बकेट लिस्टः ती काहीच रिस्क घेत नाही!!!

Submitted by अश्विनीमामी on 27 May, 2018 - 10:17

भरला संसार मागे सोडून ती जीवनाचा अर्थ शोधायला हिमालयात गेली, मैत्रीणींबरोबर मज्जा करायला मे डिटरेनिअन क्रूज वर गेली, वस्तू जमवण्यातली व्यर्थता समजून ओदिशाच्या जंगलात आदिवाश्यांना आरोग्य सेवा द्यायला गेली, पोस्ट ग्रॅजुएट शिक्षण पूर्ण करून चांगली कन्सल्टंट झाली. स्टार्टप कंपनी काढून वर्किंग विमेनना सपोर्ट सर्विसेस चालू केल्या.........................

बकेट लिस्ट सिनेमातली मधुरा असे काहीही करत नाही. अर्धे आयु ष्य अतिशय सुखात, आईबाबांकडून प्रेमळ नव र्‍या कडे अलगद ट्रान्सफर झालेली ही सान्यांची सून चार लोकांसाठी एकच भाजी चार प्रकारे करण्यात धन्यता मानते. सगळंच फार गोड गोड. प्रभात रोड वर प्रशस्त लॉरी बेकर स्टा इलचा बंगला( पण ह्याची गल्ली कुठली ते नेम प्लेट वर लिहीलेले नाही.) टॉलरेबल सासू( वंदना गुप्ते स्लीप वॉकिंग थ्रू द रोल!!) कोणी तरी नि ष्प्रभ सासरा, ओके टाइप किड्स , सुमीत राघवन सक्सेसफुल नवर्‍याच्या हुकमी भूमिकेत अनेकाव्यांदा, मुलीशी माफक जनरेशन गॅप..... असे सर्व सुखद चित्र असताना ही मधुरा इतकी लकी की तिला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असताना ते हार्ट लगेच मिळून जाते.... अशीच सिनेमाची सुरुवात आहे मी उगाच लिहीत नाही.......

आता ही डोनर जी अपघातात वारली तिने ऑर्गन डोनेशन चा प्रण केलेला असतो. त्यानुसार ती आठ लोकांना नवे जीवन देते, पण तिच्या स्वतःच्या काही तारुण्य सुलभ इच्छा अपुर्‍या राहतात. आपली सरळ स्वभावाची मधुरा डोनर फॅमिली ला शोधून काढते. त्यांच्या ग्रीवींग प्रोसेस वर अतिक्रमण करून ह्या इच्छा पूर्ण करायचा प्रण करते ही
थो डक्यात कन्सेप्ट आहे.

माधुरी प्रत्येक फ्रेम मध्ये आहे. व दिसते पण सुंदर. प्रत्येक साडीत ड्रेस लेदर जॅकेट मध्ये इत्यादि. एकदा पार्टीवेअर पण घातले आहे. व हसते पूर्वी सारखीच. चेहरा थोडा ओघळत चालला आहे पण ते वयानुरूप होणारच. पण त्या पलीकडे एक अभिनेत्री म्हणून काहीही ग्रोथ झाली आहे असे पूर्ण चित्रपट भर जाण वत नाही. इथे माझी निराशा झाली. मी माधुरी फॅन आजिबातच नाही . पण कथेतही फार दम आणलेला नाही. ती रिस्कच घेत नाही कुठे.
कथा वस्तूत, संवादात, गाण्यात, नाचण्यात...... हार्लि डेविड सन बाइक चालवताना सुद्धा शी डझ नॉट चॅनेल हर इनर सेक्सी ऑर हर इनर सेल्फ टु बिगिन विथ..... सर्व कसे मोजून मापून. गोड हसत.

ती सई देशपांडे( डोनर ची )बकेट लिस्ट पूर्ण करायचा प्रयत्न करते आहे ह्याचे सईच्या फॅमिलीवर व
आप ल्यावरही दडपणच येते. कुठेच रिलीज किंवा क्लोजर ( हा शब्द चित्रपटात वापरला आहे. ) मिळत नाही. असे
मृत्यू नंतर सहा महिन्यांच्या आत क्लोजर मिलत असते तर काय हवे होते. मधुराची हार्ट कंडिशन, सईचे जाणे
हे सर्व एका सुपरफि शिअल व कधी कधी विनोदी पद्धतीने घेतले आहे. पण ब्लॅक ह्युम र नाही. कॉज रिमेंबा...
शी ड्झ नॉट टेक रिस्कस!!!

