्याने त्याबद्दल काहीच डिटेल्स दिलेले नाहीत.
तसंच मुलीची अशी अपेक्षा असू शकते की जोपर्यंत फुल ओनरशिप चा २ BHK असलेला तसंच त्या २BHK मध्ये किंवा कसंही सासरच्या बाकीच्या व्यक्तींशी मी संपर्क ठेवणार नाही असं चालवून घेणारा नवरा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही तर तो त्या मुलीचा प्रश्न आहे. कदाचित नाहीच मिळणार असा नवरा मुलगा किंवा मिळेलही पटकन आणि त्यांचं ते बघून घेतील.
ही मुलीची ( जिचा हुंडा पद्धतीला कडाडून विरोध आहे) हिपोक्रसी आहे का? तर कदाचित हो पण ती चालवून घेणारा नवरा मुलगा जर भेटतोय तिला मग कोणाचाही काय इलाज?
अहो असले प्रश्न कोण विचारेल?
अहो असले प्रश्न कोण विचारेल? आणि विचारले तरी कोण उत्तर देईल?
>>>>
च्रप्स, थेट प्रश्न विचारले जात नाहीत. माहिती काढली जाते.
माझे लवमॅरेजच झाले. फसलो. पण अरेंजम केले असते तर प्रायोरीटी अशी असती
1) मुलगी निर्व्यसनी हवी
2) तिच्याकडे वा तिच्या वडिलांकडे भरपूर पैसा हवा आणि तो मला द्यायला हवा.
3) माझ्या सौंदर्याच्या व्याख्येत बसणारी हवी.
यात अमुक तमुकच पहिले का आणि तमुक अमुक तिसरे का किंवा अमुक तमुकचा हट्टच का वगैरे लोकांच्या प्रश्नांना मी का एंटरटेन करू? काय संबंध? तुम्हाला प्रॉव्लेम आहे तर तुमची मुलगी मला नका देऊ. एवढे सिंपल आहे हे.
जोडीदार निवडताना दोन प्रकारे विचार केला जातो.
1) आपली गरज काय आहे?
2) आपली आवड काय आहे?
आता ज्याची त्याची गरज आणि आवड ज्याला त्याला ठाऊक
मी मुलात / मुलीत काय बघावे हे मी वेळ घालवायला क्रिकेट बघावे, पुस्तक वाचावे, गाणी ऐकावी, कि नाचच करावा हे ठरवण्यासारखे आहे. त्याचे उगाच नैतिक मूल्यमापन का करावे म्हणतो मी...
लेटेस्ट दोन्ही प्रतिसादांशी
लेटेस्ट दोन्ही प्रतिसादांशी सहमत फारएण्ड
हुंड्याला विरोध पण ब्राईड प्राईसचे समर्थन हीच हिपोक्रसी आहे लेखातल्या नायिकेची!
===
< सिरीयसली?? ह्याचा आत्ताच्या जमान्यात काय संबंध? >
>> लेखातली स्त्री 'माझ्यापेक्षा दुप्पट पगार आणि स्वतःचा 2bhk' असलेला provider च शोधत आहे ना आत्ताच्या जमान्यात?
< तसंच मुलीची अशी अपेक्षा असू शकते की जोपर्यंत फुल ओनरशिप चा २ BHK असलेला तसंच त्या २BHK मध्ये किंवा कसंही सासरच्या बाकीच्या व्यक्तींशी मी संपर्क ठेवणार नाही असं चालवून घेणारा नवरा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही तर तो त्या मुलीचा प्रश्न आहे. कदाचित नाहीच मिळणार असा नवरा मुलगा किंवा मिळेलही पटकन आणि त्यांचं ते बघून घेतील.
ही मुलीची ( जिचा हुंडा पद्धतीला कडाडून विरोध आहे) हिपोक्रसी आहे का? तर कदाचित हो पण ती चालवून घेणारा नवरा मुलगा जर भेटतोय तिला मग कोणाचाही काय इलाज? >
>> चालेल कि! पण मग हुंडा घ्यायचा कि नाही हादेखील लेखातल्या मुलाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तिथे लेखातली त्रयस्थ बाई कशाला नाक खुपसायला गेली? जोपर्यंत हुंडा देणारे भेटतायत त्याला मग इतर कोणाला काय प्रॉब्लेम आहे? त्यांचते बघून घेतील.
