बकेट लिस्टः ती काहीच रिस्क घेत नाही!!!

Submitted by अमा on 27 May, 2018 - 10:17

भरला संसार मागे सोडून ती जीवनाचा अर्थ शोधायला हिमालयात गेली, मैत्रीणींबरोबर मज्जा करायला मे डिटरेनिअन क्रूज वर गेली, वस्तू जमवण्यातली व्यर्थता समजून ओदिशाच्या जंगलात आदिवाश्यांना आरोग्य सेवा द्यायला गेली, पोस्ट ग्रॅजुएट शिक्षण पूर्ण करून चांगली कन्सल्टंट झाली. स्टार्टप कंपनी काढून वर्किंग विमेनना सपोर्ट सर्विसेस चालू केल्या.........................

बकेट लिस्ट सिनेमातली मधुरा असे काहीही करत नाही. अर्धे आयु ष्य अतिशय सुखात, आईबाबांकडून प्रेमळ नव र्‍या कडे अलगद ट्रान्सफर झालेली ही सान्यांची सून चार लोकांसाठी एकच भाजी चार प्रकारे करण्यात धन्यता मानते. सगळंच फार गोड गोड. प्रभात रोड वर प्रशस्त लॉरी बेकर स्टा इलचा बंगला( पण ह्याची गल्ली कुठली ते नेम प्लेट वर लिहीलेले नाही.) टॉलरेबल सासू( वंदना गुप्ते स्लीप वॉकिंग थ्रू द रोल!!) कोणी तरी नि ष्प्रभ सासरा, ओके टाइप किड्स , सुमीत राघवन सक्सेसफुल नवर्‍याच्या हुकमी भूमिकेत अनेकाव्यांदा, मुलीशी माफक जनरेशन गॅप..... असे सर्व सुखद चित्र असताना ही मधुरा इतकी लकी की तिला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असताना ते हार्ट लगेच मिळून जाते.... अशीच सिनेमाची सुरुवात आहे मी उगाच लिहीत नाही.......

आता ही डोनर जी अपघातात वारली तिने ऑर्गन डोनेशन चा प्रण केलेला असतो. त्यानुसार ती आठ लोकांना नवे जीवन देते, पण तिच्या स्वतःच्या काही तारुण्य सुलभ इच्छा अपुर्‍या राहतात. आपली सरळ स्वभावाची मधुरा डोनर फॅमिली ला शोधून काढते. त्यांच्या ग्रीवींग प्रोसेस वर अतिक्रमण करून ह्या इच्छा पूर्ण करायचा प्रण करते ही
थो डक्यात कन्सेप्ट आहे.

माधुरी प्रत्येक फ्रेम मध्ये आहे. व दिसते पण सुंदर. प्रत्येक साडीत ड्रेस लेदर जॅकेट मध्ये इत्यादि. एकदा पार्टीवेअर पण घातले आहे. व हसते पूर्वी सारखीच. चेहरा थोडा ओघळत चालला आहे पण ते वयानुरूप होणारच. पण त्या पलीकडे एक अभिनेत्री म्हणून काहीही ग्रोथ झाली आहे असे पूर्ण चित्रपट भर जाण वत नाही. इथे माझी निराशा झाली. मी माधुरी फॅन आजिबातच नाही . पण कथेतही फार दम आणलेला नाही. ती रिस्कच घेत नाही कुठे.
कथा वस्तूत, संवादात, गाण्यात, नाचण्यात...... हार्लि डेविड सन बाइक चालवताना सुद्धा शी डझ नॉट चॅनेल हर इनर सेक्सी ऑर हर इनर सेल्फ टु बिगिन विथ..... सर्व कसे मोजून मापून. गोड हसत.

