मिंदी : धेडगुजरी भाषा _ मराठी + हिंदी

Submitted by किल्ली on 15 June, 2018 - 09:31

मिंदी : धेडगुजरी भाषा _ मराठी + हिंदी
लोकहो, बर्याचदा आपण मराठी लोक हिंदी मध्ये सुद्धा बोलतो.
तर असं होतं की, आपण हिंदी मध्ये मराठीच पाणी मिसळून काहीतरी बोलून टाकतो. पण खरेतर ती मिंदी / हीराठी भाषा आहे. पुण्यात तर ही भाषा अक्सर आढळी जाती है!
खालील अस्मादिकांची बोलीभाषेतील उदाहरणे बघा :
१. हमारे यहा पेठ मे पावसाळे मे गुढग्यापर्यंत पाणी असते !
२. मेरे पैर को मुंगी आई. तो पायके अंगठेके नख को खाजवना! मुंगी निघ जाती है!
३. जखम पे मीठ चोळ दिया
४. सरबत मे लिंबू पिळा क्या ? (हे खूप कॉमन आहे)
५. आज डब्बे मी शेपू और दोडका ची भाजी है

तुम्ही पण ही भाषा समृद्ध करता का? ह्या वरील उदाहरणामध्ये तुमच्या ज्ञानाची भर घाला आणि मिंदी ही भाषा समृद्ध करा. Lol

कोण हे रे तिकडे? आन दो आन दो ....

आणि हो, नाही सापडला असा धागा मला. आधीच असेल तर लिंक द्या म्हणजे हा उडवता येईल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

दोपहर को आप क्या करते हैं?
दोपहर हम थोडा गिरते हैं।
गिरनेसे लगता नही?
लगता हैना तुरंत डोळा लगता हैं।

यातील पुष्कळसे केवळ तयार केलेले विनोद आहेत. बालिश आहेत. एखाद दुसर्‍यावेलेस आढळते असे. महाराश्ट्रातले या पिढीतले लोक तरी एवढे हास्यास्पद हिन्दि बोलत नाहीत.

>>>>यातील पुष्कळसे केवळ तयार केलेले विनोद आहेत. बालिश आहेत. एखाद दुसर्‍यावेलेस आढळते असे. महाराश्ट्रातले या पिढीतले लोक तरी एवढे हास्यास्पद हिन्दि बोलत नाहीत >>>
अगदी खरे आहे

यार उसने ३-४ बार कॉल किया तो में आर्धी अंगोळ छोड के आया.....
<<

आजच्या काळात ही असली हिंदी बोलणारी लोक, बहुतेक, "बधीर" या कॅटेग्रीत मोडत असावी.

चेष्टा मस्करी मध्ये ही भाषा वापरायला हरकत नसावी !
आणि हो , पुण्यात सर्रास लोकांना बोलताना ऐकलंय मी असं मिंदी !
सो आहे ही भाषा खरोखर अस्तित्वात! शंका नसावी.. Happy

@@@अनिरुध्द.. <<<<आजच्या काळात ही असली हिंदी बोलणारी लोक, बहुतेक, "बधीर" या कॅटेग्रीत मोडत असावी.>>>>
तो बधिर मुलगा आज मुंबई मध्ये अक्षय, जॉन, धोनी सारख्या स्टार चा बॉडी गार्ड आहे....आणि पगारही चांगला आहे......फेंसबूक वर सचिन खैरनार....

पुण्यात सर्रास लोकांना बोलताना ऐकलंय मी असं मिंदी>>>>>>पुण्यातले लोक अशी हिंदी बोलतात? आणि प्रमाण मराठीचे गोडवे गातात? :काडी: Wink Light 1

चेष्टा मस्करी मध्ये ही भाषा वापरायला हरकत नसावी !....

मी तर म्हणेन मुद्दाम बोलावी अशी हिंदी. आणि प्रत्येक वेळेस हिंदी शब्दांची संख्या कमी करून मराठी शब्दांची संख्या वाढवावी.
जेणेकरून महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकावीच लागेल!!!

विमु संकल्पना चांगली आहे Lol Happy
माझ्या पाहणीत एक अमराठी मुलगा गेली ५ वर्षे पुण्यात राहतोय आणि तरी मराठी वाचून त्याचं कुठेही अडत नाही..
त्याने ५वर्षात फक्त ५ वाक्ये आत्मसात केली होती, तेही हिंदीच्या tone मध्ये, ती अशी :
१. चला, मधले पुढे सरका (मराठी भाषा pmt च्या वाहक काकांची ऋणी राहील, ह्या वाक्यासाठी )
२. जेवण संपलं (झालं ह्या अर्थी )
३. इकडे तिकडे हवा आली (आज वारा सगळीकडून वाहत आहे, गरमी नाही ह्या अर्थी )
४. असं कसं झालं (हे एक वाक्य बोलला तो )
५. चहा पाहिजे ला जाऊया (कप्पाळ माझं !! Lol )

ह्यावर उपाय म्हणून, सध्या तरी त्याच्याशी मराठीतच बोलून अजून ५ वाक्ये शिकवली आहेत. बघू आता, काय होते ते !