मला इथे एकच मुद्दा वाटतोय,
मला इथे एकच मुद्दा वाटतोय,
हुंडा शब्द हा बहुदा मुलीच्या आई वडीलांकडून घेतलेल्या पैशासाठी वापरला जातो
इथे मुलगी मुलाकडून अपेक्षा ठेवतेय - त्याच्या आई वडीलांकडून नाही. " मुलाने माझ्या आई वडीलांना इतकी रक्कम द्यावी / मुलाकडे वडीलोपार्जित इतका जमीनजुमला असावा / मुलाच्या आई वडीलांनी मुलीला किंवा तिच्या माहेरच्या लोकांना पैसा द्यावा " ह्या अपेक्षा हिप्पोक्रसी ठरतील
मुलानेही मुली कडून काय ज्या असतील त्या अपेक्षा स्पष्ट कराव्यात - मुलीला इतका पगार असावा / अमूक इतकी स्वकष्टार्जित रक्कम बॅंकेत असावी / भरपूर शिकलेली असूनही नोकरी करू नये /नोकरी करावी पण करीअर नको /गोरी असावी / माहेरी संबंध ठेवू नये/ एकत्र कुटुंबात मुलीने सासरी सगळ्यांची सेवाच करत रहावे/ मुलाला घरजावई व्हायचय ... इत्यादी काहीही.
लग्नात अपेक्षा साथीदाराकडून असाव्यात आणि त्या स्पष्ट असाव्यात.
ठीक आहे. मग हुंडा ऐवजी ग्रूम
ठीक आहे. मग हुंडा ऐवजी ग्रूम प्राइस शब्द वापरा आणि ते मुलीनेच द्यायचे, स्वकमाईतून, तिच्या आईवडलानी नाही. चालेल?
म्हणजे मुलाचा स्वतःचा 2bhk असावा म्हणलं कि own contribution चे निम्मे पैसे दे आणि पुढचा emi निम्मा देत रहायचा म्हणायच.
पण मग दुप्पट पगार असावा म्हणलंय त्याच काय करावे बरे???
हां आपण दोघे 5-5 लाख एका अकाउंटला टाकू आणि त्यातून खर्च भागवू म्हणायचं
वरच्या उदाहरणामध्ये मुलीने तो
वरच्या उदाहरणामध्ये मुलीने तो फ्लॅट तिच्या नावावर करावा किंवा इतके पैसे तिच्या नावावर करावे अशी अपेक्षा दाखवलेली नाही तेव्हा तुलना थोडी चुकतेय . तरीपण आपल्या स्वकमाईची रक्कम कशी खर्चावी हे ती मुलगी ठरवू शकते .
मला करीअर अगदी झोकून देउन करायची आहे , तेव्हा नवरा जरा कमी प्रेशर च्या कामात असावा म्हणजे तो घरी जास्त लक्ष देईल असं स्पष्ट सांगून ,मुंबईत फ्लॅट केवळ स्वत:च्या उत्पन्नावर घेणारी मुलगी माझ्या नात्यात आहे अगदी सुखाने ,खुषीत संसार चालू आहे
बाकी दुप्पट पगार आणि २ bhk असूनही तिच्या नवर्याने लग्न केले म्हणजे त्याला रूप/ स्वभाव / स्वत:च्या करीअरसोबत तडजोड करणारी असं काहीतरी दिसलं असेलच ना
< वरच्या उदाहरणामध्ये मुलीने
< वरच्या उदाहरणामध्ये मुलीने तो फ्लॅट तिच्या नावावर करावा किंवा इतके पैसे तिच्या नावावर करावे अशी अपेक्षा दाखवलेली नाही तेव्हा तुलना थोडी चुकतेय . >
>> ठीक आहे. मग त्या घराचे निम्मे घरभाडे + डिपॉसिट द्यावे, देत रहावे तिने घरमालकला.
आणि आपल्या मृत्यूनंतर घर मुलांच्या नावे होईल, बायको फक्त ट्रस्टी राहील असे मृत्युपत्र करावे पुरुषाने.