ती सई देशपांडे( डोनर ची )बकेट लिस्ट पूर्ण करायचा प्रयत्न करते आहे ह्याचे सईच्या फॅमिलीवर व
आप ल्यावरही दडपणच येते. कुठेच रिलीज किंवा क्लोजर ( हा शब्द चित्रपटात वापरला आहे. ) मिळत नाही. असे
मृत्यू नंतर सहा महिन्यांच्या आत क्लोजर मिलत असते तर काय हवे होते. मधुराची हार्ट कंडिशन, सईचे जाणे
हे सर्व एका सुपरफि शिअल व कधी कधी विनोदी पद्धतीने घेतले आहे. पण ब्लॅक ह्युम र नाही. कॉज रिमेंबा...
शी ड्झ नॉट टेक रिस्कस!!!

विशीच्या मुली च्या साध्या सुध्या इच्छा ही चाळीशीची दोन पोरांची आई पूर्ण करू बघते हे खरे पोटेन्शिअल आयडिया आहे. सईची व्यक्तिरेखा जेवढी आपल्याला समजते ती देखील खूप जेन्युईन वाटते. दापोलीतले सीन्स अतिशक सुरेख घेतले आहेत व्हिजुअली.

मधुराचे प्रयत्न अति शय लेम पद्धतीने पड द्यावर साकारले आहेत. हार्ली ची रेस तर अतिच विनोदी. सो लेम
त्यासाठी हिने डिझायनर लेदर जॅकेट कशाला घातले आहे असा प्रश्न पडतो. पोझ करत बसते नुसती. सईच्या बॉयफ्रेम्ड ला किस करायचा पहिला सीन एकदम इउ इंड्युसींग आहे. आय वॉज अन्कंफर्टेबल वॉचिंग इट. मधुरा क्लब मध्ये जाउन दारू पिऊन दंगा करते तो सीनही अतिशय लेम आहे. दारू पीनेसे यक्रु त विकृत होता है हे वाक्य अगदी फर्गेटेबल आहे. त्यापेक्षा कंगनाचे क्वीन मधले ड्रंकन सीन्स बघावे.

सईच्या भावाचे काम चांगले आहे. ही ग्रीविंगच्या मध्ये मध्ये येते आहे हे तो क्लीअर करतो. मधुराच्या माधुरीपणाने दबलेला वाटत नाही. पणजीच्या भूमिकेत शुभा खोटे एकदम मिसकास्ट आहे. साने वाटत नाही. मी साने गोडबोले
जोशी गोखले लोकांच्या पणज्या पाहिल्या आहेत.( कृपया वाचकांनी ऑफेंड होउ नये.. मी फक्त व्यक्ति रेखे च्या ओरिजिनॅलिटी साठी लिहीले आहे. त्या पिढीतील स्त्रिया बारीक किंचीत वाकलेली शरीरय्ष्टी , सुरकुतलेली स्किन, पांढर्‍या धोप पातळ केसांची बारीकशी मागे अम्बुडी, सुती नौवारी साडी अश्या असत. दिग्दर्शकाने रिसर्च करायला हवा इतका तरी. ) ती खोड कर आहे ते बरोबर आहे पण व्हिस्की ची बा टली जवळ बाळगून असते हे पटत नाही. दिग्दर्शकाने सर्व स्टिरीओ टाइप्स वापरून वापरून वैताग आणला आहे. पण कुठेही नॅरेशन मध्ये नाट्यमयता तो एक उच्च बिंदू येत नाही. प्रश्न समोर उभे राहतात त्यापेक्षा सहज पणे ते सुटतातही. बाईच्या सुंदर ़ कपाळाला आठ्या पडल्यातर? रडली आणि डोळ्या खाली काळे झाले तर? उगीच रिस्क नको.

मधुराचे सोनेरी वर्तूळ पूर्ण करणारे आईबाप आहेत दिलीप प्रभावळकर व एल दुगो मधली आई. मध्येच ही प्ण बकेट लिस्ट बनवते व त्या प्रमाणे हळदी कुंकू करते. व एक लेक्चर देते ़ कृ ष्णाच्यावेळी कुठे फोटो होते इत्यादि. व सर्वांना नौ वारी साडी नेसायची व पारम्पारिक दागिने घालायची एक संधी. हा लुक पण आता खूपच क्लिशेड झाला आहे. त्या हळदी कुंकवात मला गौरीची मूर्तीच कुठे दिसली नाही.