सरबत मे लिंबू पिळा क्या ? (हे खूप कॉमन आहे)>> सरबतात शुगर अ‍ॅड करा हे जास्त कॉमन आहे.
मराठी चॅनेल बघा एकदा. Happy

माझा मित्र आहे अमराठी
आज खूब पाऊस पडला...
त्याला बाड् पण आहे.... (मी Uhoh ) मग कळलं की त्याला बाळ पण आहे.

त्याला बाड् पण आहे.... (मी Uhoh ) मग कळलं की त्याला बाळ पण आहे.>>>>>>>
लहानपणी माझ्या अमराठी मैत्रीणीना 'डोंगराला आग लागली पळा पळा ' हा खेळ खेळायला बोलवायचे मी मुद्दाम Lol '.. त्या पडा पडा म्हणत गोल फिरायच्या.
आणखी एक किस्सा: माझ्या बिहारच्या मैत्रिणीने कुठे आहेस ह्या sms चा रिप्लाय असा दिला होता: "dugru set halwayi temple "
ते halwayi ह्या शब्दामुळे समजलं की ती "दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनास गेली होती Lol

कालच ऑफिसमध्ये दोन गार्डस जेवताना एकमेकींशी गप्पा मारत होत्या तेव्हा ऐकले.
वो नारळ को क्या बोलते है?
नारीयल
हां, उस्को खवके साईडमे रखो. फिर लसूनका फोडणी करो. तेल को एकदम गरम करके पयले कडीपत्ता तळनेका हां. एकदम कडक होना चाहिये. दात को चुरूचुरू लगना चाहिये. पुढे त्या लसणाचे काय झाले ते ऐकले नाही.

एकवेळ खवके अन चुरुचुरु चालेल पण पोट्याटो स्मॅश करा, नारळाला ग्रेट करा, अन गरम गरम सर्व्ह करा हे डोक्यात जातं.

अन ते गारनिशिंग के लिए पुदिने के पत्ते। उद्या उठून सोन्याच्या कळासालाही पुदिन्याचं गरनिशिंग करतील हे लोक..

आ. रा. रा. - हे असे एकदम डोक्यात जाते असे मला पूर्वी व्हायचे. पण आता कळले आहे की आजकाल, म्हणजे गेल्या पिढीपासून शहरातले बहुयेक लोक इंग्रजी माध्यमातून शिकले. त्यातून मराठी पुस्तके वाचून भाषा समृद्ध व्हावी तर मराठी नाटक, सिनेमे, लेख सर्व काही असेच मराठी लिहीतात. तेंव्हा तोहि मार्ग खुंटला. लोकांना मुळी मराठी शब्द पटकन आठवतच नाहीत.

बरीच कारणे असतात, बरेच अनुभव आलेत भारतात, पुण्यात. आता खात्री पटली की महाराष्ट्रीयन लोकांना मराठी भाषा, मराठी संस्कृति याचा जणू वीट आला आहे, नि अट्टाहासाने मराठी चालीरीती सोडून इतरांच्या चालीरीती, इतरांची भाषा वापरायची पद्धत आहे!
असो.

महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्यापेक्षा आपण हिंदी शिकावी ते फायद्याचे असेल. << धागा वाचतांना हेच माझ्या डोक्यात आलेले

मुंबई/ पुण्यात रहात होतो तेव्हा बाहेरच्या भय्या लोकांनी मराठी शिकलीच पाहिजे, तुम्ही इथे येता.... ब्ला ब्ला.. परप्रांतीय .... ब्ला ब्ला... असेच विचार होते.
आता समोरचा त्याचं गाव सोडून इकडे आलाय.. आणि आपल्याला त्याची भाषा येतेय तर त्याला इच्छा असेल तर तो इथली भाषा शिकेल. मोडकं तोडकं बोलत असेल तर जमेल तशी आपण पुढे होउन मदत केली पाहिजे, परंतु... आत्ता ह्या क्षणी आपण कॉमन डिनॉमिनेटर( मराठीत काय म्हणू?) जो असेल ती भाषा बोलली पाहिजे. अशी सक्ती करुन भाषा टिकत नाही, की तुम्ही भाषासंवर्धनाला कसली मदत करत नाही. द्वेष मात्र वाढवता हे समजलंय.
हे भाषातिरेकी (फॅनेटिक्स) जगात अनेक ठिकाणी असतात, आणि जिकडे असतात तिकडचा विकास सर्वसमावेशक होत नाही. आणि मला रहायला आवडणार नाही.

