हिपोक्रसी १ - हुंडा

Submitted by कटप्पा on 6 July, 2018 - 12:55

स्थळ - कॅफेटेरिया

ती - काय रे लग्नासाठी मुली बघतोयस ना. काही प्रगती होतेय का?

तो - नाही ना. अजून काही नाही.

ती (हसून) - हुंडा वगैरे मागत नाहींयस ना?

तो - नाही. का विचारले असे?

ती - मी हुंड्याच्या अगदी विरूद्ध आहे. मुलांकडचे लोकांना पैसा सोडून काही दिसत नाही का. माझे एथिक्स आहेत, त्यामुळे मी खूप स्थळे नाकारली.

तो- बरोबर आहे. तुझे याच वर्षी लग्न झाले, तू नवरा कसा निवडलास?

ती- माझे निकष आधीच स्पष्ट होते. मुलाचा पगार माझ्या दुप्पट असला पाहिजे आणि स्वतःचा फ्लॅट हवा 2 bhk.

तो - हाच फक्त criteria होता?

ती - हो.

तो( shocked आणि मनातल्या मनात) - तू मोरल एथिक्स च्या गोष्टी करते आणि नवरा फक्त पगार च्या criteria वर निवडते?

मी हुंड्या च्या विरोधात आहे पण आयुष्यभराचा जोडीदार केवळ पैश्याच्या बेसिस वर निवडणे हे देखील चूकच आहे या मताचा आहे !!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला बापडीला पडलेले प्रश्ण -

१. लग्न करून घरी आलेल्या सुनेने काय काय करावं ह्याची घरातल्या प्रत्येक मेम्ब्राची अपेक्षा सेम आहे का?
२. ह्या मुलीने शेप्रेट घर हवयं, सासरच्या माणसांना बघणार नाही, मुलं बाळ आणि संबधित खस्ता खाणार नाही, पण मला दुप्पट पगार आणि २ बेडरूम हव्यात असे म्हटलयं का?
३. लग्न झाल्यावर घर माझ्या नावावर असं म्हटलयं का?

कथेत तरी ह्या प्रश्णांची उत्तरं मिळत नाहीत.

वर आलेल्या काही प्रतिसादांसारखे अजुन प्रश्ण -
१. जर मुलगी काळी, जाडी, चश्मिस किंवा एकुणातच अनाकर्षक तरी हुशार असेल आणि तिचा बाप बंगला, गाडी आणि मुलीसाठी नियमीत उत्पन्नाची सोय करत असेल तर
२. मुलगी मठ्ठ पण दिसायला सुंदर आणि बाप बंगला इ. देणार असेल तर

ह्यातन सर्वसाधारण माणसं काय निवडतात २-३ भेटीत?

३ समजा मुलगी श्रीमंत, सुंदर असेल आणि एकाही मुलाला जन्म घालू शकणार नसेल आणि तुमच्याकडून मोनोगामीची अपेक्षा धरत असेल तर ,बाकी बाप बंगला, गाडी, इ. पुराण तेच असेल तर

कटप्पा , हुंडा हा विषय/ सामाजिक प्रश्न तुम्हाला अजीबातच कळलेला नाही हे तुमच्या या छोट्याशा लेखावरून लक्षात येतेय. तो खूपच गहन विशय आहे. मूळ कल्पनाच गंडली आहे.
हुंड्याची तुलना मुलाच्या पगाराशी होऊ शकत नाही. हुन्डा ही पुर्ण वेगळी संकल्पना असून त्यामागे खूप मोठा दुर्दैवी , दु:खदायक असा इतिहास , वर्तमान आहे. जरा वर्तमान पत्रातल्या बातम्या वाच्ल्यात तरी थोडेफार ज्ञान मिळू शकेल.

हुन्ड्या एवेजी जसे ती मुलगी नवर्‍याच्या पगारा विषयी म्हणाली तसे , मुलगा देखिल मला नोकरी करणारीच आणि ठराविक 'य' इतका पगार मिळवणारीच मुलगी हवी, असे म्हणू शकतो. आणि त्यात कोणाला काहीही गैर वाटत नाही / वाटणार नाहीच. आजकाल शहरातून अनेक मुले नोकरी करणारीच मुलगी हवी असे सांगतात. तसेच नविन फ्लॅट चा हफ्ता आणि घरखर्च याचा विचार दोघांचा पगार बघूनच केला जातो. मुलींची देखिल याला अजीबात हरकत नसते. मुलींना स्वतःचे घर / फ्लॅट हवा असतो आणि त्यासाठी नोकरी करण्याची त्यांची तयारी असतेच.
पैशाचाच विचार केला असता २०-२५ वर्षाच्या नोकरीत हुन्ड्या पेक्षा कीतीतरी जास्त पैसा मिळणार तेव्हा हुन्ड्या एवेजी 'नोकरी' करणारी बायको हवी , असे सर्वच मुलाकडचे , मुले का म्हणत नाहीत या बद्दल विचार करा.

