मिंदी : धेडगुजरी भाषा _ मराठी + हिंदी
लोकहो, बर्याचदा आपण मराठी लोक हिंदी मध्ये सुद्धा बोलतो.
तर असं होतं की, आपण हिंदी मध्ये मराठीच पाणी मिसळून काहीतरी बोलून टाकतो. पण खरेतर ती मिंदी / हीराठी भाषा आहे. पुण्यात तर ही भाषा अक्सर आढळी जाती है!
खालील अस्मादिकांची बोलीभाषेतील उदाहरणे बघा :
१. हमारे यहा पेठ मे पावसाळे मे गुढग्यापर्यंत पाणी असते !
२. मेरे पैर को मुंगी आई. तो पायके अंगठेके नख को खाजवना! मुंगी निघ जाती है!
३. जखम पे मीठ चोळ दिया
४. सरबत मे लिंबू पिळा क्या ? (हे खूप कॉमन आहे)
५. आज डब्बे मी शेपू और दोडका ची भाजी है
तुम्ही पण ही भाषा समृद्ध करता का? ह्या वरील उदाहरणामध्ये तुमच्या ज्ञानाची भर घाला आणि मिंदी ही भाषा समृद्ध करा.
कोण हे रे तिकडे? आन दो आन दो ....
आणि हो, नाही सापडला असा धागा मला. आधीच असेल तर लिंक द्या म्हणजे हा उडवता येईल.
ओव्हर कॉन्फिडन्सने म्हणायचंय
ओव्हर कॉन्फिडन्सने म्हणायचंय का?
आपण एखाद्याला मोठ्या हौसेने
आपण एखाद्याला मोठ्या हौसेने घडलेला विनोदी प्रसन्ग सांगावा आणि त्याने तो खरोखर तस काही घडलं का म्हणून तार्किक स्पष्टीकरण मागावं, यासारखा पोटेंट मुडकीलर कोणता असेल ?
आम्हाला पाणी पुरत नाही हे मी
आम्हाला पाणी पुरत नाही हे मी एकदा हमको पानी पुरता नही असं म्हणालो होतो
पण मग हे कसं म्हणायचं?
नुकतीच घडलेली एक सत्य घटना..
नुकतीच घडलेली एक सत्य घटना.. प्रोजेक्ट पेटलेल्या अवस्थेत.. बरेचसे issues pending. मॅनेजर ने team ला सूचना दिल्या..' saturday को आवो, रात को जागो,दिनभर काम करो कुछ भी करो, issues fix होने चाहीये. उधर आग लगी तो धूर इधर आयेगा... Bla bla......"
(Team मध्ये 4टाळकी north indian, बाकीची चेन्नईची, मॅनेजर ला धरून 3मराठी टाळकी)
मीरा, कधीकधी flow मध्ये अशी
मीरा, कधीकधी flow मध्ये अशी भाषा बोलली जाते.. नेमका हिंदी शब्द नाही आठवत कधी कधी आणि मग असं होतं
कालच मी माझ्या कलीग ला बोलताना बोलून गेले," वहा पे रास्ता खराब है, बहोत बडा खड्डा है और उसमे सळई पडी हुई है"
सळई ला हिंदी शब्द अजूनही आठवत नाहीये
इथे लिहीणारे बहुतेक स्वतःचे
इथे लिहीणारे बहुतेक स्वतःचे अनुभव लिहीताहेत.. तरी 'हल्ली असे बोलत नाहीत.... ' असे सांगण्याचा अट्टाहास का?
'तुम्ही चुकू शकत नाही, मी खात्री देतो/देते'.... असं म्हटल्यासारखं वाटतंय.
....
'तो कोकणी असणंच शक्य नाही हां... कोकणात घोडा आणणार कुठून तो.. आमच्याकडे म्हणजे सगळे बैल.... सारवट गाड्या...' काशीनाथ नाडकर्णी आठवले...
बरं, सगळेच म्हणताहेत तर मी
बरं, सगळेच म्हणताहेत तर मी माझे शब्द मागे घेते. सॉरी !
मीरा, सॉरी वगैरे काय अहो
मीरा, सॉरी वगैरे काय अहो,चालतं तेवढं आपल्यात
एक कलीग दुसऱ्याला आज सांगत होता, ' मेरा क्या म्हनना है, ये कोड आज deploy कर देते है,.........'
काकु गिरणीवाल्या भैय्याला
काकु गिरणीवाल्या भैय्याला