टॅटू काढवून घेणे, पेट अ‍ॅडॉ प्ट करणे ह्या आय टेम ला हात लावलेला नाही. कारण त्यात आरस्पानी सौंदर्याला धक्का पोहोचू शकतो व अटेन्शन पेट वर डायवर्ट होउ शकते. फ्रँक ली हाफ वे थ्रू द मुव्ही आय वॉज चेकीं ग पप फ्लिक्स ऑन इन्स्टाग्राम फॉर सम ओरिजिनल एक्स्प्रेशन्स अ‍ॅड फीलिन्ग्स.

मध्यंतरानंतर काहीतरी होईल म्हणून आप्ण वाट बघतो. तर काय? मलेशियाला जाउन मध्यम वयीन सेकंड हनीमून टाइप प्रेमगीत, सुमीत राघव न साराभाई वर्सेस सारभाई मध्ये एकदा सुरज हुआ मध्यम प्रेमगीत एका पेशं ट बरोबर गातो आहे असे मोनिशाला वाटते त्याच सीन्स मधले साधारण कपडे त्याने घातले आहेत. मधुरा एका डे फंक्षनला रेड कार्पेट टाइप मॅजेंटा पर्पल गाउन घालते!!!! हे प्र झेंटेशन सक्सेसफूल होउन सान्यांना सान होजे मध्ये जायचे आमंत्रण मिलते पण मधुरा जात नाही. इथेच राहुन लिस्ट पूर्ण करीन म्हणते. व्हॉट क्रायसीस. ड्वाले पाणावले. नॉर्मली सुद्धा कपल्स फॅमिलीज आपापल्या सोयीने जातात इथे तिथे.

शेव टी एक फर्गेटेबल गाणॅ व पार्टी. एका सीन मध्ये मला आशा होती की सईचा आत्मा किंवा स्पिरीट येउन मधुराला धन्यवाद म्हणेल तसे इरी लोकेश न तयार केले होते. पण इथे पण पतिराज च येउन पप्पी घेतात. ती ही
स्क्रीन वर नाही. उगीच रिक्स कशाला!!!

मग एक तू कशी स्फूर्ती प्रेर णा आहेस वगैरे टाइप शाळकरी स्वगत. व प्रभात रोड वरची स्टोरी सुफळ संपूर्ण.

एखादी स्मिता उंबर ठा कॅरी करते, एखादीच रिमा एखादीच अँजेलिना जोली, कधी तरी मेरील स्ट्रीप, कधी तरी सुलभा देशपांडे , विजया बाईं सारख्या ललना डो ळ्यात प्राण आणून बघावे असे अ‍ॅक्टिंग चेहर्‍याव रच्या सुरकुत्या न लपवतपू, पूर्ण शरीराचे माध्यम करून आपल्या परेंत पोहोचवतात. कारण त्या रिस्क घेतात. रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे काही ट्रेलर्स बघितले त्यावरुन अजिबातच बघावासा वाटला नाही. माधुरीला नीट मराठी बोलता येत नाही हे ऐकून रागच आला आणि काट मारली ह्या पिक्चरवर.

>>रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी!!!<<

माधुरीने हा सिनेमा प्रोड्युस्/डायरेक्ट केलाय का?..

Happy पोटतिडकीने लिहिलंय. वरवरची स्टोरी आणि सोल्युशन आधी लिहून मग उलटी सिद्धता लिहीत लिहिलेला प्रॉब्लेम हा जवळजवळ यूएसपी आहे मराठी सिनेमाचा. स्टोरीओ टाईपचा सुकाळ वाचून न बघताच डोळ्यापुढे आला.
नुसतं चांगलं दिसणं असेल तर नेफ्लिवर आल्यावर बघेन, मुद्दाम कसरत करत आत्ता वेळ नाही दवडत.
धन्यवाद Happy
दिग्दर्शक, कथा/पटकथा कोणाची आहे?

