बकेट लिस्टः ती काहीच रिस्क घेत नाही!!!

Submitted by अश्विनीमामी on 27 May, 2018 - 10:17

भरला संसार मागे सोडून ती जीवनाचा अर्थ शोधायला हिमालयात गेली, मैत्रीणींबरोबर मज्जा करायला मे डिटरेनिअन क्रूज वर गेली, वस्तू जमवण्यातली व्यर्थता समजून ओदिशाच्या जंगलात आदिवाश्यांना आरोग्य सेवा द्यायला गेली, पोस्ट ग्रॅजुएट शिक्षण पूर्ण करून चांगली कन्सल्टंट झाली. स्टार्टप कंपनी काढून वर्किंग विमेनना सपोर्ट सर्विसेस चालू केल्या.........................

बकेट लिस्ट सिनेमातली मधुरा असे काहीही करत नाही. अर्धे आयु ष्य अतिशय सुखात, आईबाबांकडून प्रेमळ नव र्‍या कडे अलगद ट्रान्सफर झालेली ही सान्यांची सून चार लोकांसाठी एकच भाजी चार प्रकारे करण्यात धन्यता मानते. सगळंच फार गोड गोड. प्रभात रोड वर प्रशस्त लॉरी बेकर स्टा इलचा बंगला( पण ह्याची गल्ली कुठली ते नेम प्लेट वर लिहीलेले नाही.) टॉलरेबल सासू( वंदना गुप्ते स्लीप वॉकिंग थ्रू द रोल!!) कोणी तरी नि ष्प्रभ सासरा, ओके टाइप किड्स , सुमीत राघवन सक्सेसफुल नवर्‍याच्या हुकमी भूमिकेत अनेकाव्यांदा, मुलीशी माफक जनरेशन गॅप..... असे सर्व सुखद चित्र असताना ही मधुरा इतकी लकी की तिला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असताना ते हार्ट लगेच मिळून जाते.... अशीच सिनेमाची सुरुवात आहे मी उगाच लिहीत नाही.......

आता ही डोनर जी अपघातात वारली तिने ऑर्गन डोनेशन चा प्रण केलेला असतो. त्यानुसार ती आठ लोकांना नवे जीवन देते, पण तिच्या स्वतःच्या काही तारुण्य सुलभ इच्छा अपुर्‍या राहतात. आपली सरळ स्वभावाची मधुरा डोनर फॅमिली ला शोधून काढते. त्यांच्या ग्रीवींग प्रोसेस वर अतिक्रमण करून ह्या इच्छा पूर्ण करायचा प्रण करते ही
थो डक्यात कन्सेप्ट आहे.

माधुरी प्रत्येक फ्रेम मध्ये आहे. व दिसते पण सुंदर. प्रत्येक साडीत ड्रेस लेदर जॅकेट मध्ये इत्यादि. एकदा पार्टीवेअर पण घातले आहे. व हसते पूर्वी सारखीच. चेहरा थोडा ओघळत चालला आहे पण ते वयानुरूप होणारच. पण त्या पलीकडे एक अभिनेत्री म्हणून काहीही ग्रोथ झाली आहे असे पूर्ण चित्रपट भर जाण वत नाही. इथे माझी निराशा झाली. मी माधुरी फॅन आजिबातच नाही . पण कथेतही फार दम आणलेला नाही. ती रिस्कच घेत नाही कुठे.
कथा वस्तूत, संवादात, गाण्यात, नाचण्यात...... हार्लि डेविड सन बाइक चालवताना सुद्धा शी डझ नॉट चॅनेल हर इनर सेक्सी ऑर हर इनर सेल्फ टु बिगिन विथ..... सर्व कसे मोजून मापून. गोड हसत.

ती सई देशपांडे( डोनर ची )बकेट लिस्ट पूर्ण करायचा प्रयत्न करते आहे ह्याचे सईच्या फॅमिलीवर व
आप ल्यावरही दडपणच येते. कुठेच रिलीज किंवा क्लोजर ( हा शब्द चित्रपटात वापरला आहे. ) मिळत नाही. असे
मृत्यू नंतर सहा महिन्यांच्या आत क्लोजर मिलत असते तर काय हवे होते. मधुराची हार्ट कंडिशन, सईचे जाणे
हे सर्व एका सुपरफि शिअल व कधी कधी विनोदी पद्धतीने घेतले आहे. पण ब्लॅक ह्युम र नाही. कॉज रिमेंबा...
शी ड्झ नॉट टेक रिस्कस!!!