विशीच्या मुली च्या साध्या सुध्या इच्छा ही चाळीशीची दोन पोरांची आई पूर्ण करू बघते हे खरे पोटेन्शिअल आयडिया आहे. सईची व्यक्तिरेखा जेवढी आपल्याला समजते ती देखील खूप जेन्युईन वाटते. दापोलीतले सीन्स अतिशक सुरेख घेतले आहेत व्हिजुअली.

मधुराचे प्रयत्न अति शय लेम पद्धतीने पड द्यावर साकारले आहेत. हार्ली ची रेस तर अतिच विनोदी. सो लेम
त्यासाठी हिने डिझायनर लेदर जॅकेट कशाला घातले आहे असा प्रश्न पडतो. पोझ करत बसते नुसती. सईच्या बॉयफ्रेम्ड ला किस करायचा पहिला सीन एकदम इउ इंड्युसींग आहे. आय वॉज अन्कंफर्टेबल वॉचिंग इट. मधुरा क्लब मध्ये जाउन दारू पिऊन दंगा करते तो सीनही अतिशय लेम आहे. दारू पीनेसे यक्रु त विकृत होता है हे वाक्य अगदी फर्गेटेबल आहे. त्यापेक्षा कंगनाचे क्वीन मधले ड्रंकन सीन्स बघावे.

सईच्या भावाचे काम चांगले आहे. ही ग्रीविंगच्या मध्ये मध्ये येते आहे हे तो क्लीअर करतो. मधुराच्या माधुरीपणाने दबलेला वाटत नाही. पणजीच्या भूमिकेत शुभा खोटे एकदम मिसकास्ट आहे. साने वाटत नाही. मी साने गोडबोले
जोशी गोखले लोकांच्या पणज्या पाहिल्या आहेत.( कृपया वाचकांनी ऑफेंड होउ नये.. मी फक्त व्यक्ति रेखे च्या ओरिजिनॅलिटी साठी लिहीले आहे. त्या पिढीतील स्त्रिया बारीक किंचीत वाकलेली शरीरय्ष्टी , सुरकुतलेली स्किन, पांढर्‍या धोप पातळ केसांची बारीकशी मागे अम्बुडी, सुती नौवारी साडी अश्या असत. दिग्दर्शकाने रिसर्च करायला हवा इतका तरी. ) ती खोड कर आहे ते बरोबर आहे पण व्हिस्की ची बा टली जवळ बाळगून असते हे पटत नाही. दिग्दर्शकाने सर्व स्टिरीओ टाइप्स वापरून वापरून वैताग आणला आहे. पण कुठेही नॅरेशन मध्ये नाट्यमयता तो एक उच्च बिंदू येत नाही. प्रश्न समोर उभे राहतात त्यापेक्षा सहज पणे ते सुटतातही. बाईच्या सुंदर ़ कपाळाला आठ्या पडल्यातर? रडली आणि डोळ्या खाली काळे झाले तर? उगीच रिस्क नको.

मधुराचे सोनेरी वर्तूळ पूर्ण करणारे आईबाप आहेत दिलीप प्रभावळकर व एल दुगो मधली आई. मध्येच ही प्ण बकेट लिस्ट बनवते व त्या प्रमाणे हळदी कुंकू करते. व एक लेक्चर देते ़ कृ ष्णाच्यावेळी कुठे फोटो होते इत्यादि. व सर्वांना नौ वारी साडी नेसायची व पारम्पारिक दागिने घालायची एक संधी. हा लुक पण आता खूपच क्लिशेड झाला आहे. त्या हळदी कुंकवात मला गौरीची मूर्तीच कुठे दिसली नाही.

टॅटू काढवून घेणे, पेट अ‍ॅडॉ प्ट करणे ह्या आय टेम ला हात लावलेला नाही. कारण त्यात आरस्पानी सौंदर्याला धक्का पोहोचू शकतो व अटेन्शन पेट वर डायवर्ट होउ शकते. फ्रँक ली हाफ वे थ्रू द मुव्ही आय वॉज चेकीं ग पप फ्लिक्स ऑन इन्स्टाग्राम फॉर सम ओरिजिनल एक्स्प्रेशन्स अ‍ॅड फीलिन्ग्स.