< बाकी दुप्पट पगार आणि २ bhk असूनही तिच्या नवर्याने लग्न केले म्हणजे त्याला रूप/ स्वभाव / स्वत:च्या करीअरसोबत तडजोड करणारी असं काहीतरी दिसलं असेलच ना >
>> हो ना. हुंडा देऊन देऊन आपली मुलगीपण देणारे घरं, आईबाप समाजात अजूनही दिसत असतील तर त्यांचीपन काहीतरी गरज भागत असेलच कि हे करून!
नवरा मुलांना ब्रेस्ट फीड केलं
नवरा : मुलांना ब्रेस्ट फीड केलं, डायपर बदलले, at होम मॉम असेल तर चाईल्ड केअर, जेवण केलं, केर काढला, पोस्टमन कडून पत्र घेतलं, भाजी आणली, फ्रीज साफ केला यांच्या खर्चाच्या निम्मे पैसे देणार असेल आणि सासू सासरे असतील तर त्यांच्या काळजीचे सगळे पैसे देणार असेल तर हरकत नाही.
Amy, तुम्ही फार ताणताय असं नाही वाटत का?
मला वर काय लिहिलंय कळतंच
मला वर काय लिहिलंय कळतंच नाहीये. दोन वेळेला वाचून पहिलं! कोण काय म्हणतंय, मुद्दा काय?
<हुंड्याला विरोध पण ब्राईड
<हुंड्याला विरोध पण ब्राईड प्राईसचे समर्थन हीच हिपोक्रसी आहे लेखातल्या नायिकेची!>
<जोपर्यंत हुंडा देणारे भेटतायत त्याला मग इतर कोणाला काय प्रॉब्लेम आहे? त्यांचते बघून घेतील.>
हे पटू लागलंय मला.
इतका वेळ दुप्पट पगार आणि 2BHK घर हा तिचा फक्त क्रायटेरिया आहे, असं समजत होतो. पण अॅमींच्या प्रतिसादांचा विचार केल्यावर त्यासाठी तिला काहीही आर्धिक वाटा उचलायचा नाहीए, हे पटलं.
लग्न ठरवताना आर्थिक स्थिती हा फक्त एक निकष नाहीए, तर मला या लग्नातून या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असा भाव आहे.
ते घर नवर्याने लग्नापूर्वी स्वकमाईतून घेतलेलं असावं किंवा त्याच्या आईवडिलांनी दिलेलं असावं, मला अयतं मिळायला हवं, हे अधोरेखित होतंय.
म्हणजे लग्नाआधीपासून नवर्याचं जे आहे, ते माझं होणारच आहे, लग्नानंतरही त्याचा माझ्यापेक्षा दुप्पट असलेला पगार म्हणजे संसारासाठी त्याने अधिक हातभार लावणं अपेक्षित.
त्यामुळे याची तुलना हुंड्याशी करणं अजिबात वावगं नाही.
नाहीतरी हुंडा म्हणजे आईवडिलांच्या संपत्त्तीतला मुलीचा वाटा द्यायची अप्रत्यक्ष पद्धत असंही मानलं जातं.
शिवाय लग्नानंतर ती संसाराला समान हातभार लावणार नाही, म्हणजे नवर्यावर भार होणार, तेव्हा त्याची किंमत नवर्याने लग्नात हुंडारूपाने वसूल करायला तिची हरकत नसावी. मी करियरचा त्याग वगैरे करीन हा त्तात्त्विक मुलामा झाला.
थोडक्यात समानतेच्या गप्पा मारू नयेत.
आयडियली, मला 2BHK flat हवा असेल, तर माझा अर्धा वाटा मी उचलेन. मग ती लग्नाआधीची बचत असेल, नवर्याचे आईवडील पैसे देत असतील, तर माझेही देतील किंवा लग्नानंतर दोघेही कर्ज काढू, असे पर्याय हवेत.
२बीएचके फ्लॅट चा अर्धा वाटा
२बीएचके फ्लॅट चा अर्धा वाटा हे हल्ली भरपूर लोक करतात.
माझ्या एका मैत्रिणीने होम लोन ला अप्लाय करुन लवकर इ एम आय चालू करायला रजिस्टर लग्न करुन नंतर २ महिन्यांनी फॉर्मल लग्न केले आहे.