रच्याकने, वरील उदा. लग्नानंतर दुप्पट पगार मिळवणार्या नवर्‍याची नोकरी गेली, घर गेले तरी त्याची बायको त्याला सोडणार नाही , एकवेळ काही कारणाने सोडले तरी त्याला जाळून मारणार नाही.

डेलिया, योग्य प्रतिसाद.

कधी कधी मुली मागणी करत आहेत ह्याचाच त्रास होतोय का? असा विचार येतो.

मला वाटतं , लग्न करताना प्रतिपक्षाचा फक्त पैसा पाहणं हे मुलानी केलं तर चूक आणि मुलीने केलं तर बरोबर, यात हिपोक्रसी आहे, असं लेखकाला सुचवायचंय. कथा लिहिताना त्यांनी तेवढेच मुद्दे प्रकाशात येतील असं पाहिलंय आणि त्यासाठी हुंड्याचं उदाहरण घेतलंय.

असो.

मला वाटतं , लग्न करताना प्रतिपक्षाचा फक्त पैसा पाहणं हे मुलानी केलं तर चूक आणि मुलीने केलं तर बरोबर, यात हिपोक्रसी आहे -- अगदी बरोबर भरत । हाच माझा लेखातील मुद्दा होता.

2bhk हे मुलाच्या संपत्तीचे माप म्हणून का पाहता?

लग्नाच्या वयापर्यंत 2 bhk घेण्याची धमक, आयुष्यात लवकर केलेली गुंतवणुकीची सुरवात, काढलेले लोन निभावून नेईन याची खात्री, बचतीची सवय, आणि तितके लोन मिळतेय म्हणजे चांगली पत याचे माप म्हणून का पाहत नाही?

म्हणजे मुलाने लोन काढले आहे म्हणजे इतक्या गोष्टी आपोआप येतात ना त्या बरोबर

मला वाटतं , लग्न करताना प्रतिपक्षाचा फक्त पैसा पाहणं हे मुलानी केलं तर चूक आणि मुलीने केलं तर बरोबर, यात हिपोक्रसी आहे, असं लेखकाला सुचवायचंय. कथा लिहिताना त्यांनी तेवढेच मुद्दे प्रकाशात येतील असं पाहिलंय आणि त्यासाठी हुंड्याचं उदाहरण घेतलंय. >>

मलाही असंच वाटलं, भरत.

<<< तो - हाच फक्त criteria होता?

ती - हो. >>> ह्या ओळी हे (माझ्यासाठी तरी) अधोरेखित करतात.

तो - हाच फक्त criteria होता?
ती - हो.
>>>

प्रश्नच असा विचारला की उत्तर असेच येणार.
प्रत्यक्षात कोणती मुलगी फक्त पैसा बघून बाकी काहीही न बघता लग्न करेल हे अशक्य नाही का वाटत?

फक्त असे काही नसते. प्रायोरीटीज असतात. त्यानुसार वेटेज असते. आणि पैसा ही पहिली प्रायोरीटी असण्यात काही गैर नाही.

स्त्रीभ्रूणहत्या किंवा हुंडाबळीबद्दल खरंच कळवळा असलेले आणि डोके ताळ्यावर असलेले को णी ही लेखातील स्त्रीच्या विचारसरणीचे समर्थन करेल असे वाटत नाही.

लेखातील स्त्रीदेखील लिंगसापेक्ष गर्भपात करणाऱ्या किंवा हुंड्यासाठी छळ करणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमीची असेल असे वाटत नाही.

त्या प्रश्नांचा वापर करून आपल्या पोळीवर तूप ओढून घेणारा हा तिसराच कोणतातरी वर्ग आहे.

असो.

लेखातील स्त्रीदेखील लिंगसापेक्ष गर्भपात करणाऱ्या किंवा हुंड्यासाठी छळ करणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमीची असेल असे वाटत नाही.
>>>

कश्यावरून?

या धाग्याची लिंक अॅमी यांनी दुसऱ्या एका धाग्यावर दिलीये, अन ठरवुन केलेले लग्न म्हणजे व्यवहार का, असा काहीसा प्रश्न इकडे विचारला आहे, सो इथले प्रतिसाद वाचले नाहीत पण लेख वाचला. अन माझे मत मांडावेसे वाटले म्हणून...