मध्यंतरानंतर काहीतरी होईल म्हणून आप्ण वाट बघतो. तर काय? मलेशियाला जाउन मध्यम वयीन सेकंड हनीमून टाइप प्रेमगीत, सुमीत राघव न साराभाई वर्सेस सारभाई मध्ये एकदा सुरज हुआ मध्यम प्रेमगीत एका पेशं ट बरोबर गातो आहे असे मोनिशाला वाटते त्याच सीन्स मधले साधारण कपडे त्याने घातले आहेत. मधुरा एका डे फंक्षनला रेड कार्पेट टाइप मॅजेंटा पर्पल गाउन घालते!!!! हे प्र झेंटेशन सक्सेसफूल होउन सान्यांना सान होजे मध्ये जायचे आमंत्रण मिलते पण मधुरा जात नाही. इथेच राहुन लिस्ट पूर्ण करीन म्हणते. व्हॉट क्रायसीस. ड्वाले पाणावले. नॉर्मली सुद्धा कपल्स फॅमिलीज आपापल्या सोयीने जातात इथे तिथे.

शेव टी एक फर्गेटेबल गाणॅ व पार्टी. एका सीन मध्ये मला आशा होती की सईचा आत्मा किंवा स्पिरीट येउन मधुराला धन्यवाद म्हणेल तसे इरी लोकेश न तयार केले होते. पण इथे पण पतिराज च येउन पप्पी घेतात. ती ही
स्क्रीन वर नाही. उगीच रिक्स कशाला!!!

मग एक तू कशी स्फूर्ती प्रेर णा आहेस वगैरे टाइप शाळकरी स्वगत. व प्रभात रोड वरची स्टोरी सुफळ संपूर्ण.

एखादी स्मिता उंबर ठा कॅरी करते, एखादीच रिमा एखादीच अँजेलिना जोली, कधी तरी मेरील स्ट्रीप, कधी तरी सुलभा देशपांडे , विजया बाईं सारख्या ललना डो ळ्यात प्राण आणून बघावे असे अ‍ॅक्टिंग चेहर्‍याव रच्या सुरकुत्या न लपवतपू, पूर्ण शरीराचे माध्यम करून आपल्या परेंत पोहोचवतात. कारण त्या रिस्क घेतात. रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Carter Chambers to Edward, (of the two questions asked of the dead by the gods at the entrance to heaven):

1. Have you found joy in your life?
2. Has your life brought joy to others?

एक: तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळाला का?
दोन: तुम्ही आयुष्यात इतरांना आनंद देऊ शकलात का?

खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. वरकरणी सोप्पे वाटतात. पण अर्थगर्भ आहेत. विचार करायला लावणारे आहेत. मी परवापासून गढलो आहे त्यातच. मी ठरवलं आहे की जेव्हा केव्हा माझी 'बादली लाथाडण्याची' वेळ येईल, तेव्हा मी स्वतःला हे दोन प्रश्न विचारेन. त्यांची उत्तरे ठाम, स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण हो अशी यायची असतील तर आज, आत्ता पासून सुरुवात करायला हवी>>>>>>

खूप सुंदर लिहिले आहे. तुम्हाला शुभेच्छा!!

(आपल्याकडे काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातून, असाच काहीसा, या क्षणात जगून घ्या असा संदेश दिला आहे.)
>> जिंदगी ना मिलेगी दोबरांपेक्षा दसविदानीया जास्त योग्य उदाहरण होईल.

दसविदनिया..
या चित्रपटाचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यात पाणी येत खळकन.

Carter Chambers to Edward, (of the two questions asked of the dead by the gods at the entrance to heaven):
1. Have you found joy in your life?
2. Has your life brought joy to others?
एक: तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळाला का?
दोन: तुम्ही आयुष्यात इतरांना आनंद देऊ शकलात का?
खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. वरकरणी सोप्पे वाटतात. पण अर्थगर्भ आहेत. विचार करायला लावणारे आहेत. मी परवापासून गढलो आहे त्यातच. मी ठरवलं आहे की जेव्हा केव्हा माझी 'बादली लाथाडण्याची' वेळ येईल, तेव्हा मी स्वतःला हे दोन प्रश्न विचारेन. त्यांची उत्तरे ठाम, स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण हो अशी यायची असतील तर आज, आत्ता पासून सुरुवात करायला हवी>>>>>>
खूप सुंदर!

*एका तरी माणसाला 'बकेट लिस्ट' करायला उद्युक्त करेन, ही गोष्ट मी माझ्या 'बकेट लिस्ट' मध्ये लिहिली आहे!*>>> फॉर्वर्डेड पोस्ट्खाली तसे स्पष्ट्पणे लिहिणे ही गोष्ट आधी तुमच्या बकेट लिस्ट्मध्ये अ‍ॅड करा.