<<<परंतु... आत्ता ह्या क्षणी आपण कॉमन डिनॉमिनेटर( मराठीत काय म्हणू?) जो असेल ती भाषा बोलली पाहिजे. अशी सक्ती करुन भाषा टिकत नाही, की तुम्ही भाषासंवर्धनाला कसली मदत करत नाही. द्वेष मात्र वाढवता हे समजलंय.>>>

अनुमोदन.
विचार करा - मराठी मुलगा नोकरी निमित्त आज अमेरिकेत, उद्या जर्मनीत, परवा जपान इथे गेला तर काय त्यानी आधी काम करायचे की भाषा शिकायची? नि त्यातून काही लोक तर इतके खवचट असतात की तुम्ही इंग्रजी बोललात तरी तुमच्या उच्चारावरून तुमची जाहीरपणे चेष्टा करतात.

या मिश्र भाषेत 2 प्रकार आहेत !
मराठी बोलताना सवयीने हिंदी शब्द घुसडणे
आणि हिंदी बोलताना शब्द न सुचल्याने मराठी शब्द वापरणे.

1) मुंबईतले लोकं चांगले हिंदी बोलतात. ते मराठी बोलतानाही सवयीने काही हिण्दी शब्द त्यात टाकतात. आणि अशी मिक्स भाषा बनते.

2) मुंबईबाहेरच्या लोकांची हिंदी फार भारी नसते. ते हिंदी बोलायला जातात तेव्हा त्यात शब्द न सुचल्याने मराठी शब्द बिनधास्त ठोकतात आणि ही भाषा बनते.

माझी चार वर्षांची मुलगी दोनचार हिंदी शब्द आवर्जून वापरते.

अगर .... अगर तू मला चॉकलेट दिलेस तरच मी तुझे ऐकेन.
हर बार .... तुझी हर बार काय नाटकं चालतात पप्पा.

पण हिंदी शब्दकोश तिचा वाढत चाललाय त्यामुळे हिंदी बोलताना मात्र ती त्यात मराठी शब्द वापरायचे कमी कमी होत अस्सखलित हिंदीकडे प्रवास सुरू झाला आहे.

अर्थात, भीम, ऑगी, राजू, डोरेमॉन अशी हिंदी कार्टून आणि शाळेतील हिंदीभाषिक फ्रेंडसर्कल यामुळे हे साहजिकच आहे. जोपर्यंत ती दोनचार हिंदीचे गोड शब्द वापरण्याव्यतिरीक्त छान मराठी बोलतेय तोपर्यंत तिची भाषा धेडगुजरी होतेय याचे टेंशन नाही. आणि बोलण्यापुरती झाली तरी टेंशन नाही. त्यांची जनरेशन आहे. ते बघून घेतील.

महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्यापेक्षा आपण हिंदी शिकावी ते फायद्याचे असेल. >>> माझा एक मित्र बेंगलोर मध्ये होता तिकडे फक्त इंग्रजी आणि त्यांची मातृभाषा चालते. हिंदी क्वचितच आणि समोरच्याने आपली भाषा शिकावी म्हणुन पाणउताराही केला जातो.

काहीही काय! मी ८ वर्षे बेंगळूरमध्ये राहत होतो. तिथे सर्व रिक्षावाले, दुकानदार, कंडक्टर वगैरे मंडळी आमच्या सारख्यांशी हिंदीत बोलत होती.

काहीही काय! मी ८ वर्षे बेंगळूरमध्ये राहत होतो. तिथे सर्व रिक्षावाले, दुकानदार, कंडक्टर वगैरे मंडळी आमच्या सारख्यांशी हिंदीत बोलत होती. >>> बर मित्राचा राहुदे मी एका कॊल सेंटर मधे होतो. आयडिया च्या टेस्ट कॊल साठी कर्नाटक, तामिळनाडु इकडे कॊल केलेले त्यावेळी ही इंग्लिश किंवा तमिल ,कन्नड मधे बोला असा तिकडुन दम दिला जायचा. आणि नेहमी हा अनुभव आलाय.
तुम्ही तिथे ८ वर्ष होतात तर असेलही तुम्ही म्हणताय तसे.

Pages