मुळात हे शेअरिंग दोन्ही बाजूंनी स्वखुशीने असावे.लादलेले नाही.
इथे ज्यांचा मुद्दा २बीएचके मध्ये मुलगी भाडं/डिपॉझिट्/लोन मध्ये ५०% न घेता राहते तिने अशी अपेक्षा का करावी हा आहे त्यांनी मुलगी/बायको घरी राहिल्याने बेबी सिटिंग्/डे केअर चे महिना १०००० वाचणे, हाऊस किपींग चार्जेस हे मुद्देही विचारात घ्यावेत.
पण ती नवर्याच्या अर्धा पगार
पण ती नवर्याच्या अर्धा पगार कमवणार आहे, म्हणजे घरी राहणार नाहीए.
मग तिने किराणा बिल देणे,
मग तिने किराणा बिल देणे, घरच्या गादीत पेट्रोल टाकणे, इंटरनेट्/कामवाली बाई/पेपरवाला/विजेचे बिल देणे ही कामे स्वखुशीने किंवा जेव्हा सांगितली जातील तेव्हा केलीच असतील ना?
हा पुढचा भाग झाला.
हा पुढचा भाग झाला.
मी ही ही कामे करणार आहे, म्हणून मला माझ्या दुप्पट पगार असलेला नवरा हवा, असं काही म्हणणं आहे का? नवर्याने घरकामाला बोटही लावू नये अशीच तिची अपेक्षा असेल, तर हेही परंपरागतच झालं. मग पुन्हा नेमकं हुंड्यातच काय वाईट आहे , ह प्रश्न उरतो.
@BHK flat आणि दुप्पट पगार हे एक कम्फर्ट लेव्हल आणि स्टेअट्स लेव्हल गृहित धरतात.
हुंडा लग्ना पूर्वीच मागून
हुंडा लग्ना पूर्वीच मागून नंतर बायकोला नीट न वागवणे, राबवणे हाही पुढचा भाग झाला.
हुंड्यात इ एम आय हवाय
३०% लग्नापूर्वी.
३०% लग्नानंतर ५ वर्षांनी चांगले रिव्ह्यूज असले तर
उरलेली लग्नानंतर १० वर्षांनी चांगले रिव्हयूज असले तर
हुंडा हा ऑन पेपर प्रूफ, विटनेस, थर्ड पार्टी अॅग्रीमेंट असा घेतला जावा. इ एम आय ची सोय असावी. वाईट अनुभव आल्यास हुंड्याची लग्न झालेली वर्षे प्रपोर्शनल रक्कम बाईला परत मिळावी.
< थोडक्यात समानतेच्या गप्पा
< थोडक्यात समानतेच्या गप्पा मारू नयेत.>
>> अगदी अगदी!!
बाकी प्रतिसादांशीदेखील सहमत भरत.
===
बाकी
< बायको घरी राहिल्याने बेबी सिटिंग्/डे केअर चे महिना १०००० वाचणे, हाऊस किपींग चार्जेस हे मुद्देही विचारात घ्यावेत. >
>> याची चर्चा कुंडलकरच्या गृहिणी लेखांनंतर झाली आहे. किती वर्ष, दिवसातला किती वेळ बेबी सिटिंग, ब्रेस्ट फीडिंग केलं जातं?
ब्रेस्ट फीडिंगखेरीज इतर सगळ्या कामांची (वृद्ध सासूसासरेंची काळजी घेणे, जेवण केलं, केर काढला, पोस्टमन कडून पत्र घेतलं, भाजी आणली, फ्रीज साफ करणे) मार्केट किंमत माहित आहे. वृद्धांची काळजी खेरीज बाकी सगळे चिप लेबर काम आहे. त्यातून 2bhk आणि 10 लाख पगाराची लाइफस्टाइल मिळत नाही. So just forget about that homemaker फालतूपणा...
===
< Amy, तुम्ही फार ताणताय असं नाही वाटत का? >
>> नाही वाटत. कारण लेखातल्या मुलीच्या विचरसरणीच समर्थन करणारे कित्येक दिसतायत इथे. व्यवहार आहे ना मग मांडुयातच कि सगळा हिशेब एकदा.