विशीच्या मुली च्या साध्या सुध्या इच्छा ही चाळीशीची दोन पोरांची आई पूर्ण करू बघते हे खरे पोटेन्शिअल आयडिया आहे. सईची व्यक्तिरेखा जेवढी आपल्याला समजते ती देखील खूप जेन्युईन वाटते. दापोलीतले सीन्स अतिशक सुरेख घेतले आहेत व्हिजुअली.

मधुराचे प्रयत्न अति शय लेम पद्धतीने पड द्यावर साकारले आहेत. हार्ली ची रेस तर अतिच विनोदी. सो लेम
त्यासाठी हिने डिझायनर लेदर जॅकेट कशाला घातले आहे असा प्रश्न पडतो. पोझ करत बसते नुसती. सईच्या बॉयफ्रेम्ड ला किस करायचा पहिला सीन एकदम इउ इंड्युसींग आहे. आय वॉज अन्कंफर्टेबल वॉचिंग इट. मधुरा क्लब मध्ये जाउन दारू पिऊन दंगा करते तो सीनही अतिशय लेम आहे. दारू पीनेसे यक्रु त विकृत होता है हे वाक्य अगदी फर्गेटेबल आहे. त्यापेक्षा कंगनाचे क्वीन मधले ड्रंकन सीन्स बघावे.

सईच्या भावाचे काम चांगले आहे. ही ग्रीविंगच्या मध्ये मध्ये येते आहे हे तो क्लीअर करतो. मधुराच्या माधुरीपणाने दबलेला वाटत नाही. पणजीच्या भूमिकेत शुभा खोटे एकदम मिसकास्ट आहे. साने वाटत नाही. मी साने गोडबोले
जोशी गोखले लोकांच्या पणज्या पाहिल्या आहेत.( कृपया वाचकांनी ऑफेंड होउ नये.. मी फक्त व्यक्ति रेखे च्या ओरिजिनॅलिटी साठी लिहीले आहे. त्या पिढीतील स्त्रिया बारीक किंचीत वाकलेली शरीरय्ष्टी , सुरकुतलेली स्किन, पांढर्‍या धोप पातळ केसांची बारीकशी मागे अम्बुडी, सुती नौवारी साडी अश्या असत. दिग्दर्शकाने रिसर्च करायला हवा इतका तरी. ) ती खोड कर आहे ते बरोबर आहे पण व्हिस्की ची बा टली जवळ बाळगून असते हे पटत नाही. दिग्दर्शकाने सर्व स्टिरीओ टाइप्स वापरून वापरून वैताग आणला आहे. पण कुठेही नॅरेशन मध्ये नाट्यमयता तो एक उच्च बिंदू येत नाही. प्रश्न समोर उभे राहतात त्यापेक्षा सहज पणे ते सुटतातही. बाईच्या सुंदर ़ कपाळाला आठ्या पडल्यातर? रडली आणि डोळ्या खाली काळे झाले तर? उगीच रिस्क नको.

मधुराचे सोनेरी वर्तूळ पूर्ण करणारे आईबाप आहेत दिलीप प्रभावळकर व एल दुगो मधली आई. मध्येच ही प्ण बकेट लिस्ट बनवते व त्या प्रमाणे हळदी कुंकू करते. व एक लेक्चर देते ़ कृ ष्णाच्यावेळी कुठे फोटो होते इत्यादि. व सर्वांना नौ वारी साडी नेसायची व पारम्पारिक दागिने घालायची एक संधी. हा लुक पण आता खूपच क्लिशेड झाला आहे. त्या हळदी कुंकवात मला गौरीची मूर्तीच कुठे दिसली नाही.

टॅटू काढवून घेणे, पेट अ‍ॅडॉ प्ट करणे ह्या आय टेम ला हात लावलेला नाही. कारण त्यात आरस्पानी सौंदर्याला धक्का पोहोचू शकतो व अटेन्शन पेट वर डायवर्ट होउ शकते. फ्रँक ली हाफ वे थ्रू द मुव्ही आय वॉज चेकीं ग पप फ्लिक्स ऑन इन्स्टाग्राम फॉर सम ओरिजिनल एक्स्प्रेशन्स अ‍ॅड फीलिन्ग्स.