"भैय्या,मेरा दळण नीटसे बारिक करके द्येवो.नही तो तेरे को ही इस पिठ का रोटी बनाके खिलाऊंगी"
गिरणीवाला भैया
"वहिनी,देतो पण मराठीत बोला.मला मराठी येत आता"
कालच मी माझ्या कलीग ला
कालच मी माझ्या कलीग ला बोलताना बोलून गेले," वहा पे रास्ता खराब है, बहोत बडा खड्डा है और उसमे सळई पडी हुई है">>>> कशाला त्रास करून घ्यायचा हिंदी भाषेत परकीय शब्द आले तर ती भाषा समृद्ध नाही का होणार?
अगं किल्ले , नुसतं सळईला नाही
अगं किल्ले , नुसतं सळईला नाही पडी हुईला पण हिंदी शब्द आहे
माझं हिंदी पण भयाण आहे आणि आताशा तर मला हिंदी शब्द आठवतच नाहीत. मी सरळ मराठी शब्द वापरत्र
वो शांत बैठताही नही है, बोहोत वळवळ करता है
कितना गोड बोलता है
मेरेको चहा की बोहोत गरज है
हमारी पोळी बोहोत मौ होती है
हे आणि तत्सम !
रिया
रिया
एफेम गोल्ड मुंबईवर आयुर्वेद
एफेम गोल्ड मुंबईवर आयुर्वेद, निसर्गोपचार, इ. सेवा देणार्या लोकांचे ( माधवबाग, तन्वीशता व तत्सम ) प्रायोजित कार्यक्रम असतात. सकाळी ८:३० ते १० दरम्यान.
यात संचालन करणारी आणि पाहुणे हे दोघेही मराठी लोकांच्या हिंदीचे उत्तम नमुने सादर करतात.
फक्त इथे लिहिण्यासाठी एखाद्या दिवशी मी तो कार्याक्रम ऐकेन.
रोज या शब्दातला ज जेवणातल्यासारखा उच्चारला की तो हिंदी शब्द होतो, अशी एका संचालिकेची समजूत आहे.
तो शब्द मुळात फारसीतला. त्याचं हिंदीकरण असंह?
दुसरी भाषा चांगली बोलता यावी
दुसरी भाषा चांगली बोलता यावी हे ठीकच.पण मराठीतले शब्द बोलता बोलता आलेच तर त्यात इतके काय चुकले? गुजराथी,मारवाडी मराठीच्या व्याकरणाचा खून पाडत का होईना,पण मराठी बोलतात्,त्यावेळी आपण कौतुकाने तो मराठी बोलतो हेच पहातो.
इंग्रजी बोलतानापण मराठी शब्द
इंग्रजी बोलतानापण मराठी शब्द घुसडून , त्यात काय चुकलं म्हणूया की.
अगं किल्ले , नुसतं सळईला नाही
अगं किल्ले , नुसतं सळईला नाही पडी हुईला पण हिंदी शब्द आहे >> हाहाहा!
त्यात काय चुकलं म्हणूया की.>>
त्यात काय चुकलं म्हणूया की.>>>>>दुसरी भाषा चांगली बोलता यावी हे ठीकच. हे आधीच म्हटलंय की!
अनवधानाने मातृभाषेतला शब्द बोलण्यात आला तर त्याचा इतका बाऊ केला जाऊ नये.
जे चुक आहे त्याला चुक नाही तर
जे चुक आहे त्याला चुक नाही तर मग काय बरोबर बोलायच का.
नुसतं सळईला नाही पडी हुईला पण
नुसतं सळईला नाही पडी हुईला पण हिंदी शब्द आहे ---- पडी हुई चा हिंदी शब्द माहीत असूनही मिंदि बोलले मी

सळई चं सांगा की कोणीतरी हिंदीत काय करू ते
सली सली गिरी हुई है
सली

सली गिरी हुई है
सस्मित
सस्मित

त्यापेक्षा वो लोहे का rod होता है ना, construction मे use करते है वोही.. हे description कसं वाटतंय ?
(हे वर्णन सांगेपर्यंत आणि समोरच्याला आकलन होईपर्यँत गाडी खड्यात जाईल )
इथे लिहीणारे बहुतेक सगळे
इथे लिहीणारे बहुतेक सगळे स्वतःच्या झालेल्या चुका, आणि त्यातून निर्माण झालेल्या गमती लिहीता आहेत. तेव्हा 'त्यात काय झाले?' असे म्हणण्याची गरज नाही.
दूरचित्रवाणीवर कार्यक्रम वगैरे सादर करताना, अथवा वर्तमानपत्रात लिहीताना अश्या चुका होऊ नयेत , त्या अक्षम्य आहेत.
प्रत्येक भाषेचे काही नियम असतात, शब्दशः भाषांतरही विचित्र होऊ शकते. भरपूर भाषा बोलाव्यात पण मिसळ करून 'त्यात काय झाले?' म्हणण्यात अर्थ नाही , असे मला वाटते.
दूरचित्रवाणीवर कार्यक्रम
दूरचित्रवाणीवर कार्यक्रम वगैरे सादर करताना, अथवा वर्तमानपत्रात लिहीताना अश्या चुका होऊ नयेत , त्या अक्षम्य आहेत.
प्रत्येक भाषेचे काही नियम असतात, शब्दशः भाषांतरही विचित्र होऊ शकते. भरपूर भाषा बोलाव्यात पण मिसळ करून 'त्यात काय झाले?' म्हणण्यात अर्थ नाही , असे मला वाटते. +11111
परदेसाईना अनुमोदन. मजा म्हणुन
परदेसाईना अनुमोदन. मजा म्हणुन ऐकायला, हसायला छान वाटतं पण लोकांसमोर कोणत्याही पद्धतीने सादर करताना नाही.
परदेसाई सहमत..
परदेसाई सहमत..
हेच कॉलेजमधे हिंदी+मराठी+इंग्लिश अशा 3 भाषांची सरमिसळ करुन शिकवणार्या प्रोफेसरचीपण मजा येते.पण कधी कधी चिड येते.
बरं झालं आम्हाला एकही
बरं झालं आम्हाला एकही प्रोफेसर असे लाभले नाहीत.
इंग्रजी न येणारे शिक्षक हा तर
इंग्रजी न येणारे शिक्षक हा तर अजून वेगळाच विषय आहे..
आमचे एक शिक्षक एका पेंगुळलेल्या मुलाला 'are you want a sleeping coach' (त्याना काउच आणि कोच मधला फरक माहीत नव्हता)...
(No subject)
इंग्रजी न येणारे शिक्षक हा तर
इंग्रजी न येणारे शिक्षक हा तर अजून वेगळाच विषय आहे..---- हो ना, अगदीच खरंय..
आमच्या एक professor इंग्रजी, मराठी दोन्ही भाषेत स चा उच्चार श करायच्या..
त्यांचं एका व्रात्य मुलाला रागावून बोललेलं ते वाक्य अजून आठवतंय, " राहुल,come अँड शीट (sit) on the first bench"
अर्रर..!
अर्रर..!

Pages