>>>>>>>मी हुंड्या च्या
>>>>>>>मी हुंड्या च्या विरोधात आहे पण आयुष्यभराचा जोडीदार केवळ पैश्याच्या बेसिस वर निवडणे हे देखील चूकच आहे या मताचा आहे !!!>>>>>>>>
हे शेवटचे वाक्य सगळ्या फसाद चे मूळ आहे,
ती जोडीदार केवळ पैशाच्या जोरावर निवडत नाहीये.
Intrview ला 65%पेक्षा जास्त असणाऱ्या लोकांनीच यावे असे म्हणतात तेव्हा केवळ पुस्तकी मार्कंवर उमेदवार निवडला असे म्हणत नाहीत,
तसेच 2bhk अँड दुप्पट पगार या मध्ये एक बेसिक राहणीमानाची लेव्हल गृहीत धरली आहे , पुढे स्वभाव, छंद गोष्टी विल follow.
कमीतकमी शब्दात ,जास्तीत जास्त पंच आणायला काही अँगल क्त शॉर्ट झाले असावेत. किंवा प्रत्यक्ष आयुष्यात सामंजस्याने केल्या जाणाऱ्या गोष्टी, लिखित स्वरूपात आल्यावर जास्तच व्यवहारी रोखठोक वाटत असाव्यात.
असो... वांड भाऊंचा आदर्श ठेऊन, इकडेच थांबतो.
तुम्ही थांबताय म्हणालात तरी
तुम्ही थांबताय म्हणालात तरी उत्तर देतोय.
स्वभाव इत्यादी विल फॉलो, या गोष्टीत न दिलेल्या गोष्टी आपण गृहित धरतोय.
मला हवे असलेले राहणीमान मिळवायला इतका इतका खर्च येतो, त्यातले मी इतके कमवते, उरलेले कमवू शकेल, असा नवरा हवा आणि माझ्या दुप्पट पगार मिळवणारा नवरा हवा यांत फरक आहे.
इथे फक्त राहणीमानापेक्षा मी आधे म्हटलं तसं स्टेटस सिंबल, श्रीमंत नवरा पटकावला, हे जास्त दिसतंय.
फक्त राहणीमानाचा मुद्दा असता, तर त्यासाठी मीही अमुकतमुक करणार असा भाग असता. टुबीएचके घर स्व+ नवर्याच्या पगारा/कर्जातून घेतलेलं चाललं असतं.
आणि हे सगळं आपण हुंड्याच्या तुलनेत बोलतोय.
आम्ही आपले कुठलेच निकष न
आम्ही आपले कुठलेच निकष न लावून प्रेम विवाह केले आणि उभारले. >>>>>
काय? राह चलत कुणी भेटला व प्रेम झाले असे होत नाही ना? प्रेमात पडताना त्याचे गुण, रूप, वागणे, बोलणे, चालणे यातले काहीतरी आवडते व माणूस प्रेमात पडतो. अतिशय रूपवान पण पक्क्या दारुड्याच्या प्रेमात कुणी पडेलही पण लग्नाचा जुगार खेळणार नाही. अतिशय गुणी पण कुरूप लोकांच्या प्रेमात प्रथमदर्शनी तरी कुणी पडत नाही. नंतर सहवासाने गुण कळले व प्रेम जडले असे होऊ शकते.
त्यामुळे प्रेमात पडताना काहीही निकष नसतात हे शक्य नाही. तुम्ही प्रत्यक्षात ते निकष ठेवले नसतील पण तुमचे सबकॉन्शस माईंड निर्णय उगीचच घेत नाही.
पुढचा भाग - https://www
पुढचा भाग - https://www.maayboli.com/node/66771
दुर्दैवाने काही लोकांना हुंडा
दुर्दैवाने काही लोकांना हुंडा हा प्रकार कळला नाहीए
हुंडा ही एक प्रथा आहे. ती लादली जाते. समाजातील सगळ्या पोरींचे बाप देताहेत मग तुम्हालाही द्यावाच लागेल. नाहीतर पोरगी घरी बसवा. यामुळे गरीबांना पोरी नकोश्या होतात. त्या गर्भातच मारल्या जातात.
वर अक्षरशा काहीच्या काही तुलना चालू आहे .
Pages