मध्यंतरानंतर काहीतरी होईल म्हणून आप्ण वाट बघतो. तर काय? मलेशियाला जाउन मध्यम वयीन सेकंड हनीमून टाइप प्रेमगीत, सुमीत राघव न साराभाई वर्सेस सारभाई मध्ये एकदा सुरज हुआ मध्यम प्रेमगीत एका पेशं ट बरोबर गातो आहे असे मोनिशाला वाटते त्याच सीन्स मधले साधारण कपडे त्याने घातले आहेत. मधुरा एका डे फंक्षनला रेड कार्पेट टाइप मॅजेंटा पर्पल गाउन घालते!!!! हे प्र झेंटेशन सक्सेसफूल होउन सान्यांना सान होजे मध्ये जायचे आमंत्रण मिलते पण मधुरा जात नाही. इथेच राहुन लिस्ट पूर्ण करीन म्हणते. व्हॉट क्रायसीस. ड्वाले पाणावले. नॉर्मली सुद्धा कपल्स फॅमिलीज आपापल्या सोयीने जातात इथे तिथे.

शेव टी एक फर्गेटेबल गाणॅ व पार्टी. एका सीन मध्ये मला आशा होती की सईचा आत्मा किंवा स्पिरीट येउन मधुराला धन्यवाद म्हणेल तसे इरी लोकेश न तयार केले होते. पण इथे पण पतिराज च येउन पप्पी घेतात. ती ही
स्क्रीन वर नाही. उगीच रिक्स कशाला!!!

मग एक तू कशी स्फूर्ती प्रेर णा आहेस वगैरे टाइप शाळकरी स्वगत. व प्रभात रोड वरची स्टोरी सुफळ संपूर्ण.

एखादी स्मिता उंबर ठा कॅरी करते, एखादीच रिमा एखादीच अँजेलिना जोली, कधी तरी मेरील स्ट्रीप, कधी तरी सुलभा देशपांडे , विजया बाईं सारख्या ललना डो ळ्यात प्राण आणून बघावे असे अ‍ॅक्टिंग चेहर्‍याव रच्या सुरकुत्या न लपवतपू, पूर्ण शरीराचे माध्यम करून आपल्या परेंत पोहोचवतात. कारण त्या रिस्क घेतात. रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा सगळ्या पोस्ट ना +1
अजून लोकांचा पाहून व्हायचा असेल म्हणून लिहीत नव्हतो

1) माधुरी जेव्हा सुमित ला मी ही बकेट लिस्ट पूर्ण करणार आहे हे सांगते तेव्हा तो सकाळी ऑफिस ला जायची तयारी करत असतो. हे असे डिस्कशन कोणी ऑफिस ला जायच्या घाईत करते का?

2) लग्न होऊन 20 वर्षे झालेली बाई 1 दिवस दापोली ला जायचे तर आधी नवऱ्याशी बोलून ठरवेल आणि मग सासू सासर्याना मी जातेय हे सांगेल की रात्री जेवायच्यावेळी पंचायत बसवल्यासारखी सगळ्यांसमोर हा विषय मांडले?
तो अक्खा प्रसंग दिसगस्टिंग वाटतो, घरातील बाई 1 दिवसासाठी बाहेर जाईन म्हणतेय त्याला ही तिला परवानगी लागते. Sad (बऱ्याच घरात हे असे असेल याची कल्पना आहे, पण सिनेमात दाखवलेल्या आर्थिक/सामाजिक स्तराला ते सूट होत नाही)

3) माधुरी ऑर्गन डोनेशन कॅम्पेन ची face झाली, तिच्या सगळीकडे मुलाखती येत आहेत, प्रसारमाध्यमात ती फेमस होते आहे याचे घरी काहीच प्रतिसाद उमटलेले दिसत नाहीत,
एकदा हे "बकेट लिस्ट" प्रकरण सोशल मीडिया मध्ये हिट झाले आणि मग माधुरी मागे फिरते त्यामुळे तिच्यावर टीका होते असे काहीच दिसत नाही.
Actually हा मुद्दा वापरून खूप वेगळ्या पद्धतीने सिनेमाचे प्रमोशन करता आले असते. ट्विटर वर आणि FB वर लोकांनी आपली बकेट लिस्ट टाकायची, ऑर्गन डोनेशन चॅलेंज वगैरे प्रकार करून +ve पब्लिसिटी करता आली असती.
पण as ama said, रिस्क नको.