मला तरी मुलीचे काही चुकले असे वाटत नाही. किमान तिला तिच्या भविष्यात नक्की काय हवे आहे याबाबत ती ठाम आहे, मग त्या निर्णयाचे परिणाम जे काही असतील त्याबाबत ती इतर कोणाला दोषही देऊ शकणार नाही. मग ते अति अटींमुळे लग्न न होणे असो वा आर्थिक स्थैर्य असणारा पण व्यसनी वा तिच्यावर प्रेम न करणारा नवरा मिळो असे असो.

बाकी, लग्न म्हणजे व्यवहार, मग ते मोठ्यांच्या संमतीने ठरवून केलेले असो वा प्रेमविवाह. म्हणजे किमान माझे तरी असे मत झालेय.
अगदीच उदाहरण द्यायचे म्हटल्यास, माझाच एक धागा घ्या, मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य? हा.
त्यातही, माझी मैत्रीण अन तिचा एक्स. दोघे एकमेकांवर सो कॉल्ड प्रेम करत होते. तिला लग्नांनतरही माहेरची जबाबदारी घ्यायचीय, ही काही अचानक उदभवलेली समस्या नव्हती. त्याला अगदी सुरुवातीपासून सगळे माहीत होते, पण तरी त्यावर काही ठाम निर्णय न देता, तो खेळलाच की तिच्या भावनांशी Angry जर त्याला ते मान्य नव्हते तर वेळीच सांगून एकमेकांत खूप जास्त न गुंतता दोघे वेगळे होऊ शकले असते. शिवाय आधी तिच्या प्रत्येक गोष्टी आवडायच्या पण नंतर तिने नोकरी सांभाळत घरकाम ही करावे , त्यांच्या घराण्या प्रमाणे स्वतःची विचार सारणी बदलावी ही अजून एक अपेक्षा. म्हणजे हे सगळे तिला मान्य असेल तरच तो लग्न करणार. वर म्हणे तो इतके सारे करतोय कारण त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे Lol किती तो त्याग

बरे झाले तिनेच त्याला लाथाडले, अन हे फक्त एकच उदाहरण आहे, अशी अजून कित्येक उदाहरणे बघितलीत, ऐकली आहेत. मग ह्याला काय म्हणावे, प्रेम की व्यवहार?

यात फरक फक्त इतकाच की ठरवून केलेल्या लग्नव्यवहारात, प्रेम विवाहापेक्षा जास्त बोलणी-अपेक्षा असतात, वर समोरची व्यक्ती बरेचदा, पूर्णतः अनोळखी असते. याउपर, प्रेम विवाह नावाच्या व्यवहारात थोडीफार भावनिक जवळीक असते, दोघे एकमेकांना थोडेफार हो थोडंफारच ओळखत असतात. कारण कुणावर कितीही प्रेम केले, आपण त्याला जाणतो असे बोलले तरी कोणीच कोणाला पूर्ण ओळखू शकत नाही हेही तितकेच खरे☺️

: हाहा: मलापन पोरगी करेक्त वातली, यात हिपोक्रसी कुथुन आली.
सग्ली चर्चा म्ह्न्जे मज्जाच

अमि का ईतका वाद घाल्तात कलेत नाही, बाकीचे प्न भांद्तात आप्ले

नाय वो भरत काका, प्रक्टीस नाही, मला मराथी नित येत नाही

प्रय्त्न कर्ते पण खुप किचकत आहे मग मधेच नाद सोदुन देते

लग्न जुळवताना जातील कितपत महत्त्व द्यावे असा तुमचा धागा आहे. caste ला महत्त्व देऊ नये, त्यात वरचा खालचा करू नये, असं तुम्हाला वाटत असावं. मग तेच economic class बद्दल का नाही? माणसाची जात तर बदलता येत नाही, पण class बदलू शकतोच ना?

गूगल इंडिक की बोर्ड डाउनलोड करा,
सोपे जाईल वापरायला >>> थन्क्स

लग्न जुळवताना जातील कितपत महत्त्व द्यावे असा तुमचा धागा आहे. caste ला महत्त्व देऊ नये, त्यात वरचा खालचा करू नये, असं तुम्हाला वाटत असावं. मग तेच economic class बद्दल का नाही? माणसाची जात तर बदलता येत नाही, पण class बदलू शकतोच ना? >>> हो नक्कीच

पण हे लव मेरेज साठी थिकेय, तीथे आपले आधीच प्रे म असते, पन अरेन्जमधे रिस्क का घ्या, सगले आधीपासुन चांगले असेल तर धोक्याची प्रोब्याबिलिती कमी होते नाही का

Pages