बरे झाले तुमचा धागा आला, Happy
काल पासून याला पिक्चर ला मनसोक्त शिव्या घालायच्या होत्या पण वेगळा धागा काढण्याइतके ते वर्थ वाटत नव्हते.
थोड्यावेळात लिहितो

माधुरीच्या मनात बरेच वर्ष पिंजरा करायचा आहे म्हणून जिकडेतिकडे ज्वानीच्या आगीची मशाल घेऊन फिरते.

कितीही लाऊड असली तरी संध्याने जे केलं त्याच्या आसपास तरी जाऊ शकेल का?
पटलं कशाला उगाच रीस्क

चित्रपट धर्मा प्रॉडक्शनचा आहे त्यामुळे रीस्क असूच शकत नाही.

अमा, अमित म्हणतो तसं पोटतिडकीनं लिहीलेलं जाणवतंय.
माधुरीची झेप फक्त हसण्यापर्यंतच आहे. अभिनय कुठल्या चित्रपटात केलाय तिनं रीस्क घेऊन? श्रीदेवीशी तुलना करण्याचा मोह आवरत नाहीये - श्रीदेवीनं स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न 'इंग्लीश विंग्लिश' मधे चांगला केला आहे. निदान प्रामाणिक वाटते. तीही दुर्दैवानं सुंदर दिसणे या मोहातून बाहेर पडू शकली नाही, पण निदान जो काही प्रयत्न केला तो प्रामाणिक आणि कन्विसिंग वाटतो.

बाय द वे, मी श्रीदेवी आणि माधुरी दोघींचीही फॅन नाही.

<<<<एखादी स्मिता उंबर ठा कॅरी करते, एखादीच रिमा एखादीच अँजेलिना जोली, कधी तरी मेरील स्ट्रीप, कधी तरी सुलभा देशपांडे , विजया बाईं सारख्या ललना डो ळ्यात प्राण आणून बघावे असे अ‍ॅक्टिंग चेहर्‍याव रच्या सुरकुत्या न लपवतपू, पूर्ण शरीराचे माध्यम करून आपल्या परेंत पोहोचवतात. कारण त्या रिस्क घेतात. रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी!!!>>>> भारतीय चित्रपटसृष्टीत दुर्दैवानं ९०% वेळा फिमेल रोल्स हे चांगले दिसणे आणि चांगले नाचता येणे यापलीकडे लिहीले जात नाहीत.

फार खरे लिहिले आहे अमा! ट्रेलर आणि इतर परीक्षणांवरून अंदाज आलाच होता. तरी बहुतेक आईबरोबर जाईन बघायला.. आजा नचले खूप उत्साहाने बघायला गेले होते पण साफ निराशा झाली होती. देढ इश्किया लॅपटॉपवरून बघितला. त्यात ठिक वाटली होती. Sri devi played and won the come back game better than Madhuri for sure. पण तरी मला अजून आशा आहे - टोटल मस्ती (का धमाल?) आणि कलंक येतील ते बरे असतील अशी!
माधुरीला अभिनय येतो पण बऱ्याच वर्षांत तो दिसला नाहीये.
रच्याकने, त्या शेवटच्या परिच्छेदात रोहीणी हट्टंगडी यांचेही नाव असले पाहिजे.. अफाट रेंज आहे त्यांचीही __/\__

रोहीणी हट्टंगडी यांचेही नाव असले पाहिजे.. अफाट रेंज आहे त्यांचीही>>> उलट मला त्यांचा अभिनय फार कृत्रिम वाततो. 'प्रेमाची गोष्ट' या सिनेमात इतक्या ज्येष्ठ अभिनेत्रीची कृत्रिम संवादफेक पाहून निराशा झाली होती.

उगीच माधुरीच्या नावाने बिल फाडले. करण जोहरचा सिनेमा! त्यात कुठे स्मिता, शबाना नि मेरिल शोधायच्या. एखादीच निमरत कौर क्वचित सापडते. आग से ठंड्क बर्फ से गरमी मांग के हम पछताए...