4) आपली आई अटक झाल्याचा व्हिडीओ 15 16 वर्षाची पोरगी मुद्दामहून 4 लोकांत येऊन दाखवेल का? फारतर ती आजी ला बाजूला बोलवेल.

5)अमेरिकेला जाण्याचे नाकारणे हा प्रसंग तर मूर्खपणाची हाईट आहे, सगळ्या घरासाठी झिजणारी बाई अचानक निःशंकपणे मुलांना नवऱ्याबरोबर पाठवून द्यायला तयार होते , आणि गाडीत बसण्या अगोदर मी येत नाही असे सांगते हे अनाकलनीय आहे. (20 दिवसांनी लिस्ट पूर्ण करून बाई जाऊ शकली असती पण तो ऑप्शन कोणी विचारात घेत नाही)

6) चैत्रगौरी चे हळदीकुंकू करणे हा कोणाच्या बकेट लिस्ट मध्ये आयटम असू शकतो हे ऐकून भरून आले (कदाचित तसे ते नसेल, पण एडिटिंगमुळे ती 2 वाक्य एक पाठोपाठ येतात त्यामुळे तसा समज होत असेल)

7) भाऊ सगळे फोटो जाळून टाकतो, त्याचा राग नक्की कोणावर आहे? त्याची शिक्षा आई बाबा ना का? आई बाबा त्याला थांबवत का नाहीत?

8) दापोली प्रसंगात ते क्ले फिगर्स टाकताना हे लोक अगदी पाण्याच्या शेजारी असतात, पुढच्या सीन ला डायरी टाकताना पुढे वाळूचा मोठ्ठा पट्टा दिसतो, हा बाबा, किनाऱ्याच्या एक टोकाला उभा राहून दूर पाण्यात वही भिरकवणार होता??

डायरी टाकताना पुढे वाळूचा मोठ्ठा पट्टा दिसतो, हा बाबा, किनाऱ्याच्या एक टोकाला उभा राहून दूर पाण्यात वही भिरकवणार होता??>> ट्रेलर बघताना हेच वाटले....वही ७-८ फूट लांब फेकून काय उपयोग, पाण्यात ती आपोआप चालत जाणार का?

सिम्बा +१११११

खरंतर डोनर ची माहिती अत्यंत गोपनीय असते, माधुरीला इतकी हातोहात ती फाईल मिळताना दाखवली आहे. हेतू उत्तम होता तिचा माहिती मिळवण्यासाठी पण उद्या अशी माहिती एकमेकांना गैर पद्धतीने पैसे उकळण्यासाठी वापरली गेली तर? (म्हणजे डोनरच्या घरच्यांनी रेसिपियन्ट घ्या घरच्याना) मिडिया हाच गैरसमज पसरवतो समजात की सर्व काही आरामात मिळते.

माधुरी कर्तव्यदक्ष गृहिणी आहे दाखवणारे दोन्ही प्रसंग,
पहिला ऑपरेशन च्या आधी दुधाचा निरोप आणि दुसरा हार्ट ची गॅरेंती वाढवून मिळेल का विचारणे अतिशय बालिश.

मला एक प्रश्न पडला आहे. इथे खूपच अवांतर आहे पण विचारतेच...
एखाद्या म्हातार्‍या नाही पण बर्‍यापैकी वय झालेल्या माणसाचे ह्रुदय (किंवा एखादा अवयव म्हणा हवे तर) तरुणाला दिले/ट्रांसप्लांट केले तर ते पुढे तेव्हढेच हेल्दी राहते का? म्हणजे माणुस जर ९० वर्षे जगत असेल तर त्यापेक्षा जास्त काळ त्याचे अवयव दुसर्‍या माणसाच्या शरिरात टिकतात का?

Sonalisl, ट्रान्सप्लांट करताना अवयव किती सुस्थितीत आहे यावर अवलंबून असणार बहुतेक.

आणि माणूस मरतो तो त्याचे सगळेच अवयव एकदम निकामी झाले म्हणून नाही तर त्यातला एखादा महत्वाचा अवयव निकामी झाला म्हणून. ब्रेन डेड म्हणजेही तेच ना? काही केसेसमध्ये माणूस ब्रेन डेड झाला तरी हृदय काम करत राहते. तेच हृदय बंद पडले तर धडधाकट किडणीही बंद पडते.

