मिंदी : धेडगुजरी भाषा _ मराठी + हिंदी

Submitted by किल्ली on 15 June, 2018 - 09:31

मिंदी : धेडगुजरी भाषा _ मराठी + हिंदी
लोकहो, बर्याचदा आपण मराठी लोक हिंदी मध्ये सुद्धा बोलतो.
तर असं होतं की, आपण हिंदी मध्ये मराठीच पाणी मिसळून काहीतरी बोलून टाकतो. पण खरेतर ती मिंदी / हीराठी भाषा आहे. पुण्यात तर ही भाषा अक्सर आढळी जाती है!
खालील अस्मादिकांची बोलीभाषेतील उदाहरणे बघा :
१. हमारे यहा पेठ मे पावसाळे मे गुढग्यापर्यंत पाणी असते !
२. मेरे पैर को मुंगी आई. तो पायके अंगठेके नख को खाजवना! मुंगी निघ जाती है!
३. जखम पे मीठ चोळ दिया
४. सरबत मे लिंबू पिळा क्या ? (हे खूप कॉमन आहे)
५. आज डब्बे मी शेपू और दोडका ची भाजी है

तुम्ही पण ही भाषा समृद्ध करता का? ह्या वरील उदाहरणामध्ये तुमच्या ज्ञानाची भर घाला आणि मिंदी ही भाषा समृद्ध करा. Lol

कोण हे रे तिकडे? आन दो आन दो ....

आणि हो, नाही सापडला असा धागा मला. आधीच असेल तर लिंक द्या म्हणजे हा उडवता येईल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आहे ना हा जोक मायबोलीच्या वरिजीनल ‘मराठी लोकांचे हिंदी’ धाग्यावर. भयंकर विनोदी आहे खरा. तो धागा वाचला नसेल तर वाचा भरत. वेड लागेल.

तो धागा वाचलाय. पण तो जोक आधी वाचल्याचं आठवत नाही. म्हणजे एकतर तो रिसायकल होतोय किंवा ती चूक अनेकांकडून होतेय. त्या ट्वीटवर पुढेही असेच भयंकर विनोद आले आहेत.

Pages