केवळ माधुरी मराठीत पहिल्यांदा आली म्हणुन लोक जात आहेत सिनेमाला नाहीतर तिच्याजागी दुसरी कोणीही असती तर गेले नसते कारण सिनेमा फार संथ, वर सर्वांनी लिहिलेल्या त्रूटी, संवादात दम नाही, अभिनयात तोचतोचपणा, कोणत्याच गोष्टीत नाविन्य नाही. Sad
फक्त बाईक रेसिंगचे आवडले कारण इतकी जड बाईक इतक्या थोड्या वेळात सुसाट वेगाने जाणे फक्त स्वप्नातच जमेल. त्यामुळे तिथे जराशी विनोदनिर्मिती होते व दुसरा प्रसंग ज्यात सासु उगीचच ओढुनताणुन विनोदनिर्मितीसाठी मराठी मिश्रीत हिंदी बोलते तेव्हा, ‘अली उधर है?‘ व ‘अली को फोन दो‘ या दोन संवादांच्यावेळी एकदम हसू आले.

माधुरीच्या साड्या छान आहेत व माधुरीचे सुपरस्टारपण लक्षात न घेता साध्या दाखवल्या आहेत ही एक जमेची बाजू.

फक्त तिच्या घरी सर्व आलबेल दाखवले आहे तर त्याचा त्रास का व्हावा लोकांना हे कळले नाही. तिला घरातुन त्रास असता तरी हेच झाले असते व जास्त झगडावे लागले असते तिला पण मग त्याचाच एक सिनेमा बनला असता व सईच्या लिस्टपर्यंत ती पोचतापोचता संपला असता. त्यामुळे ती बाजु सुरक्षित ठेऊन फक्त सईच्या यादीवर लक्ष देता यावे याकरता तिचे आयुष्य व्यवस्थित हे दाखवले आहे कथेत. पण मुळात संवादांतच व सीन्समधे वजन नाही म्हणुन पडेल व संथ होते सर्व.

बकेट लिस्ट सिनेमा बघायचा होता आणि कदाचित या रिव्यू मध्ये काही स्पॉयलर्स असतील, असे वाटले होते म्हणून हे परिक्षण वाचायचे टाळले होते. गेल्या आठवड्यात हा सिनेमा बघितला आणि मग हे परिक्षण वाचले. मुळात बकेट लिस्ट ही स्वतःसाठी असते, दुसर्‍या कुणाचीतरी बकेट लिस्ट पूर्ण करणे, ही कल्पनाच मुळात हास्यास्पद आहे आणि वरच्या परिक्षणात याबद्दल चकार उल्लेख नाही. सिनेमा बंडल आहे, त्यात काही शंका नाही. पण वरचे परिक्षण निव्वळ माधुरीविरुद्ध वैयक्तिक आकसातून लिहिले आहे, असे वाचताक्षणीच वाटले. (ते चुकीचेही असू शकेल, पण तसे वाटले हे मात्र खरे.)

आता या चित्रपटाविषयी. इंग्रजीतला "बकेट लिस्ट" बघितला असल्याने त्याच्याशी तुलना होते जरा अपरिहार्य होते. मराठी सिनेमा खूप बाबतीत गंडला आहे, त्यामुळे मी त्याला फार तर १० पैकी ३ किंवा ४ गुण देईन. मी माधुरीचा फॅन वगैरे नाही पण वयाच्या मानाने (मेकअप करून असेल) ती छान दिसते. तिच्याकडून अभिनयाच्या फारशा अपेक्षा कधीच न्हवत्या, त्यामुळे एकदा बघायला हा सिनेमा बरा आहे. पैसे खर्च न करता पुढे मागे केबलवर आला की बघितला तरी चालेल.

की प्रत्येक सिनेमात प्रत्येकाला आवडणारं / न आवडणारं असं असतच. म्हणून त्या सिनेनटांवर वैय्यक्तिक हल्लाबोल करायची गरज नाही. >> +१

{{{ मुळात बकेट लिस्ट ही स्वतःसाठी असते, दुसर्‍या कुणाचीतरी बकेट लिस्ट पूर्ण करणे, ही कल्पनाच मुळात हास्यास्पद आहे आणि वरच्या परिक्षणात याबद्दल चकार उल्लेख नाही. }}}

कोणी आपल्याला जीवदान दिलंय आणि त्याच्या काही अपूर्ण इच्छा आपण पूर्ण करतोय ही एक उदात्त कल्पना आहे, हास्यास्पद अजिबात नाही.