हो. सुस्थितीतला अवयव ट्रांन्सप्लांट करतात. तसेच माणुस मेल्यावर काही तासात अवयव काढून ट्रांन्स्प्लांट साठी वापरता येतात. पण ६० वर्षाच्या माणसाचे मुत्रपिंड जर ३० वर्षाच्य माणसाच्या माणसाला लावले आणि पुढे तो माणूस अजून ५० वर्ष जगला तर मुत्रपिंड ६०+५० वर्ष टिकेल?

सोनाली.... परफेक्ट क्वेस्चन. मी स्व: ता त्या मध्ये खुप वाचतोय (सेल बायालोजी) ... उत्तर जानुन घ्यायला खुप आवडेल

छान परिक्षण. शिल्पा तुळसकरबद्दल अनुमोदन. तिने खरंच छान केली असती भुमिका. सोनाली कुलकर्णीही चालली असती.

परीक्षणाशी सहमत! माधुरीचा 'आजा नचले' ही असाच भयानक गुडी गुडी होता. त्यात गावातल्याच लोकांना घेऊन शो करायचा अशी अट असते मग त्याच्यात मागे नाचणार्‍या मॉडेल्स, अतिभव्य सेटस, कपडे, नेपथ्य, प्रॉप्स हे सगळे कुठून येतात कोणास ठाऊक Sad
चोप्रा -जोहरच्या सिनेमात असे प्रश्न विचारायचे नसतात Wink
माधुरीकडे अभिनय आहे पण तो 'प्रहार', 'मृत्युदंड' अशा काही मोजक्या चित्रपटातच दिसून येतो. बाकी सगळीकडे सुंदर दिसणं, गोडगोड हसणं आणि त्याच त्या नृत्याच्या अदा. ती विद्या बालन, अलिया भटसारखी थोडी रिस्क का घेत नाही? स्टुडंट ऑफ द इयर ची आलिया आणि उडता पंजाब, डियर जिंदगी, राजी ची अलिया यांच्यात जमीनअस्मानाचा फरक होता. मग माधुरीच चोप्रा-जोहरच्या चौकटीत का अडकून बसली आहे? Sad

मी स्व: ता त्या मध्ये खुप वाचतोय (सेल बायालोजी) ... उत्तर जानुन घ्यायला खुप आवडेल>>>तुम्हाला ते उत्तर मिळाले तर मला कळवा Happy
नेटवर काही वाचले तर ते अवयवाप्रमाणे बदलते असे समजते. जसे हृदय कमीत्कमी ५-१० वर्ष, मुत्रपिंड १५-२० वर्ष इ.

मस्त परिक्षण अमा.
ऑन लाईनच बघणार आहे.

सोनाली, अवयवांची कम्पॅटीबिलीटी बघितली जाते की...
हे बघ ... https://www.telegraphindia.com/calcutta/match-key-to-transplant-232501

The age of the recipient is also an important criterion. A child recipient, for example, can't receive the heart of an adult.

अदिति, हार्टची साईझ (लहानाला मोठयाचं हृदय बसणार नाही) आणि बॉडी वेट बघणे हे मला वाटतं कंप्याटेबिलिटी दृष्टीने झालं.
सोनाली हृदयाची 'एक्सपायरी डेट' अशा अर्थी विचारत आहे मला वाटतं. अशी काही असते का? ती वाढवता येते का? हृदय फेल होण्याचा कर्व माणसाच्या वयावर असतो का हृदयाच्या ? अशा अर्थी.

सईचे सर्व मेमरीज फोटोज क्ले फिगरीन फेकून द्यायचे ह्याला पण काही लॉजिक नाही. साधारण पणे पूर्ण क्लोजर मिळाल्यावर अशी स्टेप घेतात डेथ झाल्यावर महिन्याभरात तर नाही. त्या वस्तू बघून एक प्रकारचा दिलासा मिळतो. सई ने बनवलेल्या भावा बहिणींच्या फिगरिन बघून मला ग्लॅडिएटर मधील त्या हिरोच्या बायको व मुलाच्या फिगरिन आठवल्या अचानक त्या परत भेटल्याने तो खूष पण होतो. जसे काही बायको मूल परत भेटले आहे. व नंतर ते गेल्याचे आठवून त्याला रडू पण येते. पुढे तो त्या चित्रांशी बोलताना दाखवला आहे. मी माझ्या बायकोशी काय बोलतो आहे इट इज नन ऑफ युअर बिझनेस असे बरोबरच्या य योध्याला दटावतो. एका छोट्या श्या पिशवीत ती दोन चित्रे घालून मधुरा सईच्या भावाला ते परत करते व पाठी वर हलके हात फिरवते असा एक संवादा विना सीन घेता आला असता.

