मिंदी : धेडगुजरी भाषा _ मराठी + हिंदी

Submitted by किल्ली on 15 June, 2018 - 09:31

मिंदी : धेडगुजरी भाषा _ मराठी + हिंदी
लोकहो, बर्याचदा आपण मराठी लोक हिंदी मध्ये सुद्धा बोलतो.
तर असं होतं की, आपण हिंदी मध्ये मराठीच पाणी मिसळून काहीतरी बोलून टाकतो. पण खरेतर ती मिंदी / हीराठी भाषा आहे. पुण्यात तर ही भाषा अक्सर आढळी जाती है!
खालील अस्मादिकांची बोलीभाषेतील उदाहरणे बघा :
१. हमारे यहा पेठ मे पावसाळे मे गुढग्यापर्यंत पाणी असते !
२. मेरे पैर को मुंगी आई. तो पायके अंगठेके नख को खाजवना! मुंगी निघ जाती है!
३. जखम पे मीठ चोळ दिया
४. सरबत मे लिंबू पिळा क्या ? (हे खूप कॉमन आहे)
५. आज डब्बे मी शेपू और दोडका ची भाजी है

तुम्ही पण ही भाषा समृद्ध करता का? ह्या वरील उदाहरणामध्ये तुमच्या ज्ञानाची भर घाला आणि मिंदी ही भाषा समृद्ध करा. Lol

कोण हे रे तिकडे? आन दो आन दो ....

आणि हो, नाही सापडला असा धागा मला. आधीच असेल तर लिंक द्या म्हणजे हा उडवता येईल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

घासाला निवाला म्हणतात ते आठवंल नसेल त्यांच्या आजीला. उसमे क्या है?
घास असो वा निवाला खायचा तर तोंडानेच आहे. Lol Lol

घासाला निवाला म्हणतात ते आठवंल नसेल त्यांच्या आजीला. उसमे क्या है?
घास असो वा निवाला खायचा तर तोंडानेच आहे. Lol Lol >>>>>> Lol

प्रोडक्शन प्लानिंग गंडा है >> कन्नडामध्ये गंडा म्हणजे नवरा Happy

उसमे क्या है? >>> या वाक्यावरून शिरीश कणेकरांचं 'उसमे क्या है? शेवटी उकीरडा फुकनेकोईच जाने का है न?' - हे आठवलं.

प्रोडक्शन प्लॅनिंग गंडा है।>>प्रोडक्शन प्लॅनिंग कितीही परफेक्ट असुद्यात. फिनिश्ड प्रोडक्ट मात्र नेहमीच गंडलेलं वाटतं बायकोला. Rofl Rofl

आमच्या शेजारी एक केरळी अंकल राहायचे. ते हिंदीत बोलायचे, मराठीही समजायचं थोडं. एकदा त्यांचे कोणीतरी नातेवाईक आले होते केरळहून. त्यांना आमच्याकडे चहाला बोलावलं होतं. माझे पप्पा आणि ते दोघं अशा गप्पागोष्टी चालू होत्या.
मधेच ते पाहुणे मल्याळम भाषेत काहीतरी बोलले. आणि न समजल्यामुळे पप्पांंनी अंकलना विचारलं, " क्या म्हणता है?"

मी तोंड दाबून किचनमध्ये पळाले होते हसायला..... , Biggrin

आमच्या लहानपणी एक पाणी भरायला माणूस यायचा (तो कुठूनतरी पाणी आणायचा, कुठून ते आठवत नाही.
आई: अरे छिंदू, आज पाणी भरलंच नाही...
छिंदु: बाई... मी तुम्हाला भुलूनच गेलो...
Happy

लंडनच्या वास्तव्यातील किस्सा आहे. आमच्या बरोबर एक पुण्याची मारवाडी मुलगी होती ग्रुपमधे. ती सुंदर तर होतीच शिवाय जरा अतिउच्च्भ्रू वर्गातील असल्याने आम्हीही तिच्याबरोबर वागताबोलताना दबकूनच असायचो. एकदा वीकेंडला चारपाचजण पबमधे बसलो होतो. हिच्याकडून बोलताना तिचे स्नॅक अंगावर सांडले तशी ती पटकन म्हणाली, " अरे .... यार, फडका है क्या इधर कोई जल्दी दो " Lol
यावर आम्ही दोघजणच मराठी होतो जे हसायला लागलो, बाहेरच गेलो निघून थोड्यावेळ. फडकं हा तिच्या शब्दकोशातील शब्द होता पण आम्हाला तो फारच अनपेक्षितपणे आणि वेगळ्या हेलात ऐकू आल्याने गम्मत झाली चांगलीच. अजूनही ते आठवलकी हसू थांबत नाही.

काल रिक्षातुन प्रवास करत असतांना सहप्रवासाचे इस्पित स्थळ आल्यानंतर त्यांच्या मुखातील उद्गार "भैय्याजी 'भाडा' कितना हूवा".

किल्ली, तुझ्या विनोदी लेख, रेसिपी, इतर लेख या सगळ्यामधील हा एकच न आवडलेला धागा.

मी कोणालाही ( मराठी विनोदी (?) नाटक सिनेमा सिरीयल सोडून) असं हिंदी बोलताना ऐकलं नाही. अगदी घरातील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा. हा लेख काय किंवा याच विषयावरचा दक्षिणाचा लेख काय, बरेच विनोद ओढून ताणून वाटतात किंवा तयार केलेले. हल्ली TV सिरियल्स आणि सिनेमामुळे शिवाय बऱ्याच वाढलेल्या नॉन मराठी शेजारामुळे सगळे, अगदी लहान मुलंसुद्धा छान हिंदी बोलतात. जिथे शुद्ध हिंदी शब्द आठवत नाही तिथे इंग्लिश शब्द वापरला जातो. थोडक्यात मिंदीपेक्षा हिंग्लिश जास्त ऐकली जाते.

आपणच आपल्या लोकांना defame करायचं, it is not funny. मग इतर लोक असतातच मराठी लोकांची टर उडवायला तयार.

हा लेख काय किंवा याच विषयावरचा दक्षिणाचा लेख काय, बरेच विनोद ओढून ताणून वाटतात किंवा तयार केलेले
>>>>> सिरियसली????

हल्ली TV सिरियल्स आणि सिनेमामुळे शिवाय बऱ्याच वाढलेल्या नॉन मराठी शेजारामुळे सगळे, अगदी लहान मुलंसुद्धा छान हिंदी बोलतात.
>>>>>> कायपण लॉजीक आहे???लहान मुलांच्या बोलण्याचे असे किती किस्से असतील दोन्ही धाग्यावर मिळून.

मीरा, अगदी ठरवुन हिंदी बोलले की उत्तम हिंदी बोलते मी. पण कधी कधी अगदीच काही शब्द निघुन जातात मराठीत.
कालपरवाच भगवान के पाया पडनेको मतलब पैर पडनेको जानेका असं बोलले मी Lol तरी समोरच्याला खटकलंच. मग दर्शन करने म्हणाले तेव्हा त्याला शांती मिळाली. Lol

Pages