{{{ वरचे परिक्षण निव्वळ माधुरीविरुद्ध वैयक्तिक आकसातून लिहिले आहे, असे वाचताक्षणीच वाटले. }}}

धागालेखिका एक अभिनेत्री आहेत / होत्या / होणार होत्या आणि माधुरीमुळे त्यांच्या हातातले काही प्रोजेक्ट गेलेत किंवा त्या निर्मात्या / दिग्दर्शिका होत्या / आहेत / होणार होत्या आणि माधुरीने शुटिंगमध्ये नखरे दाखविल्यामुळे त्यांचे आजवर कोट्यावधींचे नुकसान झाल्याने त्यांनी आता मायबोलीवर हा वैयक्तिक आकसाने धागा काढलाय अशी कल्पना करुन बघतोय.

बाकी वैयक्तिक आकसावरुन टीका करायचीच असती तर माधुरीने अनेक संधी दिल्या आहेत.

  • १,२,३ (तेजाब), धक धक करने लगा (बेटा) गाण्यांवर केलेला थिल्लर नाच
  • चोली के पीछे क्या है गाण्यातले हावभाव
  • परिंदातील न्यूड सीन
  • विनोद खन्ना सोबत दयावान मधले बोल्ड सीन
  • प्रेमग्रंथ, साहिबां मधील तद्दन पकावू अभिनय
  • खलनायक आणि प्रेमदीवाने मध्ये अजिबात न शोभलेली पोलिस अधिकार्‍याची भूमिका

या सर्व बाबींमुळे अनेकांनी वेळोवेळी माधुरीवर वैयक्तिक आकस नसतानाही टीका केलीच आहे.

वरचे परिक्षण निव्वळ माधुरीविरुद्ध वैयक्तिक आकसातून लिहिले आहे, असे वाचताक्षणीच वाटले. >> नाही मेजॉरिटी लेख त्या व्यक्तिरेखे बद्दल आहे जिचे नाव मधुरा आहे. वैयक्तिक कनेक्ट म्हणाल तर दोन बाबी आहेत. २७ मे पिक्चर बघितला त्या दिवशी नवृयाची तिथी होती तो हार्ट अ‍ॅटेकने जाउन ११ वर्शे झाली. त्याला काही बकेट लिस्ट बनवायला संधीच मिळाली नाही. दुसृया बाजूस सई जी गेली त्याच वयाची माझी मुलगी आहे. त्यामुळे इफ अ‍ॅट ऑल आय वॉज अ‍ॅट माय मोस्ट व्हल्नरेबल इमोशनली. टिशू वगैरे घेउनच गेले होते. पण कोणताच सीन तितका भावला नाही. रागी मुड्डे खायला जावे व तो फ्लफी चॉकोलेट चीज केक निघावा तसे काहीसे झाले. मी पार अ‍ॅवेंजर्स मध्ये पण गोमोरा चे बलिदान करून थॅनोस खडा मिळवतो तेव्हा , स्पायडर मॅन आयर्न मॅनच्या हातात मरतो तेव्हा वगैरे बिनधास्त रडले आहे. आय वेंट फॉर द स्टोरी बेसिकली. म्हणून हार्ट ट्रान्सप्लांट सुरू व्हायच्या आधी ती एकदम उठून पीजे टाइप बोलत राहते ते अगदी ट्रिविअ लाइज केल्यासारखे वाटले. हार्ट व मेन सर्जन उपस्थित होउन काम सुरू करण्या आधी पेशंट एकदम सिडेटेड असतो असे दणकन उठून बसत नाही. पण असेल काही वेगळा ब्लॅक ह्युमर म्हणून गब्बसले.

दुस रे कनेक्षन सुभेदार कपल ज्यांनी पिक्चर बनवला आहे त्यातील मिसेस आमच्या अंकोर वट ट्रिप ग्रूप मध्ये होत्या.
क्लब मधील सीन मध्ये जे मॅनेजर म्हणूअन आले आहेत ते मि. सुभेदार. प्रत्यक्षात टेरिफिक उद्योजक आहेत. वाडा तालुक्यात त्यांचा मोठा प्लांट आहे. फिल्म प्रॉडक्षन हा फक्त इतर अनेक साइड बिझनेस पैकी आहे असे मॅडम क्डून बोलायच्या ओघात कळले होते. म्हणून एक उत्सुकता होती.