प्रश्न समोर उभे राहतात त्यापेक्षा सहज पणे ते सुटतातही. >> सिनेमात का होईना कुणाच्याही आयुष्यातले प्रश्न सुटावेत की. आपल्याला चांगले वेगळे काही बघायला मिळावे म्हणून पात्रांच्या आयुष्यातील प्रश्न सुटू नयेत, नाट्यमय व्हावेत हे काय पटत नाही. एखाद्या पात्राचे प्रश्न सुटले चटचट तर ती "फँटसी" बघायला काय हरकत आहे?

दिर्घ प्रतिसाद लिहिला आणि save करताना ईरर आला. जाऊद्या.
भारी लिहिलय. तसाही पहाणार नव्हतोच. पण पाहिलाही असता. पण नकोच आता.
घाईत लिहिलय का?

थोडे कलाकारांविषयी

1) वंदना गुप्ते- त्यांच्या हातखंडा रोल मध्ये, पण मातीच्या चुली सिनेमा चे एक्सटेन्शन असल्यासारख्या वावरतात.
2) वेलणकर - याना काही अस्तित्वच नाहीये.
3) शुभा खोटे- सिनेमा/सीरिअल च्या नियमांप्रमाणे बिजी, बा वगैरे काळानुसार बदलणाऱ्या आजेसासूच्या भूमिकेत. सासू /आई ची जनरेशन रेग्रेसीव , आजेसासू /आजी ची पिढी प्रोग्रेसिव्ह आणि सून/मुलगी कन्फ्युजड हा घासून घासून गुळगुळीत झालेला पात्र संच आहे. अमानि म्हंटल्या प्रमाणे या कुठेही 75-80 वयोगटातील वाटत नाहीत.
5) दिलीप प्रभावळकर- टोटल फुकट, काही कामच नाही.
6) ईला भाटे- सुरवातीची एन्ट्री एक्दम एका लग्नाची दुसरी गोष्ट स्टाईल, पण ओव्हर ऑल सुसह्य वावर.
7) रेणुका शहाणे- सगळ्यात खरी वाटणारी व्यक्तिरेखा, आणि त्यात अगदी फिट बसते.
8)पाठक, आणि सुमित राघवन- काही विशेष सांगण्यासारखे नाही.
9) सई चा मित्र- आवडला , खरा वाटतो , चांगला वावर
10) सई चा भाऊ - लेखकाने या व्यक्तिरेखेला काही डायमेंशन्स च दिल्या नाही आहेत, अर्धा पिक्चर फक्त दुखवलेला लुक देऊन फ्रेम मधून बाहेर पडणे इतकेच काम आहे. याचे दिसणे शाईनी अहुजा ची आठवण करून देते. याचे काम फारसे आवडले नाही, शेवटच्या गाण्यात फारच तणावाखाली वाटतो.
11) माधुरी- चित्रपटात जवळ जवळ 95% फ्रेम्स मध्ये माधुरी आहे. ती सुंदर दिसते वगैरे वेगळे लिहायला नकोच, पण क्लोज अप शॉट मध्ये चेहरा अनैसर्गिक वाटतो, (श्रीदेवी किंवा हेमा मालिनीचा चा वाटतो तसा) सगळ्या फ्रेम्स मध्ये ती "माधुरी दीक्षित" म्हणूनच वावरते. कुठेच ती एकत्र कुटुंब सांभाळताना तारांबळ उडालेली स्ट्रेसस्ड आउट गृहिणी वाटत नाही. (तुम्हारी सुलु मध्ये विद्या अगदी हीच ती सुलु वाटावी इतकी फिट होती तशी)
यात ती कुठल्याच प्रसंगात खरी वाटत नाही, फक्त मुलांशी बोलतांच्या 1 2 प्रसंगात सूर, आणि आवाज खरा वाटतो. बाकी फार कृत्रिम बोलते. (यात मोठा हात तिच्या भयाण शब्दोच्चाराचा आहे) पण मुळात लेखकाने ही मध्यवर्ती भूमिका फारच कॅज्युअली लिहिली आहे.

हा झाला पात्र परिचय, आता प्रत्यक्ष स्टोरी, डायरेक्शन वरची चीड चीड पुढच्या भागात.