मस्त लिहिलय! प्रतिसाद सुद्धा भारीच.
ट्रेलर! > मी ही पाहिला. त्यात ही खलनायक ची हिरॉईन त्या मुलीला `फक्त हिल्स??' विचारते तेव्हा तिला बिल्कु ल शोभत नाही; आणि ती सिनेमातही माधुरीच वाटत्येय, कथेची व्यक्तीरेखा नाही हे जाणवल!
मराठी बद्दल्च प्रेम ऐन उमेदीच्या काळात कधी दिसलं नाही.

खल नायकची हिरॉइन>> खरे आहे. चोली के पीछे गाणे पहिल्यांदा आले तेव्हा ऐकताना पण चोरट्या सारखे व्हायचे.
छायागीत वर एक क्लिपिंग यायुचे. मी सर्व गाणे पहिल्याम्दा युट्यूब वर घरी एकट्याने बघितले. त्यात तिचे हाव भाव अतिशय सजेस्टिव्ह व लीव्ह नथिंग टु इमॅजिनेशन असे आहेत. मी आजिबात जज मेंटल किंवा प्रूड नाही. पण त्या गाण्याने एक प्रकारची क्रांतीच आणली. संजय दत्तचे हावभाव पण एकदम हावरटासारखे आहेत. एक दो तीन फी मेल व्हर्जन पण अतिशय सजेस्टिव्ह आहे हालचालीत . व्हिच इज टोटली ओके इन इट्स प्लेस. ह्यागाण्यांनी अतिशय स्लिम व सुरेख हिरॉइनची ट्रेंड आणली.

त्या मानाने त्या मुलीचा ड्रेस क्युट आहे.

मॅक्स, मेक माय ट्रिप आणि ते कसले दही सार्खे म्हातारी खात असते व तिला पण खिलवते त्याचे प्रॉडक्ट प्लेसमेंट पण जरा इरिटेटिंग आहे. दापोलीला जायला मेक माय ट्रिप. मलेशि याला जायला मेक माय ट्रिप.

तरुणाई बोर झाली. आणि म्हातारी आई माधुरीला बघून खुश झाली. तिच्यात एक आपलेपणा जाणवतो नव्वदीतल्या मराठमोळ्या पिढीला हे मात्र एक खरेय .. जे लोकं सचिनचा खेळ बघत मोठे झाले तेच त्यावेळी आपली माधुरी बॉलीवूडची सुपर्रस्टार हिरोईन म्हणूनही अभिमान बाळगून होती. >>>++++११११
मराठी बद्दल्च प्रेम ऐन उमेदीच्या काळात कधी दिसलं नाही >> +१००

मराठी बद्दल्च प्रेम ऐन उमेदीच्या काळात कधी दिसलं नाही>>>>>>>

हिंदी व मराठी चित्रपटाचा एकत्रित इतिहास पाहिल्यास हिंदीत गाजलेल्या कुठल्या मराठी नटीने दोन्ही भाषांमध्ये समांतर पहिल्यापासून काम केलंय? अगदी जुना जमाना पाहू गेल्यास मला शोभना समर्थचे मराठी चित्रपट माहीत नाही पण नूतन, तनुजा दोघीही पन्नाशीत गेल्यावर एखाद दुसऱ्या मराठी चित्रपटात दिसल्या. उषा किरण जेव्हा तरुण होती व प्रचंड गोड दिसत होती तेव्हाचा तिचा एकही मराठी चित्रपट मला आठवत नाही. मराठीत तिच्या सगळ्या चित्रपटात ती जाडी व थोराडच आठवतेय. पद्मिनी कोल्हापूरे हल्ली चिमणी पाखरे मध्ये दिसलेली.

स्मिता पाटीलचा अपवाद - ती जेव्हा काम करत होती तेव्हा आर्ट सिनेमा व कमर्शियल सिनेमा अशी वॉटरटाईट खाती होती. तिने दोन्ही भाषेत समांतर काम केले, ते बहुतांशी आर्ट सिनेमे होते. स्मिताने हिंदी कमर्शियलसुद्धा यशस्वी केले पण मराठी कमर्शियलमध्ये नाही दिसली.

Pages