रागी मुड्डे खायला जावे व तो फ्लफी चॉकोलेट चीज केक निघावा >> Rofl
मी पिक्चर बघितला नाही पण ही भारी उपमा दिली आहे तुम्ही Lol

रागी मु ड्डे मुद्दे म्हणजे नाचणीचे उकडून केलेले गोळे फार हेवी व एक खाल्ला तरी अर्धा दिव्स भूक निभते
कर्नाटकातला पदार्थ आहे. साधारण मेहनत कर णारा वर्ग खातो हे.

>>रागी मुड्डे खायला जावे व तो फ्लफी चॉकोलेट चीज केक निघावा Happy Happy

रागी मुद्दे अतिशय चविष्ट लागतात, वालाच्या भिरड्याबरोबर उच्च लागतात. एकदम हेल्दी मिल. आय.एफ. करणार्‍यांसाठी तर फार उत्तम. एक मुद्दा खाल्ला की निदान ६-७ तासांची निश्चिंती.

रागी मुद्दे अतिशय चविष्ट लागतात+1
मी बिरड्याबरोबर नाही खाल्ले कधी. आता ट्राय केले पाहिजे. आम्ही सांबाराबरोबर खातो.

हा दाल बाटीचा दाक्षिणात्य मेले मे बिछडा भऊ दिसतोय.>>>हो हो. गेल्या काही दिवसात दालबाटीचा लेख वाचल्यामुळे बाटीच आठवली मुद्द्याला बघून Happy

1. It's a lame movie - आमची टीना
2. ती वेगळंच मराठी बोलत होती - आमची धा.क.
3. माधुरीचा क्लोज अप तरी नका रे दाखवू - एक बोलकी प्रतिक्रिया
4. अमेरिकेत उपचारासाठी का जावं लागतं? Heart transplant तर भारतातच झालंय ना??? - एक अतिशय बोलकी प्रतिक्रिया
5. पैसे आणि वेळ अक्कलखाती जमा - सिनेमा संपल्यावर आख्या थेटरात पसरलेल्या शांततेवरून काढलेला निष्कर्ष!

हा दाल बाटीचा दाक्षिणात्य मेले मे बिछडा भऊ दिसतोय.>> नाही, खमंग नसतो. उकडलेले गोळे असतात. मला वाटतं आंध्रात नाचणीच्या पिठात मसाले घालून मुद्दे करतात. इकडे कर्नाटकात प्लेनच करतात. याची चव जरा डेव्हलप व्हावी लागते मात्र. सांबार चविष्ट पाहिजे सोबत.

विषय भरकटवण्याची माबोकरांची हातोटी स्पृहणीय (बर्याच दिवसांनी वापरला हा शब्द) आहे!

मधेच इंग्लिश-विंग्लिश वर धागा गेला होता, त्या आधी माधुरी-बॅशिंग होतच आणी आता नाचणीच्या पदार्थाविषयी चर्चा चालू आहे. Happy

अमा, तुम्ही केलेलं परिक्षण आवडलं. चांगलं लिहिलयत.

रागी मुड्डे बहुतेक बाहुबली मुव्ही मध्ये कटप्पा आणि इतर सैनिकांना जेवणात देताना दाखवलेत.....कोणाला माहीत आहे का याबद्दल????

नाचणि किवा नागलिच्या पापडाची उकड अगदी सेम दिसते फक्त त्यात पापडखार , तिळ, जिरेपुड ,हिन्ग पण असतो , मस्त लाग्ते ति उकड नुसतिच खायला...

प्रतिसाद लिहीला असता पण मग तो आकसातून लिहीला आहे असं वाटलं असतं. कुणाच्या ते माहीत नाही. म्हणून आल्ट बालाजी नावाचं अ‍ॅप डालो करून त्याआवर द टेस्ट केस ही मालिका पाहिली. जिओ सिनेमा वर पण बघता येते हे नंतर कळाले. पैसे वाचले असतेव. पण वर्थ आहे.

रणांगण, कामनाबादली आणि आता येणारा राजू नावाचा सिनेमा ही बकेट लिस्ट नसल्याने बरंचसं चांगलं काय काय पाहता येतंय. प्राईम वर आर माधवन ची वेब सीरीज पहायची राहून गेली आहे....

नाचणि किवा नागलिच्या पापडाची उकड अगदी सेम दिसते फक्त त्यात पापडखार , तिळ, जिरेपुड ,हिन्ग पण असतो , मस्त लाग्ते ति उकड नुसतिच खायला...>>>>>>+११११११११११११११Lick Lips

Pages