बकेट लिस्ट माज्या लाइफचं पप्पज आहे असं ती मुलगी ऐकवते तिकडेच मला ''परमेश्वरा, एक तरी पिच्चर मराठीत कर!'' असं झालं. अमा, बघू की नको सांग ना!

सगळ्या उणीवांसकट मला आवडला . शेवटी करण जोहरचा सिनेमा आहे तो . मग त्याच्या इतर हिंदी सिनेमासारखा असणारच. वन टाइम वोच नक्कीच . बघायचं कि नाही हे ज्याने त्याने ठरवावे. थियेटर ९०% भरलेलं होत Happy

मलाही अजिबात नाही आवडला.
रेणूका शहाणे च फक्त आवडली आणि तिचं कवितावाचन.

ते दोघे नवरा बायको मलेशियात असताना एका सीनमध्ये ती पार्टी ड्रेस घालून अवतरते. पण त्या सीनमध्ये आणि इतर वेळेला जेंव्हा ती सामान्य गृहिणी म्हणून वावरते तेव्हा सारखीच दिसते. थोडक्यात “माधुरी दिक्षीत“ च सतत दिसते. दिग्दर्शकाला नाही जमलं तर किमान हीने तरी काही स्पार्क दाखवायला हवा ना? Happy

अरेरे ! फार निराशा झाली हे वाचुन , तसा ट्रेलर वरुन अन्दाज आला होताच सगळ्या गुडिगुडी कारभाराचा

चित्रपट कसा वाटला वरची माझीच पोस्टः
much awaited बकेटलिस्ट काल पाहिला. तुम्ही माधुरीचे फॅन असाल (असाल म्हणजे काय ?? कोण नाहीये !!) तर सिनेमा आवडेल. एकदा पाहण्यासारखा आहे. खरंतर फार अपेक्षा घेऊन गेलो होतो, सगळ्या पूर्ण झाल्या नाहीत. एकच पूर्ण झाली, संपूर्ण सिनेमात.. जीन्स टॉप असो, कुर्ता-लेगिन्स असो, साडी - नऊवारी असो.. माधुरी कमाल दिसलीये ! विशेष उल्लेख रेणुका शहाणेच्या घरी ती पहिल्यांदा येते त्या वेळच्या साडीच्या :डोळ्यात बदामः
बर्‍याच गोष्टी खटकल्या, पण स्पॉयलर्स टाकायची घाई नाही.. तेव्हा नंतर..

एखाद्या पात्राचे प्रश्न सुटले चटचट तर ती "फँटसी" बघायला काय हरकत आहे?>> हरकत काहीच नाही. तू बघ ना.
मी तर इद ला रेस थ्री पण बघ णार आहे.

मसला वो नहीं है. मसला ये है कि आपा अपनी कारीगरी दिखायें कि नहीं. प्रश्न तिच्या काही विचारसरणी / कृती मुळे सुट त नाहीत. परिस्थिती नॉर्मल अ‍ॅ ज इटिज रनिंग ठेवायला किती मेहनत व विचारशक्ती खर्च करावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. बट हिअर साने बाई गेट्स एवरिथिंग ऑन अ प्लॅटर. का? ती सुरेख हसते म्हणून? मग सईने काय वाइट केले होते कोणाचे. अश्राप तरूण जीव मारला कथेसाठी ते. म्हातारे माणूस वारले व तिचे हार्ट तरूण मुलीला दिले असे ही दाखवता आले असते. शी जस्ट अ‍ॅप्रोप्रिएट्स सईज ड्रीम्स जस्ट टु फुल फिल हर डिझायर टू पे बॅक.

जालावर एक व्हिडीओ आहे. एक बाळ जन्मता च काही दिवसात जाते व त्याचे हार्ट दुसृया बाळात ट्रान्स प्लांट करतात. व मग ते थोडॅ दीड वर्शाचे झाले की पहिल्या गेलेल्या बाळा ची आई दुसृया बेबीच्या छातीला कान लाउन आपल्या बाळाच्या हार्ट चे ठोके ऐकते. एक मिनीटाचा विडीओ आहे पण मन अगदी हलून जाते ते इथे दोन तास चित्रे बघून होत नाही.

आता या परिक्षणाबद्दल. अमा एकदम परफेक्ट लिहिलंय.
माधुरीने एकदम हातचं राखून काम केल्यासारखं वाटलं. मराठीतून बोलावं लागत असल्याचा एक प्रकारचा कॉम्प्लेक्स सिनेमाभर जाणवला.
बाइक रेस च्या प्रसंगाबद्दल मात्र अमांशी असहमत. ४०-४५ ची स्त्री फक्त बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून बाइक शिकते (नोट.. फक्त शिकते, सराईत पणे चालवत नाही) म्हणून ती रेस खरी वाटते असं माझं मत. जॅकेट वगैरे गोष्टी उगीचच त्याचा 'फिल' यायला !
वंदना गुप्तेंच्या मराठमोळ्या हिंदीचा व्हॉट्स अप जोक्स ने वगैरे अतिरेक झालेला असल्याने, नावीन्य राहिलं नाही. रेशम टिपणीस ची ओव्हर अ‍ॅक्टिंग डोक्यात गेली !
चंदनाचा टिका लावलेल्या शोभा खोटेंना पाहताच, अप्पू राजा मधल्या राजा च्या आई सारख्या त्या 'अयय्यो अय्यो' म्हणतात की काय असं वाटलं . बर्‍याच दिवसांनी दिसल्याने त्यांचे प्रसंग आवडले देखील, पण खरंच अशी पणजी असू शकते का असं नंतर वाटत राहिलं.
राहून राहून श्रीदेवीच्या 'इंग्लिश विंग्लिंश' शी तुलना करायचा मोह होतोच. श्रीदेवी ने ज्या सहजतेने ती भूमिका निभावली, त्याला तोड नाही. अर्थात पटकथा, दिग्दर्शक वगैरे मधला मोठा फरक आहेच ! त्यामुळे अमांच्या रिस्क घेत नाही या सूराशी सहमत..
ही भूमिका माधुरी ऐवजी पल्लवी जोशी , शिल्पा तुळसकर, सोनाली कुलकर्णी यांपैकी कोणीही केली असती तरी चालून गेलं असतं असं वाटलं..
.. पण परत एकदा.. माधुरी कमाल दिसली आहे Happy

बकेट लिस्टचा ट्रेलर पाहून अंदाज येतो पुढे काय वाढून ठेवलेय त्याचा. तसे असले तरीही एकदा पाहण्याजोगा नक्कीच आहे हा विश्वासही ट्रेलर देतो.

परतल्यापासून माधुरी स्वतःच्या गुडी गुडी इमेजमध्ये अडकलीय. तिच्या काळाचा मेकअप व आजचा मेकअप यात जमीन अस्मानाइतका फरक पडलेला आहे हे तिच्या गावीच नसल्यागत तोंडावर 1 इंच मेकअप घेऊन ती सार्वजनिक आयुष्यात वावरते. वयाला व काळाला साजेसा मेकअप केला तर ती अजून सुंदर दिसेल.

बाकी राहिली गोष्ट अभिनयाची, काही अभिनेते पूर्णपणे दिग्दर्शकाचे असतात, ते जसा अभिनय करवून घेतात तसे ते करतात, माधुरी बहुतेक या गटात असावी. ती खूप चांगली अभिनेत्री आहे, तिने हे वारंवार सिद्ध केलेले आहे पण दिग्दर्शकाकडे तिच्याकडून चांगले काम करवून घ्यायची क्षमता हवी असावी.

श्रीदेवीच्या इंग्लिश विंग्लिशबरोबर तुलना होणे अपरिहार्य आहे. तेव्हाही श्रीदेवीचे भयाण हिंदी उच्चार, आवाज व ताणलेला चेहरा डोक्यात गेला होता, पण त्याची कसर तिने अभिनयाने भरून काढली, ती शशी वाटली, श्रीदेवी दिसली नाही. अर्थात दिग्दर्शकाचाही खूप मोठा वाटा होता ती शशीच दिसेल यात. माधुरी पडद्यावर माधुरीच दिसत असेल तर अवघड आहे. हिंदी नट्या त्यांचे आदर्श म्हणून कायम हॉलिवूडमधली दोन चार नावे जपत असतात. एकदा यांनी त्यांची सर्व वयातली कामे पाहावीत व योग्य तो बोध घ्यावा.

माधुरी बद्दल सगळ्यांनी जे काही लिहिलंय (मित ने लिहिलेलं सोडुन Happy ) त्याच्याशी सहमत. साधनाने जे मेकपबद्दल लिहिलंय ते तर अगदी अगदी.
ट्रेलर बघुन काहीतरी खटकलेलं. माधुरी सहज वाटत नव्हती. फक्त सुंदर दिसत असेल तर आणि बाकी अभिनयाची बोंब असेल आणि अति गोग्गोड असेल तर बघणार नाहीच. मला तर ही आताची माधुरी सुंदर पण वाटत नाहीच. एकेकाळी माझी फेव्ह्रेट होती. पण अता काहीतरी हुकलंय तिचं Happy
अमा, खरंच पोटतिडीकेने लिहिलंय. पण जरा अमा टच नाहीये. (थोडक्यात कमी खौट वाट्ला लेख Light 1 )

चांगलं लिहिलंय.
ट्रेलर पाहिला.मराठी बोलण्याचं प्रेशर जाणवलं.(खरं तर हा हिंदीतच बनवायला हवा होता का?)
मुळात मला हा रोलच माधुरी ला साजेसा वाटला नाही.मी या रोल मध्ये सिनियर सोकू किंवा थोडी मोठी मेकअप करून मुक्ता बर्वे किंवा विभावरी देशपांडे(नटरंग मधली बायको) पाहू शकले असते.

सिनेमा पाहिला..एकदा बघण्यालायक नक्किच आहे. स्टोरी आणि कंसेप्ट चांगली आहे. माधुरीला भाषेचं ईट्ट जमलं नाही त्यामुळे कॄत्रिमपणा जाणवतो. तरीही तीचा पब मधला सीन मस्त जमून आलाय. दुर्दैवाने माधुरीची स्टारपॉवर तिच्यामधल्या अ‍ॅक्टरला बरेचवेळा मारते.

पुर्ण अनुमोदन.. कालच पाहिला..
मागच्या रविवारी.. राझी पाहिला.. आणि डोक्यात असा घुसला की बसं..
हा चित्रपट भिडलाच नाही..राझी शी तुलना म्हणुन नाही लिहिलेलं .. राझी गंभीर होता.. पण हलके फुलके सिनेमे पण डोक्यात असं घर करतात की बसं .. बरेली की बर्फी आठवला.. अशीच साधी थिम.. पण काय मजा आणलिय..
माधुरी न तरुण ना वयस्कर.. भलतिच वाटलिये.. सिन मागे सिन तुकड्यात येउन जातात.. सलग वाटत्च नाही..
जुनी इमेज .. अवखळ वगैरे... जपतच काहीतरी दाखवायचय असं वाटत होतं..
सईचा भाउ आवडला.. सगळ्यांमधे तोच विश्वासार्ह वाटला..आवाज संवादफेक सगळं नीट..
बाकी सगळे,, टिपिकल स्टिरिओटाएप्स सिद्द्ध करायला आल्यासारखे..
वंदना गुप्तेंच पात्र एक दोन संवादात जेवढ पोहचवता आलं तेवढं पोहचवलय.. बाकी मधे मधे दोन तिनदा उगाचच लाफ्टर मिळवायला.. हिंदी-मराठी बोलण्याचे सिन्स..
सईच्या विषयी.. एखादं पात्र चित्रपटभर दाखवायचच नाहिये.. पण त्या पात्रावरच सिनेमा बेतला आहे ..तर निदान संवादातुन तर ते पात्र पोहचायला हवं .. "काय होती ना सई".. यापुढे विषेश काही बोललं जात नाही..
त्यामुळे ते भिडतही नाही..
जाउ दे.. एक्दा बघु शकतो.. पण घरी बघितला तरी चालेलं

Pages